SLB चा बाजीराव-मस्तानी

वपाडाव's picture
वपाडाव in जनातलं, मनातलं
4 Jan 2016 - 4:59 pm

अगदी बालपणापासून चित्रपटाचे संस्कार प्यालेला असल्याने, लोकांनी कितीही चिखलफेक केली तरीही, SLB चा "बाजीराव-मस्तानी" पाहायला जाणार ह्यात काही तिळमात्रदेखील शंका नव्हती. पण काही इतर कामात व्यग्र असले कारणाने पंधरा दिवस लागले. एकतर चित्रपटाचा फ्यान अन त्यात प्रेमरंगमहर्षी SLB म्हणजे आनंदाला पारावर उरला नाही माझ्या. आजही रामलीला-देवदास थेटरात लागल्यास ५ वेळा पाहून यीन इतकं प्रेम केलंय ह्याच्या कलाकृतीवर.

(डिस्क्लेमर : आमचा इतिहास SLB पेक्षाही कच्चा आहे, कृपया आम्ही बोललेल्यात/लिहिलेल्यात काही ऐतिहासिक/तार्किक संबंध लागले नाहीत तर फासावर लटकवू नये.)

तर भव्य हा शब्द जणू SLB साठीच बनवला आहे ह्या(च) समजात जगणारा माणूस मी. अशीच एका भव्य दरबारात सुरवात होते कथानकाची. पुढला पेशवा ठरवण्यासाठी. अप्रतिम संवाद, घटना अन चित्रीकरण यांचा मिलाफ घडवून आणलाय. त्यात बाजीरावाची मुहूर्तमेढ निश्चित तर होतेच पण तो किती खोलपर्यंत विचार करणारा व दृढनिश्चयी आहे ह्याची प्रचीती सुद्धा येते. पुढच्या वाटचालीत मस्तानी-बाजीरावाची भेट अन त्यानंतरच्या लढाईतले बाजीरावाचे वेगवान निर्णय, हालचाली व त्यांची अंमलबजावणी, तसेच शत्रूला विचार करू न देता हल्ला घडवून त्याची दैना हे अगदी परिणामकारक रीतीने दाखविलेले आहे. इथे त्यांची (BM) एकमेकासोबत जी गुंफण होते तिच्या जोरावर मस्तानी अखंड आयुष्यभर अव्याहतपणे बाजीरावावर निर्व्याज प्रेम करायला तयार होते.

हे सगळ घडता-घडता अर्धा-पाऊण तास कुठे निघून जातो काही समजत नाही. आता सुरु होते एका योध्याच्या प्रेमाची फरफट. मस्तानीची बोळवण. चिमाजी-आईसाहेबांचा मस्तानी तिरस्कार खेळ. इथेच बाजीराव हरला अन SLB सुद्धा.

BM एकमेकात गुंतत जातात, काशीकडे दुर्लक्ष होते असं दाखवण्याऐवजी अर्धा-अधिक वेळ कौटुंबिक/भावनिक कारस्थान दाखवण्यात खर्ची घातला आहे असं वाटत राहत. ती कथेची गरज आहे हे जरी मान्य असलं तरीही कथा सैल होत जाते. नाही म्हणायला ब्राह्मणभोज - नामकरण - मस्तानी हमला वेग्रे प्रेक्षकाला हरवू देत नाहीत.

काही प्रसंग फारच लक्षवेधी किंवा चित्तथरारक आहेत. जसे भर वादळात नाव घेऊन मस्तानीला भेटायला जाणे. चिमाजीअप्पा-बाजीरावाचा मस्तानीवरून कचेरीत झालेला वाद. मस्तानीला नर्तकी बोलणाऱ्या सेवकाची कानउघडणी. पंतप्रतीनिधींची तलवारीने तसेच जिव्हेच्या धारेने माळ कापणे. निजामभेट तर विशेष. तिथले दोहोंचे संवाद अन त्यात आवाजाची जरब असलेला रजा मुराद तर चौदवीका चांद. त्यालाही फिका पाडलाय रणवीरने.

