Newspaper वाचायला कोणतीही website उघडा की बलात्काराच्या ३-४ बातम्या तरी १०० टक्के . काय चुकतंय काय आपले ?
माझ्या मते ३ महत्वाची कारणे:(ही माझी वयक्तिक मते आहेत , मी कोणी तत्वज्ञ नाही … )
१.मानसिक संकुचता : 'सेक्स ' बाबतीत आपला देश खूपच संकुचीत विचारांचा आहे. संस्कृती रक्षणाची नाजूक झालर चढवली आहे . BBC वर rape च्या news झळकायला लागल्यात . माझा इथला एक मित्र मला बोलला : ' whats wrong with you Indian guys ? why you सो hungry for sex ? why सो मेनी रेपस ?' . इथं SA मध्ये मी जवळ जवळ मी आत्ता ४ वर्ष राहत आहे , पण एकही बलात्काराची बातमी मी ऐकली नाही . कारण sex म्हणजे काही खूप मोठ रहस्य असा 'फंडा 'इथं नाही . लग्नाआधी सेक्स केला की पाप असाही काही नाही . १८ वर्ष होईपर्यंत एखादा मुलगा वा मुलगी virgin सापडणं कठीण. सेक्स education योग्य वेळी दिला जाता . ज्या देशात 'कामसूत्रा' चा शोध लागला त्या देशातली तरुण पिढी सेक्स बद्दल एवढी भरकटलेली का ? एखादी सुंदर मुलगी रस्त्यावरून चालली कि तिच्याकडे असं बघायचा कि 'James Bond' सारखा 'X-ray' चष्मा घातला आहे . तीला घाणरडे tount करायचे . ही कसली मानसिकता ? इथं 'बिकिनी' घातलेल्या पोरीनाही कुणी tount करत नाही वा त्या नजरेन कोण बघत नाही. म्हणजेच दोष घातलेल्या कपड्यांचा नाही तर मनाला घातलेल्या घाण कपड्यांचा आहे .
परवा मी माझ्या एका मित्राला ( माझ्याबरोबर काम करणारा )भेटलो , मला समजला की त्याने लग्न केला आहे . त्याला शुभेच्या वगेरे देऊन झाल्या कि त्याला विचारले की तुम्ही कसे भेटलात ? कुठे भेटलात? वगेरे (कारण arrange marriage विचारले म्हणजे तो मला वेड्यात काढेल , arrange marriages फक्त आपल्याकडेच होतात .)तो बोलला की -(अनुवादीत )आम्ही दोघं मागील २-३ वर्षापासून एकत्र राहत होतो . थोडासा planning चुकला अन ती pregnant झाली . मग आम्ही ठरवला कि आम्हाला मुल हवाय , abortion नको म्हणून गडबडीत लग्न केलं .
आय मीन - केवढी ही तफावत ?
इथं Night Clubs, Strippers club , massage parlour सुद्धा आहेत . पण त्याने जर का संस्कृतीचा ह्रास होत असता , तर आपल्या मानाने इकडे जास्त बलात्कार ह्यायला हवेत … नाही का ? पण सगळा उलट आहे , त्याने ना इथल्या संस्कृतीचा ह्रास होतो , ना समाजव्यवस्था बिघडते ना चर्चेस ला जाणार्यांची संख्या कमी होते . एखादा विषय मग तो कोणताही असो जितका दाबाल तितका तो उफाळून बाहेर येतो . आणी म्हणूनच कदाचित एवढे बलात्कार होत असतील .
