समिधाताईंनी दिलेली गवारीच्या पुर्यांची ही पाककृती वाचून गवारीच्या आठवणीने जीव व्याकुळ झाला.
कविता अर्थातच रद्दड आहे, पण गवारीच्या प्रति व्यक्त केलेल्या भावना प्रामाणिक आहेत.
***
गवार
बारकुळी ती, हिरवी हिरवी,
छान कोवळी,
गवारशेंग मला हवी
कुटाबरोबर वाफवलेली,
छान रटरटीत शिजवलेली,
गवारशेंग मला हवी
भले कितीही गोड मटार,
फोलपटे बेचव त्याची,
पापुद्रयासहित दाण्यांची,
गवारशेंग मला हवी
आडदांड तो फ्लॉवर केवढा,
सात्विक तो श्रावण घेवडा,
दुध्याचा डौलदार आकडा
अहो घ्या ते शेकडा,
घ्या ते शेकडा,
पण गवारीचाच सडा
दारी माझ्या.
गवारीचाच सडा, दारी माझ्या
भरले वांगे
तुम्हीच चापा,
बटाट्याचे रस्से
अखंड ओरपा,
बेत असेल तुमचा तो खास,
मज नाही त्याची आंस
सडसडीत बांध्याची ती,
लवचिक साधीभोळी,
माझी गवार मला हवी
एक डाव खावूद्याना
एक डाव खावूद्याना
मला गवारीची भाजी
प्रतिक्रिया
13 Jan 2009 - 2:01 pm | विसोबा खेचर
सडसडीत बांध्याची ती,
लवचिक साधीभोळी,
माझी गवार मला हवी
अतिशय सुरेख, बोलकी आणि बोलघेवडी कविता!
जियो..! :)
तात्या.
13 Jan 2009 - 4:11 pm | लिखाळ
बोलकी आणि बोलघेवडी कविता!
बोलकी आणि बोलगवारी कविता ;)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
14 Jan 2009 - 10:31 am | आकडा
भेंडी! गवारीवरची कविता लई भारी हाय!
13 Jan 2009 - 2:04 pm | मनस्वी
खूपच आवडली कविता. मस्त आहे!
13 Jan 2009 - 6:05 pm | चंबा मुतनाळ
गवार हा विषय घेऊन केलेली ही मराठीतील पहिलीच कविता असेल!
लय आवडली.
13 Jan 2009 - 6:38 pm | शंकरराव
कविता अर्थातच अप्रतिम आहे
अजून बर्याच शेंगा\भाज्या बाकी आहेत येउद्यात अजून
13 Jan 2009 - 6:36 pm | झेल्या
हल्ली गवार फार महाग झाली आहे... :)
हापूसचे रसग्रहण...
कांदे-बटाटे-टमाटे वरील लेख...
चवळी वरील चारोळी...
शेवगा-वाल-शिमला यांवरील ललित लेख...
पालक्-चुका यांची कथा..
देवडांगरावर कादंबरी...
या सर्वांच्या प्रतिक्षेत...
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
13 Jan 2009 - 7:10 pm | राघव
वाह... एकदम वेगळी कविता!! :)
मुमुक्षु
अवांतरः
अरे त्या कोळंबीवर कुणी करा रे कविता...
(दुर्दैवी शाकाहारी)मुमुक्षु
13 Jan 2009 - 8:24 pm | प्राजु
शाळेत असताना एका नाटकांत सगळ्या भाज्या गप्पा मारत असतात असा काही प्रवेश होता... त्यात गवारीच्या मुखी.. "सर्वांची नावडती तरी खूप औषधी" असा काही संवाद होता त्याची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Jan 2009 - 9:01 pm | सुचेल तसं
वा!!!!
मस्त आहे कविता...
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
14 Jan 2009 - 12:27 am | समिधा
वेगळी कविता आहे.
तुम्हाला गवार खुपच आवडते अस दिसतय.
:H
14 Jan 2009 - 4:58 am | मदनबाण
एकदम मस्त कविता...
मदनबाण.....
"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -