जंटलमन्स गेम - ३ - इंडेक्स फिंगर या माझ्या लेखावर आलेल्या एका कॉमेंटमध्ये आमच्या बोकोबांनी इंग्लिश टेस्ट क्रिकेटर आणि अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ हा रे इलिंगवर्थचा मुलगा होता का असा प्रश्नं केला होता. अनेक वर्ष माझीही समजूत रिचर्ड हा रे इलिंगवर्थचा मुलगा होता अशीच होती, पण सहज म्हणून तपासल्यावर प्रत्यक्षात दोघांचा काहिही संबंध नसल्याचं आढळून आलं! त्या निमित्ताने क्रिकेटमधील घराणेशाहीवर थोडाफार प्रकाश टाकावा असा विचार मनात आला.
घराणेशाही हा विशेषतः भारतीय राजकारणातला अगणित वेळा चर्चा झालेला विषय! येनकेनप्रकारेण सत्ता आपल्या घरातच राहवी, निदान कुटुंबात राहवी या हेतूने राजकारणी आपल्या बायको, मुलगा, मुलगी, सून, जावई, पुतण्या यांना राजकारणात पुढे आणण्याचा सतत प्रयत्न करत असतात! अर्थात राजकीय लायकी किंवा राजकारणाची जाण असणं हा त्यातला सगळ्यात गौण मुद्दा! त्यातूनच बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर राबडीदेवीला पाहण्याची आपल्यावर वेळ येते!
क्रिकेटसारख्या खेळात मात्रं घराणेशाहीमुळे एकवेळ संधी मिळू शकते, परंतु बाकीचं स्वतः खेळाडूवर आणि त्याच्या क्षमतेवर अवलंबून असतं. अर्थात अनेकदा बाप किंवा काका/मामा सिलेक्शन कमिटीत असल्याचा फायदा होतोच (सर्वात क्लासिक उदाहरण स्टुअर्ट बिन्नी!), परंतु त्यासाठीही किमान हाता 'गोटी-ब्याट' धरता येणं आवश्यक असतं!
क्रिकेटच्या इतिहासात पार डॉ. डब्ल्यू जी ग्रेसपासून (आद्य दाढीदिक्षीत - इति शिरीष कणेकर) ते आजतागायत अनेक बाप-बेटे, सख्खे आणि सावत्रं भाऊ, भाऊ-बहिण, मेव्हणे-मेव्हणे, आजोबा-नातू आणि चक्कं नवरा-बायकोही आपापल्या देशाकडून खेळले आहेत! काही जण टेस्ट क्रिकेटमध्ये एकत्र किंवा वेगवेगळ्या काळात गाजले तर काही जणांमध्ये दोन-तीन पिढ्यांचंही अंतर पडलं आहे! इतकंच नव्हे तर काही खेळाडूंचे नातेवाईक अंपायर म्हणूनही गाजले! अनेकांना केवळ एका टेस्टचा टिळा लागला, पण टेस्ट प्लेअर म्हणून ते कायम ओ़ळखले जातात!
टेस्ट
टेस्ट मॅच खेळलेल्या बापाची एक नव्हे तर दोन मुलं टेस्टमध्ये खेळल्याची तीन उदाहरणं आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासात झाली आहेत.
लाला अमरनाथ आणि दोन मुलं - सुरिंदर आणि मोहिंदर अमरनाथ!
जेफ मार्श आणि दोन मुलं - शॉन आणि मिचेल मार्श
आणि सर्वात इंटरेस्टींग म्हणजे
वॉल्टर हॅडली आणि दोन मुलं - डेल हॅडली आणि सर रिचर्ड हॅडली!
वॉल्टर हॅडलीचा तिसरा मुलगा आणि डेल आणि रिचर्डचा मोठा भाऊ बॅरी हॅडली दोन वनडेमध्ये न्यूझीलंड्कडून खेळला आहे. रिचर्डची बायको कॅरन हॅडली न्यूझीलंडच्या महिला संघाकडून एक वनडे खेळली आहे!
टेस्ट खेळलेल्या बाप-बेट्यांच्या घराण्यातलं एक मजेशीर उदाहरण म्हणजे हर्न घराण्याचं!
