वंदन भक्ती आणि पुणेरी षड्यंत्र

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
21 Nov 2015 - 8:48 pm

करावें देवासी नमन I संत साधू आणि सज्जन I नमस्कारीत जावे I
नमस्कारें सख्य घडे I नमस्कारें मोडली जडती I समाधानें I

समर्थ म्हणतात वंदन भक्ती सर्वात सौपी आणि सरळ आहे. वंदन करण्यासाठी एक दमडी सुधा लागत नाही. काही साधन सामग्री ही लागत नाही. कुणालाहि हात जोडून आदराने नमस्कार केल्याने आपण त्याला प्रिय होतो. बिघडलेले कार्यहि मार्गी लागते.

आपण रोज पाहतोच, आपण जेंव्हा कुणाला नमस्कार करतो, त्याचा चेहरा आनंदाने उजळतो. प्रतिउत्तर म्हणून तोहि आपल्याला नमस्कार करतो. दोघेही प्रसन्न होतात. आपण कुणाला नमस्कार केला आणि त्याने प्रतिउत्तर दिले नाही तर पुढच्या वेळी आपण त्याला नमस्कार करणार नाही. किंबहुना तो व्यक्ती जर समोरून येत असेल तर आपण त्याची नजर चुकवून पुढे निघून जाऊ. सरकारी कार्यालयात असे दृश्य नेहमीच दिसते. कर्मचार्यांच्या नमस्काराला उत्तर न देणाऱ्या अधिकार्याला समोरून येताना पाहून कर्मचारी मार्ग बदलतात किंवा त्याची नजर चुकविण्याचा प्रयत्न करतात. कर्मचार्यांचे सख्य किंवा निष्ठा या अधिकारीला प्राप्त होत नाही. तसेंच जो कर्मचारी कुणालाहि नमस्कार करीत नाही किंवा नमस्काराला प्रतिउत्तर देत नाही, त्याच्या बरोबर अन्य कर्मचारी बोलणे सोडून देतात. काही काळाने अशी परिस्थिती येते कि हा कर्मचारी आपल्या विभागात कार्यरत आहे, अधिकांश सहकर्मीनां माहितच नसते.

एक प्रश्न आपल्या डोक्यात आला असेलच, वंदन भक्तीचा पुणेरी षड्यंत्रशी काय संबंध?

माझा एक पुणेरी मित्र दिल्लीत काही कामासाठी आला होता, हक्काने घरी उतरला. दिनांक १.११.२०१५ वेळ संध्याकाळची, सात वाजून काही मिनिटे. संध्याकाळी चहा पिता- पिता घरगुती गप्पा गोष्टी सुरु झाल्या. काळ, वेळ न बघता, मला काय वाटेल याचा विचार न करता, माझ्या मराठीतील चुका दाखविण्याचे कार्य माझा हा मित्र नेहमीच न चुकता करतो. पण त्या दिवशी सहज बोलता-बोलता म्हणाला विवेक तुझ्या मराठीत बरीच सुधारणा झाली आहे.