पण तद्नंतर लागलीच मल्हारी गाण्याची गरज नव्हतीच. नपेक्षा ते अस्थानी आहे. तसेच पिंगासुद्धा. इतका भावनिक प्रसंग (काशीबाई अन मस्तानीचं बाजीरावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करण) सुंदररित्या हाताळून नंतर त्यादोघींनी एकत्र फेर धरला असता तर ठीक. पण त्या उंच मस्तानीला लुगड काही शोभत नाही. त्यावर त्यांचा ड्यांस जरा अतीच. म्हणजे पेशव्यांच्या बायका नाचत असोत व नसोत. हा भाग अलाहिदा. पण "डोला रे डोला"ची पुनरावृत्ती करणे टाळू शकले असते. शेवट थोडा 'कल-हो-न-हो' प्रमाणे लांबवत नेला आहे असे वाटते. पण त्यातही दोघांची आर्त साद ऐकू येत राहते.

असो. इतिहास म्हणून तर पहायला जाणारच नव्हतो कारण गोवारीकर अन SLB ह्यांच्यामधलं अंतर संपलं नसत का? पर्वा आलो होतो अन बोर्डावर धागापण पाहिला सोत्रिचा. पण दुसर्याचे विचार घेऊन थेटरात नाही जात मी. काल पाहून आलो आणि आज तो वाचला. मी अगदीच विरोधात आहे असं नाही पण बर झालं मी तो धागा न वाचता सिनेमा पाहून आलो. अन्यथा विचार पूर्वग्रहदुषित झाले असते.

पण एक फ्यान म्हणून माझ्या ज्या अपेक्षा होत्या, BM चं हळूवार फुलत जाणारं प्रेम, त्यांचा विरह अन शेवटी मनोमिलन. त्या काही सिनेमात दिसल्या नाहीत. ती सिझलिंग केमिस्ट्री (???) काही जमून आली नाही. पण कथेचा आवाका खूप मोठा असल्याने SLB ला बरंच आवरत घ्यावं लागलंय.

चित्रपटाच्या जमेच्या बाजू :

१- रणवीरचा अभिनय. (१ गुण)
२- प्रियांका-दीपिका-मिलिंद-वैभव-तन्वी ह्यांचा अभिनय (१ गुण)
३- SLB चे प्रसंग सादरीकरण/चित्रीकरण अन सेटची भव्यता/नाजूकता/अचूकता व संवाद (१ गुण)

असे एकंदरीत पाचपैकी तीन गुण (३/५)

-
SLB कडून याहीपेक्षा उत्कट प्रेमाच्या गुंतागुंतीची साकारणी, रंगाची उधळण व चितरकथेच्या अपेक्षेत असलेला डाय हार्ड SLB फ्यान.

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

वप्या (एकदाचा) लिहिता झाला. ;)

ओह माय माय, कोण लिहीतंय बघा!! लेख नंतर सवडीनं वाचेन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2016 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर BM वर आलेली परिक्षणं माझी वाचायची राहुन जाऊ नये म्हणुन आपलंही लेखन वाचलं.

परिक्षण ठीक. +१ गुण.
चित्रपटातील जमेच्या बाजू सांगितल्या नाहीत. - १ गुण.
चित्रपटातील उणिवा व्यवस्थित आल्या नाहीत. - १ गुण.
चित्रपट चांगला की वाईट परिक्षणातून पोहचत नाही. - १ गुण

एकुण परिक्षण चार पैकी एक गुण.

पुलेशु.

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Jan 2016 - 7:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुम्हाला गुण कापल्याशिवाय चैन पडत नै का हो प्रा.डॉ. =)) =)) =)) (ह.घ्या.हे.वे.सां.न.ल.)

(प्रा.डॉं.चा नाठाळ 'विद्या'र्थी) कॅजॅस्पॅ!!

नाखु's picture

5 Jan 2016 - 8:44 am | नाखु

मुल्यांकन पद्धत आवडली, आणि समोर आलेला प्रत्येक पेपर हातावेगळा करण्याची हातोटीही अनुकरणीय.

बिरुटेसरांचा बहि:स्थ विद्यार्थी नाखु...

वपाडाव's picture

5 Jan 2016 - 10:01 am | वपाडाव

बिरुटे सर, सर्वप्रथम आभार.

सिनेमाचं नाव BM अन त्याची tagline - Love Story Of A Warrior

असं असल्यावर चित्रपट त्या दोहोंच्या प्रेमाच्या(च) अवती-भवती फिरणारा असेल हे गृहीत धरले आहे. पण ह्या ऐवजी द्वेष-तिरस्कार-कपट या भोवती कथानक फिरत राहत. ते जरा खटकत. त्याचं प्रेम फुलवणारे प्रसंग तोकडेच आहेत. आणि हे लेखात उद्धृत देखील केले आहे.

