जवाहरलाल नेहरु विद्यापीठ चौकशी आणि चर्चेत असतानाच काल कलकत्यातील जादवपूर विद्यापिठातील विद्यार्थ्यांच्या मोर्चातून दिल्या गेलेल्या राष्ट्रविरोधी घोषणा बातमीत आल्या आहेत, सुभाषचंद्र बोसांबद्दल भावूक होणारा बंगाली विद्यार्थी असा दुसर्या टोकाच्या वर्तणूकीला सोबत कशी काय देतो ? वस्तुतः सहसा प्रत्येक व्यक्तीला स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवून घेणे आवडत असावे तरीही विपरीत वर्तन का घडत असते ?
स्वतःला राष्ट्रप्रेमी म्हणवणारा माणूसही सोने खरीदीवरचे प्रेम सोडत नाही- सोने आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर कितीही ताण पडला तरीही-, दुकानात कच्चे बील पण मागत नाही, स्वदेशी आणि विदेशी दोन्ही समोर ठेवले तर विदेशी पाहीजे म्हणतो म्हणजे आपली प्रत्येक कृती देशप्रेमाच्या तराजूने मोजतोच असे नाही तरी तो तेवढ्यावरच थांबतो, सर्वसामान्य माणुस अतिरेकी, शत्रुराष्ट्रे अथवा देश विघटनाचे समर्थन करण्याचे अथवा त्यास सहानुभूती दर्शवणारे टोक सहसा गाठणार नाही अशी आपली सर्वांची अपेक्षा असते.
महात्मा गांधीबद्दलचे जे काही इतर आक्षेप क्षणभर बाजूला ठेवले तर भारतासाठी राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरताना स्वांतंत्र्यासाठी स्वातंत्र्य अशी भूमिका न घेता रयतेसाठी स्वातंत्र्य आणि म्हणून त्यासाठी समता, लोकशाही इत्यादी मुल्ये अध्यार्हुत असावीत ; त्याच प्रमाणे जवाहरलाल नेहरुंबद्द्लच आक्षेप क्षणभर बाजूला ठेवले तर संपूर्ण भारताचे विवीधतेत असलेली सांस्कृतीक एकात्मता; देश छोट्या छोट्या तुकड्यात विभागला असेल तर बलाढ्य शत्रुंचे फावते म्हणून एकसंघ राष्ट्राचा आग्रह धरतानाच स्थानिक संस्कृती आणि आर्थिक आकाक्षांना पुरेसे विसृत अवकाश देणारी राज्ये, आणि हि सर्व राजकीय संस्कृती इतपत मोकळी असावी की आदिवासी बहुल पुर्वोत्तर राज्यांना संस्कृतीसही विकासाचे सहभागाचे समान अवकाश मिळावे. शंभर अपराधी सुटले तरी चालतील एका निरपराधावर अन्याय होऊ नये या तत्वावर उभारलेली तसेच एक न्यायाधीश चुकला तर उच्चन्यायालय तिथे तुम्हाला समाधान झाले नाही तर सर्वोच्च न्यायालय अशी त्रिस्तरीय न्यायालय व्यवस्था. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाने भारताला एका पुरेशा समतोल सक्षम राज्यघटनेचा लाभ झाला आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ ज्या व्यक्तीच्या नावावर उभारले आहे त्या विद्यापीठातून राष्ट्रीय एकात्मतेची संस्कृती देशभर पोहोचावी ही अपेक्षा असताना विघटनवादी विचार घेऊन कुणी वावरते आहे, त्याही पेक्षा खेदाची बाब अशा विघटनवादी विचारांचे खंडन करण्या एवजी सहानुभीतीचे प्रदर्शन करुन त्यास अकॅडेमिक फ्रिडमचे नाव देऊन दिशाभूल केली जाते आहे ? आणि त्याही पेक्षा खेदकारक हि अशी दिशाभूल होऊ देण्यात तेथिल शिक्षक गणांचा आणि तथाकथित विचारवंतांचा सहभाग असावा ? विद्यार्थ्यांनी अगदी कोणत्याही प्रकारची शंका मोकळेपणाने विचारावी आणि शिक्षकाने त्याच्या शंकांचे निरसन करावे हा अकॅडेमीक फ्रिडमचा भाग असू शकतो, वक्तृत्व स्पर्धा, वावविवाद स्पर्धा, राऊंड टेबल चर्चा या निश्चितपणे अकॅडेमीक फ्रिडमचा भाग असू शकतात. आमच्या विद्यापिठातील विचारवंतांच्या विचारांचा दर्जा खरेच उत्तम असेल तर त्यांच्या समोर अतिरेकी जरी आला तरी विचारवंतांच्या विचाराने भारावून जाऊन त्याने स्वतःची शस्त्रे बाजूला ठेवावीत - विघटनाचा विचार शिक्षकाच्या भेटी सरशी विरुन जावयास हवा अशी अपेक्षा महावीर, बुद्ध आणि गांधींच्या भूमीने करू नये काय ? ठिक आहे विद्यार्थी चुकू शकतात पण शिक्षक आणि विचारवंत त्यांच्या कर्तव्य बजावणीत कुठे अपयशी होत आहेत का ? ते आपल्या कर्तव्यात अपयशी होत असतील तर त्यांनी एकतर स्वतःचे आत्मपरीक्षण करावयास हवे आत्मपरी़क्षणात अपयश येत असेल तर स्वतःच्या कर्तव्यात कुचराई झाल्याचे प्रायशित्त सुद्धा घ्यावयास नको काय ?
प्रतिक्रिया
17 Feb 2016 - 10:22 pm | मदनबाण
वैचारिक स्वातंत्र्याचा अर्थ देशविरोधी घोषणा देउन, तसेच देशविघातक कारवाई करणार्या व्यक्तींचे समर्थन केले जाणारा असेल तर अश्या तथाकथित वैचारिक मंथन करणार्यांच्या मुसक्याच आवळल्या पाहिजेत !
बाकी विद्यार्थ्यांच म्हणाल तर त्यांना खालील प्रकारच्या कवी सम्मेलनांना पाठवायला हवे... { सध्या कायअप्पा वर खालील व्हिडीयो व्हायरल आहे.}
अजुन एक...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Don’u Don’u Don’u... :- Maari
17 Feb 2016 - 11:03 pm | जानु
असे समजतो की वरील अपेक्षा ही महाविद्यालयीन शिक्षकान्कडुन अपेक्षित आहे. मुळात मागील दहा पंधरा वर्षामध्ये शिक्षक, समाज, शैक्षणिक धारणा यात ईतके बदल आणि स्थिंत्यंतरे घडलेली आहेत की शिक्षक स्वतःला अगदी असहाय आणि दुर्बल समजु लागलेला आहे. त्यातही प्रशासनाने त्यास एक गुलाम समजुन त्याची मानसिकता बदलुन टाकलेली आहे. आपण या समाजाचे काही देणे लागतो आणि आपण म्हणतात तशी जबाबदारी पार पाडणे हे शिक्षकाचे काम आहे हे कधीच मागे टाकले गेले आहे. त्यास फक्त शिक्षक जबाबदार आहे असे नाही तर विद्यार्थी आणि समाज हे देखील तेवढेच जबाबदार आहे. राहिला प्रश्न गांधी आणि बुध्द, महावीर यांच्या भुमीत त्यांच्या आदर्शाचे काय होणार ते अजुन नक्की व्हायचेय.