कुणी आपली प्रशंसा केली तर आपण प्रसन्न होतोच आणि त्यातूनहि कुणी पुणेकराने प्रशंसा केली तर काय म्हणावे, हवेवर तरंगूच लागलो. नसलेली छाती ५६ इंच फुलवत उतरलो, आजकाल आमी नुसतेच बोलत नाहीत, मराठीत लिवू बी लागलो आहे. तो लगेच सावध झाला आणि म्हणाला लिहिणे वाचणे हे रिकामटेकडे लोकांचे काम, आमच्या सारख्यांजवळ टाईम कुठे, मराठी लिहिण्या वाचण्यासाठी. मी लगेच उतरलो, अब नमक खा ही रहे हो, तो अपुन का ब्लॉग भी देखना पड़ेगा. कम्प्युटर उघडून आपला ब्लॉग आणि मिसळपाव दाखविले. सहज त्याचे लक्ष्य 'तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?' या लेखावर गेले. च्यायला अंतर्जालावर लोक डुप्लिकेट नावांनी लिहितात, प्रतिसाद हि डुप्लिकेट नावांनी देतात. मी म्हणालो असे नव्हे, लोक खर्या नावांनी हि लिहितात. काही लोक खर्या आणि डुप्लिकेट दोन्ही आयडीने लिहितात. शिवाय आपले विचार निर्भिकपणे मांडण्यासाठी हि काही लोक डुआयडी घेतात. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो विचित्र हसत म्हणाला 'तुझ्याहि दोन-चार डुआयडी असतीलच'. त्यांच्या वापर कर. तुला आवडणाऱ्या १५-२० आयडी टंकून टाक, त्यात तुझे नाव पण टाक. कुणी न कुणी परतफेड म्हणून तुझे नाव हि त्याच्या आवडत्या आयडीत टंकेल. मी शांतपणे म्हणालो, मला दुहरेपणाने जगता येते नाही. माझी कुठलीही डुआयडी नाही. मग ३०-४० आयडी आवडल्या म्हणून टंकून टाक, दोन-चार लोक तरी तुला लाईक करतील', नाहीतर तुझ्या सारख्या बकवास लेखकाला कोण लाईक करेल. मी रागानेच म्हणालो तू कधी माझा कुठला लेख किंवा गोष्ट वाचली आहे का? 'नाही म्हणूनच तर म्हणतो, कशाला नाराज होतो, साधा व्यवहार आहे, अहो रूपं अहो गान गाढवाने केली कावळ्याची प्रशंसा. कशी वाटली तुकबंदी. 'अंतर्जालावर तुम्ही एका दुसर्याची पाठ थोबडून घेणार'. (सौ. नेहमीच म्हणते, तुझे सगळे मित्र एकापेक्षा एक दिव्य आत्मा आहेत, कुठे भेटतात तुला असली भुते, काय म्हणणार, एकेकाचे नशीब). त्याला अक्षरश: हात जोडत म्हणालो, बाबारे मी कुठल्याहि आयडीला लाईक करणार नाही. तो म्हणाला, मग तुला हि कुणी लाईक करणार नाही. हा मानवीय स्वभाव आहे. या वर हि कुणी तुला लाईक केले तर म्हणता येईल. तुझ्या लेखनात काही दम आहे. हं! आणखीन एक, पुढच्या १०-१२ दिवस मिसळपाववर फिरकू पण नको. नाही तर दोन-चार न कळणाऱ्या कविता टंकशील, वाचून कुणीतरी तुला लाईक करेल. मी उतरलो, उद्या पासून घरात डागडुजी, रंग-रोगन, सफेदीचे काम सुरु करणार आहे. नंतर दिवाळी. मिसळपाव तर सोडा, पुढे १०-१५ दिवस अंतर्जालावर हि फिरकायला वेळ मिळणार नाही. नरक चतुर्थी पर्यंत घरात काम सुरु होते. तरीही मित्राला दिलेला शब्द पाळला अंतर्जालावर फिरकलो ही नाही. दिवाळी नंतर हळूच मिपावर डोकावून आयडीवाला लेख बघितला.मित्राचे म्हणणे खरेच होते.

आज दिनांक २१.११.२०१५, त्याचा फोन आला, विवेक हा! हा! हा! हा! गाढवा सारखा 'हसतोस कशाला'. अरे आज मिसळपाव उघडून आयडी वाला लेख वाचला, हा!हा! हा! कुणाला हि तुझी आयडी आवडलेली नाही. मूर्ख लेकाचा, स्वत:चे नाक कापून घेतले. हा! हा! हा! अरे आम्ही पुणेकर म्हणजे काय चीज आहे, माहित नाही का तुला? एक नंबरी चिक्कू, कुणी दहा वेळा आमची प्रशंसा केली तर आम्ही एकदा करू. उगाच माझे ऐकले. वाईट वाटते रे, तुझ्या सारख्या महान, विद्वाआआन, लेखकूला कुणीच ओळखत नाही रे. मरगळलेल्या आवाजात त्याला म्हणालो, मीहि कुणाला लाईक केले नाही म्हणून दुसर्यांनी हि माझे नाव घेतले नाही. त्यात एवढे वाईट वाटण्यासारखे काय. 'कुठेतरी जळण्याचा वास येतो आहे', म्हणत त्याने फोन ठेवला. मनातल्या मनात त्याला शिव्या देत कम्प्युटर उघडला. मिपावर आयडीवाला लेख वाचला, पण कुणीही चुकून सुद्धा आपले नाव घेतलेले नाही, हे लक्ष्यात आले. रेकवर ठेवलेल्या दासबोधाच्या पुस्तकाकडे लक्ष गेले. माझ्या प्रिय (?) मित्राने मला हातोहात बनविले होते. आता तिखट मीठ लाऊन हि कथा आणखीन दहा मित्रांना सांगणार. माझा सनकी स्वभाव मला भोवला आणि त्याच्या जाळ्यात सहज अडकलो. पण 'अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत'.