२. सरकार विषयी भीती : ज्या संविधानाने आपल्याला एवढे अधिकार दिलेत , त्या बदल्यात काही कर्तव्य पण दिलीत . पण ती कर्तव्य पूर्ण नाही केली की सजा नाहीये . अन जरी असली तरी त्या सजेची कुणाला भीती नाही राहिली . रस्त्यावरचा सिग्नल तोडा , बलात्कार करा की खून करा बाहेर येणारच ह्याची खात्री असते . गल्लीगल्लीत इथं एक डॉन तयार झालाय , जातीनुसार , धर्मानुसार , पैश्यानुसार वगेरे …. ज्याला भीती च राहिली नाही सजेची तो कशाला घाबरेल ? कधी -कधी वाटते की सगळ्यांना दुबई ला पाठवावे राजेशाही काय असते हे कळण्यासाठी ? किंवा साधारण नागरीक म्हणजे काय हे कळण्यासाठी किंवा सरकारची भीती काय असते हे कळण्यासाठी … बाळासाहेबांच्या भाषणातील एक वाक्य सतत सतावते कि - ' कोण म्हणत आपल्याकडे लोकशाही होती ? जर का एक घरान स्वातंत्र्यानंतर राज्य करत असेल तर ती लोकशाही कसली अन म्हणूनच माझा लोकशाही वर विश्वास नाही … आपल्याला शिवशाही हवीये , गुन्हा केला की सजा , हात ,पाय अन मुंडके तोडायची …… ' बऱ्याचदा मी त्यांच्या ह्या वाक्यांशी सहमत होतो .
३.अनुकरण : वेस्टर्न culture चे अनुकरण हे ही एक कारण असाव . कोणतही अनुकरण केलं तर ते १०० टक्के करा . 'आधा ग्यान गधे के बराबर' असं म्हणतात . आपल्या मुली तोकडे कपडे घालतात पण त्यांची डेअरिंग घालत नाहीत . इकडच्या मुली कमी कपडे घालतील पण त्यांच्या purse मध्ये protective equipments असतात अन वेळ पडल्यास स्वतः ला वाचवायला सामर्थ्यवान असतात . club मध्ये जाऊन कितीही wishky , vodaka , taquila ढोसला तरी त्याना पूर्ण भान अन स्वतः वर नियंत्रण असतं . ' उसने छु लीया और मेरा मेरे उपर से कंट्रोल छुट गया ' अशी फालतू कारणे नसतात . किस जरी केला तरी Bed पर्यंत न्यायचे की नाही हे पूर्ण पणे ते ठरवतात - तात्पर्य हे कि वेस्टर्न संस्कृती चं अनुकरण करायाचं तर पूर्णता केले पाहिजे . नाहीतर आपली पुरुषजात नालायक आहेच , तोकडे कपडे घातलेली अन अल्कोहोल घेणारी मुलगी म्हणजे त्यांच्या नजरेत 'वेश्या '……
शोकांतिका ही आहे की ज्या मातीत काली माता ने दुर्गा माते , दानवांचा नाश केला , त्यांचे शीर धडावेगळे करून रक्त पील , त्याच मातीत कितीतरी निरागस मुली बलात्काराच्या शिकार होतयेत. स्वतः ला वाचवायला बलात्कार करणाराच्या लिंगावर ही आघात करता येयू नये ? मे बी 'लाज '… पण काली माता पण नग्न च असते . गरज आहे ती मुलींना स्वताला वाचवण्यासाठी समर्थ करण्याची , आपल्या भारतीय पुरुषांची मानसीकता बदलण्याची अन सरकारचे कायदे बदलण्याची अपेक्षा मी कधीच सोडली आहे . भारतात आपण संस्कृतीचा महिमा गिरवत बसतो अन बाहेर rapist country म्हणून ओळख निर्माण होतेय …।
प्रतिक्रिया
13 Jan 2016 - 6:47 pm | राजेश घासकडवी
SA म्हणजे साउथ आफ्रिका का? मग हे वाचा. पुढच्या वेळी तिथल्या तुमच्या मित्राकडून भलतंसलतं ऐकून घेऊ नका.
Crime is a prominent issue in South Africa. South Africa has a very high rate of murders, assaults, rapes (adult, child, elderly and infant), and other crimes compared to most countries.... It has the highest murder rate of any country with a population greater than 35 million according to UNODC data.
The country has one of the highest rates of rape in the world, with some 65,000 rapes and other sexual assaults reported for the year ending in March 2012, or 127.6 per 100,000 people in the country.
20 Feb 2016 - 3:23 am | अविनाश लोंढे.
SA …south Africa असो किंवा अमेरिका असो , सगळीकडे स्त्री आहे जी आपली माता , बहिण किंवा मुलगी आहे , फरक इथे पडतो की आपण त्याची किती काळजी घेतो ? त्यांच्यामुळेच आपली दुनिया आहे ! मी हे बोलतो , कारण मी भारतीय आहे ज्याला बहिण , आई आहे , ज्यान्च्यामुळे मला एवढे प्रेम , हि दुनिया मिळाली , मला माहितेय कि आपण पुरुष आहोत अन आपली जबाबदारी आहे कि त्याचं रक्षण करण ! नाही का ?
