कलाकार
मला कोण म्हणून विचारतात ते,
मी एक कलाकार आहे..
तुमच्यातलाच एक चेहरा,
तुमच्यातलाच एक विचार आहे;
सर्व बंध तोडून मी,
झेप घेतो आकाशात..
उरुन राहतो कोठेतरी,
तुमच्या ओझरत्या स्पर्शात;
मी स्वर आहे भैरवीचा,
कधी मल्हाराची तान..
कधी भिजरी पायवाट,
कधी रखरखणारे रान;
मी स्पर्श आहे,
मी भाव आहे..
मी तुमच्याच ओळ्खीचे,
अनोळखी नाव आहे;
मी एक रंग आहे,
कधी तुम्हीच रंगविलेला..
रंगमंचाच्या शुभ्रपटावर,
मुक्त उधळलेला;
होउनी सात रंग,
स्वतःला सांधतो मी..
कधी होउनी इंद्रधनुष्य,
सात रंगात वाहतो मी;
-पंचम
प्रतिक्रिया
12 Jan 2009 - 2:11 pm | sanjubaba
मी स्पर्श आहे,
मी भाव आहे..
मी तुमच्याच ओळ्खीचे,
अनोळखी नाव आहे;
पंचम खरच, छान ओळि......
12 Jan 2009 - 8:17 pm | लवंगी
छान लिहीलय
12 Jan 2009 - 8:26 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/