थोरले माधवराव यांचे अस्सल चित्र

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
23 Jan 2016 - 10:17 am

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये माझे संशोधन प्रसिद्ध झाले त्याबद्दल हा एक छोटा लेख. कुणाला अजून काही माहिती असेल अथवा काही प्रश्न असतील तर जरूर विचारावेत यासाठी (आणि चित्राला व मला थोडी अजून प्रसिद्धी मिळावी या स्वार्थी हेतूने) इथे मिसळपाववर लेख टाकत आहे. या शोधात मिसळपाव सदस्य बॅटमॅन यांचीही थोडीफार मदत झाली त्याबद्दल त्यांचे आभार!

"या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव, त्यापुढे पानपतचा आघात काहीच नव्हे" -- ग्रॅंट डफ

थोरला माधवराव पेशवा. बुद्धिमान, मानी आणि तेजस्वी. लहान वयातच मोठमोठी कृत्ये करून तरुणपणीच निजधामी गेलेला असा हा कर्तृत्ववान पेशवा. रणजित देसाई यांच्या स्वामी कादंबरीचा नायक. अवघ्या ११ वर्षांच्या काळात पानिपतचे अपयश त्याने धुवून काढले, भोळ्या आणि सतत त्रास देणाऱ्या रघुनाथरावासारख्या चुलत्यास त्याने निष्प्रभ केले. कडक शिस्त, निःसंदिग्धता, रेखीव कारभार ही त्याची वैशिष्ट्ये. त्याची खाजगी राहणी ही साधी होती, चैन अथवा आराम त्याने कधी केला नाही. उत्तर पेशवाईत प्रसिद्ध अशी अनेक माणसे (पटवर्धन, पेठे, हरिपंत फडके, नाना व मोरोबा फडणीस, विसाजी कृष्ण बिनीवाले) त्याच्या काळात तयार झाली. अश्या या कर्तृत्ववान पेशव्याचे एकही अस्सल चित्र आजपर्यंत उजेडात आले नव्हते, त्यामुळे तो कसा दिसत असे याची कल्पना करणे भाग होते.

चित्र

From Madhavrao

मागची बाजू जिथे नाव लिहिले आहे
From Madhavrao

आजच्या पेपरमधील मूळ बातमी
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/madhavrao-peshve...

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

पैसा's picture

23 Jan 2016 - 10:30 am | पैसा

अभिनंदन! असे भारतात आणि बाहेरही किती काय काय असेल देव जाणे!

तुमचे इतिहासावर काही उत्तम प्रतिसाद पाहिले आहेत. वेळ काढून जरूर लिहीत जा!

यशोधरा's picture

23 Jan 2016 - 10:31 am | यशोधरा

हो, अज ही बातमे वर्तमानपरामधून वाचली. तुम्ही मनोद दाणी का?

होय, वार्ताहराच्या विनोदामुळे मनोजचा मनोद झालो खरा पण तो मीच :)

यशोधरा's picture

23 Jan 2016 - 11:17 am | यशोधरा

ओके :) अभिनंदन तुमचे!
बॅट्याने तुम्हांला मदत केली आहे हे वाचून बॅट्याचाही अभिमान व कौतुक वाटले.

नाखु's picture

23 Jan 2016 - 11:56 am | नाखु

प्रतीसादास नि:संशय सहमती+जाहीर आभार

नाखु प्रतिसादी

प्रचेतस's picture

23 Jan 2016 - 12:56 pm | प्रचेतस

आमच्या ब्याट्याचे कौतुक आहेच. वृत्त सकाळीच वाचले होते.

अजया's picture

24 Jan 2016 - 8:24 pm | अजया

यशोशी सहमत.

अरे वा. या माहितीकरिता आभार!

ह्या चित्राचा शोध कसा घेतला वगैरे माहिती लिहा, अशी विनंती.

संदीप डांगे's picture

23 Jan 2016 - 11:34 am | संदीप डांगे

सहमत...

अभिनंदन मनोजजी!

प्रियाजी's picture

23 Jan 2016 - 12:49 pm | प्रियाजी

सकाळीच ही बातमी वाचली होती. त्याबद्दल तुमचे अभिनंदन. खरंच या चित्राच्या शोधामागची माहिती वाचायला नक्कीच आवडेल.

