जो जसा झाला तसा, पण खास झाला
शेवटी संपन्न हा वनवास झाला
पाप माझे राहिले शाबूत अवघे
पुण्यकर्माचा त्वरेने र्हास झाला
मी जरी अध्यात ना मध्यात होतो
केवढा दुनियेस माझा त्रास झाला
देव प्रत्यक्षात नाही पाहिला मी
पण मला दगडात त्याचा भास झाला
जीव कोठेही कधी रमलाच नाही
मग असा नुसताच टाइमपास झाला
डॉ.सुनील अहिरराव
प्रतिक्रिया
12 Jan 2016 - 4:34 pm | गवि
क्वचित मीटर किंचित डळमळीत आणि शेवटचं कडवं काहीसं विजोड.
एरवी कविता नेहमीप्रमाणे उत्तम.
14 Jan 2016 - 8:16 pm | अत्रुप्त आत्मा
+१
12 Jan 2016 - 8:10 pm | कानडाऊ योगेशु
मी जरी अध्यात ना मध्यात होतो
केवढा दुनियेस माझा त्रास झाला
हा शेर फार आवडला.
13 Jan 2016 - 7:44 pm | चांदणे संदीप
+१
13 Jan 2016 - 5:53 pm | drsunilahirrao
@गवि , कानडाऊ योगेशु
खूप खूप धन्यवाद !
14 Jan 2016 - 11:54 am | पैसा
कविता आवडली.
14 Jan 2016 - 6:12 pm | gsjendra
छान मांडली
14 Jan 2016 - 8:06 pm | सूड
आवडलं.