विज्ञान - अप टू डेट

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं
25 Feb 2016 - 12:47 am

विज्ञानानं फार प्रगती केली आहे आणि सगळे अवघड प्रश्न आता जवळजवळ सुटल्यात जमा आहेत आणि इतर प्रश्न निरर्थक आहेत असं आजकाल फार वाचनात येत आहे. खरच तशी परिस्थिती आहे का आणि ह्या संदर्भात खात्रीलायक माहिती कुठे मिळवायची ह्या प्रश्नांवर थोडा प्रकाश टाकण्यासाठी हा लेख.
डिस्क्लेमर :- इथं मराठी लेखमाला चालू करण्याचा उद्देश नाही. मिपा हे मराठी अंतरंग ..... तस्मात भावनांचा आदर आहे पण काही गोष्टी मराठीत आणि सोप्या करून लिहण्याची माझी कुवत नाही. शिवाय सर्व विषय समजण्याइतके प्रकांड पंडित अजून झालेलो नाही. त्यामुळे अमुक मराठीत लिहा असा आग्रह करू नये.

ह्या लेखाचे दोन भाग आहेत - पहिल्या टप्प्यात काही महत्वाचे प्रश्न आणी त्यांची सद्यस्थिती ह्यावर प्रकाश टाकणार्या काही लेखांच्या लिंक्स थोडक्यात वर्णनासह देण्यात येतील. दुसर्या भागात ही माहिती अप टू डेट मिळणारया संस्थाळाची लिस्ट मिळेल.

१. उत्क्रांतीवाद : डार्विनचा सिद्धांत आल्यापासून आजपर्यंत किती प्रगती झाली आणि उत्क्रांतीवाद कितपत सुटला आहे ( काही लोकांच्या मते हा डार्विनने करायाला काही शिल्लक ठेवले नसेल, पण असो ). पण जीवन कसे सुरू झाले ह्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर अजून मिळालेलं नाही. सध्याच्या काळात Jeremy England हयांची एक थेअरी लक्ष वेधून घेत आहे कारण त्यांनी भौतिक शास्त्राच्या आधारावर एक समीकरन बनवन्याचा प्रयत्न केला आहे.
खालील दोन लिंक्स ह्या संदर्भात उपयोगी ठरतील
new-physics-theory-of-life
the-man-who-may-one-up-darwin
इथे लक्षात घ्यायची महत्वाची गोष्ट अशी की अजून ह्याची प्रयोगशाळेत पडताळणी झाली नाही त्यामुळे ती पुर्णतः बरोबर आहे असे अजून म्हणता येत नाही. आणि जेरेमी साहेब त्यांना ही कल्पनेची प्रेरणा धार्मिक साहित्यातून मिळाली म्हणतात म्हणुन ती चु़कीची आहे असेही समजू नये.

२. भौतिक शास्त्र : आधुनिक भौतिकशास्त्रातले बरेच सिद्धांत हे अजून पर्यंत फक्त अंदाज आहेत, त्यांना गणिताची जोड आहे पण त्यांची प्रायोगिक तपासणी करणं शक्य झालं नाही. आणि तपासणी हा विज्ञानाचा अविभाज्य भाग आहे उदा. स्ट्रिंग थेअरी किंवा मल्टीव्हर्स थेअरी. हे खरोखर्च विज्ञान आहे की कल्पना विलास असा प्रश्न उभा राहणे साहजिक आहे. ह्या संकटावर (धर्म संकट म्हणण्याचा मोह आवरला) चर्चा करण्यासाठी Ludwig Maximilian University (LMU Munich) इथे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्याचा व्रुत्तांत खाली लिंक मध्ये पाहता येथील
A Fight for the Soul of Science

टिजर म्हणून खालील चित्र उपयुक्त ठरेल. विश्वात किती लांब पर्यंत आपण पोहचू शकू आणि किती सुक्ष्म पातळीवर पाहण्याची आपली कुवत आहे ह्याचं छान विश्लेषण इथे दिले आहे.
energy
३. मशीन लर्निंग आणि न्युरो सायन्स: सध्या डीप लर्निंगची चलती आहे, पण गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, आईबीम सारख्या मोजक्या कंपन्या सोडल्या तर डीप लर्निंग साठी लागणारा डाटा आणी काँप्युटींग पावर लोकांकडे नाही. शिवाय आपला मेंदू असाच शिकतो का? कारण एखादी वस्तु मांजर आहे हे शिकायला आपल्याला मांजरांच्या कोट्यावधी उदाहरणांची गरज नसते. दुसरा पर्याय आहे की आपला मेंदु बेयेशियन असु शकेल. पण हे सिद्ध करता येतं का हा अजून एक अवघड प्रश्न. NYU Center for Mind, Brain and Consciousness ने ह्यावर एक चर्चा सत्र आयोजित केलं होतं. त्याचा वृत्तांत
are-brains-bayesian

