सेल्फी-एक विकार???

पिके से पिके तक..'s picture
पिके से पिके तक.. in जनातलं, मनातलं
6 Mar 2016 - 8:49 pm

परवाच वृत्तपत्रात बातमी वाचली, " सेल्फी काढताना हातात असलेल्या बंदुकीचा ट्रिगर दाबल्यामुळे तरुणाचा मृत्यू ".....!!
एकीकडे जगामध्ये रोजच नवीन नवीन शोध लागत असताना , तेच विज्ञानिक शोध दुसरीकडे माणसाच्या मृत्यूचे कारण बनत आहे...
एका US संस्थेच्या सर्वेनुसार मागील दोन-तीन वर्षात जगभरात ७५० पेक्ष्या जास्त लोकांचा मृत्यू हा सेल्फी काढताना झाला आहे..लोक स्वताचाच फोटो काढण्यात इतके मश्गुल होतात कि आजू-बाजूचे त्यांना ध्यानाच राहत नाही..

आतापर्यंत हृदय-विकार, अपघात,आत्महत्या,cancer , आजार , वृद्धपण असे विविध प्रकार हे मृत्यूचे कारण बनत होते...मात्र आता त्यात सेल्फी विकार किंवा सेल्फीहत्या(सेल्फी काढताना झालेला मृत्यू) हा विचित्र प्रकार include करावा लागेल....
सेल्फी निश्चित काढा पण तेवढी काळजी घ्या कि स्वताचा फोटो mobile वर असला पाहिजे न कि भिंतीवर....
विशेष करून या बाबतीत तरुणांमध्ये सतर्कता आली पाहिजे...

शेवटी एका गाण्याचा ओळी लिहाव्याशा वाटतात....
सेल्फी काढताना...." जपून जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे....."

समाजविचार

प्रतिक्रिया

जेपी's picture

6 Mar 2016 - 9:08 pm | जेपी

लै..लै..लै
रे सेल्फी लै लै रे..
टँव..टँव..टँव

अन्नू's picture

6 Mar 2016 - 9:10 pm | अन्नू

=)) =))

सतिश गावडे's picture

6 Mar 2016 - 9:12 pm | सतिश गावडे

अति सेल्फी प्रेम हे नार्सिसिझमचे लक्षण आहे.

हे नार्सिसिझम मंजे काय??
एखाद्याला कुल्फी आवडत असेल तर काय म्हणाल..

पिके से पिके तक..'s picture

6 Mar 2016 - 9:28 pm | पिके से पिके तक..

जेपी भाऊ सेल्फी आणि कुल्फी लय फरक आहे...कुठचा कुठे संबंध नका लावू....

सतिश गावडे's picture

6 Mar 2016 - 9:29 pm | सतिश गावडे

हे नार्सिसिझम मंजे काय??

नार्सिसिझमची थोडीफार कल्पना येऊ शकेल असे लेखन मी इथे केले आहे.

एखाद्याला कुल्फी आवडत असेल तर काय म्हणाल..

आवड त्याला कुल्फीची sss
आवड त्याला कुल्फीची sss
कुल्फीच्या काडीची sss

त्या लेखा बद्दल धन्यवाद,
अजुन बरच वाचन वाढवावे लागेल..

>>>> आवड त्याला कुल्फीची sss
आवड त्याला कुल्फीची sss
कुल्फीच्या काडीची sss

>>>

तुषार काळभोर's picture

7 Mar 2016 - 11:32 am | तुषार काळभोर

हायलाईट करायचं होतं- ते चुकून स्ट्राईकौट झालं

संक्षीचे लेख वाचल्यावर लग्गेच कळेल नार्सिसिझम म्हणजे काय ते.

अगम्य's picture

9 Mar 2016 - 12:07 am | अगम्य

असे नार्सिसस सारख्या इतर व्यक्तीवरून आलेले नाव देणे शोभत नाही. त्यांचा तर स्वयंभू सन्क्षीझमच!

