सकाळचे साडे सात वाजले होते. मी आणि चिरंजिव दोघेही जायच्या गड्बडीत होतो. बायकोने द्रोणाच्या इड्ल्या केल्या होत्या. बेल वाजली. मी टी पॉय वरचा ब्रेकफास्ट न आवरताच चुकुन दरवाजा उघडला. बघतो तर समोर दरवाजात शेजारीण उभी. बरोबर अडीच वर्षाचा छोटू. दरवाजा उघडताच छोटुने लगेच आक्रमण केले. आणि सोफावर विराजमान झाला. प्लेट मधील द्रोण बघताच 'माला पन पाय्जे' चा घोष सुरु झाला. बायको बाहेर आली. "एवढ्या सकाळी आजोबा जेवतात" शेजारणीने बॉम्ब टाकला. आता सहा द्रोण अधिक वाटीभर चटणी आणि चवीला सांबार व ताजे लोणी ह्याला काय जेवण म्हणतात. असो. बायकोने छोटुला सुद्धा एक द्रोण आणला. 'माला पण आजोबा एवदे पायजे' इती छोटू. (अरे बाबारे काका चालेल रे). मग वाटीभर साखरे वरुन सुरु झालेले संभाषण द्रोणाच्या इड्लीची पाक-कृती वर घसरले.
छोटू खाणे संपवुन घरभर फिरायला लागला. चिरंजीव अस्वस्थ. टी.वी वर १५ वर्ष संभाळलेली रोबोकॉप टॉय कार संकटात आलेली होती. मी त्याची मनःस्थिती बघुन छोटूचे लक्ष दुसरीकडे वळवले. लक्ष नाही बघुन कार बाजुला काढली. चिरंजीवांचा जीव सुखावला आणि तो कॉलेजला रवाना झाला.
आता संभाषण द्रोण कसे करायचे वर आले होते. बायकोने प्रॅक्टीकल सुरु केले. संध्याकाळी पाहुणे येणार होते म्हणुन मी जरा जास्तच पाने आणली होती. (भाजीचा फणसाची पाने).१५ मिनिटे झाली पण शेजारणीला काही द्रोण काही जमेना. हे सगळयाना जमेल असे नाही. इतक्यात छोटुने 'मम्मा माला सु झाली' असे म्हणत बोट वर केले. आणि लगेच आपली चड्डी काढुन माझ्यासमोर उभा राहिला. शेजारणीचा चेहेरा गोरामोरा झाला. मी छोटुला बाथरुम मधे नेले. कार्यभाग आटोपल्यावर त्याला बाहेर आणले. बाहेर आणुन चड्डी सुद्धा घातली. अचानक शेजारणीचा इडली मधला इंटरेस्ट संपला. छोटुला खसकन ओढून साखरेची वाटी तशीच सोडून ती बया घरी चालती झाली. जाताना " सॉरी आजोबा" असे अर्धवट वाक्य कानावर पडले.
बायकोने लगेच 'तुम्हाला पण उद्योग नाही हां" हा बाण मारला. शेजारणीला छोटूचा खुप राग आला होता हे कळाले. नंतर शेजारुन खुप मोठ्या मोठ्याने आवाज यायला लागले. छोटूचा रडण्याचा आवाज ऐकु आला. छोटुला बहुतेक मार पडला असावा.
त्यातली कानावर आलेली वाक्ये अशी. "लाज आणलीस तु मला" मुलाला
"तुम्ही काहीही शिस्त लावत नाही", " आतापासुन असे तर मोठा झाल्यावर काय करेल" "काय म्हणत असतील ते आजोबा."
मी काय म्हणणार. कशाला म्हणणार. कसली शिस्त. कसली लाज. च्या मारी मुलगा होता म्हणुन बरे. मुलगी असती तर काय केले असते देव जाणे.
ऑफिस मधे जाताना तो नवरा नावाचा बैल लिफ्ट मधे भेटला. त्याला म्हटले, काय, आज चहा नाही वाटते.
तो पण मला लगेच "सॉरी " म्हणाला. का कुणास ठाउक मला त्याची दया वाटली नाही.
कसली ओझी वहातात ही माणसे.
असल्या काल्पनिक ओझ्या खाली दबलेले हे पालक काय वारसा देणार आपल्या मुलाना.
