ब्रिटीश महासत्तेचा आधार, लंडनच्या मनोर्‍यातील द्रोण कावळे !!

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
7 Feb 2016 - 7:42 pm

एकेकाळी ज्यांच्या सत्तेच्या प्रदेशात म्हणे सूर्य मावळत नसे आजही जागतीक पाच मोठ्या महासत्तात ज्या देशाचे नाव घेतले जाते त्या ब्रिटीश महासत्तेचा आधार कोणता ? आधार म्हणून प्रत्येकजण ब्रिटीशांची वेगवेगळी सामर्थ्यस्थाने सांगेल ज्यात त्यांची पंक्च्युआलिटी ते त्यांचे उत्कृष्ट आरमार इत्यादी पण जर कुणी लंडनच्या मनोर्‍याची माहिती घेतली तर हे सर्व खोटे आहे. भारतीयांची मुर्तीपूजा, त्यांच्या गणपतीचे दूध पिणे ते कावळ्याच्या रूपात येऊन मृतात्म्यांनी पिंड खाणे अशा अंधश्रद्धांवर केवळ भारतीयांचीच मोनोपॉली आहे असा दोष दिला जातो. नाही म्हणावयास रोमचा पोप संतपद हवे असेल तर चमत्कार करून दाखवायला सांगतो अथवा अलिकडचा फूटबॉलका काय मॅचेसचे भवितव्य ठरवणारा ऑक्टोपस. अशीच एक अंधश्रद्धा ब्रिटीशांची ज्यानुसार ब्रिटीशांचे साम्राज्य लंडनच्या मनोर्‍यातील या द्रोणकावळ्यांमुळे अस्तीत्वात आहे.

raven

या कैक शतकांपासूनच्या ब्रिटीश अंधश्रद्धेनुसार लंडनच्या मनोर्‍यातील हे द्रोणकावळे ज्या दिवशी निघून जातील अथवा नामशेष होतील त्या दिवशी ब्रिटीश महासत्ता आणि साम्राज्य लयास जाईल. या अंधश्रद्धेपायी या द्रोणकावळ्यांची अत्युत्तम बडदास्त ब्रिटीश सरकार ठेवत असते हे वरचे छायाचित्र पाहिल्या नंतर वेगळे सांगावे लागू नये

* कावळ्यांबद्दलचे जगभरातल्या विवीध संस्कृतीतील विश्वास

* या निमीत्ताने आमची एक धागा जाहीरात

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

7 Feb 2016 - 8:24 pm | DEADPOOL

पण धागा अजून विस्तृत हवा होता!

माहितगार's picture

8 Feb 2016 - 11:13 pm | माहितगार

माझ्याही माहितीस मर्यादा होत्या म्हणून विस्तार मर्यादीत होता; चर्चेतून विस्तार होत आपली इच्छा स्वल्पप्रमाणात पूर्ण होताना दिसते आहे.

विजय पुरोहित's picture

7 Feb 2016 - 8:40 pm | विजय पुरोहित

द्रोणकावळे म्हणजे काय? डोमकावळे?

माहितगार's picture

7 Feb 2016 - 9:13 pm | माहितगार

द्रोणकावळा कावळ्यांचीच प्रजाती इंग्रजीत raven म्हणतात एवढे माहित आहे. डोमकावळा नेमका कसा असतो आणि इंग्रजीत काय म्हणतात माहित नाही. मला वाटते कुणी पक्षीप्रेमी यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

मोगा's picture

7 Feb 2016 - 9:55 pm | मोगा

रावणकावळा ठेवायचे.

द्रोणाचे नाव पोप्टाला ठेवायचे

माहितगार's picture

7 Feb 2016 - 11:21 pm | माहितगार

रावणकावळा ठेवायचे.