फ्रँक हर्न इंग्लंडकडून दक्षिण आफ्रीकेविरुद्ध टेस्टमध्ये खेळला. पुढे दक्षिण आफ्रीकेत सेटल झाल्यावर तो दक्षिण आफ्रीकेकडून इंग्लंडविरुद्ध टेस्ट खेळला! १८९१-९२ मध्ये केपटाऊनच्या टेस्टमध्ये फ्रँक दक्षिण आफ्रीकेकडून तर त्याचे दोन सख्खे भाऊ अॅलेक हर्न आणि जॉर्ज गिबन्स हर्न आणि चुलतभाऊ जॉन हर्न इंग्लंडकडून खेळले! फ्रँकचा मुलगा जॉर्ज आल्फ्रेड हर्न दक्षिण आफ्रीकेकडून टेस्ट खेळला!
टेस्टमध्ये खेळलेले इतर बाप - बेटे
ऑस्ट्रेलिया
नेड ग्रेगरी - सिड ग्रेगरी
नेड आणि डेव्ह ग्रेगरी ही क्रिकेटच्या इतिहासात १८७७ च्या पहिल्या टेस्टमध्ये एकत्रं खेळलेली सख्ख्या भावांची पहिली जोडी! नेडचा जावई हॅरी डोनन आणि नेड आणि डेव्हचा पुतण्या म्हणजे जॅक ग्रेगरी!
भारत
इफ्तीकार अली पतौडी (इंग्लंड - भारत) - मन्सूर अली खान पतौडी (भारत)
(आपलं नशीब सैफ क्रिकेटच्या भानगडीत पडला नाही! पण बॉलिवूडमध्ये जाऊन उच्छाद मांडलाच! असो!)
विजय मांजरेकर - संजय मांजरेकर. विजय मांजरेकर हा दत्ता हिंदळेकरांचा भाचा!
दत्ता गायकवाड - अंशुमन गायकवाड
विनू मंकड - अशोक मंकड
पंकज रॉय - प्रणब रॉय. पंकज रॉयचा पुतण्या अंबर रॉयही भारतासाठी टेस्ट खेळला.
हेमंत कानेटकर - हृषिकेश कानेटकर
योगराज सिंग - युवराज सिंग
रॉजर बिन्नी - स्टुअर्ट बिन्नी (नशीब आपलं! दुसरं काय?)
पाकिस्तान
जहांगीर खान (भारत) - माजिद खान (पाकिस्तान) - बाझिद खान (पाकिस्तान - माजिदचा मुलगा)
जहांगीर खानचा मेव्हणा म्हणजे बाका जिलानी! (विझी-सीके नायडू फेम). माजिद खानचे मावसभाऊ म्हणजे जावेद बर्की आणि इमरान खान!
वझीर अली (भारत) - खालिद वझीर (पाकिस्तान). वझीर अलीचा भाऊ नाझीर अलीही भारताकडून टेस्ट खेळला आहे.
नजर महंमद - मुदस्सर नजर
हनिफ महंमद - शोएब महंमद.
इंग्लंड
लेन हटन - रिचर्ड हटन
जो हार्डस्टाफ सिनियर - जो हार्डस्टाफ जुनियर
फ्रेड टेट - मॉरीस टेट
कॉलिन कौड्री - क्रिस कौड्री
चार्ली टाउन्सेंड - डेव्हीड टाउन्सेंड
फ्रँक मान - जॉर्ज मान
जिम पार्क सिनियर - जिम पार्क ज्युनियर
मिकी स्टुअर्ट - अॅलेक स्टुअर्ट
अॅलन बुचर - मार्क बुचर
(अॅलेक स्टुअर्ट आणि मार्क बुचर हे सख्खे मेव्हणे!)
क्रिस ब्रॉड - स्टुअर्ट ब्रॉड
अर्नी साईडबॉटम - रायन साईडबॉटम
जेफ जोन्स - सायमन जोन्स
डेव्हीड बॅरीस्टोव - जॉनी बॅरीस्टोव
न्यूझीलंड
विल्यम 'मॅक' अँडरसन - बॉब अँडरसन
ब्रेंडन ब्रेसवेल - डग ब्रेसवेल. जॉन ब्रेसवेल हा ब्रेंडनचा भाऊही न्यूझीलंडकडून टेस्ट खेळला.
