थर्टीपस्ट नाईट २००७

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in जनातलं, मनातलं
31 Dec 2008 - 9:32 pm

थर्टीपस्ट नाईट
कदीची वाट बगत होतू ह्या दीवसाची.
रम्या, सूर्‍या, म्हादेव न मी चौगांनी पक्का बेत ठरवलावता.सगली तयारी केलती. बॅगपायपरचे दोन खंबे,चाकन्याला अंडी, शेंगदाने,स्टार्,बॉईल चना आनुन ठीवल व्हत.बारक्याला मटन आनाला पाटवला. सूर्‍याच्या शेतात बरूबर सात वाजता जमाच ठरल होत. अंगात येगलाच वारा येत व्हता.

संद्याकाली साडेसा ला सूर्‍याची शीटी आली. मी भायेर नींगालू. शेतात पोचलु. रम्या न म्हादेव वाटच बगीत व्हते.
आमाला बगीतल्या बगीतल्या
'थर्टीपस्ट नाईट येन्जाय ~~~' रम्यान बोंब ठोकली.
आर कूट होता र आवरा टाईम ? कती वाट बगाची तूमची ? म्हादेव ला धीर नीगना
आवर्‍यात बारक्या गरमागरम मटन न भाकरी झेऊन आला.
'चला चला र स्टार्ट करूया' रम्यान गलासं काडली.

पाचव जनांचे पेग भरले, यकमेकांवर आपटले.
'चेआर्स !' पयला घोट मन भरुन झेतला. चार चार करत जालत दारू आन गेली.
गप्पा सूरू झाल्या. आख्ये शेतान आमचे आमीच, कोनाचा तरास नाय न काय नाय.

साली येक मातर गंमत हाय. दारू लोकांना जवल बी आनती न पार दुश्मनी बी करवती.
रम्या न सूर्‍याचा छ्त्तीस चा आकडा पन आज दोगव यकत्र बसलेवते.

'तुला म्हायती र मीथन्या ह्यो माज्या भावासारका हाय.' रम्यान सुर्‍याचे गल्यान हात टाकला
'म्हुन माजे बा ला शीव्या दील्ल्या व्हत्या क र ?' सूर्‍या
'आरे गपा भ्**नो. मजा कराव आल का मारामारी र' मी समझवला
'त्या शेट्टी आन्नान जाम खून्नस दिलता र परवा' म्हादेव
'माराचा क बोल. माराचा क बोल ? आत्ता कोयता आनत बोल.' बारक्या
'आर बस ,र बस'
'बस कना बस कना ? म्हादेव ला खुन्नस दीलेला मना खपाचा नाय !' बारक्या चीतालला
'आज मी जो क हाय तो म्हादेव हाय म्हनून '
'आर आसा काय झाटलीमन लागुन गेलास र तू ? साला म्हैन्याचे शेवटी लो़कांकडे पैशे मागत फीरतस.'
'मिथ्नन्या पैसा क रां* पन कमवते. आपून ईज्जतीत जगतो बोल.'
'ज्याआयला कसली ईज्जत र ? लोकांकड पैशे मागतस क ईज्जत ?'
सगली हसाला लागली.
आस सगल चाल्लवत. दोनी खंबे रीकामे झाल्ते. रात त सरली नव्हती.
'मना आजुन हवी.' म्हादेव टाईट
'आर आता कुट मीलाची येवड्या राती ?'
'मी आन्तय. देशी चालल क ?' बारक्या
'आन कुडची बी पन मना आता दारु पायजेल' म्हादेव आयकना
बारक्या गेला भेलकांडत न शेट्टीआन्नाकडशी हातभट्टीची दोन बाटल्या हानल्या

'तूमीच पीवा बाबांनो, आमाला हातभट्टीची नको, आदिच जाम झालीय' मी न सूर्‍या बोल्लो, रम्याबी नाय म्हन्ला
दोनी बाटल्या म्हादेव न बारक्यानी संपवल्या.

सगली आवराआवरी करनार येवड्यान बारक्यान ऑक्क्नन ऊल्टी केली.
म्हादेव म्हन्ला 'मना कई दीस नाय रं'
सुर्‍या त्याचे जवल गेला त त्याचे डोल्यातून रगत येत व्हत. आमी पार घाबरलो, खाडकन ऊतरली आमची
तसाच दोगांना उचालले न पनवेला हास्पीटला त नेलं. तीत त ही गर्दी. आखा गाव लोटलावता. शेट्टीआन्नान मिथेल टाकून दारू वाडवली व्हती .
घरटी यक तरी मानूस ऍड्मीट व्हता.
बारक्या म्हादेव दोगव गेले.
बत्तीस मान्स मेली. आख्या गावच मशान झाल वत. येंन्जोय करन्याचे नादान आमी पार बरबाद झालो व्हतो.

