प्रिय प्राजुस....

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in जनातलं, मनातलं
20 Jan 2008 - 2:20 am

प्रिय प्राजुस,
काल पासून तु मिसळपाव वर दिसत नव्हतीस. मला वाटले तुला काही नविन रेडिओ प्रोग्रॅम ची तयारी करावराची असेल पण,
आत्ताच तुझी प्रतिक्रिया वाचली. तू मिसळ्पाव वर चारोळ्या लिहिणार नाहीस म्हणून वाईट वाटले.
पण असे करू नकोस आम्ही तुझ्या चारोळ्या, गुंफलेल्या विणी खूप खूप ऍन्जोय करतो.
कोणा एका विक्रुत माणसापायी आम्ही एका चांगल्या कवियित्रीला मुकणार नाही निदान मिसळ्पाव वर तरी..
तु परत लिहायला चालू कर... आम्ही वाट पाहात आहोत.....
तुझ्या प्रेरणेमुळे तर मी मिसळ्पाव वर लिहायला चालू केले आहे..
कित्येक जण कविता करायला लागले... तुझ्यामुळे... त्यांनी मान्यही केले आहे...
तेव्हा माझी तुला कळकळीची विनंती आहे परत चारोळ्या, विणी गुंफायला लाग.

तुझी मैत्रिण,
स्वाती

चारोळ्यामत

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

20 Jan 2008 - 2:27 am | इनोबा म्हणे

मी ही तेच म्हणतोय तीला... असे लोक तर भेटतच राहणार ... म्हणून काही आपण आपले ध्येय सोडायचे नसते...

(चारोळीमित्र) -इनोबा

ऋषिकेश's picture

20 Jan 2008 - 3:02 am | ऋषिकेश

तेव्हा माझी तुला कळकळीची विनंती आहे परत चारोळ्या, विणी गुंफायला लाग.

+१

-ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

20 Jan 2008 - 8:44 am | विसोबा खेचर

स्वातीजी,

प्राजू पुन्हा इथे निश्चितच चारोळ्या लिहील याची मला खात्री आहे...

काळजी नसावी...

तात्या.

झंप्या's picture

20 Jan 2008 - 1:11 pm | झंप्या

'त्या' सदस्याचा 'तो' प्रतिसाद मी सुद्धा वाचलेला होता. त्याला फार फार तर 'अत्यंत आगऊ टिप्पणी' म्हणता येईल.. पण त्यात विकृतपणा काय होता बॉ?
-सबका डॉन एक

चतुरंग's picture

20 Jan 2008 - 5:33 pm | चतुरंग

कोणीतरी ते, काहीतरी ते, लिहिते
चारोळीवर चिखलफेक करते
तव तू चारोळी लिहिणे थांबविते?
आठव, कमल हे अंबुज असते!

चतुरंग

स्वाती राजेश's picture

20 Jan 2008 - 6:46 pm | स्वाती राजेश

सर, तुमचे म्हणणे बरोबर
'अत्यंत आगऊ टिप्पणी' करणार्या माणसापायी ......

धोंडोपंत's picture

20 Jan 2008 - 6:53 pm | धोंडोपंत

प्राजुताई,

आम्हाला काही दिवस मिसळपावावर येणे जमले नव्हते. त्यामुळे नक्की काय घडले हे आम्हांला माहित नाही. पण कोणाच्यातरी टिपण्णीला बळी पडून तुम्ही तुमच्या प्रतिभेचा बळी देत आहात असा अर्थबोध झाला. म्हणून सांगावेसे वाटले.

तुम्ही तुमच्या प्रतिभेला अशा प्रकारे दडपून टाकू नका. लोक येतात, बोलतात, चालू पडतात. त्याचा परिणाम आपल्या लेखनावर होऊ देऊ नये.

कुछ तो लोग कहेंगे । लोगोंका काम है कहना॥

लिहायला लागा.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

आपला,
(आग्रही) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवराव's picture

28 Jan 2008 - 5:29 pm | केशवराव

प्राजु ,
धोंडोपंतांच्या मताशी मी पुर्ण सहमत ! काय झाले मलाही माहीत नाही. त्याची गरजहि नाही. पण कुणीतरी काहीतरी बोलते आणि आपण आपले कार्यच सोडायचे हे बरोबर नाही. बोलणारा वाईट हेतूने बोलतो असेही नसते. आणि टिका कुणाला सहन करावि लागली नाही ?
बी ब्रेव्ह ऍण्ड कम ऑन!

सर्वसाक्षी's picture

28 Jan 2008 - 6:14 pm | सर्वसाक्षी

कोणते काव्य? कोणती प्रतिक्रिया? कशावरून काव्यत्याग?
अहो संचालक ,
आमच्या सारख्या ढ आणि अनियमीत विद्यार्थ्याला सविस्तर समजावून सांगाल का? प्रकरण गंभीर दिसते

असो. पण कुणीतरी प्रतिक्रिया दिली म्हणुन लेखन बंद करणे पटण्यासारखे नाही!
असभ्य/ अशिष्ट/ हीन प्रतिक्रिया देउन सभासदाना खच्ची करणारे तसेच चांगले बहरात आलेले संकेतस्थळ सुकवायची सुपारी घेतलेले महाभाग सर्वत्र असतात आणि असणारच. त्याना कितपत किंमत द्यायची हे आपण ठरवायचे. असे जर कुणी भावनाप्रधान होऊन लेखन बंद करू लागले तर यांचे काम सुकर होईल, तेव्हा काही झाले तरी तो आनंद त्याना मिळुन देऊ नका.

सर्वसाक्षी's picture

28 Jan 2008 - 6:29 pm | सर्वसाक्षी

प्राजु,
आपण काय निर्णय घेणार ते केवळ आपल्यालाच माहीत पण पुन्हा नव्या उमेदीने लिहायचा निर्णय घेतलात (आणि तो अवश्य घ्यावा - तुम्हाला अधिक महत्वाचे काय वाटते? एक नकारात्मक प्रतिसाद की हे सगळे सकारात्मक प्रतिसाद?) तर एखादी खवचट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे ( उदा: 'बघा, लोकप्रियता मिळविण्याचा सोपा मार्ग' किंवा 'याला म्हणतात अग अग म्हशी' वगैरे). वाचा आणि पुढे जा. त्याची दखल न घेता.ज्याचा एक प्रयत्न फसला तो दुसरा करणारच. अशा प्रयत्नाना यश देणे वा तो हाणुन पाडणे हे सर्वस्वी आपल्या हाती आहे.

पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture

28 Jan 2008 - 6:41 pm | विसोबा खेचर

साक्षीदेवाशी पूर्णत: सहमत आहे...

तात्या.