जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात .किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग , भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात . तेव्हा कर्म हे काही टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच ( Cause will have an effect or every effect has a cause ) मग जन्म व मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा ? हा तिढा सुटणार तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा ?
पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि कर्म घडतात तरी कशी ? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे ? विचार केला कि लक्षात येते कि कर्माचे मूळ ' इच्छा ' हे आहे . इच्छाच कर्मेंद्रियांना कर्म करण्यास भाग पाडते. मग ‘ इच्छा ’ कुठून उत्पन्न होते ? तर ती मनातून उत्पन्न होते . म्हणजेच सर्व कर्मांचे मूळ हे आपले मन आहे . मनात इच्छा का उत्पन्न होतात ? मन हे अहं भावनेने भरलेले असते. ते सतत आपले अस्तित्व दाखवण्या साठी झघडत , धडपडत असते . आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते सतत इच्छा निर्माण करत असते व कर्म घडवून आणत असते . मन हे इच्छे वरच जगते . कर्मांच्या फालावारच ते जगते व पोसले जाते . कर्म संपली की मनाचे अस्तित्वच संपले . वेदांत व संतांची उक्तीच आहे की ' मन ' मेले की ' अहं किंवा ' मी ' मारतो , ' मी ' मेला की कर्म कसे घडणार ? घडणारच नाही ! , आणि कर्माच जर संपले तर फळ कोठून येणार ? फळच नाही तर ते भोगायला जन्म कुठचा ?
आपण वर पहिले की कर्म कसे घडते . पण कर्म म्हणजे नेमके काय ? त्याची संज्ञा काय ? हे पडताळण्याचा प्रयत्न करू ? समजा की तुम्ही या जगात एकटेच आहात दुसरे कुणीच नाही ! मग तुम्ही खाता , पिता , झोपता ,चालता , फिरता , विश्रांती घेता तेव्हा कर्म घडते का ? नाही घडत ! हे कर्म जरी असले तरी ते वेदांतात अपेक्षित असलेल्या कर्मांच्या संज्ञेत बसत नाहीत . तेव्हा ही कर्मे नव्हेत . आता समजा तुम्ही चालला आहात . चालता चालता तुम्हाला एक मुंगी दिसली व तुम्ही तिला ठेचलीत तर हे मात्र कर्म झाले . किंव्हा तुम्ही समुद्र किनार्यावर फिरत असताना एक व्यक्ती बुडताना पाहून तुम्ही त्या व्यक्तीला बुडण्यापासून वाचविलेत तर हे सुद्धा कर्म या संज्ञेस पात्र ठरते . तेव्हा विचार केल्या वर लक्षात येईल की कर्म घडण्या साठी त्या कर्माचे संस्कार एकापेक्षा अधिक जीवांवर घडले पाहिजेत . तेव्हाच कर्म घडते . हे असे आपले मला वाटते , तुम्हाला ते पटेलच किंव्हा पटलेच पाहिजे असे नाही . पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या .
आता आपण पहिले की , मनातल्या ' मी ' ला मारले की मन मरते . मन मेले की कर्म घडत नाही . मग मनाला मारावे म्हणजे काय ? व ते कसे करावे ?
कठ उपनिषदांत सांगितल्या प्रमाणे कर्म ही दोन प्रकारची असतात . एक असते ' श्रेयस कर्म ' व दुसरे असते ' प्रेयस कर्म ' . जीवाने कोणत्या कर्माचा आचार करावा हे सर्वस्वी त्याच्या हातीच असते .मनाचा कल हा नेहमी प्रेयासाकडे असतो . तो प्रथम श्रेयासाकडे वळवायला हवा कारण प्रेयासामधून फक्त विषय सुखाची प्राप्ती होते व ' मी ' ची लालसा वाढते . मग मन श्रेयस कर्मा कडे कसे वाळवावे ? तर ते विवेकाने वाळवावे . विवेक बुद्धीत असतो पण बुद्धिलाच जर मानतील विषयांनी ग्रासले असेल तर विवेक कसा टिकेल ? विवेक हे एकमेव शस्त्र आहे जे मनावर विजय मिळवून त्या ' मी ' ला मारण्यास समर्थ आहे . ते नसेल तर काही उपयोग नाही . मग हे शस्त्र मिळवावे कुठून ? संत संगतीने व सद्गुरुंनी दिलेल्या नामांत राहूनच ते मिळवता येते . ते एकदा मिळाले की श्रेयसचा प्रेयासावर विजय मिळवता येतो . तो विजय मिळवला की ' मी ' मेलाच म्हणून समजा . ' मी ' मेला की मनाचे अस्तित्व संपलेच की हो ! मन संपले की द्वैत संपते , द्वैत संपले की कर्मा नष्ट होतात . एकट्याने का कर्म होतात ? जिथे अद्वैत आहे , तिथे कोठला ' मी ' नी कसले कर्म ? , कसला जन्म आणि कसला मृत्यू ? कोठेच काहीच नाही !
संत सोहिरोबानाथ म्हणतात तसे .....
आलो नाही , गेलो नाही I मध्ये दिसणे हे भ्रांती I
जागृत होता स्वप्नची हरपे I कर्पूरन्याये जग हरले I
https://www.blogger.com/blogger.g?blogID=7651279905318854206#editor/targ...
प्रतिक्रिया
27 Nov 2015 - 4:44 pm | आतिवास
की कोणतंही तत्त्वज्ञान, सिद्धान्त, विचार यांच्याकडे ते अंतिम सत्य आहे अशा दृष्टीने पाहिल्यास अडचण येते. असे विचार हा एक दृष्टिकोन असतो, त्याचा आपल्याला उपयोग होत असेल तर उत्तम, अन्यथा आपल्यासाठी काय इष्ट आहे याचा शोध घेत राहावं लागतं. कर्म सिद्धान्त एक दिशादिग्दर्शन करणारी पाटी आहे - गन्तव्यस्थान नाही.
विवेकानंद ज्ञानयोगात म्हणतात (नेमके शब्द नाहीत माझ्याजवळ आत्ता - माझ्या शब्दांत आशय) - सगळे प्रश्न मायेच्या राज्यात आहेत, आपल्याला मायेचा भेद करता आला, तर हे प्रश्न संपतील.
27 Nov 2015 - 5:19 pm | संदीप डांगे
अगदी बरोबर. सर्व मिमांसा, थेर्या ह्या फक्त साधनमार्ग आहेत. साध्य नाही.
27 Nov 2015 - 6:39 pm | मूकवाचक
All doubts will cease only when the doubter and his source (Swarupa) have been found. There is no use removing doubts. If we clear one doubt, another doubt will arise and there will be no end to doubts. But if the doubter is found, all doubts will cease. - Ramana Maharshi
27 Nov 2015 - 5:33 pm | शिव कन्या
आपण सगळ्याला कसे react होतो त्यावर बरंच आहे.
ism हा ism असतो , जगणे जगणे.
27 Nov 2015 - 6:14 pm | याॅर्कर
समजा 1920 साली भारताची लोकसंख्या 40 कोटी होती,म्हणजे 40 कोटी आत्मे होते.आता ही लोकसंख्या 125 कोटी आहे,म्हणजे 125 कोटी आत्मे आहेत.
मग प्रश्न असा आहे कि या मधल्या कालावधीत 85 कोटी अॅडिशनल आत्मे कुठे होते?आणि पुढे ते वाढतच जाणार आहेत.पण आत्म्याचे विभाजन तर होऊ शकत नाही,(नैनं छिन्दन्ति शस्त्राणि) मग हे वाढीव आत्मे कसे आले?
मनुष्यास परत मनुष्ययोनीमध्येच जन्म मिळतो,कितीही वाईट कर्मे केली तरी, असे एका सत्संगात ऐकले आहे.
.
.
.
.
.
म्हणजे असे कि आत्मे हे एका fix quantity मध्ये आहेत कि नाही?उदा. 100 कोटी वगैरे.
आणि दुसरा प्रश्न असा कि ख्रिश्चन,इस्लाम,बौद्ध इत्यादी धर्मीयांचे आपल्यासारखेच असते का? म्हणजे कर्म,पुनर्जन्म याबतीत कि त्यांची स्क्रिप्ट वेगळी आहे.
अर्थात फक्त हिंदूनाच कर्म आणि जन्म जन्मांतराच्या फेर्यात अडकून पडावं लागतं का?आणि असे असेल तर इश्वराने हिंदूच्या बाबतीत अशी असहिष्णुता का दाखवावी?
27 Nov 2015 - 6:25 pm | संदीप डांगे
या प्रश्नाचं तर अगदी वैज्ञानिक उत्तर देता येईल.
जगात जितके सजीव आहेत तितके आत्मे असे समजले तर ह्या माणसांच्या संख्येला अर्थ राहत नाही. विश्वात काही निर्माण होत नाही काही नष्ट होत नाही हा नियम सुद्धा लक्षात ठेवावा.
(सत्संगात बरेच लोक मनगढंत ठोकून देतांना बरंच ऐकले आहे. त्यांच्याकडे इतके लक्ष देऊ नये. जे पैसे घेऊन सत्संग घेऊन प्रवचन ठोकतात त्यांना तर सरळ बॉयकॉट करावे असे माझे व्यक्तिगत मत आहे. कारण ते देतात ते खरे ज्ञान नाही, मनोरंजन आहे.)