आज थर्टीपस्ट नाईट
बारक्या न म्हादेव ची लय आटवन येतय रं.
मी आनी सूर्‍या गप बसलोय. शांत शांत.

देवा म्हाराज्या ऊद्या आशी वंगाळ बातमी नको रे देऊ. तूजे पाया पडतय बग.

मिथुन काशीनाथ भोइर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

धोरणविचार

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

31 Dec 2008 - 9:36 pm | सखाराम_गटणे™

>>'तूमीच पीवा बाबांनो, आमाला हातभट्टीची नको, आदिच जाम झालीय' मी न सूर्‍या बोल्लो, रम्याबी नाय म्हन्ला
जबरा

>>'चला चला र स्टार्ट करूया' रम्यान गलासं काडली.
आम्ही पण स्टार्ट करतोच्च आता.

>>शेट्टीआन्नान मिथेल टाकून दारू वाडवली व्हती .

बेक्कार, नको ते असले दिवस

बिरीटीश हा चांगला लिहीतो आहे. असा लिहीत रहा

----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Dec 2008 - 9:37 pm | बिपिन कार्यकर्ते

मिथन्या, गपकन् फिरवलीस गोष्ट रे!!! तुझ्या प्रार्थनेत सहभागी.

बिपिन कार्यकर्ते

अनामिक's picture

31 Dec 2008 - 9:47 pm | अनामिक

असेच म्हणतो.

अनामिक

नंदन's picture

1 Jan 2009 - 12:54 am | नंदन
घाटावरचे भट's picture

1 Jan 2009 - 3:17 am | घाटावरचे भट

सहमत आहे.

टारझन's picture

1 Jan 2009 - 10:05 am | टारझन

असेच म्हणतो

- टारझन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jan 2009 - 10:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरंच असं व्हायला नको.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

प्राजु's picture

31 Dec 2008 - 9:52 pm | प्राजु

कथा एकदमच ट्वीस्ट केलीस रे... बापरे!
छान लिहिलं आहेस..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

31 Dec 2008 - 10:09 pm | मदनबाण

बाल्या लयं वाईट वाटल रं !!!

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

भडकमकर मास्तर's picture

31 Dec 2008 - 10:15 pm | भडकमकर मास्तर

संदेश जालिम आहे....
:)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

शितल's picture

31 Dec 2008 - 10:25 pm | शितल

शेवट वाचुन धक्काच बसला. :(
>>देवा म्हाराज्या ऊद्या आशी वंगाळ बातमी नको रे देऊ. तूजे पाया पडतय बग.
खर आहे.

भिडू's picture

31 Dec 2008 - 10:31 pm | भिडू

>>'तुला म्हायती र मीथन्या ह्यो माज्या भावासारका हाय.' रम्यान सुर्‍याचे गल्यान हात टाकला
प्यायला बसले को असले वाक्य निघतेच कोणाच्या ना कोणाच्या तोंडातुन. हा माझा लहान भाउ,हा माझ्या मोठया भावा सारखा आहे ईत्यादि ईत्यादि.

भास्कर केन्डे's picture

31 Dec 2008 - 10:58 pm | भास्कर केन्डे

मथुन भौ, तुमची कथा वाचायला घेतली की हसत हसत लोळायचे हा नियम आज मोडित काढला तुम्ही. पण लेखन तेवढ्याच ताकदीचं झालय. हस्यकल्लोळा ऐवजी डोळ्याच्या कडा ओल्या केल्या.

बारक्या न म्हादेव ची लय आटवन येतय रं.
तुमच्या भावना समजू शकतात. शाळेत असताना माझा एक मित्र पोहायला गेला आणि खडकावर डोके आपटल्याने गेला... अशा आठवणी सुन्न करुन जातात.

पुन्हा अशी वेळ कोणावर न येवो हीच इश्वरचरणी प्रार्थणा.

आपला,
(खिन्न) भास्कर

अवलिया's picture

31 Dec 2008 - 11:09 pm | अवलिया

देवा म्हाराज्या ऊद्या आशी वंगाळ बातमी नको रे देऊ. तूजे पाया पडतय बग.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

धनंजय's picture

31 Dec 2008 - 11:19 pm | धनंजय

धक्कादायक.

(या बाल्याच्या कथा काळजी घेऊन वाचायला पाहिजेत. गुदगुल्या करता-करता पोटात गुद्दाच हाणला याने.)

प्रदीप's picture

1 Jan 2009 - 4:39 pm | प्रदीप

हेच म्हणतो.

