दक्षिण आफ्रिकेची चिवट चिकटेगिरी आणि ..........!!!!

shawshanky's picture
shawshanky in क्रिडा जगत
8 Dec 2015 - 8:29 am

अत्यंत संथ फलंदाजीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्‍वाचे लक्ष वेधलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 337 धावांनी दणदणीत विजय मिळविला. चार सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-0 विजय मिळवत भारताने कसोटी क्रमवारीमध्येही दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सलग पाच सत्रे खेळून काढण्याचे आव्हान पेलण्याचा दक्षिण आफ्रिकेने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, तळातील फलंदाज आवश्‍यक असलेला चिवट प्रतिकार करू शकले नाहीत आणि सामन्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये दक्षिण आफ्रिकेचा डाव 143 धावांत गुंडाळला गेला.
एबी डिव्हिलर्सने दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिकाराचे नेतृत्व केले. एकदिवसी क्रिकेटमध्ये 31 चेंडूंत शतक झळकाविणारा, ट्‌वेंटी-20 मध्ये झंझावाती खेळी करणारा डिव्हिलर्स कसोटीमध्ये मात्र संघाचा पराभव टाळण्यासाठी खेळपट्टीवर अक्षरश: नांगर टाकून उभा राहिला.दक्षिण आफ्रिकेने चौथी कसोटी अनिर्णीत राखण्याच्या इराद्याने अतिशय कूर्मगतीने फलंदाजी केली. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर ‘हमला’ करणारा फलंदाज अशी ओळख जपणाऱ्या अमला अतिबचावात्मक पवित्रा स्वीकारत २०७ चेंडूंत फक्त २३ धावा केल्या. डी’व्हिलियर्सनेही बचावाचा ‘अमलामार्ग’ अमलात आणून ९१ चेंडूंत केवळ ११ धावा केल्या. या अमला-डी’व्हिलियर्स जोडीने २९.२ षटके भारतीय गोलंदाजांना झगडायला लावून जेमतेम २३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने ३३ षटकांच्या अखेरच्या सत्रात फक्त ३२ धावा केल्या
द्विशतकी चेंडू खेळलेल्या आमलाचे धावांचे पावशतकही झाले नव्हते, तर शतकी चेंडूच्या जवळपास आलेल्या डिव्हिलियर्सने जेमतेम दोन आकडी धावा केल्या. त्यांनी २३ धावांची भागीदारी करण्यासाठी २९.२ षटके घेतली. त्यापूर्वी आमला आणि तेम्बा बावुमा यांनी ३८.४ षटकांत ४४ धावा केल्या.
आमला-डिव्हिलिर्सची १७८ चेंडूंत २३ धावांची भागी, धावगती ०.७८
कसोटी इतिहासातील सर्वांत कूर्मगती (किमान १७५ चेंडू) भागी. यापूर्वी काईल ॲबॉट-डिव्हिलिर्सच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०.९१ गतीने २७ धावा
आमलाच्या २०७ चेंडूंत २३ धावा, स्ट्राईक रेट ११.११. यापूर्वी इंग्लंडच्या आरसी रसेलच्या १२.३४ च्या स्ट्राइक रेटने २९ धावा
आफ्रिकेच्या ५० षटकांत ४९ धावा. २००२ पासूनच्या या सर्वात कमी धावा. यापूर्वी दक्षिण आफ्रिकने विंडीजविरुद्ध ६८ धावा केल्या होत्या
आमलाची पहिली धाव ४६ व्या, तर डिव्हिलिर्सची ३३ व्या चेंडूवर
आमलाने ११३ चेंडूंत ६ धावा केल्या होत्या. किमान शंभर चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांची ही दुसऱ्या क्रमांकाची कूर्मगती. जॉन मरे याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ धावा केल्या होत्या.
आफ्रिकेने नोव्हेंबर २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४३० धावांचे आव्हान असताना १४८ षटकांत ८ बाद २४८ मजल मारली होती.
पाच किंवा त्याखालील क्रमांकावर दोन्ही डावांत शतक केलेला रहाणे हा जगातील नववा व पहिलाच भारतीय
पाचवा किंवा त्याखालच्या क्रमांकावर येऊन ७५ पेक्षा जास्त धावा दोन्ही डावात करणारा रहाणे पतौडी आणि लक्ष्मणनंतर तिसरा भारतीय.
दोन्ही डावांतील पाचवा शतकवीर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या कसोटीत अजिंक्‍य रहाणेने दोन्ही डावांत शतके झळकावली. अशी कामगिरी होण्याची जगातील ६५ खेळाडूंची ८१वी घटना. भारताच्या विजय हजारे, सुनील गावसकर, राहुल द्रविड, विराट कोहली यांच्यानंतर रहाणे पाचवा. भारताच्या एकूण २८५ पैकी ७७ खेळाडूंनी ४५३ शतके झळकावली.
फलंदाज कामगिरी प्रतिस्पर्धी मैदान मोसम
विजय हजारे ११६-१४५ ऑस्ट्रेलिया ॲडलेड १९४७-४८
सुनील गावसकर १२४-२२० वेस्ट इंडीज पोर्ट ऑफ स्पेन १९७०-७१
सुनील गावसकर १११-१३७ पाकिस्तान कराची १९७८-७९
सुनील गावसकर १०७-१८२* वेस्ट इंडीज कोलकता १९७८-७९
राहुल द्रविड १९०-१०३* न्यूझीलंड हॅमिल्टन १९९८-९९
राहुल द्रविड ११०-१३५ पाकिस्तान कोलकता २००४-०५
विराट कोहली ११५-१४१ ऑस्ट्रेलिया ॲडलेड २०१४-१५
अजिंक्‍य रहाणे १२७-१००* आफ्रिका दिल्ली २०१५-१६.
’भारतासाठी हा सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाला ३२० धावांनी पराभूत करण्याचा विक्रम रचला होता.
*’तब्बल १३ वर्षांनी दक्षिण आफ्रिकेवर तीन किंवा त्यापेक्षा जास्त सामने सलग गमावण्याची वेळ आली. यापूर्वी एवढय़ा मोठय़ा फरकाने ऑस्ट्रेलियाने (२००६) त्यांना पराभूत केले होते.
*’अश्विनच्या कारकिर्दीमध्ये भारताने सहावेळा मालिका विजय मिळवला आहे, यापैकी पाचवेळा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
*’आशिया खंडामध्ये चौथ्या डावात सर्वाधिक (१४३.१) षटके खेळण्याचा व्रिकम दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात रचला आहे. *’रवींद्र जडेजाने पाचव्या दिवशी १७ सलग षटके निर्धाव टाकली. त्याने २०-३८ वैयक्तिक षटके निर्धाव टाकली. पण त्याला बापू नाडकर्णी यांचा विक्रम मोडता आला नाही. नाडकर्णीनी इंग्लंडविरुद्ध सलग २१ षटके निर्धाव टाकली होती.