चित्र दिल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्याकडून अजून माहितीचा खजिना इथे येऊ द्या.

बोका-ए-आझम's picture

23 Jan 2016 - 12:38 pm | बोका-ए-आझम

शिवाजीमहाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांच्यानंतर ' जर जास्त जगले असते तर...' अशी हळहळ थोरल्या माधवराव पेशव्यांबद्दलही वाटते.

उगा काहितरीच's picture

23 Jan 2016 - 1:04 pm | उगा काहितरीच

अभिनंदन !

स्वाती दिनेश's picture

23 Jan 2016 - 1:45 pm | स्वाती दिनेश

चित्राबद्दल धन्यवाद.
खूप खूप वर्षांपूर्वी पर्वती येथे पेशव्यांचे असेच हातात फूल असलेले चित्र पाहिल्याचे स्मरते, ते कोणत्या पेशव्यांचे ते आठवत नाहीये. त्याबद्दल काही माहिती मिळू शकेल का?
स्वाती

प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय सांगणे अवघड आहे. माझ्या आठवणीप्रमाणे १५ वर्षांपूर्वी नानासाहेब पेशव्यांच्या समाधीस्थळी सर्वच पेशव्यांची ओळीत चित्रे होती. त्यातली काही वास्तवावर आधारित असली तरी काही मात्र चित्रकाराने आपल्या कल्पनेने बनवलेली होती.

स्वाती दिनेश's picture

24 Jan 2016 - 5:56 pm | स्वाती दिनेश

माहितीबद्दल धन्यवाद.
खूप वर्षांपूर्वी पर्वतीवर पाहिले होते , त्यामुळे मलाही नीट आठवत नाहीये.. हा लेख वाचताना त्या आठवणी ताज्या झाल्या..
स्वाती

नाव आडनाव's picture

23 Jan 2016 - 2:08 pm | नाव आडनाव

चित्रासाठी धन्यवाद. बातमीतल्या वेल्सच्या बाकीच्या चित्रांची पण तुम्हाला वेळ होइल तशी माहिती लिहा.

पद्मावति's picture

23 Jan 2016 - 2:17 pm | पद्मावति

वाह मस्तं. या फोटो आणि माहितीबद्द्ल तुमचे मन:पूर्वक धन्यवाद.

शिवाजीमहाराज आणि पहिले बाजीराव पेशवे यांच्यानंतर ' जर जास्त जगले असते तर...' अशी हळहळ थोरल्या माधवराव पेशव्यांबद्दलही वाटते.

+१

पर्ण's picture

23 Jan 2016 - 6:09 pm | पर्ण

सुरेख लेख.... मला राम माधव पण आवडला उत्तम सादरीकरण.... :D पुन्हा एकदा स्वामी सारखी मालिका आपल्या मराठी वाहिनी प्रेक्षकांसमोर आणावयास हवी..

यशोधरा's picture

23 Jan 2016 - 6:13 pm | यशोधरा

राम माधव कोण?

पर्ण's picture

23 Jan 2016 - 6:15 pm | पर्ण

रमा माधव **

फोटो आणि माहितीसाठी धन्यवाद....

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहब्बत बरसा दे तू... सावन आया है :- Creature 3D

अनिरुद्ध.वैद्य's picture

23 Jan 2016 - 9:16 pm | अनिरुद्ध.वैद्य

अभिनंदन हो!

सर्व प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद. अजूनही बरयाच अप्रकाशित गोष्टी उजेडात आणायच्या आहेत. त्या येलमध्ये नसून जगभर विखुरल्या आहेत. शिवाजीराजांचे तरुणपणीचे एक चित्र आहे, रघुनाथरावाचे अटकेपार भरारी मारल्यानंतरचे चित्र आहे. जसा वेळ होईल तसे पुढचे काम चालू ठेवेन.

