सदस्य मित्र मैत्रिणींनो,
मी मिपावर तसा अगदीच नवा (सदस्य) म्हणून. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी मी सभासद झालो.
मिपा हे मराठी अभिव्यक्तीचे एक उत्तम माध्यम आहे यात दुमत नसावेच!
मिपा हे चेपु सारखे उथळ माध्यम नसावे असे माझ्यासकट सर्वांना वाटत असेल.
मिपा बद्दल अनेक अपेक्षा आणि कल्पना माझ्या मनात आहेत.
तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे.
मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे.
सर्व क्षेत्रांतील दिग्गज सदस्य मायबोलीवर इतके प्रेम करताना पाहुन छान वाटते.
सुरुवातीला अगदी कट्टा न जमल्यास मी काहि मिपा सदस्यांना भेटु शकेन का?
मी अंधेरी सीप्झ येथे काम करतो. जर कोणी या भागातच असल्यास याच आठवड्यात किंवा नंतर काहि आठवड्यांनी दुपारच्या जेवणावेळी भेट होणे शक्य होइल का?
कोणी जर येथेच असेल तर काखेत कळसा आणि गावाला वळसा असा प्रकार होणार नाहि.
किंवा अन्धेरी पूर्व येथे कोणी असल्यासही ठरवता येइल.
एकदा ही भेट झाल्यास कट्ट्याला येण्यास मला उत्साह येइल .
-
कळावे आणि कळ्वावे
मी
शान्तिप्रिय!
(प्रगल्भ प्रतिसादांच्या अपेक्षेत! )
प्रतिक्रिया
16 Feb 2016 - 1:25 pm | प्रचेतस
ह्या ह्या ह्या.
16 Feb 2016 - 1:45 pm | मृत्युन्जय
पुणेकर पाणी पण श्रीखंडाचे पितात हेच यातुन सिद्ध झाले. श्रीखंड पुण्यात वेगळे मिळते. त्यात केशर वेलदोडा नसेल तर ते आम्ही गोड दही म्हणुन खातो. असो. एक धागा काढलाय मागेच. सारखे सारखे एवढे मोट्ठाले धागे नाही हो काढता येत.
तुम्ही या एकदा पुण्याला, तुम्हाला तुमच्या त्या डोंबिलीपेक्षा उत्तम खायला घालतो (पैसे तुम्ही द्यायचे हो. पुणेकर स्वतःचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी (देखील) पदरच्या पैशाला तोशीष देत नाही हो)
16 Feb 2016 - 8:41 pm | सुबोध खरे
ये कुछ बात नाही हुई.
मुंबईला या. कट्टा करू. खर्च हि आम्ही देऊ. मित्रांसाठी काहीही.
हा का ना का.
16 Feb 2016 - 9:22 pm | मुक्त विहारि
+१
त्या खर्चात काही वाटा आम्ही पण घेवू.
15 Feb 2016 - 9:22 pm | शान्तिप्रिय
एवढी लांबलचक प्रक्रिया?
15 Feb 2016 - 9:26 pm | मुक्त विहारि
मुंबई विभागाला एखादा धागा पुरेसा होतो.
16 Feb 2016 - 8:21 am | कंजूस
मला तर ट्रेक,प्रदर्शन ,रेल्वे प्रवास वगैरे ठिकाणी भेटलेल्या नवीन लोकांशी बोलायला फार आवडते.काला घोड्याला एक नवीन ओळख झाली.हॅाटेलकेंद्रित कट्टा आवडत नाही हे स्पष्ट मत. छंदकेंद्रीत आवडतो.
16 Feb 2016 - 12:02 pm | मुक्त विहारि
आम्ही मिपाकरांना भेटायला जातो.
हॉटेल तर फक्त भेटण्याचे ठिकाण आहे.
कुणाला हॉटेल मध्ये साग्रसंगीत कट्टा आवडतो, तर कुणाला रमत गमत केलेला काळा घोडा कट्टा.तर कुणाला बागेत, तर कुणाला लेणी बघत.
कट्ट्याच्या उत्सवमुर्तीला, जे ठिकाण आवडते, तिथे जमायचे.