रोचक (तशी raven आणि रावण शब्दाची व्युत्पत्ती वेगवेगळी असण्याची प्रथम दर्शनी शक्यता ), पण द्रोणाचे नाव पोपटाला कशा साठी

विजय पुरोहित's picture

7 Feb 2016 - 9:59 pm | विजय पुरोहित

@ माहितगार: सामान्यतः साध्या कावळ्यांच्या मानेभोवती राखाडी पट्टा असतो. पण पूर्णतः काळे कुळकुळीत काही कावळे दिसतात, त्यांना डोमकावळे म्हणत असावेत. ही एक वेगळीच प्रजाति वाटते.

माहितगार's picture

7 Feb 2016 - 11:22 pm | माहितगार

रोचक माहिती अजून एक डोम कावळ्यांवर भारतीय लोकांचा रोष अधिक कशामुळे असावा ?

डोम किंवा डोंब ही भारतात पौराणीक काळापासुन असलेली जात-जमात आहे. हे लोक प्रेताचे अंत्यविधी व दाहसंस्कार करुन पोट भरतात. ते अत्यन्त मागास व गरीब असुन स्मशानाजवळ, म्हणजेच गावाबाहेर राहतात.राजा हरिश्चंद्रालापण परिस्थितीमुळे स्मशानात डोंबाचे काम करावे लागले ही गोष्ट माहीत असेलच. ते रंगानी अस्सल द्राविड काळे असतात. रंगानी काळे, प्रेतांवर गुजरांण करणारे,गावाबाहेर स्मशानाजवळ राहणारे, म्हणुन कावळ्याच्या पुर्ण काळ्या प्रकाराला डोम कावळा म्हणतात. मला कोणाच्या जातीवर भाष्य करायला आवडत नाही पण नाईलाज आहे माफ करा.

पैसा's picture

7 Feb 2016 - 9:31 pm | पैसा

ब्रिटिश साम्राज्य अजून आहे?

मोगा's picture

7 Feb 2016 - 9:52 pm | मोगा

पौंडाला ९० रु मोजावे लागतात, हेही साम्राज्यच की.

...

मोघल व इंग्रजांचा फॅन

पैसा's picture

7 Feb 2016 - 9:55 pm | पैसा

इंग्लंडात जायला मिळतंय का बघा! तुमचा मित्र गामा पण आहे ना तिकडे. तो व्हिसा मिळायला मदत करील की! =))

माहितगार's picture

7 Feb 2016 - 11:14 pm | माहितगार

पौंडाला ९० रु मोजावे लागतात, हेही साम्राज्यच की.

मोगा आपले अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण होते ?

मोगा's picture

8 Feb 2016 - 11:06 am | मोगा

प्रत्येकाचा व्हु वेगळा असतो.

एक माणुस होता.. त्याची दहा घरे होती. कालांतराने ती घरे विकुन / डिस्पोज करुन तो रोकड घेउन एकाच घरात रहायला गेला.

आता , तो मनुष्य साम्राज्यहीन झाला , असे बोलणार का ?

पाउंड ९ ० रुचा आहे , तरीही साम्राज्याचा अंश त्यात शिल्लक आहे असे मला वाटते ते त्यामुळे.

तुमच्या आमच्या खापरपणजोबाने इंग्रजाना दिलेला ट्याक्स त्या पाउंडात आहे.

इस साल वो लक्ष्मीपुजन के हिंदु त्योहार मे हम अपनी बेगम को रुपये नहीं , पाउंड रखने के लिये बोलनेवाले है !

मुक्त विहारि's picture

8 Feb 2016 - 11:11 am | मुक्त विहारि

.....तरीही साम्राज्याचा अंश त्यात शिल्लक आहे असे मला वाटते ते त्यामुळे."

आयला, "अर्थकारण" इतके सोपे आहे, हे माहीतच न्हवते.... मी उगाच "अर्थात" नावाचे श्री.अच्युत गोडबोले, ह्यांचे पुस्तक विकत घेतले.

असो,

लवकरात लवकर परत एकदा श्री.चंद्रशेखर्‍ टिळकांची गाठ घ्यावी लागेल असे वाटते.