आनन्दा's picture

9 Mar 2016 - 8:56 am | आनन्दा

स्टँडिंग ओव्हेशन या प्रतिसादाला,

चौकटराजा's picture

6 Mar 2016 - 9:35 pm | चौकटराजा

नार्सिझम हा विकार एक व्यक्तिपुरता मर्यादित असतो. सार्वजनिक नार्सिझम ही संकल्पना मी तरी ऐकलेली नाही. सेल्फी हे एक सांप्रत बोकाळलेले खूळ आहे.संगणकावरील चॅटिंग ,वॉलपेपर, फेसबुक ,आर्कुट रिंगटोन या खुळाप्रमाणेच त्याचे होईल.

सतिश गावडे's picture

7 Mar 2016 - 12:02 am | सतिश गावडे

नार्सिसिझम हा व्यक्तीपुरता मर्यादीत असला तरी शेवटी व्यक्तींचाच समाज बनतो.
सारा समाजच हळूहळू नार्सिसिस्ट होत आहे की काय हा मुद्दा The Narcissism Epidemic: Living in the Age of Entitlement या पुस्तकात छान मांडला आहे.

फेसबुक हे नार्सिसिस्टांचं "व्यक्त होण्याचं" आदर्श ठिकाण आहे. एखादया रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर ऑर्डर द्यायच्याही आधी "फेसबुक चेक इन" करून मी कुठे जेवायला आलो आहे हे जगाला सांगणारी व्यक्ती नार्सिसिस्ट असण्याची शक्यता असते. :)

माझे वेगवेगळ्या ग्रुपमधले दोन चांगले मित्र आहेत. त्यांची एक खासियत म्हणजे स्वतःच्या पर्सनालिटी अन स्वफोटोविषयी नितांत प्रेम आहे. वेगवेगळ्या ड्रेसमधले, वेगवेगळ्या अ‍ॅक्शनचे अन वेगवेगळ्या ठिकानी स्वतःचे फोटो काढायचे अन ते एडिट करत बसायचा दांडगा छंद आहे दोघांना. त्यातील एकाचे तर जवळ पास ३० ते ३५ हजार स्वफोटो आहेत. त्यातील बरेचसे फेस्बुकावर, वॉटस्पवर टाकणे चालूच असते. सेल्फी त्याला म्हणू शकतो की नाही म्हाईत नाही पण हे फोटो बरेचसे एडिटेड असतात. ह्याला आपण नार्सिसिझम म्हणू शकतो का गावडेसर?

श्रीरंग_जोशी's picture

6 Mar 2016 - 9:39 pm | श्रीरंग_जोशी

सतत अन जिथे तिथे सेल्फी काढत राहणे हे आत्मरती (Narcissism) चे लक्षण आहे.

या सवयीचा मोठ्या प्रमाणात अतिरेक होत असल्याने लोकांवरचा प्रभाव हळू हळू कमी होईल असे वाटते.

राजेश घासकडवी's picture

6 Mar 2016 - 10:17 pm | राजेश घासकडवी

सात अब्ज लोकसंख्येत गेल्या दोनतीन वर्षांत ७५०! म्हणजे दरवर्षी एक कोटी लोकसंख्येत तीन! अहो, एवढ्या कमी रेटने कुठचीही अॅक्टिव्हिटी करताना मरायला होतं. झोपाळ्यांवरून पडून, दोरीत गळा अडकून वगैरे त्यापेक्षा जास्त प्रमाणात मुलं मरतात. म्हणून 'बागेत खेळणं हा महाभयंकर शोध आहे. त्यापासून सावध राहिलं पाहिजे' असं म्हणणार का तुम्ही? झोपाळ्यावर बसण्याला विकार म्हणणार का? उगीच पान पडल्यावर आकाश कोसळलं म्हणून कशाला ओरडायचं?

पिके से पिके तक..'s picture

7 Mar 2016 - 10:58 am | पिके से पिके तक..

नशीब आकाशगंगेचा हिशोब नाही लावला...
राजेश भाई..साधारण पाच वर्षापूर्वी जो आकडा शुन्य होता आणि तेव्हा कोणी कल्पना पण नसेल केली कि पुढे जाऊन सेल्फी पण मृत्यूचे कारण बनू शकेल , तिथे ७५० हा आकडा नक्कीच विचार करण्यालायक आहे.... आणि झोपाळ्यावर झोके घेताना वेगाचे आणि आजूबाजूचे भान नसल्यामुळेच अपघात घडेल.. ..त्याचप्रमाणे सेल्फी घेताना भान विसरणे हेच अपघाताला कारण ठरते..
बाकी सावधानता बाळगावी कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न....

