सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


मिपा रंगभूषा मंडळ

Primary tabs

सरपंच's picture
सरपंच in घोषणा
2 Mar 2016 - 9:14 pm

.

नमस्कार,

मिसळपाव.कॉम वर येणार्‍या साहित्यासोबतच मिपाला सजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रेखांकनांची, चित्रांची तसेच वेगवेगळ्या प्रसंगी विशेष फलकांची गरज पडते. अश्यावेळी मिपाकरांपैकी ज्यांना शक्य असेल ते लोक असे काम करतात. आता मिपाला या प्रकारच्या कामाची वारंवार गरज पडत असल्यामुळे अश्या मिपाकरांचे एक मंडळ असावे जे या ग्राफिक्सच्या क्षेत्रात काम करतात किंवा हौशी आहेत. अश्या लोकांचे मिळूण एक मिपा रंगभूषा मंडळ आजपासून कार्यरत होतेय.

आज या मंडळात अभ्या... (अभिजीत) असतील, सोबतच काही अन्य लोक जे सातत्याने मिपावर आपले योगदान देत आहेत असे लोक या मंडळात सहभागी होतील.

यापुढे मिपाच्या सजावटीची जवाबदारी या मंडळाकडे असेल. तुम्हाला मिपा सजवायचं असेल आणि तुम्हाला ग्राफिक्स क्षेत्रात काम करायला आवडत असेल तर तुम्ही सुध्दा या मंडळात सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्ही प्रशांतशी संपर्क साधावा.

- सरपंच

प्रतिक्रिया

अभ्या अभिनंदन रे भावा ;)
मला वाटत ग्रफिक्स मध्ये अभ्या पहिलेपासुनच योगदान देतोय.

सूड's picture

2 Mar 2016 - 9:17 pm | सूड

हाबिणंदन!!

बोका-ए-आझम's picture

2 Mar 2016 - 9:20 pm | बोका-ए-आझम

अभिनंदन!

स्वच्छंदी_मनोज's picture

2 Mar 2016 - 9:27 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच.. अभिनंदन अभ्याभौ..

श्रीरंग_जोशी's picture

2 Mar 2016 - 9:27 pm | श्रीरंग_जोशी

मिपावर रंगभूषा मंडळाच्या अधिकृत स्थापनेचे एक सामान्य मिपाकर या भूमिकेतून स्वागत करतो.

अभ्याने वर्षानुवर्षे एकाहून एक बॅनर्स व मुखपृष्ठे बनवून मिपाच्या सादरीकरणाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

या कामात आनंदिता, स्पा, पैसातै, नीलमोहर, संदीप डांगे, किलमाउस्की (हेमांगीके) व इतरांचेही उत्तम योगदान असल्याचे पाहिले आहे.

रंगभूषा मंडळाला मनःपूर्वक शुभेच्छा!!

नाव आडनाव's picture

2 Mar 2016 - 9:33 pm | नाव आडनाव

अभिनंदन आणि शुभेच्छा मित्रांनो :)

नाव आडनाव's picture

4 Mar 2016 - 11:21 am | नाव आडनाव

आणि परफॉर्मंस साठी काही गोष्टी (जास्त करुन डेटाबेस साईडला) मी बघू शकतो.

एक एकटा एकटाच's picture

2 Mar 2016 - 9:39 pm | एक एकटा एकटाच

अभिनंदन

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Mar 2016 - 9:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपापरिवारातिल सभासदांना सक्रिय करणारी "मिपा रंगभूषा मंडळ" ही अत्यंत स्पृहणिय कल्पना आहे !

अनेक मिपाकरांना मिपाच्या कामात सक्रिय सहभाग घ्यायचा असतो पण ते कसे करावे ते कळत नाही. या उपक्रमाने कलावंत मिपाकरांना मिपाला अधिक रंगतदार बनविण्याची आणि सुयोग्य कलाकृतींनी सजविण्याची संधी मिळेल. या प्रकल्पाने मिपा व कलाकार मिपाकर यांचा परस्पर फायदाच होईल... आणि इतर मिपाकरांना अधिकाधिक सुंदर मिपाचा आस्वाद घेता येईल ते वेगळेच !

अन्नू's picture

2 Mar 2016 - 9:46 pm | अन्नू

उत्तम योजना आहे. :))

अत्रुप्त आत्मा's picture

2 Mar 2016 - 10:22 pm | अत्रुप्त आत्मा

मले कुनी शिकीवलं , तर मी पन करिन!

श्रीरंग_जोशी's picture

2 Mar 2016 - 10:25 pm | श्रीरंग_जोशी

तुम्ही काढलेली पुष्परांगोळी एका मुखपृष्ठासाठी वापरली गेली आहे :-) .
तुम्ही या कामात यापुर्वीही सहभागी होता हे लक्षात आणुन देण्यासाठी हा उपप्रतिसाद.