17 Feb 2016 - 11:39 pm | एस
सहमत.
18 Feb 2016 - 1:50 am | तर्राट जोकर
जम्पिंग ऑन द कन्क्लुजन विदाउट नॉलेज ऑफ फॅक्ट्स इज डेंजरस.
18 Feb 2016 - 12:03 pm | माहितगार
@ त.जो.
१) मागच्या काही धागा चर्चांच्या वेळी मी दिलेल्या प्रतिसादांना तुमच्याकडून प्रति-प्रतिसाद आलेले दिसले नाही तेव्हा तुमच्या सोबतच्या चर्चा पुढे कशा जाऊ शकतील या बाबत साशंकता वाटते आणि तुमच्याच प्रतिसादाचे त्यामुळे वजन कमी होत नाहीना हा अस्पेक्ट रिव्हीजिट करता आल्यास पहावे.
२) तुम्ही उपरोक्त प्रतिसाद इतर कुणाच्या प्रतिसादास दिला असल्याचे म्हटले नाही त्या अर्थी तो धागा लेखावर गृहीत धरावा लागतो. इंग्रजी भाषेसाठी देवनागरी लिपीच्या वापराचा मी समर्थक आहे म्हणून तेवढ्यापुरते आपले अभिनंदन करून टिकाकारात सुद्धा काही चांगले शोधण्याचे मला भाग्य दिलेत या बद्दल धन्यवाद व्यक्त करतो.
३) प्रत्येक गोष्टीची सुरवात स्वतःपासून करावी असे म.गांधीजी म्हणत, दुसर्याने गुळ खाऊनये हे सांगण्यापुर्वी स्वतः गूळ खाणे सोडत, उपरोक्त धागा लेखाबाबत आपण 'जम्पिंग ऑन द कन्क्लुजन विदाउट नॉलेज ऑफ फॅक्ट्स इज डेंजरस' हा निश्कर्ष आपण कोणत्या आधारावर काढला ? इथे तुम्ही स्वतः दुसर्यांना काय माहित असेल आणि माहित नसेल हे परस्पर गृहीत धरून स्वतःच जम्पिंग ऑन द कन्क्लुजन'' करत नाही आहात ना याची साशंकता वाटते.
४) आपल्या माहितीसाठी मनाचा खुलेपणा, निषक्ष दृष्टीकोण या विषयांवरचे धागा लेख काढण्याचेही माझ्याकडे क्रेडीट आहे, तुम्ही दिलेल्या फॅक्ट मि अत्यंत खुल्या मनाने अभ्यासेन पण माझ्याशी चर्चा करताना तोच मनाचा खुलेपणा तुमच्याकडूनही अभिप्रेत असेल.
५) आपल्या माहितीसाठी जे एन यु च्या सद्य प्रसंगाबाबत विद्यार्थी शिक्षक यांच्या परस्पर विरोधी बाजूंची अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने माहिती घेऊनच सदर धागा लेख लिहिला आहे तरीही जर धागा लेखकास अथवा चर्चेत सहभागी होणार्यास काही स्पेसीफीक फॅक्ट माहिती नाही असे वाटते तर त्या बाबत लक्ष वेधणे तुमचे कर्तव्य बनते. त्यामुळे संदर्भासहीत फॅक्ट कडे लक्ष वेधण्यासाठी बॉल तुमच्या कोर्टात आहे आणि तो तुम्ही नाही खेळलात तर स्वतःच जम्पिंग ऑन द कन्क्लुजन'' करून वाचकांची दिशाभूल करण्यासाठी दिलेला प्रतिसाद असा त्याचा अर्थ होईल, मागच्या धागा चर्चांमध्ये माझ्या प्रतिसादांना तुमची प्रति-प्रतिसाद आलेले नाहीत किमान या वेळी तुम्हाला नेमके काय खुपले ते सांगितलेत तर आमच्या परीने आम्ही त्यास प्रतिसाद देऊ शकु.
अपूर्ण असला तरीही चर्चेत सहभागासाठी आभार.
18 Feb 2016 - 12:56 pm | तर्राट जोकर
धन्यवाद, सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.
18 Feb 2016 - 7:12 am | कंजूस
हा एक समाज सतत काहीतरी पदरात पाडून घेत आहे.व्होट बँक राहावी म्हणून पक्ष त्यांना देतो.आणखीन पिळून काढतात.त्यांच्यासाठी फन्नास हजार कोटींचा फंड बनवायचा निवडणूक जाहिरनामा त्यातलाच प्रकार.आता मात्र इतर जागे झालेत.
18 Feb 2016 - 9:25 am | पगला गजोधर
माहितीगार यांनी अतिशय संयत प्रकारे आपले विचार मांडले,
आणि मी त्यांच्या या लेखातील मांडलेल्या मताशी बहुतांशी सहमत आहे, कारण ते मला योग्य वाटले.
भलेही निवडणुकीत कोणत्याही रोल मॉडेलला पुढे करून निवडणुका जिंकण्यापुरता त्यांचा गवागवा करणे असो (सध्याचे व पूर्वीचे) सताधारी.
पण विदेशात जाउन, त्यांना सुद्धा 'हि भूमी गांधीजी व बुद्धाची' असेच जाहीरपणे म्हणावे लागते.
असो,
अफजल गुरुचे समर्थन करणारे देशद्रोहीच … १०० टक्के मान्य.
प्रश्न एवढाच की अफजल गुरुचे जाहीर समर्थन करणारी PDP आणि त्यांच्या सोबत काश्मिरात सत्तासोबत करणारी BJP …. यांना काय म्हणायचं ???
सगळ्या देशाला राष्ट्रवाद शिकवायला निघालेल्या 'संघ'टना, या विषयी कधी बोलणार ?
आम्ही केलं तर 'राजकीय मजबुरी', आणि इतरांचा तो राष्ट्रद्रोह ???? वा रे वा…
अजूनही, आजच्या युगात 'बारामतीकर काका मला वाचवा …' म्हणणारे नाना फडणवीशी, 'राजकीय मजबुरी'ची बारभाई कारस्थानाचा असा दुटप्पीपणा, किती बघावा लागेल ??
18 Feb 2016 - 3:33 pm | आदिजोशी
प.ग. ह्यांनी वरकरणी योग्य वाटणारे परंतू थोड्याशा विचारांती त्यातला फोलपणा लक्षात येणारे मुद्दे मांडले आहेत.