हेच तर..
सेल्फीचा किंवा झोक्याचा कशाला... सर्वच अपघात हे वेगाचे आणि आजूबाजूचे भान (आणि तारतम्य) नसल्यामुळे होतात.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Mar 2016 - 6:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अपघात होणं आणि नको तिथे मुर्खपणा करताना अपघात ओढवुन घेणं ह्यात फरक नाही का? तुम्ही दिलेली उदाहरणं झालेल्या अपघाताची आहेत. मधे व्हॉट्स अ‍ॅपवर एका कड्याच्या टोकाला बसुन सेल्फी स्टिकने सेल्फी काढणार्‍या दिडशहाण्या ग्रुपचा फोटो आलेला त्यामधे ऑलमोस्ट अपघाताला निमंत्रण दिलेलं. दोन्हीमधे फरक आहे सर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Mar 2016 - 11:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे !

AMERICAN PSYCHIATRIC ASSOCIATION MAKES IT OFFICIAL: ‘SELFIE’ A MENTAL DISORDER

त्यांनी त्या रोगाचे नाव सेल्फायटीस असे ठेवले आहे आणि तिचे वर्गिकरणही केले आहे...

Borderline selfitis : taking photos of one’s self at least three times a day but not posting them on social media

Acute selfitis: taking photos of one’s self at least three times a day and posting each of the photos on social media

Chronic selfitis: Uncontrollable urge to take photos of one’s self round the clock and posting the photos on social media more than six times a day

मोदक's picture

7 Mar 2016 - 7:03 pm | मोदक

डॉक्टरसाहेब,

हीच माहिती देणार्‍या अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेच्या एखाद्या वेबसाईचा किंवा त्यांनी प्रमाणित केलेल्या एखाद्या पेपर चा दुवा आहे का?

प्राची अश्विनी's picture

7 Mar 2016 - 7:35 pm | प्राची अश्विनी

बहुक हे खरे नसावे. selfitis hoax

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 12:26 pm | तर्राट जोकर

अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे !

>> विद्यमान पंतप्रधानांनाही ???

त्याला मनोविकार म्हणत नाही, नमोविकार असेल कदाचित. ;)

कपिलमुनी's picture

7 Mar 2016 - 2:49 pm | कपिलमुनी

घुमिवलस ! लै बेक्कार हसलो

यशोधरा's picture

7 Mar 2016 - 7:27 pm | यशोधरा

=))

चिक्कीताईनाही जडलाय हा विकार .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Mar 2016 - 6:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

Consistent Irrelevancy हासुद्धा एक मानसिक विकार असावा का? रच्याकने तुमचे प्रतिसाद वाचुन आमच्या संन्यासात गेलेल्या एका मित्रांची आठवण येते. त्यांचं नाव तीन अक्षरी आणि आडनाव दोन अक्षरी आहे. तुम्ही तेचं तर नव्हे?>

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Mar 2016 - 7:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

http://www.misalpav.com/comment/814307#comment-814307

ह्या ठिकाणी श्री. तर्राट जोकर काय म्हणता नीट पहा

मोदीभक्तांना. संशयास्पदरित्या मोदीविरोधात जाणारा एक शब्दही दिसला तर पिसाळल्यागत करतात. झुंडीने हल्ला करतात. एका प्रतिसादावर चार चार लोक प्रतिवाद करतात. वस्तुनिष्ठ चर्चेत असंबद्ध भावनिक मुद्दे आणतात, भावनिक चर्चेत वस्तुनिष्ठ प्रश्न आणतात. काही सुचले नाही की 'तेव्हा कुठे होतात?' हा फेवरिट प्रश्न काढतात. काहीही करुन कसेही करुन मोदी-भाजप विरोध करणार्‍यास सळो की पळो करुन सोडतात. मोदिंच्या बाबतीत विरोध, खिल्ली, विनोद, आरोप काहीही असो त्यांना फक्त अतिविखारी द्वेषच दिसतो. कुठे मोदीविरोधक वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्, नंतर तुम्हाला मोदीविरोधाशिवाय काहीच दिसत नाही असे म्हणत तोंडावर हात ठेवून बो करत सुटतात. जालावरच्या चर्चांना महायुद्धाचे स्वरुप देतात, इथे चाललेल्या चर्चा म्हणजे जीव की प्राण करुन लढवतात. जणू इथे एक उणादुणा शब्द सिद्ध झाला तर तिकडे दिल्लीत इंद्राचे आसन डळमळीतच होणार आहे. एवढी असुरक्षितता पाहिली आहे का कुठे?