14 Jan 2016 - 12:47 am | अविनाश लोंढे.
SA - San Antonio
14 Jan 2016 - 1:36 am | राजेश घासकडवी
कपाळावर हात मारायची स्मायली शोधायला हवी. अहो, सॅन अॅंटोनियो तुम्हाला SA म्हणून माहीत असेल, पण जगाला नाही माहीत. असो.
टेक्सासच्या क्राइमरेटचं स्टॅटिस्टिक्स इथे आहे. पावणेतीन कोटी लोकसंख्येमध्ये ८२३६ बलात्कार होतात. भारतात त्याच्या पंचेचाळीसपट लोकसंख्या आहे, आणि सुमारे चौपट बलात्कार होतात. म्हणजे दर लाख लोकांमागे १०पट कमी होतात भारतात! टेक्सासातल्या लोकांकडून काय ऐकून घेता भारतात कित्ती कित्ती क्राइम आहे म्हणून!!
आता यानंतर तुम्ही सांगाल कदाचित की हे सॅन अॅंटोनियो स्पेनमध्ये आहे वगैरे...
15 Jan 2016 - 3:04 am | सायकलस्वार
बुलशिट अलर्ट!! भारतात जेवढे बलात्कार होतात त्यातले फक्त दहा टक्के रिपोर्ट होतात, हे आत्तापर्यंत अनेक वेळा वाचलेलं आहे.
बाकी चालू द्या.
15 Jan 2016 - 4:26 am | राजेश घासकडवी
मान्य, पण टेक्सासमध्ये तरी शंभर टक्के रिपोर्ट होतात का? सर्वसाधारणपणे २/३ बलात्कार अमेरिकेतही रिपोर्ट होत नाहीत. म्हणजे तुमचे ९० टक्के खरे धरले तरी टेक्सासमध्ये दरडोई भारताच्या तिप्पट बलात्कार होतातच.
या सगळ्या मुद्द्यांतून 'हॅं, बलात्कार काय, सगळीकडेच होतात, त्यात काय एवढं?' असं म्हणायचं नाहीये. बलात्कार हा गंभीरच मुद्दा आहे. मात्र जिथे तिप्पट बलात्कार होतात त्या लोकांकडून 'तुमच्या भारतात का हो इतके बलात्कार होतात?' असं ऐकून घेऊ नये. किंवा त्यांचा आदर्श ठेवून त्यांच्याप्रमाणे आपण वागावं असंही म्हणू नये. बलात्काराचा प्रश्न सोडवण्यासाठी जे काय करायचं ते करायलाच हवं. पण अशा आकडेवारीबाबत दूध का दूध और पानी का पानी व्हायलाच हवं.
एकंदरीत असं दिसतं की हा परसेप्शनचा प्रश्न आहे. बलात्कार किती होतात, आणि ते किती गंभीरपणे रिपोर्ट होतात हे संस्कृतीनुरुप बदलतं. पण जर परसेप्शन्सचाच विचार करायचा असेल तरीही आपल्या परसेप्शन्स योग्य आहेत का हे तपासून पाहायला हवं.
या संपूर्ण लेखात त्यांच्या एसएमध्ये कसं सुखद वातावरण आहे, तेव्हा चला आपण त्यांच्यासारखं वागूया असा संदेश जाणवतो. तिथे आपल्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतलं की मग त्यांचं अनुकरण करण्याची गरज आहे का असा प्रश्न उद्भवणं साहजिकच आहे.
15 Jan 2016 - 12:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे ते मुंब्र्याच्या डोंगरापलिकडचं ना, पारसिकच्या शेजारच्या डोंगरांवर नवीन तयार होतंय, तेच ना?
आपली नम्र,
एक माजी ठाणेकर.
14 Jan 2016 - 2:03 am | प्रभाकर पेठकर
पाश्चिमात्य देशांमधल्या अपराधांवर (बलात्कार, खून इ.इ.) एक आख्खा चॅनल (Investigation Discovery) चालतो.