आज काश्मिरात परिस्थिती अशी आहे की पिडीपी शिवाय कुणालाच, ह्यात डावे उजवे वरचे खालचे सगळे आले, सत्ता स्थापन करता येणे शक्य नाही. सत्ता नसेल तर पिडीपी च्या निर्णयांवर कंट्रोल ठेवणेही शक्य नाही. मग आता जर तिथल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवायचे तर दुसरा उपाय काय? लाँग टर्म उद्दिष्ट काश्मिरात शांतता प्रस्थापित करणे हे डोळ्यासमोर ठेवल्यास त्यांना सद्ध्या ही तडजोड करावी लागली तरी दुसरा पर्याय नाही.
तसंच उदाहरण महाराष्ट्राचं आहे. आणि इथे तर सरकारने घेतलेले कित्येक निर्णय प्रचंड यशस्वी ठरल्यामुळे तडजोडीमुळे का होईना आज धरणार मुतण्याची भाषा करणार्यांचे सरकार जाऊन भाजपाचे सरकार आले हे उत्तम झाले हे मानण्यास काहीच हरकत नसावी.
संघाइतक्या निस्वार्थीपणे, केवळ आणि केवळ देश हीत डोळ्यासमोर ठेऊन काम करणारी दुसरी कुठलीही संस्था नाही. तुम्हाला त्यांचे हिंदुत्ववादी विचार पटो न पटो, पण संघाच्या राष्ट्रप्रेमावर शंका येत असेल तर तुम्हाला कावीळ झाली आहे हे एकच निदान निघू शकते.
18 Feb 2016 - 3:46 pm | पगला गजोधर
आणी त्याच, धरणार मुतण्याची भाषा करणार्यांचच, घरात पाहुणचार घेताय, धन्य आहे.
18 Feb 2016 - 3:54 pm | मृत्युन्जय
रणार मुतण्याची भाषा करणार्यांचच, घरात पाहुणचार घेताय,
खरय. पाहुण्यांची सरबराई करताना पाणी कुठले वापरतात हे जरा बघुनच घ्यावे भाजपेयींनी ;)
18 Feb 2016 - 3:59 pm | पगला गजोधर
राजकीय मजबुरी कदाचित समजून पण घेवू, पण आम्हीच काय ते देशप्रेमी,
विरोध करणारे ते देशद्रोही अशी, राष्ट्रभक्तीची ठेकेदारी डोक्यात जाते.
असो मी कोणताही असभ्य वाक्यप्रचार वापरलेला नाही, पाण्याबाबत…
18 Feb 2016 - 4:29 pm | मृत्युन्जय
पणा आम्हीच काय ते देशप्रेमी अशी भूमिका कोन घेत आहे नक्की ? मला तरी अशी भू मिका घेणारे कोणी दिसत नाही. पण "भारत मुर्दाबाद", भारत का अंतर करेंगे, पाकि स्तान जिंदाबाद, घर घर से अफजल गुरु वगैरे नारे देणारे कुठल्याही प्रकारे विचार केला तरी देशप्रेमी वाटत नाही ब्वॉ. हे असले लोक आणि त्यांचे सपोर्टर्स खुपच डोक्यात जातात. त्यांना खरेच सांगावेसे वाटते की बूड उचला आणि पाकिस्तानात जाउन बसा.
असो. मी कुठे म्हटले की तुम्ही पाण्याबाबत कुठलाही असभ्य वाक्यप्रचार वापरला?
18 Feb 2016 - 4:41 pm | पगला गजोधर
या प्रकरणी जे जबाबदार त्यांना कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे,
मात्र याप्रकरणी जे कोणी ज्या पद्धतीने मेडिया मध्ये सरकारी ताकत वापरून हस्तक्षेप करून,
आपापल्यापरीने राष्ट्रभक्तीची मोनॉपोली चालवू पाहत आहे, ते नक्कीच संशयास्पद आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांवर दबाव, भर कोर्टात मिडिया व संशयितावर झालेला हल्ला, म्हणजे सत्तेचा गैरवापर. सरसकट सगळ्या डाव्यांना राष्ट्रविरोधी ठरवणे चुकीच नाही वाटत का तुम्हाला ?
18 Feb 2016 - 4:51 pm | मृत्युन्जय
मिडीया तर सगळाच सरकारच्या विरोधात आहे. एखादा चॅनलवाला बाजुने बोलतो. बाकी सगळे गळा फाडुन कन्हैय्याची पूजा करत आहेत. लाज वाटाते ते बघुन. ज एन यु वाला कोणी तरी तर या घोषणाबाजी बद्दल बोलता ना फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे बरळला. डोक्यात दगड भरले होते त्याच्या की कोण जाणे. देशद्रोह्यांची बाजू घेणारे सगळेच देशद्रोही. कन्हैय्या कुमार कदाचित निर्दोष असेल (मग ती घोषणाबाजी त्याच्यासमोर कशी झाली आणी त्याने कशी खपवुन घेतली ते शोधायला लागेल) तर सुटॅलच. इथे तर दोषी पण सुटतात. पण या असल्या घोषाना देणारे कसाब पेक्षा वाईट.
विद्यापीठातील प्राध्यापकांवर दबाव, भर कोर्टात मिडिया व संशयितावर झालेला हल्ला, म्हणजे सत्तेचा गैरवाप हे तुम्ही कस्से ठरवले देव जाणे. हे सगळे सरकारने तर केलेले नाही ना? मग प्रश्न मिटला. असे काही सरकारने केले किंवा सरकारच्या सांगण्यावरुन झाले हे सिद्ध झाले तरची गोष्त वेगळी. हे सगळे सरकार करते आहे म्हणुन रागा सांगु लागला तर हसु येते बाकी काही नाही.
बाकी सरसकट सगळे डावरा ष्ट्रविरोधी नसतीलही कदाचित. जो एखादा चांगला असेल त्याने पुढे येउन लोकांची समजत्त घालावी. राजकीय पक्षांनी एकमेकांवर असे आरोप करणे हे काही नवे नाही. डावे पण भाजपाला राष्ट्राविघातक, जातीयवादी, धर्मांध वगैरे असे काय काय बोलतातच की तेव्हा तुमचा तिळपापड होत नाही ? ते तुम्हाला चुकीच वाटात नाही का पग?
18 Feb 2016 - 4:54 pm | पगला गजोधर
18 Feb 2016 - 4:59 pm | आदिजोशी
प्रतिवाद नसला की माघार. असोच.
18 Feb 2016 - 5:14 pm | पगला गजोधर
माघार घ्यायची, पुढं जायचे, याचे मला स्वातंत्र्य आहे, अजून तरी …
बाय द वे, I rest my Case म्हणजे माघार होते का ? याचा जरा पडताळा घ्या.