माहितगार's picture

8 Feb 2016 - 1:47 pm | माहितगार

मोगासेठ मला वाटते शशी थरुरांना या विषयावर आंतरराष्ट्रीय मंचावर अलिकडे भाषण करावयाचे होते त्यावेळी तुमचा हा व्हू त्यांच्या वाचनात आला असतातर त्यांनी नक्कीच बल्ले बल्ले म्हटले असते (उपरोधाने लिहित नाहीए)

बाकी 'पौंडाला ९० रु मोजावे लागतात, हेही साम्राज्यच की" वाक्याबद्दलची तार्कीक साशंकता मुक्त विहारिंच्या "मग ह्या न्यायाने....." या प्रतिसादात स्पष्ट व्हावी.

मग ह्या न्यायाने.....

बहारिन =====> एका बहारिन दिनार साठी १८० रुपये

ओमान =====> एका ओमानी रियाल साठी १७६ रुपये

कुवैत =====> एका कुवैती दिनार साठी २२६ रुपये

ह्यांना पण साम्राज्य म्हणायला लागेल.

आणि

जपानी येन ====> एका रुपयाला १.७३ एक जपानी येन, मिळत असल्याने जपानला साम्राज्य म्हणता येणार नाही....(माझ्या माहितीप्रंमाणे, कोरिया पण एके काळी जपानचे अंकित होते आणि जपानवर आधीही कुणी राज्य स्थापन केलेले नाही.)

असो,

अशा बर्‍याच लहान-मोठ्या गाढवकथा आंतरजालावर आणि व्यावहारिक जगांत ऐकायला, वाचायला मिळतात.(कधी कधी, नशीब जोरदार असेल तर, पहायला पण मिळतात.)

माहितगार's picture

7 Feb 2016 - 9:52 pm | माहितगार

तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. लिहिताना एक्झॅगरेशन झाले खरे ;) साम्राज्य म्हणावे असे त्यांच्याकडे काही आता उरले नाही. महासत्ता हे बिरुदसुद्धा अजुन किती काळ टिकेल माहित नाही. काळाच्या ओघात द्रोण कावळे राहतील आणि महासत्ता बिरुद जाईल असेही होऊ शकते.

बा द वे दुसर्‍या महायुद्धाच्या दरम्यान त्यांच्या द्रोण कावळ्याच्या सेट पैकी एक कपल मनोरा सोडून पळून गेले होते, आणि एक द्रोणकावळा सोडून बाकींची हिटलरच्या बाँबींगने वाट लावली होती. मग संपलेल्यांची जागा घेण्यासाठी चर्चीलने अजून द्रोणकावळे मागवले पण तुम्ही म्हणता तसे ब्रिटीश साम्राज्याची ओहोटी तरीही दुसर्‍या महायुद्धा नंतर थांबली नाही.

तरी अजून सूर्य मावळत नाही अशी परिस्थिती आहेच. अजूनही जिब्राल्टर , बर्म्युडा, Falkland बेटे , सेंट हेलेना बेट (तेच जेथे नेपोलियन ला ठेवले होते), भूमध्य सागर आणि प्रशांत महासागरातील काही बेटे अशा overseas territories आहेतच. १९८१ मध्ये आर्जेन्टिना ने Falkland बेटांचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. पण Thatcher बाईंनी सैन्य पाठवून बीमोड केला होता.

माहितगार's picture

8 Feb 2016 - 1:42 pm | माहितगार

अल्पांशाने बरोबर आहे, मुख्य म्हणजे महासत्ता हे बिरुद अद्यापतरी बाकी आहे उद्याचे सांगणे कठीण आहे द्रोण कावळे आधी जातात का महासत्ता हे बिरुद आधी जाते हे काळच सांगेल.

