सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही! त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे! ,अशी विनम्र विनंती.(नैतर काहि हुच्च अभिरूचीसंपन्नतावादी येतील परत आपले किरटे नाक घेऊण हुंगायला! ) पहावं तिथे ह्यांची हागी पडलेली,आणि त्यात ती मेली म्हणे ऑक्साइडं असतात..त्यानी ग्यालरीच्या लादीची पुरती वाट लागते,किंवा वाळत टाकलेल्या कपड्यांवर जर "ती" पडली,तर ते वाटेला लागतात. (ह्या हागी शब्दावरूनच ल्हान मुलांच्या डायपर नामक वाळून योग्य जागी कडक-होणार्या वस्त्रास 'हागीज' असे उत्-प्रेरक नाव पडले असावे काय!? ;) ) असो!
अशी कबुतरे येती आणिक हागी सोडूनी जाती
दोन शिटे ती सांडत सांडत,ग्यालरी रंगवूनी जाती॥धृ॥
वि'हंग पहिला तारेवरला, शिटण्यासाठि उभा राहिला
जरा बाजूनी पाय सरकूनी, खाली-सोडूनी देती
हकलून देता पुन्हा आले, जिथे बसावे तिथे(च्च!) बैसले
धुतले नंतर तरि निरंतर बाधित झाली लादी
पंख एक तो हळू थरथरला,शेपटी मागून वरी उचलंला
वाळत पडल्या कपड्यांमधूनी, ओघळ खाली येती
किती करावी? यांस हकाटी, हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करोनी फिरवूनि काठी
त्या भरल्या कठड्यांच्या गाथा, याद अजुनही देती
==========================================
प्रतिक्रिया
12 Mar 2016 - 6:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ग्यालरीत तांब्या किंवा डालडाचा डबा भरुन ठेवत जा. घाईच्या वेळेला बरा.
12 Mar 2016 - 6:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
म्हणजे लगेचच्या लगेचं ग्यालरीत ओतता येईल. गैरसमज नको.
12 Mar 2016 - 6:47 pm | अत्रुप्त आत्मा
दगडफेकात्मबंध-फट्काखाऊज्याकुब
.............
12 Mar 2016 - 6:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हेच्चं कबुतरांबद्दल केलं असतत तर कविता पाडायची वेळ नसती आली.
बाकी तुम्ही कबुतराची एक जोडी पाळाचं. तेवढचं मोबल्याची रेंज गेली की
कबुतर जा जा जा म्हणुन पेहेले प्यार की पहिली चिठ्ठी वगैरे करता आलं असतं. उत्तरादाखल पावशेर हिंग, दोन किलो कांदे, पावशेर मिरच्या आणा घरी एताना वगैरे चिठ्ठ्या चकटफु पाठवता आल्या असत्या =)) =))
12 Mar 2016 - 7:53 pm | पैसा
पावशेर हिंग? काय लॉटरी बिटरी लागली काय?
12 Mar 2016 - 10:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
क्वांटिटी राहुंद्या हो. पण चिठ्ठी महत्त्वाची =))
13 Mar 2016 - 3:55 pm | आदूबाळ
सौ बाबलीबाई त्रिलोकेकर यांच्या "मटणमंझील" या 'पाकक्रुती'ची आठवण झाली. (अच्छेर केशर आणि दोन तोळे कांदा वगैरे)
12 Mar 2016 - 6:50 pm | जेपी
कबुतरांवर प्रेम करा ,
त्यांना आपले म्हणा !!
14 Mar 2016 - 9:11 am | नाखु
तुला कुठली कबुतरे अपेक्षीत आहेत ते सांग (व्यनीतून)
12 Mar 2016 - 6:54 pm | जव्हेरगंज
आजकाल बाब्या स्वगृही कमी व हौशीबुवांकडे अधिक शिटतो कारण....
12 Mar 2016 - 7:04 pm | चौकटराजा
असे जातिवंत होती
आता कबुतरावर घसरती
दोन दिसाची कबुतर संगत
मुळातली न लपविता रति
बदलले बुवा "खुळे बोलले
मी वर त्यात तेल ओतले
नव्हेच अंतर काल आजच्या
कवितेची बुलशिट क्रांति
12 Mar 2016 - 7:21 pm | बोका-ए-आझम
कबुतरांवरुन बैलांवर काय गेलात?
12 Mar 2016 - 7:26 pm | अभ्या..
इतक्या दिवसात कधी आली न्हाय ओ खबुत्रं?
अचानक काय म्हणं हे?
प्रॅक्टीस करा बुवा साफसाफाईची. उपयोग होइल.
12 Mar 2016 - 7:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
मरतयं आता स्वत:च्या मरणानी अभ्या..!!!