त्या मुलाला इतक्या छोट्या वयात अपराधी पणाची भावना मनात रुजवुन (शिक्षा )देउन त्या शिकल्या सवरलेल्या गाढवीणीला काय मिळाले?
असा काय मोठा भुकंप झाला एवढ्या छोट्या गोष्टीसाठी हायपर व्हायला. छोटुला स्वःत च्या सेक्शुऍलीटी ची जाणीव अशा प्रकाराने.
जाता जाता: बैलाचे लै भारी हाल असतील बॉ. ऊठाबशा काढायला लावते की काय?
प्रतिक्रिया
12 Jan 2009 - 9:00 pm | रामपुरी
छोटुला स्वःत च्या सेक्शुऍलीटी ची जाणीव अशा प्रकाराने.
यामध्ये 'सेक्शुऍलीटी' कुठे आली?
12 Jan 2009 - 9:06 pm | विनायक प्रभू
आता तरी मराटीत हे कसे समजवायचे ते सुचत नाही. सुचले की व्यंनि करतो.
12 Jan 2009 - 9:07 pm | लिखाळ
>छोटुला स्वःत च्या सेक्शुऍलीटी ची जाणीव अशा प्रकाराने.<
हा निष्कर्ष बरोबर वाटला नाही.
लहान मुलाने इतरत्र केलेला हट्ट, 'चहा पीत नाही आमचा छोटु' असे आईने सांगीतल्या बरोबर 'मला चहा पाहिजे' असे म्हणुन कपभर चहा पिणे, इतरांकडे गेल्यावर तिथे शी-शू करणे अश्या गोष्टींचा काही पालकांना फारच त्रास होतो. त्यांना अतिशय ओशाळवाणे (एंबरेसींग) वाटते. हे मी पाहिले आहे. मुलाने अगदी लाज आणली सर्वांसमोर हे न चुकणारे वाक्य पुढे अनेकदा अश्यांकडून ऐकवले जाते.
ओझे या बेगडी शिष्टाचाराचे आहे. (दुसर्या आपत्याच्या वेळी अनुभवामुळे ते हे सर्व सहन करतात.)
त्यातून मुक्ती ते लोक आजी-आजोबा झाले की मगच मिळते.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
12 Jan 2009 - 9:22 pm | रेवती
'चहा पीत नाही आमचा छोटु' असे आईने सांगीतल्या बरोबर 'मला चहा पाहिजे' असे म्हणुन कपभर चहा पिणे,
माझ्या भावाने अशीच गंमत केली होती. आईच्या मैत्रिणीने विचारले की मुलं चहा घेतात का, त्यावर माझ्या भावाने उत्तर दिले की चहा पितो आणि बिस्कीटं पण खातो.
त्यावर सगळे हसले होते. त्यांच्या घरची बिस्कीटे संपली होती तर मोठ्या मुलाला त्यांनी दुकानात पाठवले होते. हा विनोद अजूनही सगळ्यांना आठवतो.
रेवती
13 Jan 2009 - 12:45 pm | रामपुरी
हा निष्कर्ष बरोबर वाटला नाही.
अगदि हेच मला म्हणायचे होते...
12 Jan 2009 - 9:20 pm | अनामिक
लहान मुलांना कुणाकडे घेउन गेल्यावर त्यांनी 'मला भुक लागली, खायला दे' म्हणने, चड्डीत शि-सू करणे हे आपल्या समाजातल्या पालकांसाठी लज्जास्पद ठरते. आता ३-४ वर्षाच्या मुलाला काय ते कळणार.... पण तरिसुद्धा लोक 'काय मुलगा/मुलगी आहे, पालकांना साधं वळनसुद्धा लावता येत नाही' असं म्हणून मोकळे होतात, किंवा असं म्हणतील असा बहुतांशी पालकांचा समज असतो (कदाचित स्वतःवरुन ठरवत असतील). यात नुकसान होतं ते लहान मुलांचं! याचा अर्थ असा नाही की त्यांना कुठे गेल्यावर काय करावं किंवा काय करु नये ह्याची समज देउ नये (शि -सू न करणे हे अतिच). पण अशी समज देण्याचीही काही पद्धत असावी जेणेकरुन त्या लहानग्या/गीला हळू हळू ह्या गोष्टी कळायला लागाव्या. २-४ वर्षे वय 'शिष्टाचार' कळायला खुपच कमी आहे असे वाटते.