डोमकावळे पूर्ण काळे असतात. शहरात सहसा दिसत नाहीत पण आता शहराच्या सीमा वाढल्यामुळे मानवी वस्तीच्या आसपास दिसून येतात. साध्या कावळ्याप्रमाणे मात्र हे माणसाच्या जास्त जवळ येत नाहीत तसेच थवा करून देखिल रहात नाहीत. त्यांच्या तुसडया स्वभावामुळे कदाचित् ते ब्रिटिशाचे नातलग शोभतील.
मोगाजी शबाख़ैर।

माहितगार's picture

8 Feb 2016 - 1:26 pm | माहितगार

हे आपल्या सारखे पक्षिप्रेमी जाणू शकतात. माझा पक्ष्यांचा अभ्यास नसल्याने छायाचित्रांबद्दल नेमकेपणाने पक्षी जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.
डोमकावळ्यांचा उल्लेख मराठी विश्वकोश, मराठी विकिपीडिया इत्यादी ठिकाणी जंगल क्रो शास्त्रीय नाव: Corvus macrorhynchos) असा आला आहे. इंग्रजी विकिपीडियातील जंगल क्रो लेखात It can also be mistaken for a raven असा उल्लेख आढळतो. जंगल क्रोच्याही बर्‍याच उपजाती असाव्यात असे दिसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2016 - 11:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वत्र आहेत वाचुन बरं वाटलं. द्रोनकावळे शब्द मात्र चुक आहे.

-दिलीप बिरुटे

अंधश्रद्धा सर्वत्र आहेत वाचुन बरं वाटलं.

:) चमतकृतीप्रेम शेवटी मानवी गूण आहे, अगदी बालकथांमध्येही अमूक राक्षस किंवा राज्याचा जीव तमूक वर अवलंबून आहे अशा कथा वाचल्यासारखेच हे ही प्रकरण वाटते. हॅरी पॉटर (मी वाचली नाही) पण असेच चमत्कृतीपूर्ण असावे असे वाटते.

द्रोनकावळे शब्द मात्र चुक आहे.

हे आपण का म्हटलेत हे लक्षात आले नाही. मोल्सवर्थात raven ला द्रोणकाक हा शब्द योजलेला दिसतो. मोल्सवर्थात डोंबकावळा एंट्रीत सुद्धा raven चा उल्लेख येतो -त्याचे कारण कदाचित डोमकावळा फक्त आशियायी पक्षी आहे आणि म्हणून इंग्रजी अनुवाद करताना मोल्सवर्थाचा संभ्रम झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही- पण मराठी विश्वकोश आणि इतर ठिकाणी डोंबकावळा/डोमकावळा = जंगल क्रो अशी वेगळी एंट्री दिसते आहे.

And the Raven, never flitting, still is sitting, still is sitting
On the pallid bust of Pallas just above my chamber door;
And his eyes have all the seeming of a demon’s that is dreaming,
And the lamp-light o’er him streaming throws his shadow on the floor;
And my soul from out that shadow that lies floating on the floor
Shall be lifted—nevermore!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Feb 2016 - 6:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

लंडनच्या मनोर्‍यातील कावळे नष्ट झाले किंवा उडून गेले तर "ब्रिटिश सामाज्य नष्ट होईल (ते तर केव्हाच लयाला गेले आहे ;) )" असा तो प्रवाद नाही तर "सद्य राजघराणे पदच्युत होईल व ब्रिटन या संज्ञेचे राष्ट्र नष्ट होईल" असा आहे.

ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी त्यांचे पंख कातरले जातात :(

ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी त्यांचे पंख कातरले जातात :(ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी त्यांचे पंख कातरले जातात :(

च्यामारी ब्रिटीश. पक्ष्यांना पण तसेच करतात? :(

ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी त्यांचे पंख कातरले जातात :(

आणि असले लोक भारताला अक्कल शिकवायच्या गोष्टी करतात. निर्लज्ज साले.

ते कावळे उडून जाऊ नयेत यासाठी त्यांचे पंख कातरले जातात :(

..बापरे..तरीच..
माझ्या डोक्यात हेच आलं होतं की हे सगळे पक्षी तिथेच एका जागी कसे राहात असतील. उडून कसे नाही जात.