होबासराव's picture

2 Mar 2016 - 10:24 pm | होबासराव

तुम्हिसुद्धा तर रंगिबेरंगि फुलांचि सुंदर सजावट करताच कि.

उगा काहितरीच's picture

2 Mar 2016 - 10:30 pm | उगा काहितरीच

अभिनंदन आणी शुभेच्छा . रच्याकने मिपासाठी टेक्निकल वर्क करायला आवडेल .(ड्रुपल, डेटाबेस इत्यादी ) हं कोणी गायडन्स करावे सुरूवातीला .

तुषार काळभोर's picture

2 Mar 2016 - 10:40 pm | तुषार काळभोर

सोलापूरचे तरूण, तडफदार, सळसळतंं नेतृत्व, श्री अभ्या.. यांचे हार्दिक अभिनंदन!!
अभ्या.. हवा करत नाही, अभ्या..ची हवा होते!

तसेच, अखिल उत्तर महाराष्ट्राचे मेगाबायटी प्रेरणास्थान श्री संदीप (आण्णा) डांगे यांना कार्याध्यक्षपदासाठी अणुमोदन.

प्रत्येक गोष्टीला अंत आहे, म्हणून संदीपआण्णा शांत आहे!

अभ्या.., संदीप डांगे, नीलमोहर, हेमांगीके, स्पा, स्वॅप्ससहीत संयुक्त मिपा रंगभूषा मंडळ झालेच पाहिजे!!
होऊ दे खर्च, मंडळ हाये घरचं!!

शुभेच्छुकः अखिल मिपाकर सदस्य, संपादक, सा. संपादक, तंत्रज्ञ, मालक

नाखु's picture

3 Mar 2016 - 8:34 am | नाखु

डावा नाही की उजवा, एकच भावा आहे !
अभ्या (भेंडी) आपला सच्चा छावा आहे !!

मिपा बाजारी कुणी वंदा कुणी निंदा !
बाकी कुणीबी असूदे एकच डांगेण्णा बंदा !!

सगळ्यांना शुभेच्छा !!!!

यमकस्वामी गृहस्था श्रमी झाल्याने ही चोरोळी ची गुस्ताखी खपवून घेणे ही विनंती

पैसा's picture

2 Mar 2016 - 11:05 pm | पैसा

उत्तम कल्पना! आता हे काम सुनियोजित पद्धतीने होईल.

रंगभूषा मंडळ स्थापना कौतुकास्पद उपक्रम आहे. अभ्या... आणि इतर मंडळींचे अभिनंदन आणि शुभेच्छा तर आहेतच.

एस's picture

2 Mar 2016 - 11:41 pm | एस

खूप छान कल्पना!

विवेक ठाकूर's picture

3 Mar 2016 - 12:30 am | विवेक ठाकूर

अभिनंदन आणि शुभेच्छा !

वैभव जाधव's picture

3 Mar 2016 - 12:35 am | वैभव जाधव

अरे वा....
भागातले नेतृत्व वर येताना पाहून आनंद वाटला.
अभिनंदन रे अभिजीत.

धन्यवाद नीलकांत मालक, धन्यवाद मिपाकर मित्रहो.
मालकांनी हा विषय बर्‍याच वेळा काढलेला होता. आज ह्या कल्पनेला मूर्त रुप त्यांनीच दिलेले आहे. ह्या मंडळाची गरज मिपाला भासत होती ती आता पूर्ण होइल. आपल्या मिपावर जयंतकाका, संदीप डांगे, स्पावड्या, नीलमोहर सारखे प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत. चौराकाका, एसमास्टर सारखे पारखी कलानजर असलेले बॉस लोक्स आहेत. बरेचसे हौशी अन व्यावसायिक फोटोग्राफर आहेत. चित्रकलेची आवड असणारे आणि चित्रे काढणारे बबनराव, सूड (ह्याची चित्रकला भारीय) पिवशी, आनंदिता सारखे आयडी आहेत. पुश्परंगात प्रयोग करणारे बुवासारखे स्टार आहेत, प्रकाशनांची समीक्षा करणारे राहीताई, अतिवासतै, विशाखाताई, आदूबाळासारखे रत्नपारखी आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे चित्रातल्या बगळ्याची सुध्दा पिसे मोजणारे अगणित दर्दी मिपारसिक आहेत. ;)
फोटोशॉपमध्ये इमेजेस वापरुन टेक्स्ट टाकून बॅनर बनवणे हा खूप साधा अन सिंपल प्रकार झाला. आपण त्याहूनही अधिक मिपासाठी करु शकतो. निरनिराळ्या स्वरुपाच्या साहित्याने मिपा रोजच समृध्द होत जातेय. आम्ही त्याला चित्रांनी अन रंगानी सजवू. नटवू आणि एका सुंदर रुपात मिपाकरांसमोर, मराठी वाचकांसमोर सादर करु. चित्रभाषेत बरेच प्रकार हाताळता येतील. कार्टून्स सिरीज, कॉमिक स्टोरीज, इमेज स्ट्रीप्स, स्टोरी इलस्ट्रेशन्स, सींपल ग्राफीक्स, कॅलिग्राफी, आयकॉन्स अशा बर्‍याच गोष्टी आपण मिपाला देऊ शकतो.
ह्या प्रकारात रस असणारे अनेक मदतीचे हात पुढे येतील, त्यांना अनुभव मिळेल. चित्रे शब्दांना कशी पूरक ठरतील ते दाखवता येईल.
मिपाकरांच्या काही सूचना असतील तर त्यांचे नेहमीच स्वागत असेल. ह्या धाग्यावरच्या सूचनांची मालकांकडून अवश्य दखल घेतली जाईल.
आता बरेचसे लिहिलेय. अजून सविस्तरपणे ह्या रंगभुषा मंडळाविषयी सांगुयात. तूर्तास प्रशांतकडे संपर्क साधावा ही नम्र विनंती.
पुन्हा एकदा धन्यवाद सर्वानाच.