**जाता जाता...या संपूर्ण मालिकेत डि’व्हिलियिर्सबद्दल भारतीय प्रेक्षकांनी दाखवलेला आदर खूप सुखावून गेला. कोण कुठल्या लांब आफ्रिकेतील एका माणसाला दुसऱ्या देशात असे प्रेम मिळते या पेक्षा वसुधैव कुटुंबकम या तत्त्वाची उत्तम साक्ष अजून कोणती? प्रत्येक वेळेस तो फलंदाजीला आल्यावर प्रेक्षकांनी त्याला उभे राहून अभिवादन केले. तेव्हा वाटले भारतीयांनी त्याला अनिवासी तेंडुलकरचा दर्जा बहाल केला आहे. या निमित्ताने भारतीय प्रेक्षकाच्या रसिकतेला दाद द्यायला हवी!

क्रिकेटआंतरराष्ट्रीयकसोटी क्रिकेट

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

8 Dec 2015 - 9:59 am | उगा काहितरीच

रोचक स्टॅट्स !

साधा मुलगा's picture

8 Dec 2015 - 11:11 am | साधा मुलगा

उत्तम माहिती, दिविलिअर्स ला दिलेली अनिवासी तेंडुलकर हि उपमा आवडली.
पाच दिवसांचा खेळ झाल्यामुळे मजा आली. राहणे तर प्रत्येक सामन्यागणिक आपली कामगिरी उंचावत आहे.
द. आफ्रिकेचा चिवट प्रतिकार वाखाणण्याजोगा होता.

शलभ's picture

8 Dec 2015 - 12:11 pm | शलभ

+१
पण शेवटचा "जाता जाता" इथून कॉपी मारलाय का? का तो तुमचाच लेख आहे?
http://www.loksatta.com/krida-news/blog-by-ravi-patki-on-india-south-afr...

नागेश कुलकर्णी's picture

8 Dec 2015 - 11:42 am | नागेश कुलकर्णी

उत्तम लेख,
द. आफ्रिकेच्या झुंझार प्रतिकाराच खरच खूप कौतुक केला पाहिजे.
ते जर प्रतिहल्ला करायला गेले असते तर सामना चौथ्या दिवशीच संपला असता.

आणि त्यांनी खेळ्परट्टीला दोष देण्याऐवजी खेळातुन खिलाडुवृत्ती दाखवली त्याला सलाम!
मला म्हणुनच इतर संघामधे वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका मनापासुन आवडतात.

चौकटराजा's picture

9 Dec 2015 - 1:42 pm | चौकटराजा

झटपट क्रिकेट आले आता कसोटी चे काय होणार याची चिंता लागलेल्याना ही कसोटी हे नामी उत्तर आहे.1सामना वाचवििणे हे सामना जिङ्क्ण्याच्या बरोबरीचे असते. हां सामना डी आफ्रिका वाचवती तर एक अजरामर सामना ठरला असता