27 Nov 2015 - 6:46 pm | याॅर्कर
??????
अध्यात्मिक उत्तर हवे
27 Nov 2015 - 6:59 pm | संदीप डांगे
???
अध्यात्मिक म्हणजे गोल गोल घुमवणारे, बोजड शब्द असलेले, लोक परलोक सारख्या कल्पना सांगणारे, असे? कसे असते आध्यात्मिक उत्तर, तुम्हीच जरा सँपल दाखवा.
27 Nov 2015 - 8:21 pm | याॅर्कर
मला माहित असते तर,मी प्रश्न कशाला विचारला असता?
धागाकर्त्याने उत्तर द्यावयास हरकत नाही.
धागा काढायचा आणि पसार व्हायचं म्हणजे काय म्हणायचं.
27 Nov 2015 - 8:23 pm | संदीप डांगे
;-)
28 Nov 2015 - 10:12 am | विश्वव्यापी
आपल्याला छांदोग्य उपनिषद तुमच्या प्रश्णाचे उत्तर मिळेल
28 Nov 2015 - 10:53 am | विश्वव्यापी
तुमच्या प्रश्णाचे सविस्तर उत्तर छांदोग्य उपनिषदांत तुम्हाला मिळेल
28 Nov 2015 - 12:06 pm | याॅर्कर
इथे सविस्तर सांगितला तर बरे होईल.
29 Nov 2015 - 11:57 am | विश्वव्यापी
दुसरा लेख लिहिण्यात बिझी असल्या मुळे तुमचे मनोगत पुढे कधितरी पूर्ण करू
27 Nov 2015 - 9:03 pm | प्रसाद गोडबोले
नमस्कार विश्वव्यापी ,
धागा वाचला . एक प्रेमळ सुचना आहे : आपण एक दोनदा "असे वेदांत सांगतो " किंवा " असे कंठोपनिषदात म्हणले आहे" असा उल्लेख केलेला आहे . असा उल्लेख करताना कृपया रीतसर रेफरन्स द्यावा . हे सर्व साहित्य अता अंतर्जालावर उपलब्ध आहे , आपला रेफरन्स योग्य आहे की नाही हे पडताळुन पहाता आले पाहिजे सर्वांन्ना म्हणजे आपण जे काही अनुमान काढत आहात त्याची चिकित्सा करता येईल !
उगाच असे वेदांताच्या बाबतीत व्हायला नको =))
27 Nov 2015 - 9:39 pm | विश्वव्यापी
आपली सुचना जरूर अंमलात आणू
29 Nov 2015 - 9:14 am | स्वप्नांची राणी
बुडणार्या माणसाला वाचवून त्याचे कर्मं, अनुषंगाने त्याचे फल आणि अनुषंगाने त्याचे जन्म-मृत्युचे फेरे वाढवत का ठेवावेत...? ....प्रश्न निरागस हो....
29 Nov 2015 - 11:11 am | संदीप डांगे
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन...
29 Nov 2015 - 11:27 am | संदीप डांगे
प्रश्न निरागस असला तरी जैनांमधला कोणता तरी पंथ हा विचार फार निष्ठूरपणे अमलात आणतो. म्हणजे रस्त्यात कोणी मरत असेल तर त्याला वाचवू नये. तो वाचला आणि त्याने पुढे काही दुष्कृत्य केलीत तर त्याचे 'कर्म' तुमच्या खात्यातही शेअर होते आणि हकनाक तुम्ही परत जन्ममरणाच्या फेर्यात अडकता. पण यातली प्रमुख गडबड बहुधा अजूनही त्यांच्या लक्षात आली नाही की तुमच्या कर्मफलानुसार त्या व्यक्तिस वाचवणे तुमचे प्राक्तन असेल व त्यायोगे तुम्ही याच जन्मात मुक्त होणार असाल तर? कर्माचे कुठले अकाउंट स्टेटमेंट जन्मासोबत मिळत नसल्याने जग कायमच याबाबतीत भ्रमित राह्यलेलं आहे.
म्हणून भगवंत म्हणतात, 'कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन.' ;-)
29 Nov 2015 - 11:47 am | विश्वव्यापी
29 Nov 2015 - 11:48 am | विश्वव्यापी
29 Nov 2015 - 11:48 am | विश्वव्यापी
29 Nov 2015 - 10:14 am | जेपी
शेंच्युरी बद्दल श्री.विश्वव्यापीजींचा सत्कार धन्यवाद देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छक - जेपी आणी तमाम धन्य(तो)वादप्रेमी कार्यकर्ते.
1 Dec 2015 - 7:35 am | विश्वव्यापी
जेपी जी आणि तमाम प्रतिसाद देणारी मीपा वरिल सदस्य,
यांचा मी मना पासुन आभारी आहे.
Thanks :-))