'आंतरजालावरील आवडते लेखक' हा तवा सध्या तापलेला बघून आमच्यासारख्या सामान्य वाचकाला देखिल आपली पोळी भाजून घ्यायचा मोह अनावर झाल आहे! काहीही म्हणा पण आवडते लेखक ह्यावर बोलणे आता, संजोप राव, तात्या, सर्किट ह्यांच्या उल्लेखाशिवाय अशक्यच झाले आहे. त्यामूळे नाईलाजास्तव आम्हाला ह्या तिघांच्या लेखनानेच सुरूवात करावी लागते आहे. तर सुरू करुया सं'जीए'प रावांपासून. सध्या ह्यांचे प्रस्थ आंतरजालावर भलतेच आहे. ह्यांच्या अनेक लेखांना भरघोस प्रतिसाद मिळत असले तरी ह्यांनी लिहीलेला आमच्या आवडीचा लेख म्हणजे पदार्पणात लिहिललेला तो तीन ओळींचा मनोरुग्णांवरील लेख. अहाहा 'सनातन.कॉम' वरती काय खळबळ उडवली होती तेव्हा. नंतर मात्र कधी ह्यांचे लिख़ाण ती पातळी गाठू शकले नाही हेच खरे. असो अधून मधुन मातीचे पाय सरखे अनुवाद वगैरे ते लिहीत असतात आणि आम्ही त्यांचा ब्लॉगवर जाऊन त्यांना (एकमेव) प्रतिसाद देखिल देतो. ह्यांची एक निश्चित शैली आहे राखुंडे, आठ्याळ हे असले शब्द वाचले की आयडी कुठलाही असला तरी लेखणी सरांचीच आहे हे बिनधास्त ओळखावे. त्याचबरोबर 'साखर भातावर अंडाकरी टाकणे' या सारखे अविस्मरणीय वाकप्रचार ह्यांनी मराठी भाषेला बहाल केले आहेत.
अर्थात संजोप रावांचा उल्लेख झाल्यावर तात्याकाकांचा अनुल्लेख करुन आम्हाला मिसळपाववर जाहिर भादरुन घ्यायची नाही आहे. तसे आम्हाला तात्याकाकांचे लेखन देखिल भयंकर आवडते आणि तात्यांचा उल्लेख सगळ्यांनी 'तात्याकाका' असा करावा असे आम्हाला मनोमन वाटते, कारण भाईकाकांनंतर महाराष्ट्रात कुणी व्यक्तिचित्रण हा प्रकार प्रभावीपणे हाताळला असेल तर तो आमच्या तात्याकाकांनीच. अर्थातच ह्यासाठी आम्हाला कुणा डॉक्टरीण बाईंकडून आलेल्या सुनिता ताईंच्या प्रमाणपत्राची गरज वाटत नाही. तात्यांनी शास्त्रिय संगीता विषयीच लिहावे (कारण त्यांना तेवढेच जमते) असल्या अर्थातच कुजकट विचारांशी आम्ही असहमत आहोत. 'ह्या चित्तोबावरच एखादे व्यक्तिचित्र लिहितो' असा विचार करणारे तात्यांची गंभीर मुद्रा असलेले छायाचित्र तर आम्ही जपून ठेवले आहे.
तात्यांकाकांना त्यांच्याच होम ग्राउंडवर, म्हणजे अर्थातच संगीत क्षेत्रात नडून आंतरजाल क्षेत्रात झालेले सर्किट ह्यांचे धडाकेबाज पदार्पण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. ह्यांचे पडीक ह्या शब्दाला लाजवणारे मराठी संकेतस्थळांवरील वास्तव्य, 'मराठी संकेत स्थळांवरील उखाळ्या पाखाळ्या' ह्या विषयाचा आपल्या पीएचडी विषयापेक्षा अधिक असलेला व्यासंग आणि त्यासाठी याहू नामक पाश्चात्त्य कंपनी कडून घेतलेला गलेलट्ठ पगार बघता त्यांच्या बुद्धिमत्तेचे आम्हाला अपार कौतुक वाटते. अर्थातच त्यांचा हा हिरव्या गार नोटांचा सत्यनारायण काही मंडळींच्या डोळ्यात चांगालाच खुपतो त्यातून बरीच खडाजंगी होते आणि आम्ही डबे डबे भरून पॉपकॉर्न नावाच्या लाह्या खात सगळ्याची मजा लुटतो.