वेन ब्रॅडबर्न - ग्रँट ब्रॅडबर्न
लान्स केर्न्स - क्रिस केर्न्स
जॉन रीड - रिचर्ड रीड
जिफ व्हिव्हीयन - ग्रॅहेम व्हिव्हीयन
पार्क 'झिन' हॅरीस - क्रिस हॅरीस
रॉडनी रेडमंड - अॅरन रेडमंड
रॉड लॅथम - टॉम लॅथम
केन रुदरफर्ड - हमिश रुदरफोर्ड
दक्षिण आफ्रीका
डेव्ह नर्स - डुडले नर्स
पीटर पोलॉक - शॉन पोलॉक.
पीटरचा भाऊ आणि शॉनचा काका म्हणजे ग्रॅहॅम पोलॉक!
वेस्ट इंडीज
जॉर्ड हेडली - रॉन हेडली - डीन हेडली (इंग्लंड)
सर एव्हर्टन वीक्स - डेव्हिड मरे (होय! मरे वीक्सचाच मुलगा होता!)
झिंबाब्वे
माल्कम जार्विस - काईल जार्विस
अँडी वॉलर - माल्कम वॉलर
सख्खे आणि सावत्रं भाऊ
ऑस्ट्रेलिया
चार्ल्स बॅनरमन - अॅलेक बॅनरमन
रिची बेनॉ - जॉन बेनॉ
केन आर्चर - रॉन आर्चर
नील हार्वे - मर्व्ह हार्वे. दोघांचा तिसरा भाऊ मिक हार्वे हा टेस्ट अंपायर होता!
ह्यू ट्रंबल - जॉन ट्रंबल
इयन चॅपल - ग्रेग चॅपल - ट्रेव्हर चॅपल.
चॅपल बंधूंचा आजोबा म्हणजे डग्लस जार्डीनच्या तोंडावर "Which one of you bastards called Larwood a bastard instead of this bastard?" असं आपल्या सहकार्यांना विचारणारा व्हिक्टर रिचर्डसन!
स्टीव्ह वॉ - मार्क वॉ. टेस्ट क्रिकेट खेळणारे पहिले जुळे भाऊ!
जेम्स पॅटीन्सन (ऑस्ट्रेलिया) - डॅरन पॅटीन्सन (इंग्लंड)
इंग्लंड
डॉ. डब्ल्यू जी ग्रेस - एडवर्ड ग्रेस - फ्रेड ग्रेस
जॉर्ज स्टड - चार्ल्स स्टड
अर्नेस्ट टिड्स्ली - जॉन टीड्स्ली. दोघांच्या बहिणीचा पणतू म्हणजे मायकेल वॉन!
आर्थर गिलिगन - हॅरॉल्ड गिलिगन
डिक रिचर्डसन - पीटर रिचर्ड्सन
टोनी ग्रेग - इयन ग्रेग
जॉन गन - जॉर्ज गन. त्यांचा काका म्हणजे टेस्ट क्रिकेटर बिली गन.
अॅडम हॉलिओक - बेन हॉलिओक
क्रिस स्मिथ - रॉबिन स्मिथ
क्लेम विल्सन - रॉकली विल्सन
भारत
अमरसिंग - लढारामजी
माधव आपटे - अरविंद आपटे
सुभाष गुप्ते - बाळू गुप्ते
कृपाल सिंग - मिलखा सिंग
सीके नायडू - सीएस नायडू
पाकिस्तान
हनिफ महंमद - वझीर महंमद - मुश्ताक महंमद - सादिक महंमद
उमर अकमल - अदनान अकमल - कामरान अकमल (द 'ग्रेट' विकेटकीपर!)
सलीम इलाही - मंझूर इलाही - झहूर इलाही
इमरान फरहात - हुमायून फरहात
मोईन खान - नदीम खान
वासिम राजा - रमिझ राजा
श्रीलंका
अर्जुना रणतुंगा - संजिवा रणतुंगा - धम्मिका रणतुंगा. चौथा भाऊ निशांत रणतुंगा वनडे खेळला आहे.
दुलिप समरवीरा - थिलन समरवीरा
सिद्धर्थ वेट्टीमुनी - मिथ्रा वेट्टीमुनी. तिसरा भाऊ सुनिल वेट्टीमुनी वनडे खेळला आहे.
