आज ट्रॅफीक मध्ये अडकलो. त्यामुळे उद्वेगान असल काहीतरी लिहून काढल
.
१) ट्रॅफीक जाम अवतार : आपल्याला कुठेतरी वेळेत पोहोचायच असत. नेमका तेव्हाच हा अवतार प्रकट होतो. आणि तुम्ही बाजूच्या खिडकीतले रडणारे/ केकाट्णारे पोर (जर मुंबईकर असाल तर) नायतर शेजारच्या स्कुटी/ कायनेटीक वरची बुरखाधारी व्यक्ती (जर पुणेकर असाल तर ) न्याहा़ळत बसता.
.
२) सिग्नल डाऊन अवतार : आपण सिग्नलपाशी क्रॉसींगला आलो रे आलो की सिग्नल पडतो (पडतो म्हणजे जागच्याजागीच लाल होतो) . जर पादचारी असाल तर हिरवा होतो ('हिरवा होणे' ह्याचा दुसरा कुठलाही शाब्दिक अर्थ येथे अभिप्रेत नाही)
.
३) कंडक्टर/ मास्तर अवतार: आपण ४ रुपयाचे तिकीट मागीतले असताना, संपूर्ण बस ला ऐकू जाईल इतपत 'सौम्य' आवाजात आपण काढलेल्या १०० रुपयाच्या कोर्या करकरीत नोटेला 'इस्त्री करुन व्यवस्थीत घडी करुन कपाटात ठेवा' अशी प्रेमळ मौलीक सुचना करतो.
.
४) ताटी बंद अवतार : आपण तासभर वाट बघून तिकीट खिडकीपाशी पोहोचतो न पोहोचतो तोच खिडकी बंद होते. आपली 'ताटी उघडा तिकीटेश्वरा' अशी आर्त साद आतमध्ये पोहोचत नाही.
.
५) बस लेट अवतार : तुम्ही एखादे दिवशी 'बस' ची वाट बघत 'उभे' असता. आणि तुम्हाला हवी असलेल्या सोडून इतर सर्व बशी (बस चे अनेकवचन) तुम्हाला खीजवत निघून जातात.
.
६) ट्रेन बंद अवतार : तुम्हाला अगदी चुकून खिडकी जवळची सीट आणि खिडकीतून येणारा फुकटचा वारा मिळालेला असतो. आणि बरोबर तेंव्हाच तुमची लोकल बांद्रा खाडीपाशी उभी रहाते. शेजारचे 'भाऊ' लोक तुम्हाला खिडकी बंद करु देत नाहीत. आणि तुम्ही बाहेरुन येणारा खाडीचा सुवास आणि शेजारचा 'राईच्या तेलाचा' सुवास ह्या दोन्हीतून येणारा मिश्र गंध हुंगत बसता.
.
७) चौथी सीट अवतार : तुम्हाला कुणीतरी 'प्रेमळ' सहप्रवासी उदार मनाने लोकल मधली चौथी सीट देतो. आणि डब्यात शिरणारा प्रत्येक प्रवासी तुमच्या पायपुसण्या प्रमाणे उपयोग करतो. जमल्यास एखादा नाजुकसा लत्थाप्रहार करुन जातो.
.
८) रिक्षा बंद अवतार : तुम्ही महत्कष्टाने मिळवलेली रिक्षा आजुबाजूला कोणतेही वहान अथवा प्रवासी नाही ह्याची खातरजमा करून बंद पडते.
.
९) भिक्षाम देही अवतार : तुम्ही सिग्नलला ताटकळत असताना , तुमचा भिकारी, तृतीय पंथी , फुलवाले, खेळणी वाले, चणे शेंगदाणे वाले असा चहाता वर्ग जमा होतो आनि तुमच्याशी संवाद साधू इच्छीतो
.
१०) डुलकी सहप्रवासी अवतार : तुम्हाला लोकल अथवा बस मध्ये झोप अनावर झालेली असताना , तुमच्या शेजारील सहप्रवासी हक्काने तुमच्या खांद्यावर (झोपेतली) मान टाकतो आणि तुम्ही उजाड डोळ्याने ' कुणाच्या खांद्यावर कुणाचे डोके' गुणगुणत रहाता.
.
इती श्री ट्रॅफीक दुर्दैवाचे दशावतार पुराण समाप्त.
चू भू द्या घ्या.
**********************************************************
प्रतिक्रिया
9 Jan 2009 - 5:32 pm | विनायक प्रभू
वातानुकुलीत बसमधे सहकारी प्रवाशाने आपले वातानुकुलीत यंत्र चालु केल्यामुळे होणारा घुसमट अवतार.
9 Jan 2009 - 9:04 pm | रामपुरी
त्यातून जर बस रात्रभर प्रवास करून सकाळी पोचणार असेल तर सकाळी सकाळी मरणप्राय घुसमटावतार अनुभवायला मिळतो.
9 Jan 2009 - 9:31 pm | भिडू
किंवा खिडकि मिळालि तर त्याच साईड ला उन नाहितर पाउस येतो
9 Jan 2009 - 6:00 pm | आपला अभिजित
मुंबईकर आणि पुणेकर, दोघांच्याही द्रुष्टिकोनातून विचार करता आपण!
पण नक्की कुठले मूळचे?
9 Jan 2009 - 9:32 pm | टारझन
=)) =)) =)) =)) सिंवगड एक्स्पेसने सकाळ सकाळ मुंबई गाठताणा आम्हालाही ह्याच प्रकारे बर्याच स्वयंभू देवांची कृपा व्हायची
बाकी पुण्यातल्या सव्वालाखाच्या मुठा म्हणजे कत्रिणा वगैरे च्या अविर्भावात चालतात हे व सां न ल
- टारझण
11 Jan 2009 - 4:32 pm | मूखदूर्बळ
धन्यवाद मिपाकर :)
अभिजीत : पुण काय मुंबई काय ? हे विश्वची अमुचे घर :)