अशी बायको असती तर,आम्ही असे झालो नसतो
भर तारुण्यात कफनी घालून,
रानावनात निघालो नसतो
तिची नसती आली कुणालाच सर
अशी बायको असती तर
पेशवाई गाजवली असती,
मिजास मोठीकेली असती,
राजबिंडा बनून मिरावलो असतो
पर्वतीवर छोटस आमच असत घर
अशी बायको असती तर
सारसबागेच्या झुडुपांमधे तिला घेऊन बसलो असतो
आम्ही सुद्धा छत्रीमागे तुम्हाला कधी दिसलो असतो
तळ्यातल्या गणपतीने दिले असते अनेक वर
अशी बायको असती तर
तुळशीबागेतल्या फेरीवाल्यांनी केला असता सलाम
एक ते चार रोज मस्त केला असता आराम
दुकानदारानी माझ ऐकून वेळेअगोदर
उघडले असते शटर
अशी बायको असती तर
चितळेबंधुनी होम डिलिव्हरी केली असती
माझ्यासाठी रांग सुद्धा थांबवली असती
काही नसते बोलले उडवल्यावर
पुणेकरांची टर,
अशी बायको असती तर
शनिवारवाड्यात माझ्यासाठी खास ठेवली असती जागा
सर्वाना बोललो असतो सौजन्याने वागा
माझी गाडी नसती थांबवली कोणत्याच सिग्नलवर
अशी बायको असती तर
आता नाशिबाला दोष लावुन काय फायदा
केला असता छातीठोकुन एक वायदा
झालो असतो मी या जन्मातच पुणेकर
अशी बायको असती तर
प्रतिक्रिया
5 Mar 2016 - 12:12 pm | अभ्या..
लोल लोल लोल लोल
हरिदासपंत आपणास मिपाचे 'देवांग पटेल(पुणेकर)' हा किताब शनवारवाड्यासमोरील पुलावर, जिथे टाकाऊ चार्जर मिळतात त्या गर्दीच्या साक्षीने देण्यात येत आहे.
जरा सोमवारपर्यंत थांबा. सारे हपिसखर्चानेनेट्वापरणारे कसे मंगला टोकीजकडून त्वेषाने येतेत बघा. ;)
5 Mar 2016 - 1:04 pm | चांदणे संदीप
गोंधळाला या...
पुणे-६ च्या पुणेकरांनो गोंधळाला यावे...
लक्ष्मी रोडच्या गिऱ्हाईकांनो....
जं.म. रोडला चिवचिवणाऱ्यांनो...
प्रभात रोडच्या 'दाटी'करांनो...
टिळकरोडच्या दुचाकीस्वारांनो....
झेडब्रीजला बिलगणाऱ्यांनो...
अलका चौकात जमणाऱ्यांनो...
पर्वतीवर चढणाऱ्यांनो...
सारसबागेत दमणाऱ्यांनो...
शनवारवाड्यासमोर ओरडणाऱ्यांनो...
कोथरूडात निवांत असणाऱ्यांनो...
एफसी रोडवर मिरवणाऱ्यांनो...
मंडईतल्या शांतिप्रियांनो...
युनिव्हर्सिटीत (झाडांमागे) लपणाऱ्यांनो...
पाषाणरोडच्या हुच्चभ्रूंनो...
कोर्टातल्या रिकामटेकड्यांनो...
क्यांपातल्या एकमार्गींनो....
स्टेशनात धडपडणाऱ्यांनो...
शनिपाराच्या भक्तगणांनो...
लकडीपुलावर जाहीर होणाऱ्यांनो...
गोंधळाला य्याव्वे!
(खरा पुणेकर असलं काही ऐकून येतंच नस्तो म्हणा!)
Sandy
5 Mar 2016 - 1:52 pm | अत्रुप्त आत्मा
@सारे हपिसखर्चानेनेट्वापरणारे कसे मंगला टोकीजकडून त्वेषाने येतेत बघा. >>
5 Mar 2016 - 1:55 pm | प्रचेतस
त्यां मंगला टाकिजपाशी एक पाणीदार मामा मिसळ पण मिळते म्हणे. अर्थात आधी पातेल्यात डोकावून ती खावी लागते असे जाणकार म्हणतात.
5 Mar 2016 - 2:13 pm | सतिश गावडे
सगळ्यांचीच कुवत नसते हो उद्योगपती होऊन स्वतःच्या खर्चाचे नेट वापरण्याची. ;)
5 Mar 2016 - 2:31 pm | नीलमोहर
हापिसकडूननेटहीएकमेवसुविधामिळतअसेलतरकावापरूनयेआणित्याबद्दलनेट्पॅकवापरणार्यांनीकशासाठीजळावेम्हणे?
आणि मंगला टोकीजकडूनच का यायचे? पुणेकरांना येण्यासाठी गल्लीबोळातले अनेक शॉर्ट्कट आहेत ;)
5 Mar 2016 - 2:40 pm | सतिश गावडे
अगदी हाच विचार मनात आला होता. मात्र सोलापूरी शिव्या खायच्या नसल्याने "जळजळ" शब्द लिहीण्याचा मोह आवरला. :)
ते सोलापूरचे असल्याने पुण्याचे गल्ली-बोळ त्यांना ठौक नसावेत.
5 Mar 2016 - 4:48 pm | अभ्या..
नवकविंचा सत्कार कुठे आयोजित केला आहे ते वाचावे. तेथे जायचा मंगला टोकीज कडूनचा रस्ता मला माहीती आहे. बाकी गल्ल्या काहून हुडकायच्या?
5 Mar 2016 - 5:08 pm | नाखु
नाहीत हे मोठ्या मनाने मान्य करावे काहून पंगा घ्यावा पुन्या-धन्याशी (अस्स होतं या धाग्यावर आपोआप यमके जुळतात.)
