मदहोश (शायरी)

शार्दुल_हातोळकर's picture
शार्दुल_हातोळकर in जे न देखे रवी...
12 Dec 2015 - 2:38 pm

हा असा बेधुंद वारा, धुंद मज जातो करुनी
मग जणु होऊन गंध, येतेस तू माझ्या मनी
खेळ सारा काळजाचा, जालिम हा मद्यापरि
ना दिसे ते चेहऱ्यावर, पण ओढ मात्र अंतरी

ना कळे मजला तुझे, हे गुढ रम्य हावभाव
काय मी वर्णु तयांना, काय त्यासी देऊ नाव
एवढे मज जाणवे की, तू तुझी नाहीस आता
दूर का मग राहसी तू , कैफ ओसंडुन वाहता

या अशा तारुण्यकाळी, हे धुंद रुप यौवनाचे
का उगा करतेस मग तू, ढोंग हे परकेपणाचे
हाय त्या तुझिया अदांची, काय ती जबरी नशा
मी आहे कोठे उभा अन् ना मला कळते दिशा

भासेन तुजला रांगडा मी, अन् प्रेमही हे रांगडे
पण पोटातले ओठावरीही, अन् बोलणेही रोकडे
मी नव्हे मजनु कथेतील, अन् प्रेम नाही आंधळे
मी जरी आहे दिवाना, ना लाचारवाणा घुटमळे

प्राशुनी प्रेमामृताला, झिंगुनी मदहोश होऊ
वाटुदे हेवा जगाला, बेफाम त्या मस्तीत गाऊ
उसळु दे काळिज आता, ना आता पर्वा जगाची
होऊ दे आपुली कहाणी, प्रेरणा भावी युगाची

-शार्दुल हातोळकर

प्रेम कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

एक एकटा एकटाच's picture

13 Dec 2015 - 9:11 am | एक एकटा एकटाच

वाह!!!!!!

क्या बात
क्या बात
क्या बात

जियो उस्ताद

शार्दुल_हातोळकर's picture

15 Dec 2015 - 10:54 pm | शार्दुल_हातोळकर

तुमच्या जिंदादिल प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!

पालीचा खंडोबा १'s picture

15 Dec 2015 - 1:26 pm | पालीचा खंडोबा १

क्या बात

वेल्लाभट's picture

15 Dec 2015 - 2:35 pm | वेल्लाभट

ठीक वाटली. लय मधेच सापडते, मधेच बिघडते.

पु ले शु

शार्दुल_हातोळकर's picture

15 Dec 2015 - 11:09 pm | शार्दुल_हातोळकर

या शायरीमध्ये प्रत्येक शेर जरी सर्वसाधारणपणे समान आशयाचा असला, तरी प्रत्येक शेर हा पुर्णपणे स्वतंत्र आहे. मुळात अशा शेर-ओ-शायरीमध्ये गझलप्रमाणे प्रत्येक शेर हा सारख्या लयीत किंवा तालात असण्याचे कोणतेही बंधन असत नाही.

वेल्लाभट's picture

16 Dec 2015 - 10:34 am | वेल्लाभट

शेर-ओ-शायरीमध्ये गझलप्रमाणे प्रत्येक शेर हा सारख्या लयीत किंवा तालात असण्याचे कोणतेही बंधन असत नाही.

हे मला ठाऊक आहे. मी स्वतंत्र शेराबद्दलच म्हटलं की एक दोन शेर योग्य वाटतात वाचताना बाकीच्यात सुधार शक्य आहे.
असो.

शार्दुल_हातोळकर's picture

16 Dec 2015 - 10:58 pm | शार्दुल_हातोळकर

वेल्लाभट तुमच्या म्हणण्यात तथ्य असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण शायरीच्या बाबतची मुख्य अडचण ही आहे की शायरी नुसती वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष सादर केली तरच खरी रंगत येते. कारण प्रत्येक शेरातले चढ-उतार आणि लय वगैरे स्वतः शायरच त्याला अभिप्रेत असे अधिक चांगल्या प्रकारे सादर करु शकतो.

बाकी तुमच्या सुचनांचे स्वागतच आहे. _/\_

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Dec 2015 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भासेन तुजला रांगडा मी, अन् प्रेमही हे रांगडे
पण पोटातले ओठावरीही, अन् बोलणेही रोकडे
मी नव्हे मजनु कथेतील, अन् प्रेम नाही आंधळे
मी जरी आहे दिवाना, ना लाचारवाणा घुटमळे

या चार ओळी आवड्ल्या.

-दिलीप बिरुटे

लिहिलेय चांगले पण का कोण जाणे आजकाल मिपावरच्या सगळ्याच गजला मला एकसारख्याच वाटायल्यात.
ते मिसरा, कदीफ(?) वगैरे नियमामुळे तसे होत असावे का? तरी बरय मला काही कळत नाही जास्त ते.

शार्दुल_हातोळकर's picture

20 Dec 2015 - 4:12 pm | शार्दुल_हातोळकर

सर्वांचे आभार !!

शार्दुल_हातोळकर's picture

20 Dec 2015 - 4:12 pm | शार्दुल_हातोळकर

सर्वांचे आभार !!

शार्दुल_हातोळकर's picture

20 Dec 2015 - 4:12 pm | शार्दुल_हातोळकर

सर्वांचे आभार !!

देशप्रेमी's picture

15 Jul 2017 - 9:00 pm | देशप्रेमी

खुपच छान !!! आवडली...