अनामिक.
12 Jan 2009 - 9:17 pm | रेवती
अगदी बरोबर आहे आपले म्हणणे. नको तिथे, नको त्या शिस्तीचा बडगा दाखवत मुलांना दाबून ठेवणारे पालक बरेच दिसतात.
मुलांनी उड्या मारायच्या नाहीत, ओरडायचे नाही असे कडक नियम असतात काहीजणांकडे. माझ्या एका मैत्रिणीने तिच्या मुलीला ताकिद दिली आहे की दुसर्यांकडे गेल्यावर बाथरूम वापरायची नाही. ती बिचारी कुठेही गेली की थोड्यावेळाने घरी जाऊया म्हणून रेकॉर्ड लावते. माझ्या वहिनीच्या मैत्रिणीने वहिनीला स्पष्ट सांगितले की तुझ्या मुलीचे पॉटी ट्रेनींग चालू असेल तर माझ्या नविन घरी येऊ नकोस म्हणून.
(थोडे अवांतर : द्रोणातल्या इडल्यांची कृती देऊ शकाल काय?)
रेवती
12 Jan 2009 - 9:20 pm | झुमाक्ष (not verified)
म्हणजे नेमके काय असते हो?
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
12 Jan 2009 - 9:23 pm | अनामिक
अति अवांतरः
द्रोणाची इडली - इंस्टंट मिक्स आहे... या पाकिटावर अभिशेक बच्चन आणि प्रियंका चोप्राचं चित्र आहे!
12 Jan 2009 - 9:33 pm | बट्टू
द्रोणाची इडली जाम फ्लॉप दिसते. :-)
12 Jan 2009 - 9:38 pm | कोलबेर
काय सांगता?
ही इडली खाल्ली की द्रोणाप्रमाणे अतिंदद्रीय शक्ती पण प्राप्त होतात का?
असे असेल तर आम्ही पण पहाटेच्या 'जेवणा'ला ६ द्रोण इडल्या चटणी आणि सांबार खाऊ. :)
12 Jan 2009 - 9:43 pm | झुमाक्ष (not verified)
लोणी विसरलात.
ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स...
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
12 Jan 2009 - 9:24 pm | ब्रिटिश
आमाला मूलं नाय त रोबो हवे आसतान
फुल्ली प्रोग्र्मड ऍन्ड कंट्रोल्ड बाय पेरेन्ट्स
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
12 Jan 2009 - 9:26 pm | लिखाळ
बरोबर !
आणि आम्ही वयाने मोठे व्हायला लागलो की त्या रोबोंची माणसे व्हावीत आणि त्यांनी आपुलकिने आमची सेवा करावी असे वाटते.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
12 Jan 2009 - 9:29 pm | कोलबेर
तात्पर्य : लहान मुलांना बाहेर नेताना डायपर लावावे आणि सोबत पिशवीत एखादा बिस्किटाचा पुडा ठेवावा.
12 Jan 2009 - 9:47 pm | रेवती
लहान मुलांना बाहेर नेताना डायपर लावावे आणि सोबत पिशवीत एखादा बिस्किटाचा पुडा ठेवावा.
तरीही ऐनवेळी काय करतील सांगता येत नाही. पॉटीट्रेनींग झाले असले तरी कधीकधी थंडीमुळे लवकर किंवा खेळण्यात फारच दंग असल्याने त्यांना बाथरूमची आठवण उशीरा येते.
साधारण पाच वर्षाचा असताना माझ्या मुलाला कशी कुठून एक सवय लागली होती, ती म्हणजे दरवेळी बाथरूमला जाताना आई बाबांची परवानगी मागायची (ज्यावेळी परवानगी मागणे आवश्यक आहे तिथे बरोब्बर विसरायचा). विचारतानाही नुसतच 'जाऊ का?, जाऊ का?' असं विचारायचा. आधी कळायचं नाही आम्हाला कश्याबद्दल म्हणतोय तो; थोड्याच दिवसात त्याची ती सवय गेली.