18 Feb 2016 - 3:59 pm | आदिजोशी
अपेक्षीत प्रतिसाद. असो. चालू द्या तुमचं.
18 Feb 2016 - 4:01 pm | पगला गजोधर
आमचं चालूच होतं हो… आपल्या परवानगीची गरज तेव्हाही नव्हती, आताही नाहि.
18 Feb 2016 - 4:12 pm | सुनील
ब्वॉर!
मग संघ जेव्हा इतरांच्या राष्ट्र्प्रेमावर शंका घेतो, तेव्हा ते कशाचं लक्षण मानायचं?
"विषम"ज्वराचं??
18 Feb 2016 - 4:27 pm | पगला गजोधर
मी या ठिकाणी, असे मत मांडू इच्छितो
की देशद्रोहीअफजल गुरुचे जाहीर समर्थन करणारी PDP सोबत काश्मिरातील सत्तेचा त्याग करून,
BJP तिच्या टीकाकारांना दाखवून देईल, की BJP हा एक, इतर पक्षांसारखा सत्तेला हापापलेला पक्ष नसून
(सत्तारुपी गुळाच्या ढेपेला चिकटलेले हावरे मुंगळे ), राष्ट्रप्रेमासमोर कशाचीही तमा न बाळगणारा एक पक्ष आहे
(चाल चेहेरा चरित्र वाली पार्टी विथ डीफ्रंस आहे )
फक्त लोकांनी अमळ वाट पहावी.
18 Feb 2016 - 4:35 pm | आदिजोशी
भारताचे तुकडे करू, इंडिया गो बॅक, पाकिस्तान झिंदाबाद, कितने अफजल मारोगे... इत्यादि घोषणा देणार्यांच्या राष्ट्रप्रेमावर शंका यायलाच नको.
18 Feb 2016 - 5:03 pm | पगला गजोधर
मशीद फोडणे, चर्चेस वर तोडफोड जाळपोळ करणे, १४ फेब सारख्या दिवशी मुलींना किंवा पबमधे जाउन स्त्रियांवर हल्ले करणे, बीफ च्या अफवेवरून एखाद्याची हत्या करणे वैगरे ... इत्यादि कृती करणार्यांच्या राष्ट्रप्रेमावर शंका यायलाच नको.
18 Feb 2016 - 5:10 pm | मृत्युन्जय
मशीद फोडणे ठीके, पण इतर कुठलीही गोष्त संघाने केलेली नाही. मशीद फोडली गेली त्यात देखील खरे सांगायचे तर संघ नव्हताच. पण संशयाचा फायदा देता येइल.
18 Feb 2016 - 5:11 pm | आदिजोशी
पहिल्या दोन गोष्टी थोतांड होत्या हे सिद्ध झालेले आहे. बाकीच्या गोष्टी चुकीच्याच आहेत, त्याचं समर्थम मी कधी केलं नाही आणि करणारही नाही. त्यामुळे नेहेमीसारखं आतताईपणे अनुमान काढू नका. विरोधासाठी विरोध करण्याच्या नादात काहीही लिहू नका.
18 Feb 2016 - 11:58 am | नाना स्कॉच
आम्ही केलं तर 'राजकीय मजबुरी'
मज़बूरी नाही 'कूटनीति' 'चाणक्यनिति' वगैरे वगैरे वगैरे!
अर्थमंत्री जेव्हा '१०० बारामती व्हायला पाहिजेत' म्हणतात तेव्हा कपाळावर हात मारून घ्यायची इच्छा होते
18 Feb 2016 - 12:03 pm | बोका-ए-आझम
मधले विद्यार्थी हे पदवीधर असतात. याचा अर्थ त्यांचं वय हे सहज २१-२२ वर्षांचं असेल. या वयात शिक्षक त्यांच्यावर काही संस्कार करत असतील असं वाटणं हा गैरसमज आहे. मुळात आज वर्गात शिक्षकाची भूमिका बदललेली आहे. शिक्षक शिकवत नाहीत, विद्यार्थी शिकतात (Teachers aren't teaching, students are learning). शिक्षक हा facilitator झालेला आहे. ज्या वयात शिक्षकांचा प्रभाव मुलांवर असतो त्या वयात तो पडत असेलही पण नंतर येणाऱ्या प्रभावांच्या जोरामुळे शिक्षकाने केलेले संस्कार पुसले जाण्याची किंवा क्षीण होण्याची शक्यता जास्त असते. उलटंही होऊ शकतं. तेच संस्कार प्रबळही होऊ शकतात.
पण मुख्य मुद्दा हा आहे की शिक्षकाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम करणारे अनेक घटक आज कार्यरत आहेत अाणि त्यांचा विद्यार्थ्यांवरचा प्रभाव किंवा पकड ही शिक्षकांच्या प्रभावापेक्षा जास्त मजबूत आहे.
18 Feb 2016 - 2:43 pm | माहितगार
केवळ अंशतः सहमत आहे. ठिक आहे, शालेय जिवनात शिक्षकांकडून मिळतात त्यांना संस्कार म्हणा, महाविद्यालयीन जिवनात तयार होते तिला वैचारीक बैठक म्हणा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे जे वय असेल तेवढी एका (किमान ज्येष्ठ) प्राध्यापकाची कारकीर्द झालेली असू शकेल कि ज्यात त्याने स्वतःची म्हणून काही वैचारीक बैठक म्हणून कमावलेली असावयास हवी. -प्राध्यापक केवळ प्राध्यापक नव्हे तर 'तथाकथीत' हे विशेषण लावण्याची गरज न भासणारा विचारवंत असणे अभिप्रेत नसते का ?- विद्यार्थ्यांची जेव्हा वैचारिक बैठक तयार होते तेव्हा त्यातील तार्कीक उणीवा दाखवून तर्कसुसंगत विचार करण्याची क्षमता प्राध्यापकांमध्ये नको का? समजा काही कारणानी एका संस्थेचे प्राध्यापक अयशस्वी होत असतील तर ती वैचारीक पोकळी दुसर्या विद्यापिठाच्या प्राध्यापकांकडून -त्यांच्या भषणातून लेखनातून- भरली जावयास नको का ? कि वैचारिक पोकळी शिल्लक राहीलेले विद्यार्थी जसेच्या तसे पुढच्या पिढीकडे शिक्षक, जिल्हाधीकारी, राजदूत, पोलीस कमिशनर म्हणून पोहोचणार आहेत आणि ते त्यांच्या जबाबदार्या नेमक्या कशा प्रकारे पार पाडतील या बाबत साशंकता निर्माण होणे कितपत सयुक्तीक ठरते ? इतर घटकांच्या प्रभाव लक्षात घेऊन प्राध्यापकांनी आणि शिक्षकांनी विवीध मंचांवरून रचनात्मक आणि सकारात्मक मांडणी करावयास नको काय ?