कुठे मोदीविरोधक वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्

ओह आय सी. धाग्याचा विषय मोदी होता तर. सॉरी माफ करा. मला वाटलं धोकादायक पद्धतीने सेल्फी काढण्याबद्दल धागा होता का काय ते.

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 8:53 pm | तर्राट जोकर

काडी होती ती. आग लागली. गवत वाळके होते, पेटले.

जव्हेरगंज's picture

7 Mar 2016 - 12:59 pm | जव्हेरगंज

" जपून जपून जपून जपून जा रे पुढे धोका आहे....."

सप्तरंगी's picture

7 Mar 2016 - 6:50 pm | सप्तरंगी

असे तर सगळीकडेच लोक सेल्फी काढताना, आज काय खाल्ले काय पिले हे सांगताना , फिलिंग यो आणि फिलिंग त्यों म्हणताना आणि पोस्ट करताना दिसतात. (मला शिकायचेय ते अजून) अश्या गोष्टी सारख्या वाचून वाचून मला सगळीकडे असे आपली टिमकी वाजवणारे लोक दिसू लागतात. कळत नाही - सारखा सेल्फी काढून पोस्ट केला तर Narcissism, एकही फोटो नाही काढला आणि कुठेही आपला चेहराच नाही दाखवला तर डिप्रेशन. त्यातील लक्षुमण रेषा आपण सामान्य तर ओळखुच नाही शकणार, ओळखायचा प्रयत्न केला तरी नक्की नाही सांगता येणार. डॉक्टर्सना / psychologist ना चांगले दिवस आलेत का ?

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 6:59 pm | तर्राट जोकर

एकही फोटो काढला नाही, कुठे दाखवला नाही तर डिप्रेशन येतं हे विधान जरा अतिच.

असे विधान मी तरी नाही केले. तुम्ही थोडा भाग उचलून त्याला ' येत ' असे जोडलंत. हे अति नाही का ?
(खर तर मला हे सगळच अति वाटते. पण इथे दिग्गज लोक आहेत आपण त्यांचे विचार ऐकुयात.)

तर्राट जोकर's picture

7 Mar 2016 - 9:36 pm | तर्राट जोकर

कळत नाही - सारखा सेल्फी काढून पोस्ट केला तर Narcissism, एकही फोटो नाही काढला आणि कुठेही आपला चेहराच नाही दाखवला तर डिप्रेशन.>> ह्याचा अर्थ काय घ्यावा?

आनन्दा's picture

8 Mar 2016 - 1:57 pm | आनन्दा

मराठीचा क्लास लावा.. त्या कन्हैयाच्या धाग्यावर पण तुमचा मराठीचा घोळ झालाय.

ह.घ्या.

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 2:05 pm | तर्राट जोकर

कुठे? बरं ते असुदेत. मराठीचं बघु नंतर, तुम्ही वकिली कधीपासून सुरु केलीत आनंदासाहेब?

आनन्दा's picture

8 Mar 2016 - 3:20 pm | आनन्दा

बाकी - मी उगीचच कोणाला तरी सल्ले द्यायला जात नाही. पण तुमची माझ्या मनातली पहिली प्रतिमा एका त्रयस्थ विचारवंताची होती. नंतर ती बदलून हळूहळू "सार्वकालीन विरोधकाची" बनत गेली. असे वाटू लागले की मिपावरच्या एका आयडीने परकायाप्रवेश केला आहे.
पुढे तर विरोधाच्या भरात तुम्ही फारच वाहवत चाललात, म्हणून जरा गाडीला ब्रेक लावायला हे प्रतिसाद.. आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. विरोध करण्याच्या नादात तुमचे मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊन केवळ शब्दच्छलातच आनंद मानू लागलात की काय?