ऋषिकेश's picture

1 Jan 2009 - 4:48 pm | ऋषिकेश

+२
अस्सेच म्हणतो

-(सहमत) ऋषिकेश

पक्या's picture

1 Jan 2009 - 12:31 am | पक्या

छान कथा . खुसखुशीत वाचताना एकदम इमोशनल क्लायमॅक्स ने आधीच्या कथांएवढी मजा आली नाही. पण कथा ओढून ताणून नव्हे तर आपसूकच एक चांगला संदेश देते ते आवडले.

baba's picture

1 Jan 2009 - 12:50 am | baba

मित्रा, काय लिवतोस रं... खल्लास..

..बाबा
सर्वा॑ना नविन वर्षाच्या शुभेच्छा

संदीप चित्रे's picture

1 Jan 2009 - 1:08 am | संदीप चित्रे

पार्टी रंगतेय रंगतेय म्हणताना एकदम चांगलाच धक्का दिला की राव...
संदेशही आवडला

सुनील's picture

1 Jan 2009 - 6:53 am | सुनील

काही वर्षांपूर्वी मुंबईत छाया बारमध्ये घडलेल्या गोष्टीची आठवण आली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

3 Jan 2009 - 10:57 am | विसोबा खेचर

काही वर्षांपूर्वी मुंबईत छाया बारमध्ये घडलेल्या गोष्टीची आठवण आली.

३१ डिसेंबर, १९९१. छाया बार. लायसन नंबर १०, फोर्जेट स्ट्रीट.

त्या काळात मी प्रभादेवीच्या जी एम ब्रुवरीज या देशी दारूच्या कंपनीत नोकरीला होतो. या छाया बारवाल्याने आमच्या जी एम च्या रिकाम्या बाटल्यांमध्ये विषारी गावठी दारू भरून विकल्यामुळे आमच्या कंपनीचे नांव उगाचंच वादात सापडले. अर्थात, आम्ही सरकारमान्य देशी दारू उत्पादक असल्यामुळे आमचा त्यात काहीच दोष नव्हता. कारण तेव्हा आम्ही मुंबईच्या जवळजवळ सातशे बारमध्ये दारू पुरवत होतो आणि अन्य कुठल्याच बारमध्ये असा कुठला प्रकार घडला नव्हता. ज्या रिकाम्या बाटल्या सापडल्या त्याच्या बॅचचे नमुने आमच्या विरार येथील कारखान्यातून तपासणीकरता मागवले गेले व आम्ही निर्दोष सिद्ध झालो. त्याच बॅचची दारू इतरही अनेक बारमध्ये पुरवली गेली तीही चांगली होती..

परंतु १ जानेवारी रोजी सकाळी काही काळ आमच्या प्रभादेवीच्या कार्यालयात मात्र उगाचंच टेन्शन निर्माण झाले.

त्या काळात फोरासरोडवरील रौशनीच्या चाळी शेजारच्या ज्या झमझम बारमध्ये मी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत नोकरी करत असे तिथेही आमचीच दारू पुरवली जायची!

असो.

आपला,
(देशी) तात्या.

विसोबा खेचर's picture

1 Jan 2009 - 8:54 am | विसोबा खेचर

हळवा शेवट..!

बाला, लै भारी लिवलंस बोल!

तात्या अहिरे,
दिवा गाव.

विनायक प्रभू's picture

1 Jan 2009 - 11:15 am | विनायक प्रभू

सहमत
विप्र्-ठाणे गाव

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jan 2009 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार

सुंदरच लिहिले आहे. शेवट एकदम धक्कादायक.
असेच लिहित रहा !

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jan 2009 - 3:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय लिवतंय रे बाल्या ! पोट धरुन हसवतो आन्
डोल्याला पाणीबी आणतं काय रे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लवंगी's picture

2 Jan 2009 - 12:23 am | लवंगी

दारू ( कुठल्याही प्रकरची ) वाइटच.. सोडून दया सर्वानी..

विसोबा खेचर's picture

2 Jan 2009 - 12:32 am | विसोबा खेचर

दारू ( कुठल्याही प्रकरची ) वाइटच..

असहमत! :)

आपला,
(स्कॉटलंडच्या सिंगलमाल्ट परिवारतला) तात्या.

लवंगी's picture

2 Jan 2009 - 12:56 am | लवंगी

दारुने भल्याभल्या माणसांची भूते झालेली पाहून या एका बाबतीत देवाने जरी येउन सांगीतले तरी आपल्या मतावर पक्की असणारी .. लवंगी

सुनील's picture

2 Jan 2009 - 9:47 am | सुनील

लवंगीताई,

तुमच्या मतावर ठाम रहाण्याचा तुम्हाला हक्क आहेच!

पण एक विचारू? जगात दारू पिणारे किती आणि त्यापैकी किती टक्के लोकांची भूते झालेली आहेत?

काही विदा आहे का?