खरे म्हणजे अकॅडेमीक फ्रिडमचा मी पक्षधर आहे. जगभरातले अगदी पाकिस्तान आमेरीका चीन सर्व देशांच्या प्राध्यापकांनी भारतीय विद्यापिठातयावे आणि त्यांच्याशी चर्चा आणि वादविवादात आमचे प्राध्यापक जिंकावेत असा आदर्श हवा. देशाच परदेशात नेतृत्व करताना एका एका शशी थरुरला घडवणारे देशाचे तत्त्वज्ञान घडवणारे प्राध्यापक हवेतच.
मिडीया समोर फुकटची प्रदर्शने म्हणजे अकॅडेमिक विचारांचा विकास होतो का ? कि विद्यार्थ्यांना बोलण्याचे पुर्ण स्वातंत्र्य देणारी वक्तृत्व स्पर्धा घेऊन त्यांचे विचार ऐकुन शेवटच्या भाषणात त्याचा वैचारीक परामर्ष घेणे, तार्कीक उणीवा निदर्शनास आणणे की ज्यामुळे एक दर्जेदार वैचारीक बैठक नवीन पिढीस मिळू शकेल, पण विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन करण्याची क्षमता प्राध्यापकमंडळीत उरली नसेल तर त्यांनी आत्मपरीक्षण करावयास नको का ?
18 Feb 2016 - 4:05 pm | बोका-ए-आझम
हे एक दुष्टचक्र झालेलं आहे माहितगार सर. लोक आज प्राध्यापक का होतात तर वर्षाचे दोन महिने (दिवाळी आणि मे) भरपगारी रजा देणारी दुसरी कोणती नोकरी नाहीये. शिवाय जे नोकरीत कायमस्वरूपी आहेत त्यांना हात लावायची सरकारला,मग ते कोणत्याही पक्षाचं असो, हिंमत नाहीये. आणि अमेरिकेप्रमाणे Publish or Perish अशी परिस्थिती नसल्यामुळे संशोधन करणं हे अनिवार्य नाही. विद्यार्थी घडवणं वगैरे तर सोडूनच द्या. संशोधन कुणी जर करत असेल तर त्याचा हेतू बहुतांशी स्वतःची प्रगती आणि उन्नती असतो. विद्यार्थी हा या सगळ्या प्रक्रियेत कुठेही नाही. हे मी जी परिस्थिती पाहिली आहे (मी स्वतः ८ वर्षे प्राध्यापक होतो) त्यावरून सांगतोय. अपवाद असतीलच.
18 Feb 2016 - 2:20 pm | पगला गजोधर
बरोबर आहे सर तुमचं, आता आजचंच बघाणा…
एका वृत्तपत्रीय बातमीनुसार, "मोदी सरकारचा राष्ट्रवाद नव्हे, गुंडगिरी- अभाविप"
आता हे " अभाविप मधले विद्यार्थी यांच्यावर, तुम्ही म्हणताय तसं, 'शिक्षकाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम करणारे अनेक घटक आज कार्यरत आहेत अाणि त्यांचा विद्यार्थ्यांवरचा प्रभाव किंवा पकड ही शिक्षकांच्या प्रभावापेक्षा जास्त मजबूत आहे'.
18 Feb 2016 - 2:25 pm | बोका-ए-आझम
यांचाही अंतर्भाव झाला पाहिजेच. एकांगी विचार जर करायचा नसेल तर. मुळात विद्यार्थी राजकारण हे राजकीय पक्षांच्या हातात किंवा त्यांनी चालवलेल्या विद्यार्थी संघटनांच्या हातात नकोच हे माझं मत आहे. मग ती कुठल्याही पक्षाची असू दे.
अभाविप किंवा NSUI किंवा विद्यार्थी सेना किंवा अजून कोणीही.
18 Feb 2016 - 2:39 pm | पगला गजोधर
राजकारण हे अस्पृश्य विषय नाही… त्यामुळे विद्यार्थी दशेतच, विद्यार्थी परिचित व्हावे, की देशाचा कारभार कसा चालतो, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारण व व्यापाराची, व्यापक दृष्टी मिळते, इ इ
आणि इथेच राजकीय पक्षांना त्यांचे अँपरेण्टीस मिळतात … त्यामुळे राजकीय पक्ष इथे लक्ष ठेवणारच…
18 Feb 2016 - 2:52 pm | माहितगार
समस्या व्यापक दृष्टी एवजी संकुचीत दृष्टीकोण आणि हितसंघर्ष बळावतात त्यातून तयार होते.
18 Feb 2016 - 2:56 pm | पगला गजोधर
संकुचीत दृष्टीकोणाचे उदाहरण, मी वर म्हटल्याप्रमणे... पिडिपि-बि़जेपि गठ्जोड..
18 Feb 2016 - 8:56 pm | श्रीगुरुजी
भाजप काश्मिरमध्ये सत्तेत असल्याने पीडीपीवर कसे नियंत्रण राहिले हे खालील लेख वाचल्यावर लक्षात येईल.
http://indianexpress.com/article/india/india-news-india/mehbooba-mufti-m...
18 Feb 2016 - 9:32 pm | आदिजोशी
समजून घ्यायची इच्छा असेल तर लक्षात येईल. आणि तशी इच्छा असती तर इतका निरर्थक काथ्या कुटलाच गेला नसता. हे वाचूनही फार फरक पडेल अशी अपेक्षा नाही. पुन्हा नमस्कार करणारा फोटो चिकटवण्यात येईल.
18 Feb 2016 - 2:56 pm | पगला गजोधर
संकुचीत दृष्टीकोणाचे उदाहरण, मी वर म्हटल्याप्रमणे... पिडिपि-बि़जेपि गठ्जोड..
18 Feb 2016 - 2:32 pm | बोका-ए-आझम
हे अंतर्गत राजकारणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणी लादलेली अनेक जणांना पसंत नव्हतं. काहींनी विरोधही केला होता. हे प्रत्येक पक्षात होतंच. आणि ज्यांनी राजीनामा दिलाय ते फार मोठे तत्वनिष्ठ आहेत असं मानायचं कारण नाही. जगातल्या कुठल्याही राजकीय पक्षात सत्ता हाच मुख्य मुद्दा असतो, मग ती पक्षांतर्गत असो की अजून कुठे. शिवाय वृत्तपत्र सकाळ आहे - राष्ट्रवादी काँग्रेसचं अघोषित मुखपत्र. त्यामुळे बातमीत किती मसाला घातलाय आणि खरं काय आहे हे ठरवणं कठीण आहे.
18 Feb 2016 - 2:45 pm | पगला गजोधर
बास हे तुमचेच वाक्य, तुम्ही/आम्ही/सर्वांनी लक्षात घेतले की झालंच,
मग ''विरोध'' म्हणजे देशद्रोह, असे बोंबलणार लोकं किंवा गट, त्यांच्या हातात सत्ता घेण्यासाठी किंवा हातातील सत्ता राखण्यासाठी च अश्या राष्ट्रवादाच्या खेळ्या करतो, हे ही आपसूकच उघड होते.