माहितगार's picture

8 Feb 2016 - 11:01 pm | माहितगार

तो मनोरा त्यांच्यासाठी उघडा पिंजरा आहे कारण शक्यतो इन हाऊस ब्रीड केलेले पक्षी वापरतात म्हणजे त्यांच्या पालक पक्षांचे पंख दूरचे उड्डाण भरता येणार नाही असे क्लिप केलेले असतात आणि जन्मल्यापासून मरोर्‍यातलेच खाण्याची सवय लावलेली असते, एवढे करून चुकून माकून एखादा अधिक दूर गेला तर इतर ब्रिटीश नागरीक अशा पक्षांना शोधून मनोर्‍यास वापस करण्यातही मदत करत असावेत. एकुण काय तर ब्रिटीश सत्तेबद्दलच्या अंधश्रद्धेखातर गरीब बिच्चार्‍या पक्षांचे स्वातंत्र्य पणास लावलेले असते.

पद्मावति's picture

8 Feb 2016 - 11:14 pm | पद्मावति

फारच वाईट आहे हा प्रकार. याविषयी प्राणी आणि पक्षीप्रेमी आवाज उठवत नाहीत याचेही नवल वाटते.

खरयं माणसांनी मुक प्राण्यांशी केलेला भेदभाव आहे.

आवाज उठव्ण्याबद्दल प्राणी आणि पक्षीप्रेमीच सांगू शकतील, पण मिपा सदस्य ज्ञानोबा पैजरांच्या आवाहनाची दखल घेत केलेल्या अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी लंडनच्या मनोर्‍यातील द्रोण-कावळ्यांवरील अन्यायाची दखल आम्ही आवर्जून घेतली. किंवा त्या कवितेतील उल्लेख अधिक स्पष्ट व्हावा म्हणून हा लेख टाकला असेही म्हणता येइल.

माहितगार's picture

8 Feb 2016 - 11:08 pm | माहितगार

आताच्या काळात तर या पक्षांना ट्रॅक करण्यासाठी इलेक्ट्रानिक यंत्रणासुद्धा वापरात असतील तर नवल नसावे.

(ब्रिटनमध्ये आपल्या सारखे कबुतरांच्या पायातले चाळ बांधायची फॅशन नसली तर) फोटोतल्या कावळ्याच्या पायात रेडिओ कॉलर दिसतीय. ट्रॅक करत असणारच.

मारवा's picture

8 Feb 2016 - 7:44 pm | मारवा

हा प्रकार भयंकर आहे यापेक्षा कबुतर खान्यावर दाणे टाकणारे जैन परवडले.

माहितगार's picture

8 Feb 2016 - 11:10 pm | माहितगार

ते तसे आहे हे वास्तव !

कबुतर खान्यावर दाणे टाकणारे जैन

हे काय असते ?

मोगा's picture

9 Feb 2016 - 8:14 am | मोगा

प्रत्येक धर्माने एक सजीव दत्तक घेतला आहे.

हिंदु ... गाय

इंग्रज ... कावळा.

मोघल / मुसलमान ... मांजर

जैन ... कबूतर.

मांजर मस्त निवड आहे. बांधायची गरज नाही. स्वच्छ रहाते.. मुलेबाळे कुटंबवत्सल प्राणी आहे. स्पेशल अन्नाची गरज नाही.

भंकस बाबा's picture

9 Feb 2016 - 8:49 am | भंकस बाबा

मांजर कुटुंबावर नाही तर घरावर प्रेम करते. त्यामुळे कुटुंबाने घर सोडले तर मांजर त्याच्याबरोबर जायला राजी नसते. पुष्कळदा बदललेले घर जवळ असेल तर मांजर जुन्या घरी परत येते. एका ठराविक मर्यादेपर्यंत मांजर घरात खेळून रहाते, पण त्याला कंटाळा आला की ते बोचकारायला कमी करत नाही. खायला मिळाले नाही की चोरी करायला मागेपुढे पहात नाही. मांजर स्वतंत्र मनोवृत्तिचा प्राणी आहे.
रच्याकने मोगाजि तुम्ही किती मांजरे पाळली आहेत?
टकंन्याचे कष्ट घेत आहे कारण मोगल व् मुस्लिमामधे कुत्रा निषिद्ध असतो. जो माणसावर प्रेम करतो,त्याने दिलेले कदान्न खातो, आणि मुख्य म्हणजे तो खाल्या ताटात हगत नाही.
हे इन जनरल आहे, वैयक्तिक टिका नाही.