खाण्याबाबत तर आम्ही (आणि आमच्या मित्रमंडळाने) लाज कधीच सोडलीये. घरून पोटभर खाऊन निघालो तरी दुसर्यांकडे गेल्यावर पायताण काढायच्याआधीच भूक लागली हे जाहीर व्हायचं.
रेवती
12 Jan 2009 - 9:47 pm | बट्टू
छोटुला स्वःत च्या सेक्शुऍलीटी ची जाणीव अशा प्रकाराने - म्हणजे काय?
आमचाही कूटप्रश्नः गाढविणीचा नवरा बैल असेल तर मूल कोणते होइल?
12 Jan 2009 - 9:51 pm | झुमाक्ष (not verified)
अरे बाप रे! 'कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे' च्या धर्तीवरच्या एखाद्या येऊ घातलेल्या लेखाची ही नांदी की काय? कदाचित 'खजुराहोची लेणी'?
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
12 Jan 2009 - 9:55 pm | झुमाक्ष (not verified)
चांगला प्रश्न आहे. गाढविणीचा नवरा घोडा असेल तर होणार्या संततीस 'खेचर' असे म्हणतात, असे जाणून होतो. बैलाचे नव्याने ऐकतोय.
खात्रीलायक माहिती बैल किंवा गाढवीण यांपैकीच कोणी (किंवा आजोबा) देऊ शकतील असे वाटते.
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
12 Jan 2009 - 9:49 pm | मुक्तसुनीत
माझ्या काही मूलभूत शंका :
"डायपर घालणे " ही संकल्पना भारतातल्या शहरी भागात कितपत रुजली आहे ? (खेड्यातल्या धनिक लोकांना सोडले तर तिथे डायपर ही गोष्ट उपलब्ध नसावी असा माझा अंदाज) . भारतात"डायपर" ही कमॉडीटी कितपत महाग पडते/महाग समजली जाते ? परवडत असूनसुद्धा , मुलांच्या त्वचेबद्दलच्या काळजीमुळे न घालण्याकडे ओढा जास्त असतो का ? "भारतातले उष्ण हवामान" हा डायपर न वापरण्याच्या प्रवृतीचे एक प्रमुख कारण असावे काय ?(अर्थात , अर्थशास्त्रीय कारण सगळ्यात जास्त मोठे , यात शंका नाही.)
12 Jan 2009 - 10:06 pm | अनामिक
मला मुलं नाहीत पण माझ्या बहिणीच्या मुलांवरुन सांगतो,
"डायपर घालणे " ही संकल्पना भारतातल्या शहरी भागात कितपत रुजली आहे ? (खेड्यातल्या धनिक लोकांना सोडले तर तिथे डायपर ही गोष्ट उपलब्ध नसावी असा माझा अंदाज) .
शहरी भागात बर्यापैकी रुजली आहे. छोट्या छोट्या गावातसुद्धा डायपर्स सहज उपलब्ध आहेत.
भारतात"डायपर" ही कमॉडीटी कितपत महाग पडते/महाग समजली जाते ?
किती महाग आहे ते माहीत नाही, पण मध्यमवर्गीय लोकांना दररोजच्या वापरात परवडावी अशी किंमत नक्कीच नाही.
परवडत असूनसुद्धा , मुलांच्या त्वचेबद्दलच्या काळजीमुळे न घालण्याकडे ओढा जास्त असतो का ? "भारतातले उष्ण हवामान" हा डायपर न वापरण्याच्या प्रवृतीचे एक प्रमुख कारण असावे काय ?
हो त्वचेची काळजी हे एक मोठे कारण आहे. त्यामुळे माझी बहिण अति-आवश्यक असेल तरच तिच्या मुलासाठी डायपर वापरते, डायपर मुळे रॅशेस येतात त्वचेवर (आपल्या मुलाला सांभाळायची किंवा योग्य काळजी घेण्यासाठी कसली आली लाज, हा तिचा समज. ज्या लोकांना त्रास होउ शकतो त्यांना ति आधिच या गोष्टींची कल्पना देते आणि त्यानुसार आपला बेत ठरवते.)
12 Jan 2009 - 10:18 pm | कोलबेर
शहरी भागातील (मध्यमवर्गीय कुटूंबियात) लहान मुलांच्या आयांना एका पिशवीत डायपर, दुधाची बाटली/ कोरडा खाऊ, पाण्याची बाटली , १ २ खेळणी आणि इतर किरकोळ गोष्टी असा लवाजमा घेउन फिरताना बर्याचदा बघीतले आहे.