असो, वाटते म्हणून बोलतो. पटले तर घ्या, नाहीतर सोडून द्या.. तुमचा हा जर परकायाप्रवेश असेल तर मग बोलणेच खुंटले..

तिथे अध्याहृत असलेला शब्द "येतं" असा नसून "म्हणतात" असा आहे.

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 2:08 pm | तर्राट जोकर

तुम्हाला अध्याहृत असलेला शब्द बसवून पूर्ण प्रतिसाद परत लिहून दाखवाल का हो मराठीचे गुरुजी? आम्ही अजून 'कमल नमन कर' हेच गिरवतोय.

सारखा सेल्फी काढून पोस्ट केला तर Narcissism झालाय म्हणतात, एकही फोटो नाही काढला आणि कुठेही आपला चेहराच नाही दाखवला तर डिप्रेशन आलंय म्हणतात.

मूळ लेखकाच्या अनुमोदनाच्या प्रतीक्षेत.

सप्तरंगी's picture

8 Mar 2016 - 9:04 pm | सप्तरंगी

अगदी बरोबर आनन्दा, अनुमोदन आणि आभार !!
मला म्हणायचेय: सारखे असे articles वाचून आणि मग लोकांना तसेच वागताना पाहून आपण मनात काहीतरी connect करत लोकांना judge करत जातो, आणि मग सगळीकडे असे लोक दिसू लागतात. पण लोक तसे असतातच असे नाही. म्हणून हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार वाटतो. डिप्रेशन, Narcissism किंवा अशी इतर निदाने इतक्या साध्याशा (सेल्फी काढण्याच्या / कधीच फोटोच न टाकण्याच्या etc ) गोष्टीवरून करता येऊ शकत नाहीत. अर्थात यामागे loneliness, publicity stunts, anxiousness अश्या छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात. पण म्हणजे काही लगेच 'विकार' नाही.

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2016 - 8:03 pm | श्रीगुरुजी

सेल्फीचं हे वेड तर भयंकरच आहे.

https://in.news.yahoo.com/nude-selfies-latest-trend-sweeping-080000979.h...

अन्नू's picture

7 Mar 2016 - 10:14 pm | अन्नू

अगदी हिच बातमी सांगणार होतो. :))

विवेक ठाकूर's picture

7 Mar 2016 - 8:30 pm | विवेक ठाकूर

.

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2016 - 8:44 pm | श्रीगुरुजी

त्यात काय म्हणायचंय?

मोदीअब्बांचा फोन मॅचिंग मॅचिंग आहे म्हणायचं. ;)

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2016 - 8:52 pm | श्रीगुरुजी

त्यांचा फोन आहे, ते स्वतःच स्वतःचा फोटो काढताहेत आणि त्यात इतरांना त्रास व्हायचं कारणंच काय? ते स्वतःच स्वतःचा फोटो काढत असताना माध्यमांनी ते दृश्य टिपले आणि ते बघून इतरांना त्रास होतोय.

विवेक ठाकूर's picture

7 Mar 2016 - 11:08 pm | विवेक ठाकूर

आणि लेखकाच्या म्हणण्या प्रमाणे ती मनोरूग्णता आहे . मोदी सातत्यानं हाच प्रकार करतांना दिसतात .

दिवसातून ३ वेळा? या न्यायाने मोदींनी आतापर्यंत ३००० पेक्षा जास्त फोटो शेअर करायला हवे होते.
मोदी मनोरुग्ण आहेत का हे माहीत नाही, पण तुम्ही नमोरुग्ण आहात हे नक्की.

श्रीगुरुजी's picture

8 Mar 2016 - 2:27 pm | श्रीगुरुजी

मोदी सातत्यानं हाच प्रकार करतांना दिसतात .

सातत्याने? गेल्या २१ महिन्यात मोदींनी किती सेल्फी काढल्या याची आकडेवारी आहे का? का एकच सेल्फी रोज ३ वेळा मोजता आणि शिव्या हासडता?