सगळे नातेवाईक सोडून जातील, पण कुत्रा कधीच मालकाची साथ सोडत नाही.

हाडूक मिळाले तरी वाहवा आणि उपाशी पोटी रहायची वेळ आली तरी वाहवा.

कुत्र्या बाबतीत लहान-मोठ्या गाढवकथा बर्‍याच ऐकल्या आहेत.

कुत्र्याच्या बाबतीत साली एकच चूक....भेंडी ही कुत्री भयंकर लळा लावतात.कुत्रा पाळणे कमकुवत मनाच्या लोकांना जमत नाही.

कुत्र्यांच्या बाबत एखादी लेखमाला लिहायला लागेल, असे दिसत आहे.

मोगा's picture

9 Feb 2016 - 9:45 am | मोगा

हे सगळे प्राण्याच्या बुद्ध्हीमत्तेवर व मुख्यतः मेमरीवर ठरते. मांजर फक्त आठ की दहाच मानवी शब्द लक्षात ठेवु शकते... त्यामुळे कुत्र्याइतके ट्रेन्ड होऊ शकत नाही.

मेमरीमुळे मालक कोण , आपले ताट कुठले , कपाटात तोंड घालू नये इ इ कुत्रा शिकू शकतो. तसे मांजराचे नसते.

त्यामुळे अमुक प्राणी इमानदार व मांजर बेइमानी ही तुलना चुकीची आहे असे वाटते.

भंकस बाबा's picture

9 Feb 2016 - 12:38 pm | भंकस बाबा

तुम्हाला आज्ञा म्हणायचे आहे का? सवय असणे व् आज्ञा पाळने या गोष्टीचा दुरून पण संबध नाही.
पैसा ताई मी माझ्याकडे चार वर्षे मांजर पाळले होते. त्याला भूक लागली की ते खायला मागायचे. आम्हाला फार अभिमान होता त्याचा की त्याने कधीच आमच्याकडे चोरी केलि नाही पण दुसर्यांच्या घरी जाऊन मासे खायला अजिबात कचरत नसे.
मांजर मालकाला जरूर ओळखते पण त्याचा जीव वास्तुवर जास्त असतो.

पैसा's picture

9 Feb 2016 - 10:25 am | पैसा

आमच्याकडे गेली ७/८ वर्षे मांजरे सतत आहेत. घरापासून २ किमि अंतरावर हॉस्पिटलमधून हरवलेल्या २ मांजरी एक महिन्यानंतर केवळ मी हाक मारल्यावर आवाज ओळखून उत्तर देऊन समोर आलेल्या आहेत. तसेच आम्ही जेव्हा घरे बदलतो तेव्हा मांजरेही सुखाने नवीन जागी अ‍ॅडज्स्ट झाली आहेत. फक्त त्यांना सरावण्यासाठी जरा वेळ द्यावा लागतो. सुरुवातीला बेडखाली लपून बसतात, मग हळूहळू भीड चेपली की थोडे थोडे पुढे येत जागा ओळखीची करून घेतात. आणि पुरेसे खायला मिळणारी मांजरे कधीच चोरी करत नाहीत. ती कोणाचे ऐकत नाहीत म्हणून पाहिजे ते उचलून घेतात. त्याला चोरी म्हणतात हे त्याना समजत नाही. =))

मुळात सर्वच प्राण्यांना (मग ते पाळीव असोत किंवा नसोत) स्वतःचे अन्न स्वतः मिळवायची नैसर्गिक सवय असते.पण आपण त्यांना परावलंबी करतो.

(आमचे बीगलू आज जेमतेम ५-६ महिन्यांचे असेल-नसेल...पण भूक लागली की स्वतः हून फ्रीज उघडते.आधीची लॅबू बिचारी कधीच स्वैपाकघरात भटकत न्हवती.असो, प्रत्येक कुत्र्याची लक्षणे वेगळी.एक जोरदार लेखमालिकाच कुत्र्यांच्यावर लिहावी लगणार असे दिसत आहे.)