डायपर रॅश येऊ नये म्हणून वेगवगळी डायपर्स वापरुन ज्याने रॅश येत नाही असे वापरतात असे निरिक्षण.
फक्त बाहेर असतानाच डायपर वापरल्याने खर्चावर देखिल नियंत्रण.
13 Jan 2009 - 3:53 am | भास्कर केन्डे
डायपर रॅश येऊ नये म्हणून वेगवगळी डायपर्स वापरुन ज्याने रॅश येत नाही असे वापरतात असे निरिक्षण.
-- एक पालक या नात्याने स्वानुभवातून असे समजले की रॅश येऊ नये म्हणून डायपर रॅश साठीचे मलम वापरले तर मुलांच्या त्वचेला त्रास होत नाही. आम्ही आमच्या मुलांसाठी A+D Oinment वापरतो. सतत डायपर वारून दोन्ही लेकारांना कधीही रॅश आली नाही. अर्थात डायपर दर २-३ तासांच्या आता बदलने हे सुद्धा महत्वाचे.
12 Jan 2009 - 10:41 pm | चतुरंग
निदान पुण्यासारख्या ठिकाणी मला बर्याच बालकांसाठी ह्याचा विचार करताना आई-वडील दिसतात. निदान कुठे बाहेर जाताना तरी त्याचा वापर नक्की होतो/करावा अशा मताचे बरेच लोक दिसतात. सार्वजनिक ठिकाणी सुयोग्य आणि स्वच्छ स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने बाहेर जाताना तो वापरणे योग्यही वाटते. सर्वसाधारणपणे १० ते १२रू. एक अशी त्याची किंमत आहे.
खेड्यात हे फारसे प्रचलित नसावे असा अंदाज आहे.
घरात मात्र मुलांसाठी सुती लंगोट/चड्डी असेच वापरणे आपल्याकडच्या हवामानाला अनुसरुन योग्य वाटते. मुलांच्या त्वचेला सुती कापडाने अपाय होत नाही.
आपल्याकडे मुले शी-शू साठी परदेशातल्या मानाने लवकरच्या वयात तयार होतात असे माझे निरीक्षण आहे. डायपर नसल्याने त्यांना शी-शू च्या भावना चटकन समजतात आणि त्याबद्दल वडीलधारी मंडळी सुद्धा लवकर त्यांना योग्य ठिकाणी जाण्याची मदत करु शकतात.
डायपर वापरताना मुलांना शी-शू झालेली समजत नाही आणि त्यायोगे त्यांची त्याबाबतीतली जाणीव चटकन प्रगल्भ होत नाही मोठ्यांना प्रयत्नपूर्वक त्या सवयी बदलणे भाग पडते. त्यामुळे 'पॉटी ट्रेनिंग' वगैरे करणे जरुर असते. भारतातले ट्रेनिंग म्हणजे 'दोन विटा आणि कागद' किंवा 'होल वावर इज अवर' एकदम हवेशीर! ;)
चतुरंग
12 Jan 2009 - 9:54 pm | विनायक प्रभू
एका लघु शंकेबद्दल मोठी शंका. पण मुद्दा एकदम बरोबर
12 Jan 2009 - 10:57 pm | मुक्तसुनीत
डायपर बद्दलच्या प्रश्नांच्या उत्तरांबद्दल आभार.
अडीच वर्षांच्या मुलाला असल्या गोष्टींमुळे शिक्षा द्यावी , घालून पाडून बोलावे हे चुकीचे आहेच. पण त्याचा लैंगिकतेशी संबंध येतो असे मलाही वाटले नाही. आपल्या जननेंद्रियांबद्दलचे कुतूहल आणि त्यासंबंधीचे पेचप्रश्न या सार्याची सुरवात अडीच वर्षे इतक्या लहान वयात होत नसावी.