12 Mar 2016 - 7:47 pm | अभ्या..
बाळ क्याप्टन. बुवांची चेष्टा कुणी आणि किती करावी ह्याचे लॉजिक शिकायला अजून लै वर्षे आहेत तुला. तूर्तास तुझी काडी न पेटवता ठेवलीस तरी चालेल.
13 Mar 2016 - 8:16 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सल्ल्याबद्दल धन्यवाद.
12 Mar 2016 - 7:28 pm | माम्लेदारचा पन्खा
कबुतरांचा असा त्रास लग्नाच्या आधीही होता की नंतर सुरू झालाय?
अहो तुमच्या आयुष्यात शांती टिकून रहावी म्हणून येत असतील हो ती....
असो......तुम्ही टीशू पेपर आणि कपडा ठेवत चला..... शिकलेली असली तर बरं पडेल.....
आप्लं घर तो त्यांचा शिटारखाना ! काळाचा महिमा.....
12 Mar 2016 - 7:37 pm | यशोधरा
=))
12 Mar 2016 - 7:54 pm | अजया
काय ते अद्भूत अनर्थशास्त्र =)))
12 Mar 2016 - 8:40 pm | कंजूस
कविता चांगली जमलीय.
यावर उपाय ( स्वस्तातला ) केलाय.माशाचं जाळं आणलं आणि लावलं.तीनशे रुपयात काम झालं.
12 Mar 2016 - 9:05 pm | स्पा
हगु आणि बुवाचे जन्मोजन्मीचे नाते अहे, हे परत अधोरेखित झले.बिचारी कबुतरे, त्यांनाही तांब्या घेउन उडावे लागेल.
- हगुबुवाच्या शॊच कवितांचा फॅण
( इस्पा)
12 Mar 2016 - 9:06 pm | सतिश गावडे
अगदी याच समस्येने त्रस्त आहे. बाल्कनीची कबुतर हागणदारी झाली आहे. :(
अगदी how to get rid of pigeons वगैरे गुगलल्यानंतर सापडलेले जे जे उपाय करता येतील ते ते सारे करून पाहिले. पण नो लक.
हाच उपाय सोसायटीमधील इतरांनी केला आहे. मला तसे जाळे लावून बाल्कनी बंदिस्त करण्याची ईच्छा होत नाही. मावळतीचा सूर्य छान दिसतो बाल्कनीतून. ते असं बंदिस्त करायचं नाही.
कुणाला दुसरा काही उपाय माहिती आहे का?
14 Mar 2016 - 1:09 pm | भिंगरी
माझीही हीच समस्या आहे.
त्यांची घरटी,काड्या,आणि घाण या गोष्टींचा त्रास कमी म्हणून की काय त्या कबूतरांची अंडी खाण्यासाठी कावळे येतात आणि बाल्कनीतल्या वाळत घातलेल्या कपड्यावर घाण करतात.
पण
मला तसे जाळे लावून बाल्कनी बंदिस्त करण्याची ईच्छा होत नाही. मावळतीचा सूर्य छान दिसतो बाल्कनीतून. ते असं बंदिस्त करायचं नाही.
हेही तितकेच खरे.(आमच्या बाल्कनीतून उगवता सूर्य दिसतो.)
12 Mar 2016 - 9:19 pm | कंजूस
माझं जाळं इतकं बारीक आहे की दृष्य अडत नाही.काहीवेळा जाळं आहे हे लक्षातही येत नाही.
12 Mar 2016 - 9:21 pm | कंजूस
तुम्हाला विणता येत असेल तर जे बारीक तंगूस मिळते त्याचे विणून लावा.
12 Mar 2016 - 9:40 pm | सतिश गावडे
धन्यवाद काका. स्वतः विणणे जरा अवघड दिसते. मात्र बाजारातून विकत आणून लावून पाहतो.
12 Mar 2016 - 9:39 pm | अन्नू
घरी दारी कबुतरांगोळी ;)
बाकी दुपारीच जेपी कबुतर का बदला शिनमा बघत होते अचानक त्याची आठवण आली.
अवांतर- गुर्जींबद्दल कसलं वैर असावं बरं कबुतरांचं? :P
13 Mar 2016 - 6:20 am | प्रचेतस
क्या बात है...!
एक सहज सुंदर कविता. आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच दिसणाऱ्या घटनेवर बुवांनी काय मार्मिक भाष्य केले आहे पहा ना. चार शब्दांतून ते जणू व्यथारुपी आशयच इतरांना सांगत आहेत.
आपण तर कर्जदार झालो राव तुमचे.
आम्हाला तुमच्या चाहत्यांच्या जगात एक स्थाण द्या ना प्लीज.
13 Mar 2016 - 6:37 am | चौकटराजा
एक सहज सुन्दर मार्मिक प्रलयकारी नव्हे प्रत्ययकारी रसग्रहण ! कदाचित कबुतरे गुतरघुम चे ट्रेनि़ग द्यायला तर येत नसतील ना ? काय तुमचे काय संंशोधन आहे ?