18 Feb 2016 - 3:56 pm | मृत्युन्जय
पक्षाचा किंवा व्यक्तीचा विरोध असेल तर नक्कीच समजु शकतो. पण देशविरोधी नारे? जिस थाली मे खाते है उसी मे *गते हे *ले
18 Feb 2016 - 3:20 pm | पगला गजोधर
तशीच बातमी मटा मधे आलीये, अस लिहिल असत तर, तुम्ही म्हणाला असता की, 'ते शिवसेनेचे अघोषित मुखपत्र. त्यामुळे बातमीत किती मसाला घातलाय आणि खरं काय आहे हे ठरवणं कठीण आहे.'
असो, काँ, रा. काँ, शि से, म न से, डावे, सपा, ममता, नितिश, आप सर्व ......
फक्त भाजपा तेवढा देशप्रेमि...असे म्हणु नका, प्लिज.
18 Feb 2016 - 3:48 pm | बोका-ए-आझम
पण आणीबाणी आणणारे, १९८४ मध्ये शिखांचं शिरकाण होऊ देणारे अाणि भोपाळ गॅस कांडाच्या मुख्य आरोपीला भारताबाहेर जाऊ देणारे जेव्हा वैचारिक स्वातंत्र्याच्या वगैरे गप्पा मारतात आणि फॅसिस्ट वगैरे शब्द अर्थ न समजता वापरतात तेव्हा हसायला येतं. बाकी वृत्तपत्रं कुठल्या ना कुठल्या पक्षाची मुखपत्रं बनलेली आहेत हे खरंच आहे. नि:पक्षपातीपणा हा कोणाकडेच नाहीये. तुम्हीही भाजप - पीडीपीचं उदाहरण दिलंत. काँग्रेस - डीएमकेही बोलू शकला असतात. असो.
18 Feb 2016 - 3:53 pm | पगला गजोधर
वरील माहीतीगार यान्च्या,लेखाशी सयुक्तिक वाटलेल उदा. दिले.
असो.
18 Feb 2016 - 3:03 pm | माहितगार
@ प.ग. कुठे तरी गल्लत होते आहे का
मला वाटते शब्दांच्या अर्थछटात अल्पसे बारकावे असावेत, निव्वळ सहानुभूती दाखवणारे आणि समर्थन करणारे वेगवेगळे असू शकतात. तसेच केवळ एखादे वक्तव्य केवळ देश विरोधी असू शकते त्याला देशविरोधी गंभीर कृतीची जोड मिळाली की देशद्रोह होतो.
राजकारण तडजोडींवर चालते त्यात स्ट्रेंज बेडफेलोज वाला प्रकारही होतो, आणि शांततेसाठी किमानपातळीच्या तात्कालीक राजकीय तडजोडीही करण्यात हरकत नसावी. परस्पर विरोधी टोकाच्या दृष्टीकोणाच्या लोकांचे आमने सामने बसणे झाले तर क्वचित दीर्घकालीन तोडगेही निघू शकतात पण हे पार्लमेंटरी पद्धतीने व्हावयास हवे -अफजल गुरु प्रमाणे पार्लमेंटवर अथवा न्यायालयांवर हल्ले करुन नव्हे- पण हे साधावयाचे असेल तर समर्थक जनतेच्या भावनांसाठीच्या पॉलीटीकल पोझीशनींग -पॉलीटीक शो शिवाय जनतेचे समर्थनही मिळत नाही- त्या (पॉलीटीक्सच्या) पलिकडे जाऊन स्टेटमनशीप दाखवली जात असेल तर हरकत नाही.
18 Feb 2016 - 3:09 pm | पगला गजोधर
देश्प्रेम व देशद्रोह, याच्या धुराळ्यात,
'हातात सत्ता घेण्यासाठी किंवा हातातील सत्ता राखण्यासाठीच' अश्या राष्ट्रवादाच्या खेळ्या करणारे/करवणारे, हे नामानिराळे राहतात हेच खरे....
18 Feb 2016 - 3:19 pm | माहितगार
'उडदामाजी काळेगोरे' अशी एक म्हण आहे ती आठवली. या सर्व राजकारणातून तरून स्टेटमनशीप करणारे स्टेटमन खूप कमी निपजतात, मानवजातीच्या नशीबी सर्वसाधारणपणे खड्डे आणि खाचखळग्यातला प्रवासच लिहीलेला असतो. काही बाबतीत हात जोडून प्रार्थना करणे बरे पडावे.
18 Feb 2016 - 3:23 pm | पगला गजोधर
मानवजातीच्या (सर्वसामान्य करदाता मतदार) नशीबी सर्वसाधारणपणे खड्डे आणि खाचखळग्यातला प्रवासच लिहीलेला असतो.
१००% सत्य
18 Feb 2016 - 3:03 pm | नाना स्कॉच
रविश कुमार एट हिज सिंपली बेस्ट
बोका-ए-आझम ह्यांच्या नीरक्षीर विचारसरणीशी सहमत , मला स्वतःला सद्धया मोदी हे एकमेवद्वितीय वाटतात हे ही मी सांगू इच्छितो ईथे. बोका साहेब अन त्यांच्यासारख्या सगळ्यांसाठी हा वरील वीडियो चिकटवतो आहे
अर्थात रविश हा स्वतः डावखुरा आहे हे फॅक्ट आपण अमान्य करण्यात पॉइंट नाही, फ़क्त तो लेफ्ट ऑफ़ सेंटर वाटतो ह्या चित्रफितीमधे म्हणून पोस्ट करतोय
माहितगार साहेब,
राष्ट्रिय एकात्मता ह्याचा अभ्यास करणे म्हणजे पहिले राष्ट्र, राष्ट्रवाद ह्यांचा अभ्यास अन त्यांच्या लागु करण्यात समतोल हवा असे वाटते म्हणून हा वीडियो इथे पोस्ट करतोय, माहीती अन पृथक्करण असे दोन्ही पैलू ह्यात आहेत असे वाटले,
आवडल्यास कळवा , काही आक्षेप असल्यास त्यावर तुमच्याशी अन बोका-ए-आझम ह्यांच्याशी (त्यांची इच्छा असल्यास) चर्चा करायला आवडेल
18 Feb 2016 - 3:10 pm | माहितगार
एक तर लिंक उघडली नाही आणि माझ्या संगणकावर ऑडीओ क्वालीटी बिघडलेलि आहे त्या शिवाय संदर्भ नमुद करणे आणि वाक्यवार चर्चा सोपी जावि म्हणूनही मी सहसा टेक्स्ट प्रिफर करतो. आपण किंवा इतर कुणी रविश कुमारांच्या म्हणण्याचा गोषवारा दिला तरीही हरकत नाही.