असो ह्या तीनही लिंक्स वाचल्यावर असं लक्षात येईल वैज्ञानिंकामध्ये बर्याच गोष्टींवर एकमत नाही आणि हे प्रश्न वाटतात त्यापेक्षा अधिक किचकट आहेत.

आता भाग दोन : अप टू डेट कसे राहायचे. ह्याची सुरुवात मी फॉलो करत असलेल्या काही लिंक्स पासून करत आहे.

काही जनरीक विज्ञान विषयिक लिंक्स
१. scientific american

२. quanta magazine

३. phys org

वैद्यकशास्त्र
४. medical express

संगणकशास्त्र
५. P=NP

गणित
६. Terrance Tao

इथे वाचकांना अजून काही संस्थळे माहित असतील तर त्याची भर जरून घाला.

विज्ञानमाहिती

प्रतिक्रिया

प्रफुल्ल पा's picture

25 Feb 2016 - 1:04 am | प्रफुल्ल पा

स्वागत

प्रफुल्ल पा's picture

25 Feb 2016 - 1:06 am | प्रफुल्ल पा

स्वागत असो

अर्धवटराव's picture

25 Feb 2016 - 1:39 am | अर्धवटराव

विज्ञानानं फार प्रगती केली आहे आणि सगळे अवघड प्रश्न आता जवळजवळ सुटल्यात जमा आहेत आणि इतर प्रश्न निरर्थक आहेत असं आजकाल फार वाचनात येत आहे.

असलं काहि(च्याकाहि) वाचत जाऊ नका हो. पुर्वीपेक्षा अनेकपटींनी नवे प्रश्न आज निर्माण झाले आहेत, व ते सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

पॉइंट ब्लँक's picture

25 Feb 2016 - 7:09 am | पॉइंट ब्लँक

काय करणार सरकार, उगाच बुरसटलेल्या थेअर्‍या वापरून आणि त्यांचा चुकीचा अर्थ लावून धर्म कसा चुकीचा आहे हे सिद्ध करण्यासाठी चालवलेला विज्ञानाचा दुरुपयोग झालेला बघवलं नाही.

अर्धवटराव's picture

26 Feb 2016 - 12:00 am | अर्धवटराव

ज्यांना विज्ञान आणि धर्माची जुगलबंदी करायची हौस आहे त्यांना ते करु दे. आपण त्यात थोडंफार मनोरंजन म्हणुन बघावं. राखी सावंतच्या चित्रपटात अभिजात मुल्य शोधायला गेल्यास केवळ कपाळमोक्ष होईल.

पॉइंट ब्लँक's picture

26 Feb 2016 - 8:24 am | पॉइंट ब्लँक

राखी सावंतच्या चित्रपटात अभिजात मुल्य

अरारा, पार बिलो दे बेल्ट दणका दिलाय. ;)

वारा's picture

25 Feb 2016 - 10:32 am | वारा

इन्ट्रेस्टीङ्ग...
सगळेच विशय .....

सतिश गावडे's picture

25 Feb 2016 - 11:30 pm | सतिश गावडे

विज्ञानानं फार प्रगती केली आहे आणि सगळे अवघड प्रश्न आता जवळजवळ सुटल्यात जमा आहेत आणि इतर प्रश्न निरर्थक आहेत असं आजकाल फार वाचनात येत आहे.

=))

लेख आवडला. ते चित्र थोडं लहान करुन घ्या की सासंला साकडं घालून.

पॉइंट ब्लँक's picture

26 Feb 2016 - 11:27 am | पॉइंट ब्लँक

वाह, क्या बात है, आम्हि साकडं घालायच्या आधीच काम झालं. संपादक मंडळ भारीच तत्पर आहे. धन्यवाद :)

नाखु's picture

26 Feb 2016 - 11:42 am | नाखु

नेमका आज संपादक मंडळाने तो धागा वाचला आणि चक्रे जोरात हलली...

सरव संबंधीतांने अगदी हलके घेणे.