माहितीये मला माझी नाहीं होनारेस तू
तरीही का मन ऐकत नहीं माझ ...
का एवढी छान आहेस तू ...
का एवढी मनमिळावू ,
शब्दांत गोडवा तुझ्या,हृदयात प्रेम
तू बोलतेस,थोडेसे का होईना लाजतेस...
तेव्हा वाटत आवडत असावा मी देखिल तुला...
पण तुझ तुलाच ठावुक बाई,
तुझ्या मन ओळखन माझ्या अवाक्याबाहेर आहे....
तरीही सतत तुलाच ओळखाण्याच्या प्रयत्नात का असते मन....
तुझा attitude त्रास देतो मला...
पण तो नाहीं न दाखवलास की वाटते दूर लोटतेयस मला....
एखादी गोष्ट चार वेळा विचारल्यावर एकदा बोलतेस....
तरीही का सतत विचारावास वाटते तुलाच...
ह्या सर्व प्रश्नांची उत्तर नक्कीच नसणार तुझ्याजवळ...
तरीदेखिल मुर्खासारख का विचारावस वाटते तुलाच...
सांग ना का ग एवढी आवडतेस मला.......?????
प्रतिक्रिया
8 Mar 2016 - 4:19 pm | डॉ. एस. पी. दोरुगडे
छान.
पहिलीच कविता मस्त उतरलिय.
8 Mar 2016 - 4:26 pm | kunal lade
धन्यवाद सर....
8 Mar 2016 - 4:37 pm | निशांत_खाडे
पहिलीच? छान जमलीये. 'माझी पहिली कविता' असा उल्लेख केलेला नसता तरी कविता मला आवडलीच असती. लिहित राहा..
8 Mar 2016 - 5:02 pm | अभ्या..
अप्रतिम, सुरेख. फारच आवडली कविता.
8 Mar 2016 - 5:04 pm | प्रचेतस
खूपच अप्रतिम.
पहिल्याच प्रयत्नात तुम्ही जिंकलंत हो रसिक वाचकांना.
येऊ द्यात अजूनही अशाच कविता.
8 Mar 2016 - 6:48 pm | अजया
और भी आने दो!
8 Mar 2016 - 5:36 pm | चांदणे संदीप
लोल प्रतिसाद! =))
असे बरेच पंचेस आहेत कवितेत!! रसग्रहण करायला हात शिवशिवत आहेत, पण नको; आज गिराण आहे! ;)
Sandy
8 Mar 2016 - 5:41 pm | अभ्या..
आमालाबी वेध लागलेच होते. आता सुटलं गिराण की दे दाण दाण. ;)
8 Mar 2016 - 5:42 pm | प्रचेतस
कर रे रसग्रहण.
8 Mar 2016 - 5:45 pm | निशांत_खाडे
कराच रसग्रहण तुम्ही..
8 Mar 2016 - 7:07 pm | kunal lade
पोरगं नवीन आहे सांभाळून घ्या...
8 Mar 2016 - 7:11 pm | अभ्या..
यस बॉस्स. कुणालभाई अपना जिगर है. कोई विडंबन बिडंबन नै आयेंगा.
और कुणालभाई बिन्दास लिखनेका.
हैगै नै कर्नेका.
8 Mar 2016 - 6:51 pm | शान्तिप्रिय
छान! अजुन यमकं जुळवण्याचा प्रयन्त करा पुढ्च्या कवितेत.
8 Mar 2016 - 7:12 pm | kunal lade
दादांनो पोरग नवीन आहे. जरा सांभाळून घ्या.. आणि नवीन कविता हे शीर्षक या साठीच होत.. काही चुका असतील तर सांभाळून घ्या....
अगली बार शिकायत का मौका नाही दुंगा.....
आभारी...!!!!!
8 Mar 2016 - 8:21 pm | प्रचेतस
खरंच जिगर हाय राव.
तुम्ही मुरणार बघा मिपावर लवकर.