18 Feb 2016 - 3:16 pm | नाना स्कॉच
बापरे!
हे काम माझ्या अवाक्या बाहेरचे आहे !
तरीही, गोषवारा म्हणले तर
१. थोडीफार जेएनयुची भलामण आहे, काही असामाजिक तत्वांमुळे 'शट डाउन जेएनयु' करणाऱ्यांवर शरसंधान आहे
२. राज्यशास्त्राच्या अनुषंगाने राष्ट्रवाद ह्या वादाची 'इझम' म्हणून उत्पत्ती अन प्रवास
३. राष्ट्रवादाची एक अशी फिक्स डेफिनिशन नाही अन ती करणाऱ्या लोकांचा उद्देश्य हा बहुतकरुन एकछत्री अंमल कायम करण्याकडे असणे हा एक मुद्दा
इतके काही ठळक मुद्दे आठवले सद्ध्यातरी
18 Feb 2016 - 4:33 pm | माहितगार
ठिक आहे, तसा विषय मोठा आहे, तुर्तास आपण लिहिलेल्या तिनच मुद्यांची चर्चा करू मी केवळ उलट्या क्रमाने जमेल तेवढ्या संक्षेपाने लिहितो.
काही अपवाद गृहीत धरून जर मानवी समाजाचा प्रत्येक शंभर वर्षांचा कालावधी घेऊन आढावा घेतला मानव प्रगती पथावर आहे असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल का ? अराजका शिवाय राष्ट्र ही संकल्पना नसलेल्या मला दोनच स्थिती दिसतात -अधिक तुम्हाला/ इतर कुणाला सुचल्या तर स्वागत आहे - एक जंगलात राहणारा आदीम मानव आणि दुसरे वसुधैव कुटूंबम - जंगलात राहणार्या स्थितीला मानव वापस जाण्याची नजिकच्या काळात तर शक्यता दिसत नाही, राष्ट्राशिवाय असलेले अराजक जे कधी मधी सोमालीया- येमेन अशा प्रसंगातून पुढे येते आणि राष्ट्रवादाने केलेले अराजक यात उजवा कोण त्यामुळे राष्ट्र नसलेल्या अराजकाचे समर्थन व्यक्तीशः मला जड जाते - राष्ट्रवाद आणि वसुधैव कुटूंबक हे पर्याय उरतात यात वसुधैव कुटूंबम अशी सर्वांसाठी न्याय्य व्यवस्था भविष्यात येऊ शकेल जागतिक व्यापार करारा सारखे करार अस्तीत्वात येत आहेत पण वसुधैव कुटूंबकमसाठी सर्वांच्या हिताची न्याय्य निश्चिती करून वैचारिक दृष्ट्या एकाच पातळीवर येणे विश्व हे एकच राष्ट्र ही संकल्पना घडवणे हे भविष्यात होऊ शकेल पण हा बराच लांबचा टप्पा आहे. सर्व विश्व हे एकच राष्ट्र हा टप्पा गाठताना प्रत्येक व्यक्ति आणि समुहाच्या हिताचे प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी तुर्तास तरी राष्ट्र या घटकावर आहे. आता आपण भारतीय राष्ट्रवादाकडे येऊ भारतीय राष्ट्रवाद वसुधैव कुटूंबकम या संकल्पनेसाठी वैचारीक दृष्ट्या ओपन आहे का ? तर तसा तो ओपन आहे. दुसर्या राष्ट्रांना जिंकुन घेऊन अथवा जबरदस्तीने कह्यात करुन स्वतःचा राष्ट्रवाद थोपवणे हि संकल्पना भारतात आजतरी असावी असे वाटत नाही.
भारतीय उपमहाद्वीपांतर्गत भारतीय संघराज्यात जे घटक प्रदेश समाविष्ट आहेत त्यांच्या दृष्टीने भारतीय राज्यघटना आणि लोकशाही त्यांच्या अस्मिता आणि विकास विषयक पुरेसा समतोल आणि संधी उपलब्ध करते. अडचणी असतील अडचणी आहेत म्हणून बाळाचे नाहु घातलेल्या पाण्यासोबत बाळही फेकुन देणे श्रेयस्कर असेल का ? जेव्हा -केव्हा युरोपियन युनियन राजकीय दृष्ट्या एक होईल तेव्हा स्कॉटलंड सुद्धा युकेचा भाग म्हणून युरोपियन युनियन मध्ये पोहोचते मग गरज नसताना केवळ भावनिक प्रदर्शनासाठी ब्रिटनपासून स्कॉटलंडने तुटून वेगळे होण्याचे समर्थन होते का ? पाणी हे एक उदाहरण म्हणून घेतो : गोदावरी नदीच्या पाण्यासाठी नाशिक आणि औरंगाबादेत हितसंघर्ष होईल पण ती वावटळ त्या कपापुरतीच मर्यादीत राहील तेच तेलंगाणा आणि आंध्र वेगळे झाले की पाण्यावरून (स्रोतांसाठी) अधिक भांडतील, बांग्लादेशाला सार्वभौमत्व असल्यामुळे त्याच पाण्यासाठी प.बंगालचा वैरी होण्यास आणि कदाचित शक्य झाल्यास युद्धही करण्यास तयार होईल तेच बांग्लादेश साऊथ एशियन राज्य म्हणुन असेल तर युद्धाचा प्रसंग शक्यता कमी होईल. एक मोठ्या आकाराचे राष्ट्र राष्ट्रवादी आहे म्हणून त्याचे तुकडे पाडले तर त्यातून अधिक राष्ट्रे अधिक संघर्ष उद्भवतात. दिल्लीचा एक आमदार गेल्या दोनचार दिवसात म्हणाला माझ्या हातात बंदुक असती तर मी त्यांना ठार केल असत आता त्याला वेगळ राष्ट्र दिल तर तो रणगाडा घेऊन युद्धावर निघेल अराजक माजवेल हे सांगण्यासाठी भविष्य वेत्त्याची आवश्यकता नसावी.
जर आमच्या देशात काश्मिर असो की अरुणाचल तामिळनाडू असो वा महाराष्ट्र काही राजकीय तडजोडी सोडल्या अस्मितांना ओंजारणे गोंजारणे सोडले तर सर्व प्रदेशांना सर्व साधारणपणे राज्यघटनेत विकासाच्या समान संधी उपलब्ध होतच आहेत वसुधैव कुटूंबम न्याय्य तत्वावर असेल तर भारत त्यात सहभागी होण्यास तयार आहेच. त्यामुळे भारताच्या कोणत्याही राज्याने फुटीरतावाद बाळगण्यात काही पॉइंट उरतो का ? उलट पक्षी सर्वोच्च न्यायालयासारखी व्यवस्था उपलब्ध होते, राज्यस्तरावर भ्रष्टाचार झाला किंवा अन्याय झाला तर अधिक वरची अजून एक स्तरप्रणाली भारतीय राज्यघटनेत/राज्यव्यवस्थेत उपलब्ध होते वचक खूप नसेल पण अंशतःतरी समतोल सांभाळला जातो. मालदीव, श्रीलंका अथवा पाकीस्तानात चिन ने नाविक तळ उभारला की चिंतापडते पण मोठ्या आकाराचे राष्ट्र म्हणून आपण किमान स्तराचा आत्मविश्वास आणि विपरीत वेळ येता तोंड देण्याची क्षमता ठेऊ शकतो.
