होतो अत्रुप्त आत्मा
मग आत्म-मुक्त झालो..
आता कळून आले
मी आत्मबंध आहे.
अतृप्त मूळ माझे
आत्मस्वरूप तेच.
परी मूळबीज म्हणजे
मी आत्म-बंध आहे.
आत्मा बदलता-हा
अतृप्त वर्तमान!
तो भूत काळ त्याचा
प्राचीन बंध आहे.
मी बदलताच असतो
वैविध्य तेच माझे.
या जाणिवेत नुकता,,,
"तो" आत्मबंध आहे.
जाणिव आज झाली
बदलून मीच मजला..
त्या जाणिवेत आता
मी पूर्ण लिप्त आहे.
दिसते स्व रूप त्याचे
जगता जरा स्वतःशी!
शोधीत जात असता
तो एक गंध आहे.
आहे असा मी आज
असतो असाच नेहमी!
ते सत्यरूप असते
इतुका स्वबंध आहे.
ठरवू कशास मग मी?
राहीन-आत्मबंध???
जर मूळरूप त्याचे
तैसे सबंध आहे!
स्विकार आज याचा
केला मी मजं-मतीने
पाहू कितीकं टिकतो!?
"तो" मुक्त छंद आहे!
कळले मलाही काही
सांगून टाकले मी..
घेतो रजा जराशी
तो मूळ छंद आहे!
प्रतिक्रिया
10 Dec 2015 - 12:44 pm | निनाव
Aavadli
10 Dec 2015 - 2:31 pm | सूड
अत्रुप्तता गेलेली दिसत्ये! बाकी शेवटला फोटो बघून रणदीप हुडा चा खिचडी मुव्ही आठवला. =))
10 Dec 2015 - 2:42 pm | सस्नेह
आत्म्याइतकीच गूढ कविता !
बुवा, घुगऱ्या कुठायत ?
10 Dec 2015 - 2:44 pm | मितान
सुंदर कविता !
10 Dec 2015 - 4:09 pm | दमामि
मान गये! कविता ओर फोटो दोनों को!=))
10 Dec 2015 - 4:47 pm | पैसा
कविता आवडली.
10 Dec 2015 - 5:26 pm | प्रचेतस
अत्रुप्ततेकडून त्रुप्तीकडे होणारी वाटचाल मोठ्या खुबीने मांडण्यात कवी यशस्वी झालाय.
10 Dec 2015 - 5:29 pm | सस्नेह
कुलकर्ण्यांची थोरली का ?
10 Dec 2015 - 5:34 pm | प्रचेतस
नाही. ती उजवली.
ही धाकटी.
10 Dec 2015 - 7:11 pm | अत्रुप्त आत्मा
नाम अगदी सार्थ आहे..
प्र-चेतस = चेतवून लावितो जो आग तो!
=======================
फट्कागोबा-तवामारात्मबंध
10 Dec 2015 - 7:34 pm | प्रचेतस
:( :( :(
10 Dec 2015 - 5:26 pm | पगला गजोधर
'काटा रुते कुणाला ….' च्या चालीमीटरमधे बसतीय तुमची कविता.
10 Dec 2015 - 5:35 pm | प्रसाद गोडबोले
तसे " चार बोतल व्होडका " च्या चालीमीटरमधेही बसतीय ही कविता. =))))
11 Dec 2015 - 10:40 am | बोका-ए-आझम
ची चाल पण ब-यापैकी बसतेय.
10 Dec 2015 - 5:35 pm | शान्तिप्रिय
छानच कविता
गूढ आणि अर्थपूर्ण.
गेयताही आहे.
10 Dec 2015 - 5:46 pm | कंजूस
एवढं चांगलं लेखन होतंय पण नाव सतत बदलल्याने ब्रँड होत नाही.त्यापेक्षा "पराग दिवेकर" नाव /आइडी घ्या आणखी एक नवीन आइडी घेऊन इतर दुत्त --उउउउउलूलू वगैरे स्फुट टाकता येईल.
10 Dec 2015 - 6:59 pm | जव्हेरगंज
+१
मला तर हे नवीन 'आत्मबंध' नाव नै आवडलं.
'अतृप्त' मध्ये कशी धार होती. तोच ठेवा हो बुवा!!
10 Dec 2015 - 7:14 pm | अत्रुप्त आत्मा
धारं म्यान केली परी अंतरात आहे
ऐसा कितीही बदलो अंतरी अतृप्त आहे! ;)
10 Dec 2015 - 7:43 pm | बॅटमॅन
सहमत, आयडी बदलून.....अत्म्यास का बांधून ठेविता?????
11 Dec 2015 - 8:45 am | नाखु
बांधलेले आत्मे झपाटत नाहीत असे कुठे तरी वाचल्याचे आठवते..
बॅटोबा बघ रे सापडला संदर्भ कुठेशीक !!!
अ ते आ प्रवासाचा साक्षी.