14 Jan 2016 - 3:01 am | डॉ सुहास म्हात्रे
"मिपावर जगभरच्या घडामोडी वाचणारे आणि त्यावर सारासार विचार करणारे वाचक-सभासद आहेत" या वास्तवाचा गोग्गोड विसर पडल्यानेच लिहीलेला लेख दिसतो आहे. मात्र धागा लेखक SA, TX मध्ये राहतो हे मात्र कळले ;)
हँ, काय हे ! इतका ज्वलंत विषय, पण इतका एकांगीपणे आणि सिंप्लिस्टिक प्रकारे मांडलाय की तो वादग्रस्त तर नाहीच पण धड विनोदीही झालेला नाही ;) :)
"बडवला कीबोर्ड आणि लिहिला टीआर्पी इच्छूक लेख" अशी म्हण मनात आली, पण जौंदे =))
आता सद्य परिस्थितीबद्दल थोडे (जालावरून साभार) :
१. Crime rates for San Antonio, TX
या वरच्या दुव्यातील एक भाग :
With a crime rate of 60 per one thousand residents, San Antonio has one of the highest crime rates in America compared to all communities of all sizes - from the smallest towns to the very largest cities. One's chance of becoming a victim of either violent or property crime here is one in 17. Within Texas, more than 97% of the communities have a lower crime rate than San Antonio.
Importantly, when you compare San Antonio to other communities of similar population, then San Antonio crime rate (violent and property crimes combined) is quite a bit higher than average. Regardless of how San Antonio does relative to all communities in America of all sizes, when NeighborhoodScout compared it to communities of similar population size, its crime rate per thousand residents stands out as higher than most.
The crime data that NeighborhoodScout used for this analysis are the seven offenses from the uniform crime reports, collected by the FBI from 17,000 local law enforcement agencies, and include both violent and property crimes, combined.
Now let us turn to take a look at how San Antonio does for violent crimes specifically, and then how it does for property crimes. This is important because the overall crime rate can be further illuminated by understanding if violent crime or property crimes (or both) are the major contributors to the general rate of crime in San Antonio.
For San Antonio, we found that the violent crime rate is one of the highest in the nation, across communities of all sizes (both large and small). Violent offenses tracked included rape, murder and non-negligent manslaughter, armed robbery, and aggravated assault, including assault with a deadly weapon. According to NeighborhoodScout's analysis of FBI reported crime data, your chance of becoming a victim of one of these crimes in San Antonio is one in 186.
In addition, NeighborhoodScout found that a lot of the crime that takes place in San Antonio is property crime. Property crimes that are tracked for this analysis are burglary, larceny over fifty dollars, motor vehicle theft, and arson. In San Antonio, your chance of becoming a victim of a property crime is one in 18, which is a rate of 54 per one thousand population.
Importantly, we found that San Antonio has one of the highest rates of motor vehicle theft in the nation according to our analysis of FBI crime data. This is compared to communities of all sizes, from the smallest to the largest. In fact, your chance of getting your car stolen if you live in San Antonio is one in 201.
२. Troubling data: Rapes on the rise in San Antonio
यातले सुरुवातीचे वाक्यः
The numbers show violent crimes in San Antonio are on the rise, and the number of rapes reported in the Alamo City are higher than any other major Texas city.
३. जालावर San Antonio आणि crime किंवा sex crime हे शब्द वापरून सहज विचारणा केली तर वाचायला दिवस पुरणार नाही इतके दुवे सापडले !!! लेखक स्वतः पाहून आपली खात्री व ज्ञानवर्धन करू शकतो :)
14 Jan 2016 - 11:15 am | अविनाश लोंढे.
कपाळावर हात मारायची स्मायली शोधायला हवी. अहो, सॅन अॅंटोनियो तुम्हाला SA म्हणून माहीत असेल, पण जगाला नाही माहीत. असो.
San Antonio is a popular tourist destination, often referred to simply as SA. (source- Wikipedia)
14 Jan 2016 - 11:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
@ अविनाश लोंढे.
सर्वसाधारण कन्व्हेन्शन्प्रमाणे केवळ SA लिहिल्यास ते "साऊथ ऑस्ट्रेलिया" या ऑस्ट्रेलियातील एका राज्याचे अब्रविएशन होते. जालावर फक्त SA टंकून खात्री करावी.
