शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक जून 1674 मध्ये करून घेतला व मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची घोषणा केली. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना व्यापक व प्रभावी होती. त्यामुळे निर्वीकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. याप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापन केली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली. ही मंत्रीपदे वंशपरंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर व व्यक्तीचे गुणदोष पाहूनच ठरवण्यात येत. या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते.
प्रधानमंत्री (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे हे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे मंत्री. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर देखरेख ठेवणे व महाराजांच्या गैरहजेरीत राज्यकारभार सांभाळणे हे त्यांचे काम होते. प्रधानमंत्रीला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.
पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र निलकंठ हे महत्त्वाचे मंत्री असून त्यांना स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च पाहून तसेच लिहून व तपासून महाराजांसमोर सादर करणे ही कामे करावी लागत. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.
पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हे महत्त्वाचे मंत्री असून त्यांना सर्व जाणाऱ्या येणार्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे, शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी पाठवल्या जाणार्या आज्ञापत्रावर लक्ष ठेवणे, स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळणे तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवणे ही कामे करावी लागत. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवणे, महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे होती. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या घोडदळ व पायदळ विभागाचे सेनापती होते. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंत सुमंत (डाबीर) : रामचंद्र त्रिंबक यांना परराष्ट्रांना खलिते पाठविणे व आलेली घेणे, परराष्ट्रासंबंधी माहिती आणि सल्ला महाराजांना देणे आणि परराष्ट्रातील बातम्या हेरांमार्फत काढण्याचे काम होते. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी यांना दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देण्याचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत यांना दानधर्म करणे, पंडीत, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमीत चालणाऱ्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही कामे होती. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
प्रतिक्रिया
15 Dec 2015 - 12:08 pm | अनुप ढेरे
हे रोचक आहे. हे डायरी लिहिण्यासारखं आहे का? आणि ती रोजनिशी सापडली आहे का?
15 Dec 2015 - 3:28 pm | आदूबाळ
रोजनिशी म्हणजे "डियर डायरी" स्वरूपाचं नसावं. आऊटलुकमध्ये क्यालेंडर असतं तसं काहीतरी असेल.
15 Dec 2015 - 12:19 pm | प्रचेतस
अतिशय अभ्यासपूर्ण लेखन.
अजून येउ द्यात.
15 Dec 2015 - 2:51 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११ अगदी अगदी..
हे कुठे आधी कुणी लिहिलेलं हि नाही,ना या पुढे कुणी लिहिलं..! मी देखील प्रथमच वाचतोय..आणि लेखन चिकाटी ,हातोटी , परिश्रम हे सदर लेखकाचे गुण पाहून मटकन खालीच बसलो आहे..
19 Dec 2015 - 8:15 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नुसतेचं खाली बसलाय ना?
23 Dec 2015 - 10:49 am | अत्रुप्त आत्मा
15 Dec 2015 - 9:05 pm | अजया
:)
15 Dec 2015 - 12:30 pm | जेपी
सदरील लेख मराठी विकीपिडीया साठी घेण्याचा मानस आहे.आपला लेख आणी त्याअनुषंगाने येणारे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त असतील अशी आशा आहे.
अवांतर टाळण्यासाठी धन्यवाद.
-जेपी(थंड)गार
15 Dec 2015 - 12:33 pm | जेपी
सदरील लेखन कुठुन उचलले आहे,याचा उल्लेख दिल्यास संदर्भ जोडण्यास मदत मिळेल.
धन्यवाद.
15 Dec 2015 - 2:07 pm | नाव आडनाव
:)
15 Dec 2015 - 2:54 pm | नाखु
हे लिखाण कुठुनही च्योप पेस्त नसून स्व तंत्र असू शकते, यावर समस्त मिपाकरांचा विश्वास नाही हे पाहून एक मिपकार म्हणून मला........................... वाटली..
फ न्ना झाला
चल्तुफ्रीघे
खात्मकुंद
15 Dec 2015 - 1:14 pm | पालीचा खंडोबा १
माहिती छान आहे. एक दुरुस्ती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला नाही तर तो गागाभट्टानी प्रस्ताव मांडला. त्यास महाराजानी दुजोरा दिला. इतक्या स्वयंभू व्यक्तिमत्वास कुठल्याही मोहेरेची गरज नव्हती. परंतु आलंम हिंदुस्थानात पसरलेल्या दिन दुबळ्या हिंदू जनतेस एक संदेश जाणे गरजेचे होते कि आता इथे एक हिंदू साम्राज्य अस्तित्वात आले आहे. बहादूरखान हा औरंगजेबाचा सुभेदार औरंगाबाद ला होता त्याने एक पत्र तेही उपहासात्मक औरंगजेबास लिहिले . त्यात तो म्हणतो त्या बुतपरस्त शिवा ने तख्तनिशी म्हणजे राज्याभिषेक केला. त्यावरून संतापून औरंगजेबाने त्यास खरमरीत उत्तर दिले त्यात तो म्हणतो अरे मुर्खा त्याने राज्याभिषेक केला त्याचे काही मला वाटत नाही परंतु त्याने जे तख्त निर्माण केले आहे त्याचे फार मोठे आव्हान मुघल सल्तानितीपुढे उभे राहिले आहे ते कसे काय मोडून काढणार ?