छोटुच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो घडू नये याची जबाबदारी आईवडलांनी घ्यावी हा सगळ्यात उत्तम उपाय. शेजार्यांकडे जातानाही डायपर घालता आला तर असे प्रसंग येऊ नयेत. अर्थात , वेळ कधी सांगून येत नाही आणि असे अनवस्था प्रसंग कधीतरी घडणारच. आमच्या बाबतीतही असे एकदाच घडले होते. या प्रसंगी एका स्नेह्यांच्या घरी आमच्या चिरंजीवांनी पराक्रम केले होते. सुदैवाने त्यांच्याकडे फरशी होती (कार्पेट किंवा तत्सम सरफेस असता तर कायमस्वरूपी नुकसान झाले असते !) आम्ही नवरा-बायकोंनी सर्व सामग्रीसकट पूर्ण स्वच्छता केली. मुलगा २ वर्षाचाच होता आणि डायपर ऐनवेळी सुटल्यामुळे हे झाले. दोष कुणाचाच नव्हता त्यामुळे कुणीही कुणालाही बोलले नाही. आम्ही आमच्या स्नेह्यांना "सॉरी" इतकेच म्हणालो.
13 Jan 2009 - 12:04 am | कोलबेर
कुठल्याशा शास्त्रीय पुस्तकात लैंगिक भावना ह्या माणसाला जन्मापासुन असतात असे वाचल्याचे आठवते. (नेमके पुस्तक संदर्भ आठवत नाही) लहान वयात मूल 'मल विसर्जन' क्रियेतुन (त्याच्या नकळत) लैंगिक सूख अनुभवते असा काहीसा दावा लेखक महाशयांनी केला होता. तज्ञांनी अधिक खुलासा केल्यास आवडेल.
13 Jan 2009 - 12:35 am | चतुरंग
लहान वयात मूल 'मल विसर्जन' क्रियेतुन (त्याच्या नकळत) लैंगिक सूख अनुभवते
नाही नाही त्या गचाळ कल्पनांचा प्रतिवाद करायला लहान मुले समर्थ नसल्याने असली विकृत 'संशोधनाची कंडू' लोक शमवत असावेत! ~X(
चतुरंग
12 Jan 2009 - 11:14 pm | पिवळा डांबिस
तुमचा अनुभव वाचून मन सुन्न झालं...
अभिप्राय तरी काय द्यायचा ह्याचा विचार करतोय...
तोपर्यंत तुम्ही तो चिंचेचा फोक वापरायला आमची हरकत नाही!!!!
(अवांतरः तुमचं एका फोकाने भागणार नाही असं दिसतंय!! तेंव्हा असं करा, मुलुंड स्टेशनाच्या बाहेर गुजराती बाया ते दातण काठ्या विकतात बघा! त्या होलसेलमध्ये विकत घ्या (दातण काठ्या! गुजराती बाया नव्हेत!! उठले लगेच पैशाचं पाकीट घेऊन!!!:))
ह. घ्या
13 Jan 2009 - 12:42 am | चतुरंग
वापरावा असे सल्ले दृष्टीस आल्याने चिंचेची एखादी बागंच करायला घ्यावी की काय असा विचार करतोय! :W
म्हणजे चिंचेपरी चिंचही मिळेल आणि ताजे हिरवे फोकही आयतेच! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, विप्रंबरोबर एक काँट्रॅक्ट करुन टाक. त्यांचे समुपदेशन आणि तुझा 'फोक डान्स' ;) )
चतुरंग
13 Jan 2009 - 4:33 am | पिवळा डांबिस
समाजात एक्ती गाडवं नजरेला पडाया लागली तर मास्तरांनी काय करांचा काय?:)
बाकी तुमी बाग जरूर घ्या पन तुमचा वेपार चिच्चेपुरताच ठेवा! फोकांची मोनोपोली आमची हाय!!!:)
आनि तुमचा फोक डान्स पघायला कंदी पन बोलवा! आम्ही मास्तरांना घेऊन येऊ!!! आपल्या शौकीनतेचा आंजेलिसवाडीत लई लौकिक हाय!!!!:)
-दाम्बिसशेठ पिवले
(फोक, बांबू, इत्यादि हत्यारांचे घाऊक ठेकेदार!!)
(आमची आफ्रिकेतही शाखा आहे!!!!)
:)
12 Jan 2009 - 11:55 pm | अवलिया
छोटुला स्वःत च्या सेक्शुऍलीटी ची जाणीव अशा प्रकाराने.
हा निष्कर्ष पटला नाही.