***************
आता अमेरिकन शहराच्या नावांचीच गोष्ट काढलीत तर अमेरिकन शहरांची नावे कशी लिहितात याबाबत थोडा अभ्यास वाढवावा असे सुचवतो :)
अमेरिकेत खालील "San Antonio" नावाची शहरे आहेत (अधिकही असू शकतात) :
San Antonio, TX (pop. 1,409,019)
San Antonio, FL (pop. 1,181)
San Antonio, NM (pop. 165)
अमेरिकन पद्धतीप्रमाणे शहराचे नाव सहसा पूर्ण लिहीतात (ते शहर फारच प्रसिद्ध असले तर कदाचित् त्याच्या नावाचे अब्रविएशन चालू शकते, उदा NYC), आणि प्रत्येक शहराच्या नावापुढे ते शहर ज्या राज्यात आहे त्याचे अब्रविएशन जरूर असते (उदा NYC, NY).
कारण, अमेरिकेत एकाच नावाची अनेक शहरे असणे फार नेहमीचे आहे.
उदाहरणार्थ :
क्रमांक...शहराचे नाव (त्या नावाच्या अमेरिकेतील एकूण शहरांचा US Postal Service ने दिलेला आकडा)
1 Springfield (41)
2 Washington (32)
3 Franklin (35)
4 Greenville (30)
5 Bristol (29)
6 Clinton (29)
7 Fairview (27)
8 Salem (26)
9 Madison (24)
10 Georgetown (23)
11 Ashland (22)
12 Oxford (22)
13 Arlington (22)
14 Jackson (21)
15 Burlington (21)
16 Manchester (21)
17 Milton (21)
18 Newport (20)
19 Auburn (19)
20 Centerville (19)
21 Clayton (19)
22 Dayton (19)
23 Lexington (19)
24 Milford (19)
25 Winchester (19)
26 Cleveland (18)
27 Hudson (18)
28 Kingston (18)
29 Mount Vernon (19)
30 Oakland (19)
31 Riverside (18)
32 Dover (22)
***************
एक मात्र खरे की, अगोदर दिलेले San Antonio, TX मधिल गुन्ह्यांचे ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स पाहता, तुमच्या लेखातले गुन्ह्यांबद्दलचे दावे टेक्सास (TX) मधल्या San Antonio पेक्षा फ्लोरिडा (FL) किंवा न्यु मेक्सिको (NM) मधिल San Antonio मधले असावेत असेच दिसते आहे :)
14 Jan 2016 - 11:27 am | अविनाश लोंढे.
all references on crime - agree .
("बडवला कीबोर्ड आणि लिहिला टीआर्पी इच्छूक लेख" अशी म्हण मनात आली, पण जौंदे =))
काहीतरी type करण्यासाठी keyboard बडवावा लागणारच की , आत्ता तुम्ही mouse ने type करत असाल तर देव जाने … असो
मनातील विचार मांडताना जसे आले तसे मांडतो , मग त्याचा विनोद होईल ओर आणी काही , हू केअर्स …!!!
-
14 Jan 2016 - 11:41 am | चांदणे संदीप
साऊथ आफ्रिकेवालाच SA सर्वांना वाटू द्येला अस्ता तरी चाल्ले अस्ते. हे टेक्सासवालं SA म्हणजे..... काहीतरीच!
14 Jan 2016 - 11:59 am | बोका-ए-आझम
जर तुम्ही हा लेख लिहिलाय आणि अमेरिका किंवा तिथलं एक ठिकाण आणि भारत यांची तुलना करून लिहिलाय तर त्यावरून तुम्हाला हा मुद्दा इथे महत्वाचा वाटतोय हा निष्कर्ष निघतो. असं असताना तुम्ही हू केअर्स अशी भाषा वापरणं आणि त्याचा विनोद होईल किंवा आणखी काही, मला फरक पडत नाही (ध्वनित अर्थ) असं म्हणणं हे परस्परविसंगत आहे.
