कसा आणू शब्दामध्ये
सुगंधी दर्वळ.....
"आई " म्हणजे वात्सल्याची
श्रावणी हिर्वळ.....
"आई" तुझ्या आठवणी
चांदण्यातले कोवळे ऊन.....
तुझ्या मायेचा स्पर्श
माझ्या पाठीवर अजुन...
"आई" तुझे स्वरुप
कसे शब्दरंगात चिता रु.....
तू वात्सल्याचे आकाश
माझे शब्द इवले पाखरू...
"आई" संस्काराची शिदोरी
"आई" त्यागाचे प्रमाण.....
"आई" प्रेमाची मूर्ती
"आई" त्या ईश्वरा समान....
"आई" तुझ्या आठवणीने
आज मन हेलावते....
पण तूच दिलेल्या मायेने
दु:ख माझे सावरते....
हीच प्रार्थना माझी
त्या दयाळु ईश्वराला.....
तुझ्याकडे नेऊ नको
कधी कुणाच्या आईला.....
प्रतिक्रिया
7 Jan 2009 - 2:35 pm | दिपक
स्वामी तिन्ही जगाचा...
खरं आहे.
7 Jan 2009 - 2:55 pm | प्रभाकर पेठकर
छान आहे कविता. विशेषतः शेवटचे कडवे मनाला भिडणारे आहे. अभिनंदन.
"आई" संस्काराची शिदोरी
हे वाक्य जरा पटले नाही. 'शिदोरी' मर्यादीत स्वरूपात असते. त्यापेक्षा '"आई' संस्कारांची खाणं' असे म्हंटलेले जास्त भावले असते. खाणीत अमर्याद साठा असतो.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
7 Jan 2009 - 3:16 pm | आनंदयात्री
शिदोरी प्रवासात/ अडीअडचणीला कामाला येणारी असते, म्हणुन असावे कदाचित !!
7 Jan 2009 - 3:21 pm | प्रभाकर पेठकर
खरं आहे. मीही तसा विचार केला. पण 'बांधून दिलेली शिदोरी आणि पुस्तकी विद्या जन्मभर पुरत नाही' असेही म्हणतात. म्हणजेच 'शिदोरी'चा उपयोग फार मर्यादीत आहे. तसेही संस्काराचे अनेकवचन केले तर 'खाण' हा शब्द मिटरमध्ये बसतो आहे असे वाटते. असो. बाकी सर्व अधिकार कवीच्या स्वाधीन आहेत.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
7 Jan 2009 - 3:22 pm | आनंदयात्री
-