मोदींचे सेल्फी वेड

तिथे इतरही फोटो आहेत पण त्याबरोबर त्यांच्या अनेक सेल्फीज आहेत. मोजदाद तुम्ही करा.

बुद्धीभेद करण्यात तुमचा हात कोणीच धरू शकणार नाही विठा.
१. ती गूगल इमेजेसची लिंक आहे.
२. त्या लिन्कवर मोदींचे हजारो फोटो आहेत.
३. त्यातले फार तर १०० सेल्फी आहेत.
तरी म्हणे सेल्फीवेडे.

माझ्याकडे तुमचा प्रतिवाद करायला शब्दच नाहीत. पुरावे देताना किमान तपासून तरी बघत जा. की आपले उचलली जीभ?

तुमच्या मनातला ३,O00 चा आकडा कुठून काढला ते बघा !

आनन्दा's picture

8 Mar 2016 - 10:50 pm | आनन्दा

सोप मॅथ आहे -
मोदींचे पब्लिच लाईफ साधारन ३-४ वर्षांचे आहे.. म्हणजे १००० दिवस तरी नक्की होतील. दिवसाला ३ याहिशोबाने झाले की नाही ३०००?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Mar 2016 - 9:02 pm | डॉ सुहास म्हात्रे

.

"अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे !"

.

ही अफवा (होक्स) आहे =)) =)) =))

.

या बाबतीत सबळ दुवा मागण्याची तसदी यांनी आणि यांनी घेतली याचा आनंद झाला आहे ! :)

"कोण्यातरी वर्तमानपत्र / टिव्हीवरची बातमी अथवा मुलाखत / मोठ्या संघटनेचे नाव (इथे, अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटना) असे नाव टाकले तर लोक पटकन डोळे मिटून विश्वास ठेवतात" असे लिहिले असते तर अनेक जण त्याचे खंडन करायला पुढे आले असते !

पुरावा खरा-खोटा, सबळ-दुर्बळ आहे की नाही ते पाहण्याऐवजी तो आपल्या माणसाने दिला की विरोधकाने, तो सोईचा आहे की गैरसोईचा हे पाहिले जाते, हे सिद्ध करण्यासाठी हा एक छोटासा प्रयोग होता =))

हा प्रयोग किती यशस्वी झाला आहे की नाही हे इथल्याच काही प्रतिसादांवरून ज्याने त्याने ठरवावे.

मिपाकरांच्या सोईसाठी, जालावरच्या अश्या अफवा सहज पडताळून पाहण्यासाठी उपयोगी दुवे :

http://www.snopes.com/

http://urbanlegends.about.com/

http://www.breakthechain.org/

http://www.truthorfiction.com/

http://www.sophos.com/security/hoaxes/

http://www.hoax-slayer.com/

http://www.vmyths.com/

http://www.symantec.com/business/security_response/threatexplorer/risks/...

http://www.hoaxbusters.org/

http://virusbusters.itcs.umich.edu/hoaxes.html

सतत सेल्फी काढत राहणे हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्याच्या बातम्या पूर्वी अमेरिकन माध्यमांत पाहिल्या होत्या. निरखून वाचल्या नव्हत्या. अशाच बातम्या कदाचित भारतीय माध्यमांतही आल्या होत्या.

ती पार्श्वभूमी असल्याने अनेकांचा या अफवेवर विश्वास बसला असू शकतो.

मोदक's picture

8 Mar 2016 - 1:22 pm | मोदक

:))

हुशारीने लावलेला सापळा लक्षात आला नाही म्हणून विशिष्ट आयडींची गोची झाली असावी.

हा प्रकार हॉक्स आहे हे निव्वळ त्या दुव्यावर क्लिक केले असते तरी दिसले असते. ढळढळीत मराठीमध्येही मजकुर दिसत आहे आणि मपिची लिंक आहे.

मोदींना शिव्या देण्याच्या नादात अशा चुका होतात. चालायचेच. :))

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 1:52 pm | तर्राट जोकर

@खाडेसर, मोदीभक्तांच्या लक्षणात आणखी एकाची भर पडली. हुशारीने सापळा लावतात.

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 1:55 pm | तर्राट जोकर

...आणि सापळा लावला होता हेही स्वतःचीच पाठ थोपटून घेऊन बडेजाव मिरवत सांगतात.

