लेख थोडा छोटा झाला आहे त्याबद्दल मिपाकर क्षमा करतील अशी आशा आहे .
----------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक राज्यात आपल्या देश कि रेल ने विकासाची नक्कीच नवी गंगा आणायला हातभार लावला आहे ह्याबद्दल शंका नाही. विविध प्रगत देशात जलदगती गाड्या पाहून आपल्या नेत्यांना त्याची स्वप्ने पडू लागली. France-SNCF , ब्रिटीश रेलची इंटरसिटी १२५ तर अमेरिकेची Acela express. पण ह्या सगळ्यांना मागे टाकून जपान रेल ची बुलेट ट्रेन मोदिजींच्या मनात बसली. आता विकास हा व्हायलाच हवा. पण तो कधी करायचा हे आपण ठरवायचे आहे.
आता प्रथम मुंबई मध्ये काय समस्या आहेत ते बघू. मुंबई चा भौगोलिक आकार हा उत्तर दक्षिण आहे. त्यामुळे रेल्वेचा पूर्व-पश्चिम विस्तार शक्य नाही . मध्य पश्चिम आणि हार्बर ह्या तीन लोकल सेवा मुंबईला सुसह्य बनवतात.आणि गुद्मरावतात सुद्धा आता बुलेट ट्रेन चा विचार केला तर ते सुरवातीच स्टेशन लोकमान्य टिळक कुर्ला किव्वा बांद्रा बीकेसी आहे .पुढील नियोजित स्टेशन आहे माझे ठाणे. आता हे सरारारी अंतर साधारण ३० किमी आहे म्हणजे बुलेट ट्रेन लगेच थांबणार! पुढील स्टेशन विरार . हा मार्ग दिवा मार्गे आहे. म्हणजे पारसिक च्या डोंगराचा मोठाच अडथला आहे. रेल्वे अहवालानुसार ५-६ लाईन करता जो बोगदा खानला जातो आहे त्यामुळे पारसिक चा डोंगरात खूपच पर्यावरणाची हानी झाली आहे. त्यात आता अजून एक बोगदा म्हणजे कल्याणाच होईल. विरार नंतर मला नाही वाटत काही समस्या येतील.
पण असे असले तरी मुंबई च्या बाबतीत काही मुलभुत प्रश्न अनुतारीतच राहतात:-
०१- मध्य रेल्वे सक्षमीकरण ह्याने सध्या होणार का?
०२- बुलेट ट्रेन करता जागा कुठून आणणार? बांद्रा ते ठाणे गाडी भुयारी मार्गाने आणणार का?
०३- लोकमान्यता टिळक कुर्ला ला सुरुवात असेल तर ५-६ रेल्वे गाड्यांची जागा तुम्ही बुलेट ट्रेन करता वापरणार का ?
०४- ठाणे स्टेशन परिसरातली सध्याची स्थिती बघता बुलेट ट्रेनचे स्टेशन घोड्बन्देर रोड वरच करावे लागेल त्याचा अतिरिक्त खर्च कसा करणार?
०५- दिवा-ते विरार आणी दिवा ते ठाणे अशी जलद वाहतुकीची साधने तुम्ही उपलब्ध करून देणार का?
०६- बुलेट ट्रेनचे तिकीट दर सामान्यांना परवडतील असे ठेवणार का?
ह्या प्रश्नाची उत्तरे मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
आता काही उपाय मला सुचत आहेत ते पुढील प्रमाणे:-
०१: मध्यम जलद गती गाड्या वसई रोड- अह्म्दाबाद मार्गावर चालू कराव्ग्यात. सदर गाड्यांना विरार , डहाणू रोड , नवसारी , सुरात , वडोदरा , आनंद , असे थांबे असावेत. अहमदाबाद च्या आधीचे स्टेशन मणीनगर येथे एक स्वतंत्र स्थानक उभारून त्या गाड्या तिथच संपवाव्यात( मणीनगर-वाटवा स्टेशन दरम्यान रेल्वेची मोठी जागा उपलब्ध आहे) सदर स्टेशन अहमदाबाद जन्मार्ग बस सेवेने जोडावीत.
०२: ट्रेन-सेट चालू करावा. ह्या मध्ये दोन्ही बाजीला इंजीने हे डब्यांबरोबर अनिवार्यारीत्या जोडलेले असते.त्याची रचना मुंबई लोकल गाडी सारखीच असते. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटीश रेलची इंटरसिटी १२५. . ह्या मुले लोको शेड ची सोय करावी लागणार नाही.
०३- सदर गाड्या ह्या दर २ तासांनी सोद्याव्यात. त्यांचा मार्ग हा पूर्ण भिन्न असेल असे पाहावे.
०४- मुंबई चे जे वसई स्थानक आहे ते आणी ठाणे/ दिवा हे डेमू रेल्वे गाड्यांनी जोडावे. (डेमू:diesel Electric Multiple Unit)
०५- पुणे-वसई गाड्या सुरु कराव्यात. मुंबई मध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांना पूर्ण बंदी करावी. त्यान साठी ठाकुर्ली ( कल्याण) आणि पनवेल येथे ब्स्वतंत्र स्थानक उभारावे. ठाकुर्ली-मुंबई आणि पनवेल मुंबई मार्गावर ह्यामुळे लोकल गाड्या वाढवता येतील.