भारतीय व्यवस्थेत राज्यांना न्याय्य वाटा मिळावा किंवा राज्यांची पुर्नरचना व्हावी म्हणून सुयोग्य बदल सुचवणारी कायम स्वरुपी व्यवस्था असावयास हरकत नाही. पण सरसकट राष्ट्र या संकल्पनेवर प्रश्न चिन्ह उपस्थीत करून अराजकास वाट मोकळी करुन देणार्या पर्यायांचा विचार प्रशस्त आणि सयुक्तीक वाटत नाही.
18 Feb 2016 - 4:52 pm | माहितगार
आता प्रश्न भाजपा सारख्या राष्ट्रवादाची आग्रही प्रतिपादन करणारा पक्ष केंद्रात सत्तेत आला आहे; पण भातीय लोकव्यवस्थेचे, लोकशाहीच्या प्रगल्भतेचे आणि राज्यघटनेतील समतोलाचे स्वरुप पाहता अनचॅलेंज्ड एकछत्री अंमल/राज्य करणे सहज साध्य नसावे. लोकसभेच्या निवडणुकीत एकाच पक्षाची पूर्ण देशव्यापी लाट आली तरीही राज्यसभेतले गणित बदलण्यासाठी अर्ध्याच्यावरून राज्यातील निवडणूका सलग सहा वर्षे जिंकाव्या लागतात इथे वर्षभर दोन-चार राज्यातील निवडणूका सलग जिंकणे शक्य होत नाही हे प्रत्यक्ष आहे. न्यायालयातील सर्व न्यायाधीश तुमच्या मर्जीचे आणण्यासाठी पुढची दहावर्षे जातात म्हणजे अन चॅलेंज्ड एकछत्री अंमल आणण्यासाठी किमान विसवर्षांचा कालावधी गरजेचा असावा कुणीही तिस्मारखा आलातरी जे शंभर कोटीच्या भारतात सहज साध्य नसावे. उलटपक्षी छोटे प्रदेश/राज्ये आहेत त्यात एकछत्रि राज्य टिकवणे भारताततील राज्य अथवा प्रदेशांना अधिक सहज होते, बांग्लादेश पाकीस्तान ह्यांचा समावेश एकसंघ भारतात असता तर एकाधिकार शाहीशी त्यांना कमी सामना करावा लागला असता. त्यांना आमेरीकेपुढे जसे नाक धरुन उभे टाकावे लागते तेवढे आमेरीकेस सोपे गेले नसते. हे त्यांचे नुकसान असो. प्रदेश स्तरावर अथवा आमदार खासदार या स्तरावर एकच एक व्यक्ती किती वेळा निवडून येऊ शकते किंवा मुख्यमंत्री अथवा पंतप्रधानपदावर अधिकतम किती काळ राहु शकेल यावर मर्यादेची कदाचित गरज असावी.
18 Feb 2016 - 5:34 pm | नितीनचंद्र
माझ्या मते शिक्षण हा विषय राज्यांच्या अखत्यारीत देऊन आपण हे गोंधळ ओढवुन घेतले आहेत. टोकाचा विचार करणारे राजकीय पक्ष ज्या घरांच्या मधे घुसतात तिथे शालेय शिक्षणाचा प्रभाव संपुन राजकीय नेत्यांच्या टोकाच्या भुमीका किंवा टो काची विचारधारा जपली जाते.
जर सर्वोच्च न्यायालयाने आपला बचाव करण्याची मुभा दिलेली असताना गुरु अफजल च्या फाशीवर संवाद कसा होऊ शकतो यावर शालेय शिक्षणातच विद्यार्थ्यांची मनोभुमिका पक्की व्हायला हवी. असे न होता मग स्वातंत्र्यावर चर्चा होते हे गैर आहे आणि पक्षीय राजकारण म्हणुन सुध्दा सर्व पक्षांचे एकमत होणारे शिक्षणाचा अभाव आहे.
डिफेन्स मधला माणुस यावर टोकाची भुमिका कधीच घेत नाही इतकी तिथली कार्यपध्दती चांगली आहे. तशीच ती शाळा आणि महाविद्यालयात हवी आहे. अमेरीकेसारख्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक असलेल्या देशात सुध्दा शिक्षण उत्तम असल्यामुळे टोकाच्या भुमिका असलेले पक्ष नांदताना दिसत नाहीत. परीणामी देशविघातक शक्तीचे फावते.
जर गुरु अफजल याला कोंग्रेसच्या काळात फाशी झाली होती तर किमान काँग्रेस व भाजप यात या विषयावर एकमत असायला हरकत नव्हती. आजचा भाजप हा कालचा जनसंघ आहे जो एके काळी कॉग्रेसचे नेते असलेले डॉ शामाप्रसाद मुखर्जी यांनी निर्माण केलेला आहे. सबब किमान राष्ट्रप्रेमाच्या संकल्पनेत या दिन पक्षात अंतर नको अशी अपेक्षा किमान मला आहे.
स्तानिक पक्षांची जडण घडण स्वार्थाची आहे. रशीया आणि चायनाकडुन धडे घेतलेल्या डाव्यांच्या मुजोरीवर भारतात निर्माण झालेले हे उजवे पक्ष एकत्र यावेत अशी भुमिका कधी काळी सत्तेवर असताना अटलबिहारी यांनी मांडली होती. खास करुन पं बंगाल मधल्या निवडणुकात डावे विरुध्द भाजप काँग्रेस एकत्र यावेत असा त्यांचा प्रयत्न होता.
पण जेव्हा काँग्रेस कमजोर असते तेव्हा डावे त्यांचे सरकार तारुन नेतात हा इतिहास असल्यामुळे असे घडले नाही.
जगातुन क्म्युनिझम त्याच्या टोकदार पणामुळे संपला. भारतातुन तो पुर्ण संपेल तेव्हा सुदीन उजाडेल. तोवर विद्यार्थी आणि दलीत किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना खतपाणी घालुन हा विनाकारण संघर्ष हे डावे घडवणार. भाजप आणि डावे यात दरी जास्त असल्याने तो वाढता असणार आणि काँग्रेस सारखा मध्यममार्गी पक्ष मुग गिळुन गंमत पहाणार
18 Feb 2016 - 6:08 pm | पगला गजोधर
Correct, One can Fool, all the people, some time. Some people all the time.
But not all the people all the time.