पूणेरी शेजारी नाखु
5 Mar 2016 - 5:12 pm | अभ्या..
हात जोडतो नाखुकाका
यमकहरामी होऊ नका.
;)
5 Mar 2016 - 6:03 pm | प्रचेतस
त्यांनी गंडा बांधलाय. अता त्यांनाही आपोआप यमके होतात त्याला ते तरी काय करतील.
5 Mar 2016 - 6:15 pm | अभ्या..
भुर्जीला फोडलेले अंडे
गुर्जीनी बांधलेले गंडे
हपिसात बसलेले संडे
सारे बिनकामाचे फंडे
5 Mar 2016 - 12:24 pm | हरिदास
या कवितेतून कोणाला ही दुखावण्याचा मनसुबा नाही.
कोणाचे मन दुखावले असल्यास मी मनपूर्वक माफी मागतो.
5 Mar 2016 - 12:39 pm | भाऊंचे भाऊ
.
5 Mar 2016 - 1:44 pm | एक एकटा एकटाच
जबरदस्त
5 Mar 2016 - 2:00 pm | अत्रुप्त आत्मा
असे
डब्डे असते तर,आम्ही असे बसलो नसतो
भर गवतात लुंगी घालून...
सक्काळी सक्काळी निघालो नसतो (दोन दगडांवर!)
त्याची नसती आली क'मोडला सर
असे डब्डे असते तर!
5 Mar 2016 - 2:20 pm | चांदणे संदीप
वरडा!
___/\___ घ्या गुर्जी!
5 Mar 2016 - 2:23 pm | प्रचेतस
जुने गुरजी परत भेटल्यागत वाटलं अगदी.
5 Mar 2016 - 2:26 pm | सतिश गावडे
होय. हेच आम्चे जुने गुर्जी.
कस्सा राव थांबू... या अजरामर तांब्या कवितेची आठवण झाली या निमित्ताने.
5 Mar 2016 - 2:32 pm | नाखु
एक वेळ अंड्याविना बुर्जी चालेल पण
डबड्याविना गुर्जी हे कसं खपवून घेणार....
ये अशक्य है अनहोनी है.
खास गुरुजी आणि वरील लोकांसाठीच हे गाणे.. पसंद
5 Mar 2016 - 2:42 pm | सतिश गावडे
अंड्याविना बुर्जी
डबड्याविना गुर्जी
वाह... काय यमक जुळवलं आहे.
5 Mar 2016 - 2:45 pm | सस्नेह
हळूहळू तांब्यागृही परतण्याचे वेध लागताहेत वाट्टं ;)
5 Mar 2016 - 2:49 pm | अत्रुप्त आत्मा
नाय हो नाय!
अशीच आली हुक्की
म्हणून टाकली थोड़ी फक्की! =))
5 Mar 2016 - 2:51 pm | सतिश गावडे
फक्की म्हणजे काय हो गुर्जी?
5 Mar 2016 - 3:14 pm | नाखु
चुना...
बुवांना ओला चुना(ही) मळायचा अणभव आहे याची नोंद घेणे
5 Mar 2016 - 3:18 pm | सतिश गावडे
धन्यवाद
5 Mar 2016 - 9:06 pm | अत्रुप्त आत्मा
@बुवांना ओला चुना(ही) मळायचा अणभव आहे याची नोंद घेणे>> ढेंण्यवाड ना'खुन्स!
5 Mar 2016 - 3:53 pm | गणेशा
आवडली कविता !
चितळ्यांनी रांग थांबवली असती तर तुमच्या तशा बायकोलाच आम्ही घेवुन जावे लागले असते दरवेळेस असे सहज वाटले..
5 Mar 2016 - 4:50 pm | अभ्या..
गणोबा काय रे ह्या वाक्याचा अर्थ? काही लागेना बाबा टोटल. :(
5 Mar 2016 - 5:11 pm | यशोधरा
गणेशाबुवा एकदम सुधारक झाले =))
5 Mar 2016 - 6:41 pm | अक्षय१
गान्धीजीन्चि कविता वैश्नव जन तो याचा अर्थ कोनी सान्गु शकेल काय्?असेल तर प्लीझ प्रतिसाद द्या
5 Mar 2016 - 7:02 pm | अभ्या..
नाहीतर?????
असो. एका व्यक्तीला भेटा. सतीसभौ नाव आहे त्यांच्या काकांचं. (म्हन्जे सतीस्भौ स्न्गतिल, पुतनेभौ पाथ्व्तिल लिहुन)
5 Mar 2016 - 7:23 pm | जव्हेरगंज
ल य भा री !!!!!
6 Mar 2016 - 7:56 pm | स्वामी संकेतानंद
लॉळलो!!
7 Mar 2016 - 11:04 am | ज्ञानोबाचे पैजार
तर आम्ही तुमच्या शेजारीच घर घेतले असते.
पैजारबुवा
7 Mar 2016 - 2:10 pm | सूड
काव्य कसंही होवो, मात्र या हरदासाने गुर्जींची कविता मूळपदावर आणली. =))
7 Mar 2016 - 2:16 pm | अनुप ढेरे
कविता छान!
8 Mar 2016 - 7:53 pm | kunal lade
छान लिहिता हरिदाराव....
9 Mar 2016 - 12:27 pm | हरिदास
:)
8 Mar 2016 - 10:02 pm | सुमीत भातखंडे
.
9 Mar 2016 - 1:08 pm | पैसा
अशीच अमुची आई असती वगैरे आठवले! कवीला जास्त दु:ख बायको "अश्शी" नसण्याचे आहे की पुण्यात नसण्याचे आहे ते कळ्ळे नाही.