मला आत्तातरी हेच उपाय सुचत आहेत . बाकी आपले मिपाकर हुशार आहेत. त्यंना काही उपाय सुचत असतील तर त्यांनी सांगावे.
प्रतिक्रिया
16 Dec 2015 - 3:48 am | अर्धवटराव
बुलेट ट्रेनकडे एक स्वतंत्र विषय म्हणुनच बघावे. सध्याचय रेल्वे समस्या तशाही सोडवाव्या लागतीलच.
16 Dec 2015 - 9:53 am | सुबोध खरे
रेल्वे स्टेशन हुन बस सोडणे हे अव्यवहार्य आहे. ऊडा. कर्णावती एक्स्प्रेस ला १७ डबे आहेत प्रत्येक डब्यात १०८ प्रवासी बसतात म्हणजे एका गाडीत १८३६ प्रवासी आहेत यांना मणीनगर किंवा वटवा स्थानकावरून अहमदाबादला सोडण्यासाठी कमीत कमी ३० बसेस सोडायला लागतील.
ठाकुर्ली हून किंवा पनवेल हून सामान घेऊन कुटुंबासकट मुंबईत सकाळी किंवा
संध्याकाळी उलट्या दिशेने म्हणजे मुंबई तून ठाकुर्ली कडे जायचे हे अव्यवहार्य वाटत नाही का आपणास? त्यातून वरिष्ठ नागरिक आणी लहान मुले यांचे हाल कुत्रा खाणार नाही.
परत विचार करून पहा.
16 Dec 2015 - 11:04 am | पिवळा डांबिस
इच्चिभनं, तुमची बुलेट ट्रेन ठाकुर्लीला थांबनार हाय?
जल्लां, मग मी उगीच खोली सोडली!!!
:)
16 Dec 2015 - 11:55 am | प्रणवजोशी
रेल्वेच्या माहितीनुसार मेल गाड्यांना स्टेशन मोकळे करण्यास सरासरी ४मिनिटे लागतात.हि मिनिटे आपण ठाकुर्लीला जर एक्सप्रेस गाड्यांचे टर्मिनस केले तर हाच वेळ लोकलगिडीसाठी वापरता येईल आपण असे धरु की संध्याकाळी व रात्री छशिट हुन १२ एक्सप्रेस सुटतात. तर दादर ,ठाणे यैथे २मिनिटे थांबा व फलाट मोकळा करायला २मिनिटे.हाच वेळ लोकल फेर्या वाढविण्यासाठी वापरला तर ?तसेही साधारण दर ४मिनिटांनी एक लोकल अशी सेवा आहे ती कमी करुन २ मिनिटांनी करता येईल.
16 Dec 2015 - 12:04 pm | प्रणवजोशी
रेल्वेच्या माहितीनुसार मेल गाड्यांना स्टेशन मोकळे करण्यास सरासरी ४मिनिटे लागतात.हि मिनिटे आपण ठाकुर्लीला जर एक्सप्रेस गाड्यांचे टर्मिनस केले तर हाच वेळ लोकलगिडीसाठी वापरता येईल आपण असे धरु की संध्याकाळी व रात्री छशिट हुन १२ एक्सप्रेस सुटतात. तर दादर ,ठाणे यैथे २मिनिटे थांबा व फलाट मोकळा करायला २मिनिटे.हाच वेळ लोकल फेर्या वाढविण्यासाठी वापरला तर ?तसेही साधारण दर ४मिनिटांनी एक लोकल अशी सेवा आहे ती कमी करुन २ मिनिटांनी करता येईल.
16 Dec 2015 - 11:15 am | प्रसाद१९७१
जी गोष्ट ( बुलेट ट्रेन ) मुळातच गरजेची नाहीये आणि व्हायेबल पण नाहीये, त्याला पर्याय शोधणे फारच रोचक वाटले.
16 Dec 2015 - 12:50 pm | बोका-ए-आझम
तर मिपा पण नाहीये (नीलकांतच्या दृष्टीने) कारण बाकीच्या लोकांना एक स्वतःचा दमडा खर्च करावा लागत नाही पण नीलकांत यांना मालक असल्यामुळे काही एक किमान खर्च करावा लागतोच. त्यामुळे मिपा बंद करावे असा प्रस्ताव मांडायला हरकत नाही. तसेही मिपाला बरेच पर्याय आहेत. ;)
16 Dec 2015 - 12:55 pm | जेपी
लातुर -मुबंई एक्सप्रेसला ठाण्यात थांबा मिळालाच पाहिजे...
16 Dec 2015 - 1:07 pm | प्रणवजोशी
सोबतच पंजाब मेल व गितांजली एक्सप्रेसला सुद्धा
16 Dec 2015 - 1:31 pm | उगा काहितरीच
हम्म...
16 Dec 2015 - 4:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
एक प्रवास अनेक तुकड्यात अनेक पर्याय वापरून करणे ही कल्पनाच वाहतूक व्यवस्था काही शतके मागे नेण्यासारखी वाटते !
हजारो किमी विमानप्रवासातही नॉन्स्टॉप फ्लाईट उत्तम समजल्या जातात. इथे तर दोनतीनशे किमी जमिनीवरून प्रवास करायलासाठी प्रवाश्यांना इतका त्रास देणे म्हणजे सुधारणा होण्यासाठी केलेला कल्पनाशक्तीचा वापर म्हणता येणार नाही.