9 Mar 2016 - 8:02 am | अत्रुप्त आत्मा
@kunal lade >>
अट्यंट शमत हाय मी प्र"चेतस सरांशी! प्राचीन काळी मिपावर प्र"चेतस सरांची "नवकवी बचाव(विडंबन सुचाव!) संघटना" होती. मला त्यात काम-दिलंवत प्र"चेतस सरांनी! स्वतःहि ते त्यात अत्यन्त हिरीरीने भाग घेत असत. कित्येक नवकविना सरांनी क्रियाशील पणे मिपाच आध्यात्म शिकीवल होतं. त्यातून अनेकांना मोक्ष-प्राप्ती झाली. वाहुव्वा रे वाहुव्वा! काय दिवस होते टे! आज समद आटावलं!!! तुम्हालाही सरांच्या शिकविण्याचा लाभ होईल. शुभेच्छा तुम्हाला. :)
9 Mar 2016 - 8:24 am | अत्रुप्त आत्मा
@स्वतःहि ते त्यात अत्यन्त हिरीरीने भाग घेत असत. >> पण प्र'चेतस सरांच्या मणाचा मोठ्ठे पणा असा,कि ते तसं स्वतः काही केल्याचं जाहीरपणे कुठेच कधीच सांगत नसत! कित्ती हा विनय!? माझा विनय नावाचा मित्र याचमुळे सरांचा फ्याण झाला.
कुंदनजी, तुमच्या नेम/सरनेम चा हि खयाल ठेवतील प्र"चेतस सर! अगदी लाडे लाडे शिकीवतील टुम्हाला. आमचे मायाळू सर! प्र'चेतस सर!
9 Mar 2016 - 9:12 am | नाखु
विनयशील म्हणायचे आहे काय?
प्रसिद्धी पराङ्:मुख असल्याने हा मणाचा मोठेपणा आला असावा. सध्या या काव्यप्रकारात ते का लक्ष्य घालीत नाहीत याची आप्ण व्य्क्तीशः चौकशी करणे.
बॅट्या संचालीत वल्ली-बुवा प्रतिसाद आस्वादक संघ व कुंथुनाथ संप्रदायाचे अगलतगल गट प्रमुख टका यांच्या संयुक्त मोहिमेचा एक भाग.
9 Mar 2016 - 9:50 am | अत्रुप्त आत्मा
@प्रसिद्धी पराङ्:मुख>> अगदी अगदी!!! हाच टो शब्द! हाच! मग्गाशी मेला कुटं ग्येलता पाणी भराय तो गावेच ना!
धन्य वाद णा'खुण.. धन्य वाद!
10 Mar 2016 - 10:26 am | प्रमोद देर्देकर
हे तुमचे अपलं काई तरीचे बुवा. अहो ते नवकवींना चेतवतात म्हणुन तर नवकवींची पुढली कविता बोर्डावर येते.
8 Mar 2016 - 9:33 pm | निशांत_खाडे
'दादांनो पोरगं नवीन आहे, सांभाळून घ्या'
सदस्यकाळ: 1 Year 5 Months
9 Mar 2016 - 2:23 pm | kunal lade
दीड वर्षापासून आहे मिपा वर पण कधी लिहायचा प्रयत्न केला नाही... आणि अशीच सुचलेली एक कविता कुठेतरी टाकावी म्हणून टाकली... हा म्हणजे वाचनाची आवड आहे म्हणा म्हणून तर सुचले त्याशिवाय कस लिहिणार न....
8 Mar 2016 - 7:18 pm | वैभव जाधव
कविता आवडली तरी काहि प्रश्ण पडलेत.
>>> माहितीये मला माझी नाहीं होनारेस तू
म्हण्जे लढाईच्या आधि राजीनामा दिलात काय? का प्लोट कुणाच्या नावावर आहे आधिच?
बाकिचे नंतर विचार्तो.
8 Mar 2016 - 7:31 pm | kunal lade
ती नाही बोलल्यावरच सुचलिये कविता....
8 Mar 2016 - 8:34 pm | विवेकपटाईत
कविता आवडली. मस्तानीच्या प्रेमात तर पडला नाही ना.
9 Mar 2016 - 9:15 pm | kunal lade
विवेकपटाईत अजून काशीबाई चा पत्ता नाही दादा कुठून येणार मस्तानी !!!!!