आम्हाला लेण्यांपासून ते समुद्र किनार्या पर्यंत कुठलेही ठिकाण चालून जाते.
शक्यतो घरी नको, बंधने जास्त येतात.बोलतांना विषयाला धरून बोलल्या जातेच असे नाही आणि विषय जर "विषयाकडे" वळला तर, भलतीच पंचाईत होते.
16 Feb 2016 - 12:42 pm | इरसाल
पियुष म्हणजे तेच का ते श्रीखंडाचा ड्बा धुतलेले पाणी कि काय असते असे म्हणतात तेच ना ?
16 Feb 2016 - 9:44 pm | मुक्त विहारि
ह्यालाच पुण्यात पियुष नावाने ओळखले जाते.
16 Feb 2016 - 12:50 pm | गॅरी ट्रुमन
नेहमीप्रमाणे धागा भरकटल्यामुळे मला पण एक पिंक टाकायचा मोह आवरत नाही :)
का हो, शान्तिप्रिय, ओम शांती ओम मधील शांतीप्रिया (दिपिका) तुमची नक्की कोण म्हणायची?
ह.घ्या.हे.वे.सां.न.ला
(ओम शांती ओम बघितलेला) ट्रुमन
16 Feb 2016 - 12:52 pm | शान्तिप्रिय
कोणही नाही. सुदैवाने.
:)
16 Feb 2016 - 1:05 pm | शान्तिप्रिय
कट्ट्यांबद्दल धागे काढणे वैकल्पिक असावे.
त्या त्या भागातिल मिपाकरांनी एक्मेकांना व्यनि पाठवून किंवा/आणि फोन वगैरे करुन
कट्टा यशस्वी करुन मिपावर फोटोसहित व्रुत्तांत द्यावा. हे बरे.
16 Feb 2016 - 1:34 pm | टवाळ कार्टा
बघा...आला की नै मूळ छुपाकट्टा करण्यावर...आणि तुम्ही म्हणे नवमिपाकर =))
16 Feb 2016 - 4:47 pm | मुक्त विहारि
+१
16 Feb 2016 - 2:24 pm | सूड
वा रे वा!! आणि तुम्ही काय फक्त काडी टाकून गेलात वाटतं. =))
16 Feb 2016 - 3:08 pm | नाखु
सुडोबा
धागाकर्त्याने (आय्डी) नावाबद्दल्चा अभिप्रेत अर्थ सोदाहरण स्पष्ट केला आणि मिपाकरांची गम्मत केलेली दिसतेय !!!
16 Feb 2016 - 3:18 pm | सूड
ऑ अच्चं जालं तल!!
16 Feb 2016 - 3:24 pm | होबासराव
त्या त्या भागातिल मिपाकरांनी एक्मेकांना व्यनि पाठवून किंवा/आणि फोन वगैरे करुन
कट्टा यशस्वी करुन मिपावर फोटोसहित व्रुत्तांत द्यावा. हे बरे.
सर कोण आहे तुमच्या भागात ;) करा बॉ मग कट्टा यशस्वि.
16 Feb 2016 - 4:55 pm | मुक्त विहारि
१००
16 Feb 2016 - 7:25 pm | शान्तिप्रिय
हा मी लिहित असलेला १०१ वा प्रतिसाद .
मी हा धागा शोधत होतो.
मला वाटलं उडवला का काय !
16 Feb 2016 - 7:33 pm | होबासराव
तसेच मिपा च्या काहि सदस्यांना माझी भेटण्याची इच्छा आहे.
मिपाचा सदस्य झाल्यापासुन माझ्या जीवनातील आनंद आणखी वाढला आहे.
मिया खत का मज्मुन भाप लेते है हुम लिफाफा देखकर :)
तुम्हाला अपेक्षित असलेला प्रतिसाद आलेला दिस्तोय :) एन्जोय द कट्टा..
16 Feb 2016 - 11:04 pm | खटपट्या
हात त्येजा....
जल्ल्या येवड्या प्रतिक्रिया आनि ठरला कायच नाय. येवड्यात दोन कट्टे करुन झोपलो असतो.
काय ता ठरवा ठरवा