मोदक's picture

8 Mar 2016 - 2:22 pm | मोदक

:))

असूद्या असूद्या. गेट वेल सून.

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 2:45 pm | तर्राट जोकर

आम्ही म्हनायला पाहिजे भक्तांना गेट वेल फर्स्ट. एक छोटीशी पिंकही सहन झाली नाही आणि सेल्फी धाग्यावरही नमोभक्तांनी आक्रमण केले. सापळ्यात अडकवण्याच्या बाता मारणार्‍यांना आपणच सापळ्यात अडकलो ते कळत नाही. =))

मोदक's picture

8 Mar 2016 - 2:51 pm | मोदक

:))

आम्ही तसदी घेतली नाही कारण आम्ही तुमच्या विश्वासार्हतेवर विश्वास ठेवला.. असो. चूक झाली म्हणायची.
:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Mar 2016 - 9:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान प्रयत्न होता =))

(ह्घ्या)

एकपण सेल्फी न देता लेख पुढे का दामटतआहे?
जपून मागे धोका आहे असं पाहिजे.
स्वत:चा एक छानसा फोटो दुसय्रा एका फोटोवर चिकटवता आला की झाला सेल्फी.तिथेच कशाला जायला हवं?पॅरिसच्या टावरच्या फोटोवर आपला फोटो बेमालूम चढवायचा.

पिके से पिके तक..'s picture

8 Mar 2016 - 2:13 pm | पिके से पिके तक..

आजकाल एक विशेष गोष्ट होत चाललीय भारतात....विषय कुठलाहि असला त्याची सुरवात कुठूनही होत असली तरी त्याचा धागा नरेंद्र मोदींशी जोडला जातो आहे...मी काही मोदीभक्त वैगरे नाही...पण तुम्हीही विचार करून पहा या गोष्टीचा...तुम्हाला लक्षात येईल...
"गुरु" सिनेमा मधील एक dialogue आठवतोय..." जब लोग तुम्हारे हर बात के खिलाफ बोलने लगे तो समझ लेना कि तुम तरक्की कर रहे हो..."

तर्राट जोकर's picture

8 Mar 2016 - 2:21 pm | तर्राट जोकर

त्याला कारण आहे. विषय कुठलाही असला, काही चांगलं झालं की मोदींशी त्याचा संबंध जोडला जातो. निगरगट्टपणे फोटोशॉपचाही आधार घेतला जातो.

बाकी, गुरु सिनेमातला डायलॉग राहुल, केजरीवाल बाबतीतही खरा आहे असं म्हणावं काय?

माझ्या सेल्फोन ला एक मनोविकार झालेला आहे. त्यात अचानक क्यामेर्‍याचा मोड बदलतो. मग आपल्या समोरचे द्रुश्य न दिसता आपलाच फोटो परत परत काढला जातो. काय म्हणावं याला.....

आपला थोबडा अर्र्र्र सं म हा, शब्द चेहरा असा वाचावा ) साठी ओलांडल्यामुळे सेल्फीच्या लायकीचा राहिलेला नाही सबब मी सेल्फी चा तिरस्कार करतो. मला कोणता बरं .....? विकार झालाय ?

तो फोन बदलून टाका. तुम्हाला कंजूसगिरी विकार झालाय.

ह.. घ्या.

ही चूक मोबाईल निर्मात्याची आहे, मूळातच मागच्या कॅमेरा मध्ये समोरचा व्ह्यू दिसताना त्यात फ्रंट कॅमेरातून मोबाईलधारकाचाही व्ह्यू असे कंबाईन फोटू काढणारा डिव्हाईस तयार व्हायला हवा जेणेकरुन फोटोग्राफरचे लक्ष समोरच्या धोका लाईनवर (लक्ष्मण रेषेवर) राहील . आणि ते काय ७५० का काय जीव वाचतील.

अभ्या..'s picture

8 Mar 2016 - 7:02 pm | अभ्या..

कार पार्किंग मिररसारखे?
आयडीया चांगलीय

विवेक ठाकूर's picture

8 Mar 2016 - 7:03 pm | विवेक ठाकूर

संपादक मंडळ तर्राट जोकर यांना समज देईल का ?