यावेळी एक गोष्ट नमूद करण्याजोगी वाटते. राजवाडे, ग. ह. खरे, पोतदार, पगडी, गजानन मेहेंदळे आणि इतर अनेक संशोधकांनी रोज काही न काही संशोधन करून ज्या परिस्थितीतून मूळ कागदपत्रे जमा केली, वाचली, प्रकाशित केली आणि पुढच्या पिढीसाठी सुरक्षित ठेवली, त्यांच्याशिवाय आज काहीच शक्य झाले नसते. खरे यांच्या कामाला तपस्या म्हणणेच योग्य होईल. मेहेंदळे यांच्या पहिल्या भागाच्या पुरवण्या केवळ १००० पानांच्या वरती आहेत. या संशोधकांच्या कामाचा थोडाफार परिचय आणि वापर मला करता आला ते माझे मोठे भाग्य.

पत्रकार काही म्हणोत, आजकाल श्री मानसिंग कुमठेकर आणि त्यांच्यासारखे अनेक (आपले वल्ली अथवा प्रचेतस यांचे उदाहरणच पहा) आपल्या परीने थोडीफार इतिहासात भर घालतच असतात, त्यामुळे इतिहासाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे असाच मी म्हणेन.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2016 - 1:28 am | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम संशोधन. ते कसे केले याबद्दल वाचायला नक्की आवडेल.

तुमचे व बॅटमन यांचे हार्दिक अभिनंदन !

प्रतिक कुलकर्णी's picture

24 Jan 2016 - 8:25 am | प्रतिक कुलकर्णी

व्वा ! बातमी वाचली होती काल. उत्तम संशोधन :)
हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद.

रेवती's picture

24 Jan 2016 - 8:26 pm | रेवती

ग्रेट!

अभिजीत अवलिया's picture

25 Jan 2016 - 9:52 pm | अभिजीत अवलिया

अभिनन्दन.

चित्रगुप्त's picture

25 Jan 2016 - 11:46 pm | चित्रगुप्त

अशी मूळ तात्कालीन चित्रे उजेडात येणे हे थोरच. परंतु माधवरावांची आणखी चित्रे उपलब्ध असल्यास त्यांचे तौलनिक निरिक्षण करण्यातून ते खरोखर कसे दिसत होते यावर प्रकाश पडायला मदत होईल.
जालवर उपलब्ध असलेले एक चित्रः
.
Madhu Rao Narayan the Maratha Peshwa with Nana Fadnavis and attendants Poona 1792 by James Wales
या दोन्ही चित्रात चेहरेपट्टीतील साम्य दिसून येत नाही, असे म्हणता येईल. यातील कोणते प्रत्यक्ष समोर बसून रंगवले गेले होते, याबद्दल माहिती उपलब्ध आहे का?
(हे Madhu Rao Narayan म्हणजे तेच माधवराव ना?)

गामा पैलवान's picture

26 Jan 2016 - 4:29 am | गामा पैलवान

चित्रगुप्त,

वरील चित्रातली व्यक्ती सवाई माधवराव असावेत. ज्याअर्थी नाना फडणीस त्यांच्या शेजारी बसलेत त्यावरून हा तर्क बांधला आहे. माधवराव १७७२ साली स्वर्गवासी झाले. वरील चित्राचे साल १७९२ आहे. तसेच हे चित्र विकिवरही द्वितीय उपाख्य सवाई माधवरावांचे म्हणून दाखवले आहे.

आ.न.,
-गा.पै.

इष्टुर फाकडा's picture

26 Jan 2016 - 2:59 am | इष्टुर फाकडा

मनोज साहेब, धन्यवाद !
बाकी त्या काळातल्या चित्रांवरून लोकांच्या फारफारतर पोशाखाचा अंदाज येवू शकतो बाकी कसे दिसत असतील वगैरेचा अंदाज बांधणे शक्यच नाही.

स्वाती२'s picture

26 Jan 2016 - 3:17 am | स्वाती२

अभिनंदन!

अभिनंदन आणि धन्यवाद! हि बातमी पेपरमध्ये वाचल्याचं आठवतंय आणि तेव्हा अनोळखी व्यक्तीबद्दल वाटलेलं कौतुक ती व्यक्ती मिपाकर मनो आहेत हे कळल्यावर ते कौतुक दुणावल्याचंही जाणवतंय :):).