13 Mar 2016 - 7:22 am | प्रचेतस
अगदी खरे आहे. प्राचीन काळापासून कबुतरे ही प्रेमाची प्रतिके म्हणून ओळखली जातात. कदाचित म्हणूनच ती बुवांना गुटर्रघूम गुटर्रघूम चे ट्रेनिंग द्यायला (सध्या) येत असावीत. आता ती येणार म्हटल्यावर त्यांनी शिटावे तरी कुठे? त्यासाठी बुवांची वीथिका त्यांना आदर्श जागा वाटल्यास नवल नव्हे. बुवांनी येथे काव्य खरे तर उद्वेगाने नव्हे तर कबूतरांपोटी असलेल्या आस्थेतूनच प्रसवलेले असल्यास नवल नव्हे.
-
रसग्राहक प्रचेतस(थेट रायगडावरुन)
13 Mar 2016 - 7:39 am | अत्रुप्त आत्मा
13 Mar 2016 - 9:56 am | चौकटराजा
आली कुथूनशी ती स्मायली
आली आग्डोमम्ब घेऊन
नाद ठो ठो ठो ठो करीत
येई सिंहगड रस्त्यातून
14 Mar 2016 - 8:35 am | नाखु
शक्यता क्र १. बुवा अलिकडेच बाल्कनी (पक्षी गच्ची) उघडू लागलेत (पुन्हा पक्षी वापरू लागलेत)
शक्यता क्र २. बुवांना त्यांच्या मिपावर त्रिकाळी हजर राहण्याची शि़क्षा म्हून गॅलरीत (पुन्हा पक्षी बाल्कनीत) निवास करावा लागतो काय ?
शक्यता क्र ३. कबुतरे आणि (त्यांचे) इतर नातेवाईक-सखे यांनी बुवांनी (अनावधानेने) ठेवलेले चारोळी (पक्षी मी माझा तर माझा कुणाचा) हे अनमोल ग्रंथातील पाने वाचलीत काय? आणि शीघ्र काव्यप्रेमी सहवास असावा या नैसर्गीक उर्मीने ते बाल्कनीत आले असावेत काय ?
शक्यता क्र ४.बुवा पुर्वी बाल्कनीत येत असतील तर तेव्हा (त्यांना) कुठली कबुतरे दिसत असतील व त्यांचा काही त्रास होता काय? अता होतो तसाच की वेग्ळा?
शक्यता क्र ४.हा धागा घरी दाखवून (प़क्षी प्रूफ तपासून) इथे टाकलाय काय ? (कारण आपण निरूप्नात हात आखडता घेतल्याचे उघड दिसत आहे.
वल्ली संचालीत अभ्या पुरस्कृत चौरा मार्गदर्शीत "बुवा चाहता संघ व भावविश्व चक्री पारायण महामंडळा तर्फे धागा-कपोत हितार्थ जारी
14 Mar 2016 - 9:02 am | चौकटराजा
ए सी पी प्रद्युम्न तुमचे तर्क सही आहेत पण दया ( प्रेव्चेटूक) यांच्याशी सल्लामसलत करून काय तो निषकर्ष काढा म्हण्जे पार्टीसकट ग्यालरीवर धाड ठाकू.
बाकी ते अभ्या पुरस्कृत म्हणजे काय ? पुढेमागे कविता "ह"संग्रह निघाला तर ""मुख" व मल प्रुष्ठाची सोय आताच करून ठेवली की काय ?
14 Mar 2016 - 9:09 am | नाखु
सुप्त हेतू आहेच पण "कुंथुनाथांची कुंचलेगिरी" या नावाने एक पुस्तीक करण्याचे घाटत आहे प्रस्तावना बॅट्टमण करणार आहे.त्याचीही तजवीज अत्ताच करून ठेवली.
14 Mar 2016 - 9:36 am | प्रचेतस
प्रकाशक घरकुल प्रकाशन का?
14 Mar 2016 - 9:38 am | नाखु
वितरक
मेतकुट सेवा केंद्र
आणि माजघर महिला संस्था (परदेशी शाखांसह)
13 Mar 2016 - 11:28 am | पियुशा
अर्र मेले मेले..... अगोबा डगोबा कबुत्र पैलेच पिछु पडे बुवा के उप्पर से तुम उन्को छ्ळो मत ;)
14 Mar 2016 - 10:12 am | अत्रुप्त आत्मा
जिल्बुचा,


आपण हत्तीवर एक कचकूण जिल्बी पाडायची का!? सारका मले ढुश्या देत फिरत असतो.
नीच, हलकट !
दुत्त दुत्त!