20 Feb 2016 - 3:38 am | अविनाश लोंढे.
हु केअर्स about अमेरिका …… लेख भारतावर आहे अन महिलांच्या सुरेक्षाबाबत
15 Jan 2016 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे
मनातील विचार मांडताना जसे आले तसे मांडतो , मग त्याचा विनोद होईल ओर आणी काही , हू केअर्स …!!!
लोंढे साहेब,
हे एखाद्या बिनमहत्वाच्या गोष्टीबाबतही जबाबदारीचे नाही, पण फारतर खपून जाण्यासारखे आहे.
पण, जेव्हा बलात्कारासारखा गंभीर विषय घेऊन एखाद्या व्यक्ती/समाज/देशासंबंधी नकारात्मक दावे केले जातात, तेव्हा ते जबाबदारीने विचार करून व सबळ पुराव्यांनीच करावेत असा सारासार विचाराचा दंडक आहे.
अश्या बाबतीत "मला वाटले ते मी लिहेन/बोलेन, दुसर्याला काय वाटले तर हू केअर्स" अशी वृत्ती (अटिट्युड) ठेवू नये. कारण मग कोणीही कोणत्याही गोष्टीबाबत (यात तुम्हाला महत्वाच्या वाटणार्या गोष्टीही येतात) "हू केअर्स" म्हणत बेजबाबदार विधाने करू शकेल... व एकंदरीत "डिसइन्फोर्मेशन केऑस" होईल, जो कोणाच्याच फायद्याचा नाही.
असो.
15 Jan 2016 - 11:40 am | मृत्युन्जय
पण मी काय म्हणतो की तुम्ही एसए ची तुलना करत आहात (जे की एक गाव आहे पुर्ण देश नाही) तर मग तुलना पण संपुर्ण देशाशी न करता कवठे महांकाळ शी का नाही. तुम्ही छातीठोकपणे सांगु शकता की "अरे जाव आमच्या कवठे महांकाळ मध्ये तर गेल्या १० वर्षात एकही बलात्कार झालेला नाही". वर भारतीय संस्कृतीचे गोडवे गाउन हे सुद्धा सांगा की कवठे महांकाळ च्या ज्ञात वर्तमानानुसार तेथील मुली लग्नाशिवाय परपुरुषाला शिवतही नाहित. लग्नापर्यंत वाट पाहतात then why are people in your SA so hungry for sex? Why? Why cant they just wait till they get married?
20 Feb 2016 - 3:42 am | अविनाश लोंढे.
धन्यवाद
20 Feb 2016 - 3:48 am | अविनाश लोंढे.
कवठे महांकाळ सांगलीच का कि दुसर कुठलं ?
14 Jan 2016 - 12:14 pm | वेल्लाभट
व्याकरणाच्या चुका सोडून देतो
आधीचे प्रतिसाद सोडून देतो
बाकी लेखातल्या मुद्द्यांशी पूर्ण सहमत. माझ्या मित्रालाही सिंगापूर मधे असा प्रश्न केला होता एका सहकर्मचा-याने. व्हाय कान्ट दे जस्ट गिव मनी अँड डू सेक्स? व्हाय रेप?
आपल्या संस्कृतीने घालून दिलेली स्त्री-पुरुष विषमतेची चौकट हे एक मुख्य कारण आहे ज्यामुळे अज्ञान - कुतुहल - वासना - गुन्हा असा एका भावनेचा प्रवास होतो आणि हे प्रकार घडतात.
पण ही लाज वाटण्यासारखी बाब आहे की देशात कॅमेरे लावणं, पोलिस ठेवणं, आरक्षणं देणं, असले प्रकार महिला सुरक्षेसाठी करायची वेळ येते. तुमच्या इंटेग्रिटीचा अपमान आहे. पण सुक्याबरोबर ओलंही जळतंच त्यामुळे भारत हा बलात्का-यांचा देश अशी भारताची ओळख भविष्यात जगभरात झाली तरी नवल नसावं.
14 Jan 2016 - 12:30 pm | बोका-ए-आझम
आपली rapist country म्हणून बाहेर ओळख निर्माण होतेय >> कशी काय? वरती दिलेलं statistics हे दक्षिण आफ्रिकेत भारतापेक्षा जास्त बलात्कार होत असल्याचं दाखवतंय.
