दूर तू दूर मी का मनी हुर हूर ही
भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।।
का हे मन माझे तुझ्याशी बोलण्या आतुरले
का फुलांशी खेळण्याला श्वास ही आसावले
गीत आता तुच माझे ताल ही अन् सुर ही
भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।।
जे अपुरे वाटते ते स्वप्न का रे रंगले
का कळेना हे तुझे रे वेड मजला लागले
जीवनाचा अर्थ तु जरी अंत ही अंकुर ही
भेटण्याला का असे आतुर तू आतुर मी..।।
प्रतिक्रिया
7 Dec 2015 - 10:04 pm | सनईचौघडा
आवड्ली.
हुSSश दोन अवघड कवितांनंतर अशी सोपी कवीता हवीच होती.
7 Dec 2015 - 10:46 pm | टवाळ कार्टा
आज हा आयडी वाट्टे :)
7 Dec 2015 - 10:22 pm | एक एकटा एकटाच
वाह
7 Dec 2015 - 11:07 pm | अत्रुप्त आत्मा
छान
7 Dec 2015 - 11:41 pm | शार्दुल_हातोळकर
मस्त
8 Dec 2015 - 9:48 pm | माहीराज
धन्यवाद ...आपल्या प्रोत्साहनामुळे खूप प्रेरणा मिळते. ..