चित्रपटाच्या जमेच्या बाजू लिहिल्या आहेतंच. त्या तुमच्या निदर्शनास कशा आल्या नाहीत हे कळाले नाही.

आणि एक फ्यान ह्या नात्याने लिहिलेले परीक्षण आहे ते. मी माझ्या बुद्धीला अन विचारांना जशी अपेक्षा होती ते लिहिले आहे. गुणांकन सुद्धा त्याच प्रकारे केलेलं आहे.

चित्रपट चांगला की वाईट हे मी ठरवू शकत नाही. कारण ती त्या दिग्दर्शकाने अपार मेहनत घेऊन प्रसवलेले अपत्य असते. कथानक त्याच्या परीने गुंफलेले/फुलवलेले असते. माझ्या दृष्टीने सिनेमात काय असायला हवे होते हे सांगून झाले आहे. हे वाचून सिनेमा पहावा की नाही तो वाचकाचा अंतिम निर्णय असेल. पाहू नका म्हणून किंवा पहा म्हणून माझे विचार मी त्यांवर लादू शकत नाही.

आपलं शंका निरसन झालं असेल अशी अपेक्षा करतो.

मोहनराव's picture

4 Jan 2016 - 6:50 pm | मोहनराव

वा.. सवड मिळाली? स्वागतम!!

अरे वा, बर्‍याच दिवसांनी आलात म्हणायचं!

काय म्हणतोस वपा? कसा आहेस? लै दिसांनी येणं केलंस.

सतिश गावडे's picture

5 Jan 2016 - 12:00 am | सतिश गावडे

दिलवालेच्याऐवजी चक्क बामचे परिक्षण?

प्रचेतस's picture

5 Jan 2016 - 7:26 am | प्रचेतस

हा ना राव.
कुठे रणवीर कुठे शारुक.

वपाडाव's picture

6 Jan 2016 - 2:19 pm | वपाडाव

तद्दन फालतू, गल्लाभरू अन रद्दड सिनेमे न बघण्याचा संकल्प केला आहे.
सलमान, शारूक अन आमीर हे तिघेही त्या नावेत आहेत सध्या.
तरीही सलमान भाइंनी बजरंगी भाईजान हा सिनेमा करून सर्वांना धक्का दिला आहेच.

आणि वल्लीदा, रणवीर बघण्यासाठी मुळात गेलोच नव्हतो मी. SLB वरचं प्रेम होतं ते...

सतिश गावडे's picture

6 Jan 2016 - 11:00 pm | सतिश गावडे

तद्दन फालतू, गल्लाभरू अन रद्दड सिनेमे न बघण्याचा संकल्प केला आहे.

ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन असलेले मित्र असले की निर्मात्याचा गल्ला न भरताही चित्रपट पाहता येतात.

इरसाल's picture

5 Jan 2016 - 11:18 am | इरसाल

कुठी होता बे वप्या ?

मी-सौरभ's picture

5 Jan 2016 - 6:50 pm | मी-सौरभ

बायको गेली माहेरी अन् वप्याशेट आले मिपावरी ;)

पद्मावति's picture

6 Jan 2016 - 10:39 pm | पद्मावति

आताच बघून आले. मला आवडला चित्रपट. सेट्स, कॉस्ट्यूम्स तर बघत राहावे असे आहेत. प्रियंका चोप्रा अप्रतिम दिसते. चित्रपटभर आणि त्यानंतरही फक्त तीच दिसते आणि लक्षात राहते. रणवीर सिंग चांगला आहे, पण अज़ून चांगला अभिनय करू शकला असता. गाणी दोन चार कमी केली असती तर बरं झालं असतं. एकूण चित्रपट वन टाइम मस्ट वॉच! एकेकाळचा सुपर मॉडेल मिलिंद सोमणला पंतांच्या भूमिकेत बघून गंमत वाटली. त्याने छान काम केलंय.

DP अन PC दोघींना स्क्रीनस्पेस हवा तेवढा मिळाला नाहीये.
पण त्यातसुद्धा PC वरचढ ठरते हे तंतोतंत खरे आहे.
धाग्याच्या विषयाला अनुसरून आणि सच्चेपणाने प्रतिक्रिया दिल्यामुळे आभारी आहे.

संदीप डांगे's picture

8 Jan 2016 - 12:13 pm | संदीप डांगे

चित्रपट बघितला. सविस्तर नंतर कधी. तुर्तास इतकेच की चित्रपटाचे नाव 'काशीबाई' असायला हवे होते. कारण चित्रपट काशीभोवती फिरतो असे वाटते.