औरंगजेब मुत्सद्दी होता तो हे जाणून होता कि हे मुघल सत्तेस फार मोठे आव्हान आहे म्हणूनच तो महाराष्ट्रावर चालून आला. परंतु ते आव्हान त्यास मोडून काढता आले नाही त्या लढ्यातच त्याचा अंत झाला. ते मराठी साम्राज्य नव्हते तर हिंदवी साम्राज्य,हिंदूंचे साम्राज्य होते मुघली सत्ता जी इस्लाम प्रतिनिधित्व करत होती त्यास हिंदू भूमिपुत्रांचे उत्तर होते.
सर्वात शेवटी चिटणीस नावाचे पद होते ते बाळाजी आवाजी सांभाळत असत म्हणजे सगळा पत्रव्यवहार / ह्यात महाराजांचा खाजगी पत्रव्यवहारही होता.
19 Dec 2015 - 8:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचा प्रतिसाद वाचुन डुकरांची स्युडो सेक्युलर पिलावळ पिसाळणार बरं का. :) :)!!!
महात्मा औरंगजेब आणि धर्मवीर न्यायाळु दयाळु कृपाळु समाजवादी मुर्तीपुजक गोप्रतिपालक अफझलखान यांची पिल्ले अता डुरकत येणार.
15 Dec 2015 - 1:59 pm | अफ्रिकेचा मुम्बैकर
tevhache hudde kivva mantripadanchi navaa nantar lok swatachi aadnava mhnaun waparu lagale....
15 Dec 2015 - 2:20 pm | जातवेद
आडनाव शक्यतो ठिकाण, धंदा, हुद्दा यावरूनच येते ना?
15 Dec 2015 - 4:39 pm | जिप्सी
सर्व मन्त्रीगणाचे पगार कुठुन घेतलेत? सन्दर्भ काय अस विचारायच होत.
कारण मला जे माहित आहेत ते आकडे यापेक्षा फारच कमी आहेत.
साधारण १होन = ३.५ रु असा भाव धरता जरा जास्त मोठे येतात हे आकडे.
19 Dec 2015 - 8:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
टॅक्स रिटर्न डॉक्युमेंट सापडलेत मोडीत लिहिलेले.
15 Dec 2015 - 5:02 pm | जिप्सी
रियासतकार,शेजवलकर,पगडी आदि लोक पेशव्याचा पगार ७०००होन आणि इतर ७ मन्त्र्यांचे पगार ५००० होन असा सांगतात.
पंत सचिव्,पंत अमात्य इ इ :- पंत हे विशेषण नंतर लागले,आधी फक्त सचिव्,अमात्य एवढच होते.
मन्त्री :- यांचे कार्य अजून एखाद्या संदर्भांतून तपासून घ्या, तुम्ही लिहिलेली कार्ये चिटणीसाची आहेत.
15 Dec 2015 - 5:30 pm | उगा काहितरीच
आजच्या INR मधे कुणी कन्वर्ट करून सांगेल काय ?
15 Dec 2015 - 6:07 pm | मारवा
अत्यंत गहन विवेचन मार्मिक वेध
सुयोग्य शब्दात मिताक्षरी अभिव्यक्ती
फाफटपसारा टाळण्यात पाल्हाळ टाळण्यात
कमालीचे यशस्वी नेहमीच यशस्वी ठरतात
लाटकर सर
15 Dec 2015 - 6:48 pm | हेमंत लाटकर
@ पालीचा खंडोबा
शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्याला सर्व राजांनी मान्यता द्यावी, हिंदूंचे स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळावे म्हणून शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला.
बाळाजी आवजी राज्याभिषेकापुर्वीपासून चिटणीस पद सांभाळत. चिटणीस पद अष्टप्रधान मंडळात मोडत नाही.
अवांतर: रणजित देसाईच्या श्रीमान योगी पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत नरहर कुरूंदकरांनी लिहले शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का करून घेतला.
16 Dec 2015 - 12:40 pm | सुमीत भातखंडे
चांगलं संकलन आहे.
धन्यवाद.