प्रत्येक धर्माने एक सजीव दत्तक घेतला आहे.

हिंदु ... गाय

असहमत
हिंदु धर्माने अर्ध प्राणिसंग्रहालय दत्तक घेतलेल आहे.
वाघ सिंह गाय कुत्रा गरुड रेडा हत्ती घुबड इ.
त्यात वराह आणि फुलपाखरु हे प्रचंड विसंगती दाखवतात

फुलपाखराचा संदर्भ लक्षात नाही आला.

एका पुराणानुसार बुद्ध विष्णु चा एक अवतार आहे.
विष्णु च्या दहा अवताराता एक वराह अवतार आहे.
बुद्ध मृत्यु पावण्याच कारण वराह चे मास सेवन केल्याने पोट बिघडणे.
थेअरी पुर्ण जोडली तर अवताराने अवताराचे भक्षण केले असे दिसते.
अजुन एक म्हणजे इतरांना जो मान मिळतो त्या मानाने वराह पुजन जसे नागपंचमी ला नाग पुजा
बंगाली स्त्रीया विवाह विधी वेळेस घुबडाचा आवाज काढतात, इ.
वाघ सिहांच्या पुजनात धोका आहे म्हणुन टाळल जाण पटण्यासारख आहे.
मात्र साप रीस्की असुनही पुजला जातो
मात्र वराह ?
त्यामानाने उपेक्षित

वाघ सिहांच्या पुजनात धोका आहे म्हणुन टाळल जाण पटण्यासारख आहे.

मात्र वराह ? त्यामानाने उपेक्षित

गंमत असते लोकांची (आणि आपल्या दोघात जशा मत भिन्नता आहेत तसे अशा काही ठिकाणी विचारही जुळतात, त्या सिंहिण धाग्यात पैसा ताईंनी जोरदार आरोप केला आहे प्रतिक्षा आहे तुमची तिकडे). एनीवे या विषयावर एक धागा टाकण्याची आठवण आली लगोलग टाकतोच.

गामा पैलवान's picture

9 Feb 2016 - 1:03 pm | गामा पैलवान

काहीही हं मोगा! इंग्लंडचं चिन्हं सिंहत्रयी आहे :

http://ecx.images-amazon.com/images/I/516ar8jOHoL._SY300_.jpg

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

9 Feb 2016 - 2:21 pm | माहितगार

गा.पै. कुठले कुठे भिडवताय मोगासेठ बहुधा श्रद्धांबद्दल बोलताहेत,

अहो मोगासेठ बरोबर का नाही सांगा, या निमीत्ताने तुमची बाजू घेण्याचे झाले आहे ;)

शिंव्हं झेप घेण्याएवजी दोन हात पसरुन भीक मागताहेत असे वाटतेय चित्रात. दे माय, वाढ माय करुन. खालच्या नमुन्याने तर नीट डोस्क्याला हात लावायची टिपीकल पोज पण दिलीय. ;)

माहितगार's picture

9 Feb 2016 - 5:13 pm | माहितगार

=))

चांदणे संदीप's picture

9 Feb 2016 - 6:09 pm | चांदणे संदीप

=))

हाण्ण्ण तेजायला अभ्या. =)) =)) =))

प्रचेतस's picture

9 Feb 2016 - 6:29 pm | प्रचेतस

अगदी अगदी =))

मायला लैच बारीक लक्ष बे तुझं =))

गामा पैलवान's picture

10 Feb 2016 - 2:39 am | गामा पैलवान

प्रचेतस, तुमच्याशी अगदी सहमत! अचूक वर्णन आहे. भिकेस लागलेली सिंहावळ जणू!
आ.न.,
-गा.पै.

ही सिंहावळ आपल्या कर्माने भिकेस लागेल तो सुदिन.

यशोधरा's picture

9 Feb 2016 - 8:40 pm | यशोधरा

=))