-
खुले आम बोलतोय.यांचे योगदान चर्चा भरकटवणे,इतरांना हिणवणे आणी ट्रोलींग करणे या पलिकडे काहि ही नाही.

-
बाकी मर्जी संम आणी मालकांची

गणेश उमाजी पाजवे's picture

9 Mar 2016 - 2:03 am | गणेश उमाजी पाजवे

माझे मिपा वरचे लिखाण पाहिले तर मी तुम्हा सगळ्यांच्या समोर उभाच राहू शकत नाही. पण मी गेली २ वर्षे मिपा चा नियमित वाचक आहे. कोणत्या अधिकाराने मी बोलतोय मला माहीत नाही. तजो सर तुम्ही असे नाही आहात, पण गेले आठवडाभर तुम्ही अगदी पिसाळल्यासारखे सगळ्यांवर शब्दबाण सोडत आहात.

मोदीभक्तांना. संशयास्पदरित्या मोदीविरोधात जाणारा एक शब्दही दिसला तर पिसाळल्यागत करतात. झुंडीने हल्ला करतात. एका प्रतिसादावर चार चार लोक प्रतिवाद करतात. वस्तुनिष्ठ चर्चेत असंबद्ध भावनिक मुद्दे आणतात, भावनिक चर्चेत वस्तुनिष्ठ प्रश्न आणतात. काही सुचले नाही की 'तेव्हा कुठे होतात?' हा फेवरिट प्रश्न काढतात. काहीही करुन कसेही करुन मोदी-भाजप विरोध करणार्‍यास सळो की पळो करुन सोडतात. मोदिंच्या बाबतीत विरोध, खिल्ली, विनोद, आरोप काहीही असो त्यांना फक्त अतिविखारी द्वेषच दिसतो. कुठे मोदीविरोधक वेगळ्या विषयावर बोलला तरी खेचून मोदी मध्ये आणतात्, नंतर तुम्हाला मोदीविरोधाशिवाय काहीच दिसत नाही असे म्हणत तोंडावर हात ठेवून बो करत सुटतात. जालावरच्या चर्चांना महायुद्धाचे स्वरुप देतात, इथे चाललेल्या चर्चा म्हणजे जीव की प्राण करुन लढवतात. जणू इथे एक उणादुणा शब्द सिद्ध झाला तर तिकडे दिल्लीत इंद्राचे आसन डळमळीतच होणार आहे. एवढी असुरक्षितता पाहिली आहे का कुठे?

आता तुम्हीच इथे हे लिहिलंय.आज हा धागा व्यवस्थितपणे सेल्फी च्या दुष्परिणामाबद्दल चालू असताना तुम्ही हे विधान केलेत

अमेरिकन मानसोपचारतज्ज्ञ संघटनेने सेल्फी घेणे हा एक मनोविकार असल्याचे दोन वर्षापूर्वीच अधिकृतरित्या जाहीर केले आहे !

>> विद्यमान पंतप्रधानांनाही ???

आता इथे मोदींचा विषय काढून आग पेटवायची काही गरज होती का ?एकतर सगळ्यांना मोडी समर्थक म्हणून हिणवायचं आणि कोणी काही बोललं कि आकांड तांडव करायचं.अस नका वागू सर प्लीज तुम्हाला अस बघवत नाही हो.

आनन्दा's picture

9 Mar 2016 - 8:59 am | आनन्दा

हेच म्हणत होतो.
त्यांना मिपावरच्या कुठल्यातरी मृत आयडीने पछाडलेय बहुतेक.. आत्मूकाकांना विचारले पाहिजे.

शलभ's picture

9 Mar 2016 - 1:16 pm | शलभ

+१
आणि आव तर असा आणायचा कि समर्थक बोलतात म्हणून हे प्रत्युत्तर देतात.

श्रीगुरुजी's picture

9 Mar 2016 - 2:13 pm | श्रीगुरुजी

आता इथे मोदींचा विषय काढून आग पेटवायची काही गरज होती का ?

कोणताही विषय असला तरी काही जणांना त्यात मोदी आणल्याशिवाय चैन पडत नाही.

मोदक's picture

9 Mar 2016 - 2:36 pm | मोदक

+१