शिवाय भारतात बलात्काराच्या बातम्या येतात याचा एक अर्थ हाही आहे की गुन्हे नोंदवले जाताहेत आणि ही वाईट गोष्ट कशी काय? घडलेला गुन्हा दडपणं ही जास्त वाईट गोष्ट नाही का? तुमच्या या लेखामागचा हेतू चांगला असेल पण तो मुद्दा नीट पोचलेला नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय.
14 Jan 2016 - 4:07 pm | उगा काहितरीच
मेबी तपशीलात चुका असतील , पण लेखकाच्या भावना पोचल्या . खरंच आपलं काहितरी चुकत आहे असं नाही का वाटत ?
14 Jan 2016 - 8:59 pm | फेरफटका
लेखकाच्या SA वरून केलेली टीका, व्याकरणाच्या चुका ह्या पलिकडे जाऊन बघायचं तर मुद्दा बरोबर आहे. आणी प्रतिसादातले 'तिकडे तसं आहे, अमेरिकेत, द. अफ्रिकेत असं आहे' वगैरे प्रकार म्हणजे दीवार मधल्या 'जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ' सारखं लॉजिक आहे. स्टॅटिस्टीक्स वगैरे जाऊ द्या, पण स्त्रीयांची सुरक्षा (ह्यात अगदी बलात्कार वगैरे फार लांब राहीले, पण गर्दीतले धक्के, नजरा, रोडरोमिओंच्या कॉमेंट्स, मंगळसुत्र चोर्या वगैरे) भारतात किती 'जाणवते, हा कळीचा मुद्दा आहे. मध्यंतरी प्रवासात, एक रात्र दिल्ली ला रहावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर घरातल्या सगळ्या स्त्रीयांनी जोरदार विरोध केला होता. पहाटेचं विमान पकडू पण दिल्ली चा एअरपोर्ट सोडून बाहेर येणार नाही असा सगळ्यांचा सूर होता. हे देशाच्या राजधानी बद्दल सामान्य नागरिकाचं मत आहे. उगाच denial mode मधे रहाण्यात काय अर्थ आहे?
15 Jan 2016 - 12:14 am | डॉ सुहास म्हात्रे
साहेब त्यांचे "तिकडच्या व इकडच्या परिस्थितीबद्दलचे तुलनात्मक दावे" म्हणजे केवळ कपोलकल्पीत (फिक्शन) आहेत ! त्यांना सत्य / सबळ आधार नाही :(
कल्पनेच्या भरार्या न मारता व चुकीची तुलना न करता, सरळ सरळ इथल्या समस्या मांडल्या असत्या तर मला वाटत नाही की विरोध झाला असता. मग चर्चा सकारात्मक राहिली असती.
हे अजून एक उदाहरण, जे सिद्ध करते की, आपला मुद्दा ठासून सांगण्याच्या भरात चुकीचे / कपोलकल्पित दावे केल्याने आपला मूळ मुद्दाच भरकटतो / पराभूत होतो !
15 Jan 2016 - 1:52 am | फेरफटका
तुमचा मुद्दा योग्य आहे.
20 Feb 2016 - 3:45 am | अविनाश लोंढे.
दुसऱ्यांच सोडा , इथं आपला विषय आहे ! ज्या दिवशी हे रसातळाला जाईल तेव्हा कळेल …
20 Feb 2016 - 7:32 am | अर्धवटराव
बाकी काहिही म्हणा.. पण ते "पराभूत होतो !" वगैरे शब्द वापरु नका. काहि जुन्या आठवणींनी धडकी भरवतो हा शब्द :ड
15 Jan 2016 - 7:15 pm | अविनाश लोंढे.
लेखातील 'गर ' सोडून जर 'सालीचा 'ज्ञानरस' कन्हून कन्हून काढल्यावर रस फेकूनच द्यावा लागेल नाही का ? 'तुम्ही' वा 'मी' कीतीही ओरडलो तरी सत्य ते सत्य … उद्देश तुलना करण्याचा नव्हताच मुळी - होता तो आपल्या 'माता-भगिनींच्या' रक्षणाचा …. कसेय पटल तर घ्या. जर समजून घ्यायचे सगळेच दरवाजे बंद केले तर सत्य सुद्धा 'बाहेरून'च जाईल