तर मंडळी आमच्या सामान्य लेखणीतुन इतकेच उतरू शकले पॉलीटीकली करेक्ट राहण्यासाठी अत्यानंद वगैरे उल्लेख आवश्यक आहेत पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!!!
प्रतिक्रिया
20 Sep 2007 - 12:56 am | सर्किट (not verified)
तात्याकाकांच्या पावलावर आमचाही पंजा टाकून आमच्या आवडत्या लेखकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा लेख आम्ही लिहिणार असा मानस व्यक्त केल्या केल्या (धमकी दिल्यानंतर ?;-) अनेकांच्या प्रतिभेला घुमारे फुटलेले पाहून अतीव आनंद झाला.
आपल्याला मिसळपावाने पॉपकॉर्न खाण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे, ह्याबद्दल आम्हाला अधिकच आनंद होतो.
-सर्किट
20 Sep 2007 - 6:40 am | सहज
आवडले. मोजकेच पण कडक. ही मालीका सुरू होऊ दे.
20 Sep 2007 - 6:56 am | सन्जोप राव
आमच्या लिखाणाची विवेचनात्मक समीक्षा वाचून 'अत्त्यानंद' झाला. काही लोक याला 'झक्क बिनपाण्याने केली' असे म्हणतील असे म्हणतील, पण कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम है कहना. 'आठ्याळ राखुंडे' च्या बरोबरीने आम्ही 'कंडेच्छा, झब्बट, तंटाकंडी' हेही शब्द मराठी भाषेला बहाल केले आहेत, असे नम्रपणे नमूद करु इच्छितो. अधिक माहितीसाठी आमचे खाजगी सचिव वैद्यबुवा यांच्याशी संपर्क साधावा. आमचे धोतर केंव्हा खेचता येते हे बघण्यासाठी ते या अशा प्रकारच्या विदावर लक्ष फार बारीक ठेवून असतात.
सन्जोप राव
20 Sep 2007 - 7:01 am | नंदन
हाही 'अण्णू झाला काय रे?' च्या तोडीचाच वाक्प्रचार विसरुन चालणार नाही :)
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
20 Sep 2007 - 8:23 am | आजानुकर्ण
बापरे.
20 Sep 2007 - 8:48 am | विसोबा खेचर
संजोप राव, तात्या, सर्किट ह्यांच्या उल्लेखाशिवाय अशक्यच झाले आहे. त्यामूळे नाईलाजास्तव आम्हाला ह्या तिघांच्या लेखनानेच सुरूवात करावी लागते आहे.
खरं आहे. अहो गावकीचं राजकरण! दुसरं काय? :)
तर सुरू करुया सं'जीए'प रावांपासून.
त्याचबरोबर 'साखर भातावर अंडाकरी टाकणे' या सारखे अविस्मरणीय वाकप्रचार ह्यांनी मराठी भाषेला बहाल केले आहेत.
अंडाकरीचा वाक्प्रचार सहीच आहे. जीए ही रावशेठच्या कपाळावरील भळभळती जखम आहे! (अरेरे वाक्य फारच साहित्यिक झालं का?) :)
तात्यांनी शास्त्रिय संगीता विषयीच लिहावे (कारण त्यांना तेवढेच जमते) असल्या अर्थातच कुजकट विचारांशी आम्ही असहमत आहोत.
धन्यवाद. याचा अर्थ आम्ही 'सहमत आहोत' असाच घेतो...:)
अर्थातच त्यांचा हा हिरव्या गार नोटांचा सत्यनारायण काही मंडळींच्या डोळ्यात चांगालाच खुपतो त्यातून बरीच खडाजंगी होते आणि आम्ही डबे डबे भरून पॉपकॉर्न नावाच्या लाह्या खात सगळ्याची मजा लुटतो.
हम्म! खरं आहे. सर्कीटने अमेरिकेत पैसा कमवून नागपुर आणि परिसरात संत्र्यांच्या बागाच्या बागा खरेदी केल्या आहेत ही गोष्ट बर्याच जणांच्या डोळ्यात खुपते! :)
असो..
वरूणराव लिहिते रहा, लिहीत रहा! तुमच्यात आम्हाला भावी 'ऐहिक' दिसतो आहे! , सॉरी दिसते आहे! :)
आपला,
(भेदरलेला व भादरलेला) तात्या.
अशोक गोडबोले साहेबांना 'वाद माझे, वेद माझे' ही ओळ आम्हीच सुचवली होती! :))
22 Jul 2010 - 7:09 pm | क्रेमर
हा लेख ऐतिहासिक ठेवाच आहे.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.