राघवेंद्र's picture

3 Mar 2016 - 2:36 am | राघवेंद्र

अभ्या ला खूप साऱ्या शुभेच्छा !!!

स्रुजा's picture

3 Mar 2016 - 3:55 am | स्रुजा

वाह ! सुरेख प्रतिसाद. मंडळास शुभेच्छा !!

नंदन's picture

3 Mar 2016 - 5:53 am | नंदन

अभिनंदन, अभ्या!

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2016 - 7:16 am | अत्रुप्त आत्मा

अभ्या,
या प्रतिसादासाठी टाळ्या.

स्पा's picture

3 Mar 2016 - 7:28 am | स्पा

फोटोशोप फक्त बेसिक येते, त्यात जमेल तेवढी मदत करायला नक्की आवडेल :)

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 10:00 am | सतिश गावडे

मी जेव्हा तुझे फोटोशॉप केलेले फोटो वेब डेव्हलपरच्या नजरेतून पाहतो तेव्हा मला त्यात फोटोशॉपचा उत्तम असा वापर दिसतो.

आपल्यासारखे विनयी कलाकार मिपाला कलासमृद्ध करतील यात शंकाच नाही.

सतिश गावडे's picture

3 Mar 2016 - 9:57 am | सतिश गावडे

तोडलंस, मोडलंस, जोडलंस, फोडलंस... आणि जिंकलंस =))

तुषार काळभोर's picture

3 Mar 2016 - 10:12 am | तुषार काळभोर

येक नंबर..

सगळ्यात महत्वाचे म्हणजे चित्रातल्या बगळ्याची सुध्दा पिसे मोजणारे अगणित दर्दी मिपारसिक आहेत. ;)
>> कसचं कसचं!
डॉ खरेंच्या शब्दातः मिपाकर संत ज्ञानेश्वरांनासुद्धा 'वयाच्या मानाने बरं लिहितो' अशी दाद देतात.

- (फोटोतल्या बगळ्याची पिसे मोजणारा) पैलवान

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2016 - 11:28 am | पिलीयन रायडर

चित्रभाषेत बरेच प्रकार हाताळता येतील. कार्टून्स सिरीज, कॉमिक स्टोरीज, इमेज स्ट्रीप्स, स्टोरी इलस्ट्रेशन्स, सींपल ग्राफीक्स, कॅलिग्राफी, आयकॉन्स अशा बर्‍याच गोष्टी आपण मिपाला देऊ शकतो.

हे खुपच छान होईल. नक्कीच आवडेल अशा नव्या गोष्टी पहायला..

एकच बारीकशी अ‍ॅडिशन.. तुमच्या वरच्या लिश्टीत आमच्या हेमांगीताईंचे (नवा अवतारः- किलीमाउस्की) नाव राहिले आहे. हेमांगी सुद्धा खुप डोकेबाज प्राणी आहे. विज्ञानलेखमालेचा तिने बनवलेला लोगो मस्तच होता. तेव्हा तिनेही ह्या मंडळात नक्की काम करावे अशी इच्छा आहे.

नक्कीच आवडेल अशा नव्या गोष्टी पहायला..