दक्षिण आफ्रीका
गॅरी कर्स्टन - पीटर कर्स्टन (सावत्रं भाऊ)
अल्बी मॉर्केल - मॉर्नी मॉर्केल
लुईस टॅंक्रेड - बर्नाड टँक्रेड - व्हिन्सेंट टँक्रेड
लिओनेल टॅप्स्कॉट - जॉर्ज टॅप्स्कॉट
वेस्ट इंडीज
ड्वेन ब्रावो - डॅरन ब्रावो (सावत्रं भाऊ). ड्वेनचा मावसभाऊ म्हणजे ब्रायन चार्ल्स लारा!
जॉन कॅमेरॉन - जिमी कॅमेरॉन
पेड्रो कॉलिन्स - फिडेल एडवर्ड्स (सावत्रं भाऊ)
जॅकी ग्रँट - रॉल्फ ग्रँट
रॉबर्ट सॅम्युएल्स - मार्लन सॅम्युएल्स
जेफ्री स्टॉलमेयर - व्हिक्टर स्टॉलमेयर
न्यूझीलंड
हॅडली हॉवर्थ - जेफ्री हॉवर्थ
जेफ क्रो - मार्टीन क्रो. त्यांचा चुलतभाऊ म्हणजे अॅक्टर रसेल क्रो!
जॉन पार्कर - मरे पार्कर
हमिश मार्शल - जेम्स मार्शल (जुळे भाऊ)
मॅथ्यू हार्ट - रॉबी हार्ट
मॅथ्यू हॉर्न - फिल हॉर्न
झिंबाब्वे
अँडी फ्लॉवर - ग्रँट फ्लॉवर (सावत्रं भाऊ)
क्रेग अर्विन - शॉन अर्विन
हॅमिल्टन मासाकाड्झा - शिंग्रई मासाकाड्झा
गेवीन रेनी - जॉन रेनी
पॉल स्ट्रँग - ब्रायन स्ट्रँग
गाय व्हिटल - अँडी व्हिटल
फ्लॉवर, रेनी आणि स्ट्रँग - सहाजण न्यूझीलंडविरुद्ध १९९७ च्या हरारे टेस्टमध्ये खेळले आहेत!
बांग्लादेश
तमिम इक्बाल - नफीस इक्बाल. दोघांचा काका म्हणजे बांग्लादेशचा कॅप्टन अक्रम खान.
टेस्ट क्रिकेट खेळलेले परंतु बाप-बेटे आणि सख्खे किंवा सावत्रं भाऊ नसलेले / अंपायर्स -
ऑस्ट्रेलिया
ग्रेग कँपबेल (मामा) - रिकी पाँटींग (भाचा)!
जो डार्लिंग (आजोबा) - रिक डार्लिंग (जो डार्लिंगच्या भावाचा नातू)
डॅरन लिहमन (ऑस्ट्रेलिया) - क्रेग व्हाईट (इंग्लंड) - मेव्हणे.
इंग्लंड
रणजी - दुलिप (पुतण्या) - अजय जाडेजा (भारत) - दुलिपचा पणतू
डेनिस कॉम्प्टन (आजोबा) - निक कॉम्प्टन (नातू)
मॉरीस ट्रेमलेट (आजोबा) - क्रिस ट्रेमलेट (नातू)
रॉजर प्रिडॉक्स (नवरा) - रुथ वेस्टब्रूक (बायको) - टेस्ट मॅच खेळणारे पहिले नवरा-बायको!
भारत
माधव मंत्री (मामा) - सुनिल गावस्कर (भाचा) - गुंडाप्पा विश्वनाथ (सुनिलचा मेव्हणा).
सुनिलचा मुलगा रोहन गावस्कर वनडे खेळला.
गुलाम अहमद (काका) - आसिफ इक्बाल (पाकिस्तान - पुतण्या)
विक्रम राठोड - आशिश कपूर - मेव्हणे (का खेळले हे भारतासाठी?)