(प्रत्येक मानवी प्रेरणा, कृती लैंगिक भावनेने प्रेरीत असते असे मानणे चुक आहे)
बाकी...सुऽऽऽऽऽऽ आपलं चालु द्या.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
13 Jan 2009 - 5:23 am | धनंजय
लोकलज्जेचा संबंध लैंगिकतेशी असतो, म्हणून आपण नागव्याने वावरत नाही, हे मान्य आहे.
पण समाजात उघडपणे, वाटेल तिथे मल-मूत्र-विसर्जन टाळण्यात दुसरेही काही फायदे आहेत - दुर्गंध टाळणे, आणि स्वच्छता.
त्यामुळे लहान मुलांना लोकलज्जेविषयी शिकवतात तेव्हा लैंगिकतेची जाणिव करून दिली जाते, हे काही खरे नाही.
पण अडीच वर्षांच्या लहान मुलाला समजावून सांगताना तुमच्या शेजारणीने त्याला मारहाण केली, याबद्दल वाईट वाटले.
13 Jan 2009 - 1:04 am | चतुरंग
रागावणे गैरच आहे. त्या बिचार्याला कळलेही नसेल की आई का रागावली. बरेचदा लोकांना काय वाटेल? लोक काय म्हणतील? अशा दडपणामुळे आई-वडील नको इतके टोकाचे शिस्तीचा काच करायला जातात.
चतुरंग
13 Jan 2009 - 1:05 am | पिवळा डांबिस
सहमत आहे.
13 Jan 2009 - 1:11 am | झुमाक्ष (not verified)
माझ्या 'द्रोणाची इडली म्हणजे नेमके काय असते' या साध्या प्रश्नाचे उत्तर कोणी देऊ शकेल काय? बाकीच सगळी बडबड चालली आहे... शी-सू काय, सेक्शुऍलिटी काय आणि फोक काय...
- झुरळ मारणारा क्षत्रिय.
13 Jan 2009 - 1:13 am | धनंजय
आता फणसाची पाने मला कुठे मिळणार :-(
इडलीपात्रात केळीच्या किंवा हळदीच्या पानाच्या चकत्या घालून इडल्या करण्याचा प्रयोग केला पाहिजे...
13 Jan 2009 - 7:28 am | सहज
मला वाटले इतके वर्षात शेजारणीला तुमच्यासमोर, शेजारी, आसपास कसे वागायचे याचे ज्ञान आले असेल. नवी असावी. :-) बर ते जाउ द्या.
द्रोणाची इडली काय प्रकार आहे ते सांगा.
अवांतर - आशा आहे की युज एन्ड थ्रो डायपरच्या ऐवजी देशी अथवा परदेशी लोक रियुजेबल चांगल्या प्रतीचे क्लॉथ डायपर वापरत असावेत?
13 Jan 2009 - 10:50 am | विनायक प्रभू
It is just another body part. O.K. Nothing great about it. Nudeness need not be turned into a big issue atleast till age of 4. or a child need to be physically punished for little acccidents. This can give them feeling undefined guilt causing problems. (Bed wetting, continuous handling of body part)
This is what practtitioners believe.
एवढ्या लहान वयात 'वस्तु'निष्ट दृष्टी कोन देण्यात काय अर्थ आहे.
13 Jan 2009 - 11:45 am | मनस्वी
असे ओझ्याखाली दबलेले, स्वतः घरात सोने खातो असे समजणारे, चहा पण दार लावून पिणारे, सेल्समन/गर्ल आल्यास दार लावून घेणारे, चेहेर्यावर सदैव १२ वाजलेले, बोलल्यावर किंवा हसल्यावर आपल्यावर मोठे संकट येईल असे समजणारे, मुलांना इतर जणात खेळायला न पाठवणारे, फक्त दिवाळीच्या हळदीकुंकवाला शेजार्याच्या घरात जाणारे शेजारी नसणे केव्हाही चांगले.
काका, बाकीचं जाउ दे, ती द्रोण इडलीची पाकृ द्या की.
14 Jan 2009 - 5:28 pm | आनंद
आत्ता लक्षात आल प्रभु सर शेजारणीवर येवढे का चिडले ते.
अजुन कुठ कुठ जायाच हनिमुनला हे डोक्यात चालु असताना,
ती दोन वेळा त्यांना आजोबा म्हणाली.