विडंबनविचार

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

21 Nov 2015 - 8:53 pm | DEADPOOL

खरं आहे!!!
मस्त लिहिलय!!!

अहो विप साहेब! कुणीच तुम्हाला विसरलं नाहीये. एक सच्चे आस्तिक म्हणून तुम्ही आमच्या हृदयात आहातच. फक्त काय आहे! इतर लोकांच्या धाग्यावर प्रतिसाद नै दिलेत तर ते लोक्स नाराज होतात. बाकी काय नै. एक सच्चे आस्तिक म्हणून मी तर तुम्हाला ओळखतोच. सध्या चना जोर गरमवाला आणि गारवा या नास्तिक मंडळींनी चालवलेला उच्छाद बघून तर तुमची जास्तच आठवण येते. या परत.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 9:10 pm | संदीप डांगे

लॉजिक गंडलंय... कि गम्मत म्हणून लेख टाकलाय?

सर्वांना आवडलेल्या टॉपटेन आयडींमधली टॉप ३ नावं कुणालाही अहो रुपं अहो ध्वनिं करायला जात नाहीत हे वर्षाच्या अनुभवावरुन सांगतो. बाकी, लेख गमतीत असेल तर असो.

भाऊंचे भाऊ's picture

21 Nov 2015 - 9:25 pm | भाऊंचे भाऊ

हे हे असले लेख लिहाल तर कुठला आयडी आवडतोमधे कोण तुपन का नाम लेंगा ?

प्रभाकर पेठकर's picture

21 Nov 2015 - 9:46 pm | प्रभाकर पेठकर

त्या धाग्यावर प्रतिक्रिया न देणार्‍यांचा अजून एक गट असतो. ज्यांना मुळात तो धागाच पसंत नसतो. मग ते कोणाचेही नांव घेत नाहीत. वाईट कशाला वाटून घ्यावे? तुम्ही लिहीत राहा. जोपर्यंत लोकं तुमचे लेखन आवर्जून वाचून प्रतिक्रिया देत आहेत तो पर्यंत तुमचे लेखन इतर वाचकांना आवडते/पटते आहे.

कंजूस's picture

22 Nov 2015 - 7:31 am | कंजूस

फटाका फुटला नाही तर दु:ख( फारच जड शब्द झाला )कुणाला होतं?आणि वाजल्यावर कुणी ऐकलंच नाही तर?यावर एक निरूपण करता येईल काय?

जव्हेरगंज's picture

22 Nov 2015 - 8:16 am | जव्हेरगंज

(सौ. नेहमीच म्हणते, तुझे सगळे मित्र एकापेक्षा एक दिव्य आत्मा आहेत, कुठे भेटतात तुला असली भुते, काय म्हणणार, एकेकाचे नशीब). >>>> हा हा

तुझ्या लेखनात काही दम आहे. हं! आणखीन एक, पुढच्या १०-१२ दिवस मिसळपाववर फिरकू पण नको. नाही तर दोन-चार न कळणाऱ्या कविता टंकशील, >>>> ही ही ही ही

दिनांक १.११.२०१५ वेळ संध्याकाळची, सात वाजून काही मिनिटे. >>>>>> हे हे हे

आनंद कांबीकर's picture

22 Nov 2015 - 8:58 am | आनंद कांबीकर

जव्हेरभौ चे हसु षड़ंत्रि वाटून राहीलेन् भौ!

श्रीरंग_जोशी's picture

22 Nov 2015 - 9:18 am | श्रीरंग_जोशी

मिपावरचा कुठला लेखक तुम्हाला आवडतो असा धागा असता तर तुमचे नाव प्रतिसादांत अनेकदा आले असते.
आयडी आवडण्यासाठी त्याचे इतरांबरोबरचे (स्वतःच्या लेखांबाहेरचे) वर्तन आवडायला हवे.

विवेकपटाईत's picture

22 Nov 2015 - 11:32 am | विवेकपटाईत

हि खरोखर घडलेली घटना आहे, बाकी वंदन भक्तीशी या घटनेशी तुलना केली आहे. गम्मत म्हणून वाचा, सिरीयसली घेऊ नका. बाकी घरात चालू असलेले कार्य आणि बदलत्या मौसम मुळे उद्भवलेल्या स्वास्थ्य संबंधित समस्यांमुळे अंतर्जालावर जास्त वावरता नाही आले. असो.