16 Dec 2015 - 2:01 pm | मालोजीराव
पगार जरा जास्तच आहेत असं वाटतंय, या लेखात नमूद केलेले पगार हे चिटणीस बखरीतून उचलले आहेत.माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त पगार हा सरसेनापतीला असायला हवा, जो कि ४०००-५००० होन आहे. त्यानंतर सेनाकर्ते कोण असतील तर त्यांना (पगार + राखीव भत्ते ) जास्त पगार आणि मग अष्टप्रधान असा क्रम.
लेखातील पगार जास्त आहेत यास कारण म्हणजे, दुसर्या फळीतील अधिकार्यांना पगार तुलनेने कमी म्हणजे ४००-१००० (१५००-३५०० रुपये ) च्या रेंज मध्ये आहेत.
परदेशी प्रवाश्यांच्या ज्या काही तत्कालीन नोंदी आहेत त्यानुसार हे प्रवासी जे स्वतःसाठी मदतनीस घ्यायचे त्यांना दोन वेळचे जेवण देऊन महिना पगार फक्त २ रुपये असे.
राज्याभिषेक पूर्व संपूर्ण राज्याचा महसूल ५०-६० लाखांच्या आसपास होता त्यामुळे एव्हडे पगार असतील वाटत नाही.
एका मावळच्या महासुलाइतके पगार आहेत एकेकाचे
16 Dec 2015 - 2:38 pm | अर्धवटराव
पण पायदळाचे प्रमुख यसाजी कंक होते ना?? अर्थात, सरनोबत सर्वच सैन्याचे चीफ कमांड असतील.
16 Dec 2015 - 6:21 pm | भीमराव
आरमार व हेरखाते यांना प्रधान मंडळात स्थान का बरे मिळाले नसावे?
16 Dec 2015 - 6:35 pm | खटपट्या
पंत सुमंत (डाबीर) यांच्याकडे हे काम होते...
16 Dec 2015 - 10:43 pm | DEADPOOL
जबरदस्त लिहिलय!
17 Dec 2015 - 11:18 am | जिप्सी
सरनौबत आणि पेशवा यापैकी पेशव्याला पगार जास्त होता कारण पेशवा हा मुलकी आणि लष्करी २ही गोष्टी सांभाळत असे.
17 Dec 2015 - 6:43 pm | प्रसाद१९७१
शिक्षण ( मानव संसाधन ) आणि उद्योग मंत्री नसलेला बघुन विषाद वाटला.
25 Dec 2015 - 12:13 pm | सतीश कुडतरकर
त्यावेळेस मानव संसाधनाचे उद्योग घरातच करायचे, हो. :-)
18 Dec 2015 - 2:46 pm | llपुण्याचे पेशवेll
पंतप्रधान म्हणजे कोणते होते? कारण पेशवे म्हणजे पंत प्रधान असे पद असल्याचे वाचले होते कुठेतरी.
18 Dec 2015 - 5:00 pm | हेमंत लाटकर
प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान. सर्व मंत्र्यांचे मुख्य म्हणून प्रधानमंत्री.
18 Dec 2015 - 3:40 pm | मॅक
अभ्यासपूर्ण लेखन.
18 Dec 2015 - 4:53 pm | हेमंत लाटकर
पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून. पण श्रीवर्धनकर भट घराण्यातील पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी या दोन्ही आघाड्यांवर असा पराक्रम गाजवल्यामुळे त्यांना लोकांनी श्रीमंत हा किताब दिला. हा किताब पेशव्यांनी १०४ वर्षे टिकवून ठेवला. पेशवे दिल्लीच्या बादशहाचे नोकर नव्हते आणि छत्रपतींचे मांडलिकही नव्हते. ते होते छत्रपतींचे एकनिष्ठ सेवक होते. पण अतिशय पराक्रमी असून बहुतेक सर्व पेशवे हे अल्पायुषी होते. त्यामुळे राज्यात विद्या, कला यांची वाढ करण्यासाठी त्यांना स्वस्थता मिळाली नाही. पेशव्यांची कारकीर्द म्हणजे सततची युद्धमोहीम असे चित्र उभे राहिले. सरदार मुजोर झाले आणि उत्तर आणि दक्षिण दोहीकडे मित्र जोडण्याऐवजी शत्रू वाढत गेले. नाना फडणविसांच्यानंतर इंग्रजांच्या उद्योगांकडे पेशव्यांचे दुर्लक्ष झाले, आणि ब्राह्मण पेशव्यांनी मराठी राज्य घालविले ही अपकीर्ती पदरी आली. त्यामुळे १०४ वर्षांची पेशवाईची कारकीर्द झाकोळली गेली.
