आमचे आजोबा [बालकविता]

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
3 Mar 2016 - 11:46 pm

दोन पाय अन आधार काठी
तीन पायांचे आमचे आजोबा..

पाठ ताठ खांदेही ताठ
ना दुखतो एकही खुबा..

दृष्टी शाबूत दातही मजबूत
हास्याचा तर नित्य धबधबा..

धाक दरारा अजून वाटतो
गल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा..

गिरणीत जाती घेऊन हाती
दहा किलोचा दळण डबा..

चौरस आहार सतत विहार
आरोग्याचा मंत्र अजूबा..

नव्वदीतला तरुण जणू हा
पार शंभरी करणे मनसुबा ..

......... विजयकुमार देशपांडे
.

बालसाहित्यकविताबालगीत

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

3 Mar 2016 - 11:53 pm | अभ्या..

मस्तच.
आरोग्याचा मंत्र अजूबा हे वाचून माझ्या आजोबांची आठवण झाली. त्यांच्या नंबरला मी 'अजूबा, अजूबा' ही रिंगटोन ठेवलेली. :( आता नाही वाजणार कधीच ती.
.
तुमच्या विदेश नावाची फोड आज कळली. धन्यवाद अन अशाच निरागस, निर्लेप सुघड लेखनासाठी शुभेच्छा.

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2016 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या माहितीप्रमाणे ते तुझ्याच गावचे आहेत :-) .

धन्यवाद अन अशाच निरागस, निर्लेप सुघड लेखनासाठी शुभेच्छा.

अनुमोदन.

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2016 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी

माझ्या माहितीप्रमाणे ते तुझ्याच गावचे आहेत :-) .

धन्यवाद अन अशाच निरागस, निर्लेप सुघड लेखनासाठी शुभेच्छा.

अनुमोदन.

अरे वा. देशपांडे अन गाववाले. वावा.
मग तर काय जोरात डॉल्बी लावून शुभेच्छा. ;)

श्रीरंग_जोशी's picture

3 Mar 2016 - 11:53 pm | श्रीरंग_जोशी

कविता आवडली.

एक एकटा एकटाच's picture

4 Mar 2016 - 1:34 am | एक एकटा एकटाच

चांगलीय

आवडली

प्राची अश्विनी's picture

4 Mar 2016 - 8:41 am | प्राची अश्विनी

फारच छान!

पद्मावति's picture

4 Mar 2016 - 2:08 pm | पद्मावति

छान आहे कविता. आवडली.

हरिदास's picture

4 Mar 2016 - 2:49 pm | हरिदास

छान आहे कविता. आवडली.

छान कविता आहे.

विदेश's picture

4 Mar 2016 - 3:46 pm | विदेश

अभ्या.. श्रीरंग_जोशी एक एकटा एकटाच प्राची अश्विनी पद्मावति हरिदास बोका-ए-आझम ...

प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद !

एस's picture

4 Mar 2016 - 4:21 pm | एस

आवडेश!

अरिंजय's picture

4 Mar 2016 - 7:51 pm | अरिंजय

छान कविता. सर तुम्ही सोलापूरचे का?

विदेश's picture

4 Mar 2016 - 8:53 pm | विदेश

एस , मानस चंद्रात्रे ..

प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद !

अरिंजय's picture

4 Mar 2016 - 10:30 pm | अरिंजय

सर, नमस्कार. मिपा वर बघून आनंद झाला. देशपांडे सर माझे फेबु मित्र आहेत. त्यांचे दोन काव्यसंग्रह नुकतेच प्रकाशीत झाले आहेत व मी वाचले आहेत.

रातराणी's picture

4 Mar 2016 - 9:32 pm | रातराणी

कविता आवडली!

विदेश's picture

18 Mar 2016 - 7:54 pm | विदेश

रातराणी -
प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद !

काल पुण्यातले एकशेएक वर्षांचे घाटपांडे डॅाक्टर अजूनही दवाखाना चालवतात ते टिव्हिवर पाहिले आणि कविता आठवली.

पैसा's picture

19 Mar 2016 - 6:04 pm | पैसा

निरागस कविता!

विदेश's picture

21 Mar 2016 - 7:24 am | विदेश

कंजूस , पैसा ...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

मदनबाण's picture

21 Mar 2016 - 8:38 am | मदनबाण

छान आहे कविता...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram

श्रीरंगपंत's picture

21 Mar 2016 - 10:07 am | श्रीरंगपंत

सुंदर आहे कविता..

विदेश's picture

22 Mar 2016 - 6:04 am | विदेश

मदनबाण , श्रीरंगपंत -
धन्यवाद आपल्या प्रतिसादासाठी !