14 Mar 2016 - 12:25 pm | स्पा
कच्कुन बन्ध
14 Mar 2016 - 9:26 am | बोका-ए-आझम
रोफलल्या गेले आहे!
13 Mar 2016 - 10:13 am | बाजीगर
वाह आत्मबंधपंत. छान लिहिलत.मन प्रसन्न झाले.अजून येवू द्या.
14 Mar 2016 - 12:05 am | खटपट्या
काव्य आवडले.. अशा कविता आम्हाला मिपावर परत परत येण्यास उद्युक्त करतात...
14 Mar 2016 - 6:40 am | प्रचेतस
अगदी अगदी.
कवितेच्या सुरुवातीचे मुक्तकही भारीच.
14 Mar 2016 - 10:21 am | खटपट्या
तर काय, त्यातल्या त्यात "डांबरीकरण" हा शब्द काळजाला भिडल्या गेला आहे..
14 Mar 2016 - 9:07 am | श्रीरंग_जोशी
रुपक कविता म्हणून खूप भावली.
__/\__.
14 Mar 2016 - 1:11 pm | चौकटराजा
ह्या रंगा तू फारच अळणी बूवा ! हे तुमच्या सारखे गुढगुंजन वाले समीक्षक कायच्या बाही लिहितात व कवितेच्या मूळ अंगाला अगदी मल फासतात शी शी !
14 Mar 2016 - 12:15 pm | सस्नेह
एकेकाळच्या तांबीय संप्रदायप्रमुखाधिपतींवर अशी वेळ यावी ना ! उचल रे बाबा उचल (कबुतरांना ) =))
14 Mar 2016 - 12:35 pm | प्रचेतस
क्या बात है......!
कसलं जबरदस्त निरिक्षण आहे. आख्खा प्रसंगच डोळ्यांसमोर उभा राहतोय. आता माझ्या नजरेसमोर एक कबूतर हलकेच पंख थरथरवंतय... शेपटा मागून हळूच तो पंख वर होतोय आणि.. आणि...
वाहव्वा आत्मूस, तुमच्या लेखणीतली ताकदच अशी की रसिक माणसाला त्या दृश्याशिवाय इतर कुठलेच दृश्य डोळ्यांसमोर येणारच नाही. तुमच्या ह्याच काव्यगुणांवर आम्ही फ़िदा आहोत. ह्या निमित्ताने आम्हाला तुम्ही तुमच्या चाहत्यांच्या जगात स्थाण द्यावे ही प्रलंबित मागणी आम्ही पुन्हा रेटत आहोत.
14 Mar 2016 - 12:43 pm | अन्नू
ह्या निमित्ताने आम्हाला तुम्ही तुमच्या चाहत्यांच्या जगात स्थाण द्यावे... ++१००००
14 Mar 2016 - 12:44 pm | नाखु
कवी आणि धन्य ते रसीक (चतुर गुणग्राही,चलाख भावविभोर वगैरे)
आज कबुतरेही आप्लया कर्माने कृतकृत्य झाली असतील.
अति अवांतर : पोपशास्त्रींकडे कबुतरे उडविण्याचा किंवा टाळण्याचा उपाय असेल असे वाटते.
माहीती देवाण घेवाण केल्यानेच साहीत्य निर्मीती होते असे मुवी बाबा म्हणतात ते खोटे नाही .
पार वाच लेला नाखु
14 Mar 2016 - 1:11 pm | अत्रुप्त आत्मा
@ह्या निमित्ताने आम्हाला तुम्ही तुमच्या चाहत्यांच्या जगात स्थाण द्यावे ही प्रलंबित मागणी आम्ही पुन्हा रेटत आहोत.>>
14 Mar 2016 - 1:16 pm | चौकटराजा
बुवाना कबुतरांचा एक फायदा जरूर आहे. त्याना वश करून घ्या बुवा ! सिन्हगड रोडचे सेन्द्रिय डांबरीकरणाचे कंत्राट मिळेल. शिवाय मॅगसेसे सारखे एखादे पारितोषिक या " नव्या" प्रयोगासाठी मिळेल.
14 Mar 2016 - 1:16 pm | चौकटराजा
बुवाना कबुतरांचा एक फायदा जरूर आहे. त्याना वश करून घ्या बुवा ! सिन्हगड रोडचे सेन्द्रिय डांबरीकरणाचे कंत्राट मिळेल. शिवाय मॅगसेसे सारखे एखादे पारितोषिक या " नव्या" प्रयोगासाठी मिळेल.
14 Mar 2016 - 1:30 pm | यशोधरा
परत एकदा =)) =))
14 Mar 2016 - 3:03 pm | सूड
याच प्रतिभासंपण्णतेचे आम्ही फॅण आहोत.
14 Mar 2016 - 3:13 pm | नाखु
सूड उगवला (धाग्यावर )!
सर्व संबधीतानी ह घेणे.