18 Dec 2015 - 8:25 pm | माहितगार
चिकित्साकरणे हा मिपाकर म्हणून आमचा आपद्धर्म आहे म्हणून हे जरा संदर्भासहीत इस्कटून सांगीतल्यास अभिमानाला विश्वासार्हतेची जोड मिळण्यास हातभार लागेल असे वाटते. बाकी लेखनशैली वाचनीय आहे. पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा)
19 Dec 2015 - 11:33 am | नितिन थत्ते
लाष्टवाल्या प्रधानजींना कामाच्या मानाने जास्त पगार होता असे वाटते. [सेनापती वगैरेंच्या तुलनेत].
20 Dec 2015 - 7:59 pm | मोगा
पगाराचे आकडे वाचून डोळे फिरले.
20 Dec 2015 - 8:50 pm | मोगा
पगाराचे आकडे वाचून डोळे फिरले.
20 Dec 2015 - 9:08 pm | मोगा
तरीच सरदार घराण्यांचे आजचे वारस अगदी सदगदीत होऊन महाराज महाराज करत असतात.
21 Dec 2015 - 10:52 am | हेमंत लाटकर
वार्षिक 10000 ते 15000 होन म्हणजे काय जास्त आहे. 1 होन म्हणजे 3 ते 4 रू म्हणजे महिन्याला 2500/3333 (10000 होन प्रमाणे) किंवा 3750/5000 (15000 होन प्रमाणे)
21 Dec 2015 - 11:11 am | मोगा
त्या काळी इतर जनतेचे महिन्याला१०० रु तरी उत्पन्न असायचे का ?
23 Dec 2015 - 9:30 am | राही
अहो पन्नाससाठ वर्षांपूर्वींपर्यंत महिना ९०-१२० असे पगार होते लोकांना. म.टा. मध्ये लोक जुन्या आठवणी लिहितात तेव्हा 'नव्वद रुपयांची ती पहिली कमाई मी वडिलांच्या हातावर ठेवली. वडील म्हणाले, जा आधी देवापुढे ठेव' असे अनेक उल्लेख असतात. वार्षिक पगारवाढ एक रुपया, दोन रुपये असायची. ती सुद्धा एक वर्षाआड.
आजच्याच म.टा.मध्ये एका रोजनिशीतल्या १९३२ सालातल्या नोंदी छापल्या आहेत. त्यात चार तोळे सोने रु.१०० असे नोंदले आहे.
23 Dec 2015 - 1:22 pm | मोगा
त्या काळी द. म. १००० होन हे प्रचंड उत्पन्न होते. १६ व्या शतकात
23 Dec 2015 - 9:42 am | माहितगार
शिवकाळाबाबत कंपॅरेटीव्ह इकॉनॉमीक्सबद्दलच्या काही स्टडी झाल्या आहेत का ?
21 Dec 2015 - 7:15 pm | हेमंत लाटकर
अष्टप्रधान मंडळातील मंत्री व इतर जनतेत काही फरक असेल की नाही
23 Dec 2015 - 12:02 pm | कपिलमुनी
मंत्री किंवा इतर स्टाफची पगारवाढ किती व्हायची ओ ?
23 Dec 2015 - 2:48 pm | आदूबाळ
ते काय माहीत नाही, पण "नॉट मीटिंग एक्स्पेक्टेशन्स अॅट युवर लेव्हल" असा सूर असलेलं "हुकूम नसतांही सला काय निमित्ये केला? हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे." वगैरे अप्रेझल असलेलं पत्र आहे.
23 Dec 2015 - 3:05 pm | होबासराव
आणि त्यानंतर...
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गदीर्त लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्यावर गात
23 Dec 2015 - 3:07 pm | कपिलमुनी
_/\_
26 Dec 2015 - 11:29 am | यशोधरा
हे ऐकता, वाचताही अंगावर काटा येतो!
27 Dec 2015 - 11:50 am | हेमंत लाटकर
राज्यभिषेकासाठी एवढा खर्च करणारे महाराज आपल्या स्वामीनिष्ठ अष्टप्रधान मंडळाला एवढा पगार देऊ शकणार नाहीत का.
27 Dec 2015 - 3:32 pm | मालोजीराव
नाही देऊ शकणार
27 Dec 2015 - 11:25 pm | मोगा
आम्हाला सातवे पे कमिशन आता लवकरच लागू करा.
28 Dec 2015 - 7:36 pm | होबासराव
ओ युनानी हकीम... ते फक्त सरकारी कर्मचार्याना लागु होत(योग्य अयोग्य माहित नाहि).
आजच्या घडीला तरी भारतात युनानी हकीम सरकारी नौकरीत नाहीत त्यांचे अस्तित्व फक्त सरकारी मुत्र्यांमध्ये असते. चिकटवलेल्या बिल्स / पोस्टर च्या स्वरुपात.