सुनील तळीराम

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Jan 2009 - 11:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फटाक्यांच्या दारूचं काय? ;-)

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

सुनील's picture

2 Jan 2009 - 11:09 am | सुनील

फटाक्याच्या दारूचं काय माहित नाय बॉ पण फटाकड्यांच्या हातून दारू पिताना भले भले पागल झालेले पाह्यलयं!!
;)

असो, हे फारच अवांतर होत चाललयं!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पण ज्यांनी स्वताची वाट लावली आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या घरच्यांची झालेली अवस्था पाहून दारुबद्द्ल तिटकारा निर्माण झालाय..

सुनील's picture

2 Jan 2009 - 10:43 pm | सुनील

मग हा दोष दारूचा की त्या व्यक्तींचा?

सुनील तळीराम

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश's picture

3 Jan 2009 - 7:05 pm | ब्रिटिश

यक जुनी गोस्ट हाय
यक पापभीरू मानूस व्हता.
त्याला देवान सपनात येउन सांगतल क बाबा तु आयुश्यात यकपन पाप केल नायस.
तर तुला यक कोन्तही पाप करन्याची संदी देन्यात येतय
तवा
ह्या पापांमदुन यक नीवड
१. दारु ( तवा दारु पीन पाप समजल जाई)
२.शीवी
३. जुगार
४.परस्त्रीगमन
५. खुन

मानुस भला व्हता. त्यान ईचार केला. यकच पाप कराच ना, मग

खुन करन आपल्या बापाच्यान जमायच नाय
परस्रीगमन ? छ्या नाव नको
जुगार आपल्याला बरबाद करील
दुसर्‍याना वाईट बोलनं, शीव्या देनं आपन आयुश्यात कदी केल नाई
दारु यकदा पीली तर कई व्हत नाय .सोतालाच तरास व्हईल दुसर्‍याना नाय

त्यान दारु पेली. नशा चडल्यावर बायकोपोरांना शीव्या दील्या, जुगार खेलला, परस्त्रीशी बळजबरी केली न तीचा खुन केला

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

लवंगी's picture

3 Jan 2009 - 11:32 pm | लवंगी

तुमच्या उत्तरात सार काहि आल..

सुनील's picture

4 Jan 2009 - 7:24 am | सुनील

पुन्हा तेच!

असे करणार्‍यांची संख्या एकूण दारू पिणार्‍यांपैकी किती?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शेवटल्या धारेचं झालं की रं बाला! एकदमच सुन्न झालंय बग! :(

चतुरंग

अनिल हटेला's picture

2 Jan 2009 - 9:27 am | अनिल हटेला

शेवट धक्का देउन गेला...

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दिपक's picture

2 Jan 2009 - 10:02 am | दिपक

पिवाची पण वाट नाय लावाची जिवाची

-दिपक

पर झालं ते झालं,दारवा पिवायची पण झेपल इतकीच्.देशी नग रं बाबानु.लई झ्याक लिव्हतस बाल्या तुं. तुका नव्या वर्शाच्या शुभेच्छा
वेताळ

झेल्या's picture

2 Jan 2009 - 10:43 am | झेल्या

चढवली ..चढवली....अन्..खाड्कन उतरवली...!

-झेल्या

विजुभाऊ's picture

2 Jan 2009 - 12:23 pm | विजुभाऊ

शन्का : भुते फक्त माणसांचीच का होतात?
झुराळाची ढेकणाची डासाची मटणाच्या बोकडाची चिकनच्या कोंबडीची भुते का होत नाहीत.

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

ब्रिटिश's picture

2 Jan 2009 - 12:55 pm | ब्रिटिश

कारन फक्त मान्स भुतांना घाबरतान
झूरळ्, ढेकून्,डास्,बोकड, कोंबडी भुतांना घाबरत नाय

सोताशीच : त्यांच्यात आसतील पन आपल्याला कई म्हाईत र?

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

लिखाळ's picture

2 Jan 2009 - 8:40 pm | लिखाळ

उत्तम.. जोरकस..
मानलं बुवा तुम्हाला.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.

मनस्वी's picture

2 Jan 2009 - 8:52 pm | मनस्वी

कं भारी लिवलं. यकदम डोला उघडनारं बोल!

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Jan 2009 - 1:24 am | ब्रिटिश टिंग्या

त्यासाठी ब्रँडेड प्यावी.... हातभट्टीचा काही भरवसा नाही!

- (प्रिमियम ट्रिपल डिस्टील्ड स्मिरनॉफ व्होडका पिणारा) टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

सुनील's picture

3 Jan 2009 - 9:13 am | सुनील

त्यासाठी ब्रँडेड प्यावी.
मान्य. पण त्यासाठी (भारतात असाल तर) खात्रीशीर ठिकाणाहून विकत घ्यावी. नाहीतर, बाटली ब्रँडेड आणि दारू चालू, असा प्रकार व्हायचा!!

(खात्रीशीर तळीराम) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.