कविता हवी तशी जमली नाही, इतरांनीही कविता करून कावळ्यांना न्याय द्यायला हरकत नाही, आम्ही आमच्या परीने पैजारबुवांच्या आवाहनाला खालील प्रमाणे दाद दिली आहे.
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
आम्हा कावळ्यांचा अन मानवी बायकांचा संबंधच काय
तुमच्या बायांनी आम्हाला फुकाचं बदनाम केलं हाय
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
तुमच्याकडन हाय दंडाच येण
आमच घर मेणाच का शेणाच तुम्हाला काय देण घेण
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
तुम्ही करता घाण
आमच्या काळ्या रंगाच्या नावान तुमची नसतीच ठणाण
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
तुमच्या नजरा वाईट
त्यासाठी डोंबकावळ्याची बदनामी, खूप झाली हाईट
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
कशाला ठेवता पिंड आणि
आणि मेलेल्या आत्म्यांच्या नावाने आमची नसतीच धींड
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
कशाला पिंजर्यात तुमच्या द्रोणकावळे
तुमच्या सत्तेसाठी कशाला कुजवता हकनाक आमचे मावळे
अहो मानवी बाईजी, अहो मानवी रावजी
खोट्या बदनामीचा दंड भरून जावाजी,
छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स
इंग्लंडातल्या द्रोणकावळ्यांवर धागा लेख आणि आमच्या आरोप, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बदनामी आणि अब्रूनुकसानी या धाग्याची जाहिरात करणेत येत आहे.
प्रतिक्रिया
6 Feb 2016 - 2:41 pm | माहितगार
पैजारबुवा तुमी घाऊकपणे कावळ्यांना 'डेम्बिस' हा अपशब्द वापरल्यामुळे या धाग्यावर आपणास दंडाची नोटीस आलेली आहे ती आवर्जून वाचावी.
7 Feb 2016 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार
सर तुम्ही स्वत: कावळ्यांच्या बाजूने खटला लढवणार असाल तर आपली सपशेल माघार. पण माय लॉर्ड कावळ्यांचॆ बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. उलट कावळ्यांबद्दल आम्हाला असणारी सहानुभूती आम्ही आमच्या पोपट.... या काव्यपुष्पात व्यक्त केली होती याची कृपया नोंद घेण्यात यावी. म्हणुनच मी असे म्हणतो की तुम्ही माझ्यावर केलेला आरोप धादांत खोटा आहेत
आता जगावं का मारावा हा एकच सवाल आहे!
ह्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम, लाचार, आनंदानं?
का फेकून द्यावं देहाचं लक्तर मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये?.....आणि करावा शेवट सर्वांचा एकाच प्रहारानं...तुझा, माझा, ह्याचा अन त्याचाही!
मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणा-या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा..कधीही...
पण मग...त्या निद्रेलाही स्वप्नं पडु लागली तर?....तर.....तिथंच तर मेख आहे!
नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून असं आम्ही सहन करतोय जुनं जागेपण, सहन करतोय प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार....अस्तित्वाच्या गाभा-यात असलेल्या सत्त्वाची विटंबना...आणि अखेर, करूणेचा कटोरा घेऊन उभा राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेक-यांच्या दाराशी!!
पैजारबुवा,
7 Feb 2016 - 10:49 am | माहितगार
कावळ्यांच्या बाजूने वकील पत्र आपण आधीच घेतले असल्यामुळे आम्हाला तशी संधी मिळण्याची शक्यता कमी. आम्ही केलेला आरोप म्हणजे स्वतःहून तुमचा ज्युनिअर असिस्टंट होण्याची दिलेली परिक्षा होती. आम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालो असलो तर तुमच्याकडे ज्युनियर असिस्टंट म्हणून अर्ज करतो. म्हणजे कावळ्यांची केस अजून जोमाने लढता येईल.
7 Feb 2016 - 11:02 am | अजया
:)
7 Feb 2016 - 2:20 pm | पैसा
कावळे दा बेष्ट!