नमस्कार मिपाकर मंडळी,
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या शहरात विविध कार्यक्रम झाले असती नाही. तसाच एक अनोखा कार्यक्रम ठाण्याच्या खोपट बस डेपो मध्ये पार पडला. होय ह्या २६ जानेवारीच्या निमित्ताने एसटी विश्व प्रदर्शन भरवले गेले होते
एसटीची विविध मोडेल्स, संग्रहित तिकिटे, तक्रार वह्या , वाहकाच्या नोंदवह्या आदि सामान्य प्रवाशाला कधी न बघायला मिळणाऱ्या गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. तसेच एसटीची कागदी मोडेल्स १:१०० ह्या प्रमाणात बनवून ठेवली होती. त्यामध्ये आपला लाल डब्बा पासून शिवनेरी पर्यंत आणि बेडफोर्ड च्या पहिला बस पासून नवीन वोल्वो बस पर्यंत मोडेल्स बघायला आणि विकायला ठेवली होती ( प्रत्येकी रुपये ५०/-) संपूर्ण संच ५००/-* रुपयाला होता. [फोटो कसे टाकायचे त्याची लिंक कोणी देऊ शकेल का ?] एकूणच प्रदर्शन फार उत्तम झाले.
मी स्वतः शिवनेरीचे कागदी मोडेल घेऊन ते घरी बनवले आहे. त्याचे फोटो तुम्हाला ह्या लिंक वर मिळतील:-
जर कोणाला तशीच मोडेल्स हवी असतील तर मी खाली देत असलेल्या फोनवर संपर्क करावा:
आदित्य राणे: +९१९७६८२९८०५० / msrtclovers@gmail.com
Disclaimer:-
०१ : वरील संपर्क क्रमांक केवळ तुमचा साठी दिले आहेत.
०२: हा लेख कोणाच्याहि व्यवसायाची जाहिरात नाही. आणी माझा msrtclovers group शी कोणताही आर्थिक संबंध नाही. मी पूर्ण जाणीव ठेऊन हे विधान करतो कि मी मिसळपाव संकेतस्थळाच्या सर्व नियमांचे पालन करतो आहे.
आपला
प्रणव जोशी
ठाणे
प्रतिक्रिया
1 Feb 2016 - 9:05 pm | सुहास झेले
http://www.misalpav.com/node/13573
2 Feb 2016 - 7:06 am | प्रणवजोशी
धन्यवाद मी फोटो अपलोड करीन आता
2 Feb 2016 - 12:15 am | श्रीरंग_जोशी
मॉडेल बस आवडली.
या प्रदर्शनाच्या माहितीबद्दल धन्यवाद.
प्रदर्शनाचे काही फोटो टाकल्यास आनंद वाटेल.
2 Feb 2016 - 11:47 am | नाखु
फक्त ठाण्यातच संपर्क आहे का? पुणे आगारात अशी काही व्यवस्था आहे काय?
प्रश्नार्थी नाखु
2 Feb 2016 - 1:41 pm | प्रणवजोशी
प्रदर्शन फक्त २६ जानेवारीला ठाणे खोपट डेपो मध्येच होते.
2 Feb 2016 - 1:52 pm | अभ्या..
सुंदर माहीती प्रणवराव.
तुम्ही ती शीतल बस कशापासून केली? फोम की माऊंटबोर्ड? त्यावर डीसी कलरप्रिंट काढून चिकटवले का? त्याची चाके चासीस वगैरे कसे अॅडजस्ट केले? परफेक्ट प्रपोर्शनेट मॉडेल आहे का? वर्कींग (ब्याटरीवर वगैरे) मॉडेल असल्यास ते कसे करता. प्लीज डिटेलमध्ये द्या ना माहीती. मला खूप इंटरेस्ट आहे.
3 Feb 2016 - 1:18 am | प्रणवजोशी
शितल बस पुर्णतः कार्डबोर्ड पासुन बनवली आहे. एस्टीचे डु ईट युअरसेल्फ किटस त्या दिवशी मिळत होते. शितल बसही प्रदर्शनात ठेवली होती ( मी बनवलेली नाही) पण ते १ः१०० स्केल मॉडेल आहे.
3 Feb 2016 - 1:23 am | प्रणवजोशी
मी शिवनेरी आणी हिरकणीचे किट विकत घेतले आहे.शिवनेरी बस मी आजच बनवली आहे
3 Feb 2016 - 1:35 am | प्रणवजोशी
हे घ्या फोटोज
3 Feb 2016 - 1:39 am | श्रीरंग_जोशी
दुवा शीर्षकात देऊ नये कारण
कमाल अक्षरांची मर्यादा असल्याने संपूर्ण दुवा प्रकाशित होत नाही.
त्यावर त्या प्रतिसादाची लिंक सेट होते.
दुवा प्रतिसादाच्या मजकूरात द्यावा.
3 Feb 2016 - 1:41 am | प्रणवजोशी
मी खाली नवीन लिंक दिली आहे.
3 Feb 2016 - 8:28 am | अभ्या..
सॉरी. ते डू ईट युरसेल्फ मॉडेल म्हणजे फक्त रेडी कागदाचा बॉक्स बनवणे आहे. मला वाटले अॅक्चुअली चाके, चेसिस बाकी डिटेल्स करायचे असतील. हे तर रेडिमेड प्रिंट पेपरचे बॉक्स फोल्डिंग निघाले. नथिंग क्रियेटिव्ह. सॉरी.
3 Feb 2016 - 4:27 pm | जव्हेरगंज
3 Feb 2016 - 6:19 pm | आदिजोशी
वरच्या फोटोत दाखवलेल्या शीतलची चाके वळलेली असल्याने माझाही तसाच समज झाला होता. असो. नुकत्याच कापा-चिकटवायला शिकलेल्या पोरांसाठी मस्त आहे.
4 Feb 2016 - 6:55 am | प्रणवजोशी
सॉरी म्हणू नका मलाही ते अजिबात क्रियेटिव्ह वाटले नाही. पण एस्टीचा पंखा असल्यानेच मी घेतले ते.
3 Feb 2016 - 1:39 am | प्रणवजोशी
https://picasaweb.google.com/101138837054935486671/Shivneri
3 Feb 2016 - 1:43 am | श्रीरंग_जोशी
नवी लिंक ओपन होत नाहीये.