ऑफकोर्स पिराताई. मूळ उद्देश तोच आहे. मिपा विजुअली सुंदर तर होइलच शिवाय लोगो कशाला म्हणतात, सिफर, मोनोग्राम, टायपोग्राफ, कॅलिग्राफ अशा गोष्टी म्हणजे काय? अ‍ॅक्चुअली चित्र सुंदर दिसणे म्हणजे काय ह्या ग्राफीक कन्सेप्ट्समध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना पण समजतील.
सो.....अशी सौन्दर्यदृष्टी असणार्‍या अन प्रत्यक्षात आणू पाहणार्‍यांचे प्रत्येकाचे स्वागत असेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Mar 2016 - 12:09 pm | बिपिन कार्यकर्ते

अभिनंदन भावा!

सुमीत भातखंडे's picture

3 Mar 2016 - 2:19 pm | सुमीत भातखंडे

छान प्रतिसाद.

रंगरंगोटीचं काही असल्यास जरुर सांगा, यथाशक्ती यथामति करु... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Mar 2016 - 12:43 am | डॉ सुहास म्हात्रे

सरसावा बाह्या आणि व्हा पुढे ! आम्ही आहोतच कवतिक करायला.

सविता००१'s picture

3 Mar 2016 - 7:04 am | सविता००१

खूप खूप अभिनंदन

मुक्त विहारि's picture

3 Mar 2016 - 8:40 am | मुक्त विहारि

चित्रे काढता येत नसली तरी, उत्तम नैसर्गिक चित्रांचा आस्वाद, मात्र नक्कीच घेता येतो.

यशोधरा's picture

3 Mar 2016 - 8:40 am | यशोधरा

अभ्या, खूप अभिनंदन!!

प्रचेतस's picture

3 Mar 2016 - 8:41 am | प्रचेतस

स्पृहणीय उपक्रम.
अभ्याचे पहिल्यापासून योगदान आहेच आणि यापुढेही राहील हे पाहून आनंद वाटला. इतर सहभागींचेही स्वागत.

अनुप ढेरे's picture

3 Mar 2016 - 9:49 am | अनुप ढेरे

छान उपक्रम!

प्रीत-मोहर's picture

3 Mar 2016 - 9:53 am | प्रीत-मोहर

मस्त उपक्रम!!!! शुभेच्छा!!!.

मस्त उपक्रम!!!! शुभेच्छा!!!.>>>+११११११११

सस्नेह's picture

3 Mar 2016 - 10:29 am | सस्नेह

मिपा-विकासाच्या दृष्टीने अत्यंत विधायक निर्णय !

मोदक's picture

3 Mar 2016 - 1:22 pm | मोदक

+१११

अजया's picture

3 Mar 2016 - 11:15 am | अजया

असाच मिपाचा एक तांत्रिक विभाग पण हवा.त्या त्या कामासाठी वेगळे डिपार्टमेंट असणे केव्हाही सोयीचे जाईल.
हे मंडळ काम कसे करणार आहे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2016 - 1:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या, (हेड ऑफ़ दी डिपार्टमेंट) नवकलाकारांकडून विविध प्रकारचे ब्यानर बनवून घेईल आणि स्वत:ही करेल. विविध अंकासाठी मुख्यपृष्ठ आणि लेखात चित्र याची प्रमुख जवाबदारी अभ्या आणि त्याच्या मंडळावर असेल
असे वाटते.

- दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2016 - 1:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभ्या, अभिनंदन रे....! प्रतिसाद पण आवडला. काय करायचं ते कर पण मिपावर सनासुदीला मस्त ब्यानर झळकले पाहिजेत. मिपाचं ब्यानर म्हटलं की अभ्या तुझंच नाव डोळ्यासमोर येतं, इतकं तू व्यसन लावलेलं आहे. कधी कोणत्याही अपेक्षेशिवाय मिपाला नेहमीच एका पेक्षा एक सरस ब्यानर बनवून दिलेस. आम्हा रसिकांना सतत खुश ठेवलंस थ्यांक्स. आता काय वाटेल ते स्वत:चं कामकाज सांभाळुन कर मिपा समृद्ध कर. आता जवाबदारी वाढली आहे. चांगली टीम तयार कर....पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा....!

अवांतर : तेवढं नाराज नको होत जाऊस. मला तुझ्या स्वभावाची खूप भीती वाटते. आयुष्यात संयम लै महत्वाचा असतो. :)

औरंगाबाद कोल्हापुरसह एक कट्टा झालाच पाहिजे, अरे होत कसा नै झालाच पाहिजे. अभ्यासेठ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है..!

-दिलीप बिरुटे
(अभ्याचा ज़िंदादिल कलाकारीचा फ्यान)

अभ्या..'s picture

3 Mar 2016 - 1:24 pm | अभ्या..

जो हुक्म आका.
.
(आयामजिनीइनबॉटल)

रामदास's picture

6 Mar 2016 - 10:39 pm | रामदास

सहमत.