10 Dec 2015 - 8:42 pm | एक एकटा एकटाच
मस्त
10 Dec 2015 - 8:58 pm | सतिश गावडे
कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा? ;)
10 Dec 2015 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा
@कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा?>> सूर्याला जैशी असते,आत्मबंधी प्रभा!
10 Dec 2015 - 11:03 pm | प्रचेतस
जसा यमकात असतो, आत्मू हा उभा
10 Dec 2015 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा
@जसा यमकात असतो, आत्मू हा उभा>>> अर्थक ओळिचा हत्तीनी मोडिला खुबा..
(आणि स्वतःच आहे यम-कात हुबा! )
10 Dec 2015 - 11:12 pm | सतिश गावडे
कसा मिळाला हो लाल रंगाचा डबा?
सूर्याला जैशी असते,आत्मबंधी प्रभा!
जसा यमकात असतो, आत्मू हा उभा
अर्थक ओळिचा हत्तीनी मोडिला खुबा..
आणि स्वतःच आहे यम-कात हुबा!
ये रे तू पाणssssडुब्बा पाणssssडुब्बा
10 Dec 2015 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा
10 Dec 2015 - 11:14 pm | प्रचेतस
=)) =)) =))
10 Dec 2015 - 11:15 pm | प्रचेतस
=)) =)) =))
11 Dec 2015 - 4:35 pm | वपाडाव
=)))==))=))
10 Dec 2015 - 11:04 pm | सतिश गावडे
यमक्या आत्मुस =))
10 Dec 2015 - 9:30 pm | अभ्या..
गुर्जी हे नाव काय तितके भारी वाटत नाही हो. उगी कामून चेंजवता?
10 Dec 2015 - 9:56 pm | प्रचेतस
हो ना राव. अत्रुप्त किंवा अत्रुप्त आत्मा किंवा ... ह्या नावांत जी मजा आहे ती हयात नै.
11 Dec 2015 - 1:15 am | बोका-ए-आझम
एवढं चांगलं वल्ली नाव बदललंत ते?
11 Dec 2015 - 7:00 am | अत्रुप्त आत्मा
द्दे मारा!!!
11 Dec 2015 - 7:44 am | प्रचेतस
नै हो.
कुठे प्रचेतस आणि कुठे आत्मबंध. :)
11 Dec 2015 - 8:57 am | अत्रुप्त आत्मा
है ह्हो!
कुठे अवांतर आणि कुठे मूळ. :)
11 Dec 2015 - 9:00 am | प्रचेतस
बुवा पाडतात नेहमीच गूळ =))
11 Dec 2015 - 10:19 am | बोका-ए-आझम
डोक्यात शिरलेलं खूळ आणि बुवांनी पाडलेला गूळ यांच्या फंदात पडू नये!;)
11 Dec 2015 - 10:20 am | प्रचेतस
=))
अगदी अगदी.
11 Dec 2015 - 4:43 pm | पगला गजोधर
राग मानू नका, पण आपले नवे 'आत्म - बंध' नाव वाचून, का कोणास ठावूक,
चड्डी कमरेला बांधणारी नाडी (फुली बांध अवस्थेत) डोळ्यासमोर येते,
यापुढे जावून, तुम्ही परत जर नाव बदलणार असाल, तर कृपया 'आत्म - मुक्त'
हेही नाव घेवू नका… पुन्हा चड्डी कमरेला बांधणारी नाडी (सुटलेल्या अवस्थेत दादा कोंडके स्टाईल) डोळ्यासमोर येइल.
11 Dec 2015 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा
@राग मानू नका, पण आपले नवे 'आत्म - बंध' नाव वाचून, का कोणास ठावूक,
चड्डी कमरेला बांधणारी नाडी (फुली बांध अवस्थेत) डोळ्यासमोर येते,>> ओक्के..नो प्रॉब्लेम. पण तुम्हाला आत्म आणि बंध हे ऐकल्यावर बंध म्हणजे तुम्ही म्हणता तसं बांधलेलं हा प्राथमिक अर्थ प्रतीत होतो..हे ठिक आहे..पण आत्म या शब्दानी चड्डी कमरेला बांधणारी नाडी - कशी काय दृष्टीला प्रतीत होते??? हे जरा निराळंच आहे. कॉमन नाही.
11 Dec 2015 - 5:23 pm | पगला गजोधर
कदचित ''स्वतःचा'', असा अर्थ मझ्या मनःचक्षुसमोर येते. (तुम्ही म्हन्ला ते बी मान्य आहे.)
11 Dec 2015 - 7:41 pm | हेमंत लाटकर
बुवा, आत्मा अवस्थेतून बाहेर या!
11 Dec 2015 - 9:24 pm | अत्रुप्त आत्मा
तुम्ही कल्पिता तो आत्मा आणि मी कल्पितो तो आत्मा वेगळा आहे लट्टू काका.. धन्यवाद.
आणि पुढील चर्चा करायची-असेल तर खरडवहित या.