यशपाल शर्मा (काका) - चेतन शर्मा (पुतण्या)
न्यूझीलंड
नॅथन अॅस्टल - क्रेग मॅकमिलन - मेव्हणे
कॉलिन स्नेडन (काका) - मार्टीन स्नेडन (पुतण्या)
पाकिस्तान
अनिल दलपत - दानिश कनेरिया - आते-मामे भाऊ
जावेद मियांदाद (आत्याचा नवरा) - फैसल इक्बाल (भाचा)
वेस्ट इंडीज
कॉनरेड हंट (काका) - कॉलिन क्रॉफ्ट (पुतण्या)
लान्स गिब्ज - क्लाईव्ह लॉईड - आते-मामे भाऊ
डेव्हीड हॉलफोर्ड - गॅरी सोबर्स - आते-मामे भाऊ
रोहन कन्हाय (मामा) - महेंद्र नागामुट्टू (भाचा) - अल्विन कालिचरण (आत्याचा नवरा)
ग्रेसन शिलिंगफोर्ड - अर्विन शिलिंगफोर्ड - चुलत भाऊ. दोघांचा पुतण्या शेन शिलिंगफोर्ड
दक्षिण आफ्रीका
क्लाईव्ह वॅन रेनवेल्ड (मामा) - जिमी ब्लॅकनबर्ग (भाचा)
श्रीलंका
बंदुला वर्णपुरा (काका) - मलिंदा वर्णपुरा (पुतण्या)
बांग्लादेश
मुशफिकूर रहीम - महंमदुल्ला - मेव्हणे
वन डे
क्रिकेट खेळणार्या घराण्यांमध्ये सर्वांनाच टेस्ट खेळण्याचं भाग्यं लाभलं नाही. काहीजण केवळ टेस्ट खेळू शकले तर काही केवळ वन डे! काही घराण्यांमध्ये महिला खेळाडूही टेस्ट - वन डे खेळल्या!
एक मजेदार उदाहरण म्हणजे डॉन आणि डेरेक प्रिंगलचं. डॉन प्रिंगल पूर्व आफ्रीकेसाठी दोन वन डे खेळला तर डेरेक इंग्लंडसाठी टेस्ट आणि वन डे!
ऑस्ट्रेलिया
टेरी आल्डरमन आणि त्याची बहिण डेनिस इमर्सन दोघंही ऑस्ट्रेलियाकडून टेस्ट आणि वन डे खेळले. डेनिसचा नवरा म्हणजे वन डे मध्ये मुरलीधरनला फेकी बॉलिंगवरुन नोबॉल देणारा रॉस इमर्सन!
इयन हिली (काका) - अॅलिसा हिली (पुतणी) - टेस्ट आणि वन डे.
माईक हसी - डेव्हिड हसी - सख्खे भाऊ! डेव्हीड केवळ वन डे खेळला तर माईक वन डे आणि टेस्ट!
ट्रेव्हर लाँग्लिन (बाप) - बेन लाँग्लिन (मुलगा) - ट्रेव्हर टेस्ट तर बेन आतापर्यंत फक्तं वन डे खेळला आहे.
ब्रेट ली - शेन ली - सख्खे भाऊ, ब्रेट टेस्ट आणि वन डे तर शेन केवळ वन डे खेळला.
एल्सी शेव्हिल आपल्या धाकट्या दोन जुळ्या बहिणी फर्नी आणि रेनी यांच्या सह टेस्टमध्ये खेळली! एल्सीची जुळी बहिण लिली मात्रं टेस्ट्पर्यंत पोहोचली नाही!
इंग्लंड
डेव्हिड लॉईड (बाप) - ग्रॅहॅम लॉईड (मुलगा). डेव्हीड टेस्ट आणि वन डे खेळला तर ग्रॅहॅम केवळ वन डे.
भारत
इरफान पठाण - युसुफ पठाण - सावत्रं भाऊ. इरफान टेस्ट आणि वन डे खेळला तर युसुफ केवळ वन डे.
डायना एडलजी - बेहरोज एडलची - सख्ख्या बहिणी. डायना टेस्ट आणि वन डे खेळली तर बेहरोज एकमेव टेस्ट!
न्यूझीलंड
ब्रेंडन मॅक्कलम - नॅथन मॅक्कलम - सख्खे भाऊ - ब्रेंडन टेस्ट आणि वन डे खेळला तर नॅथन केवळ वन डे.
पीटर मॅक्ग्लॅशन (भाऊ) - सारा मॅक्ग्लॅशन (बहिण) - पीटर केवळ वन डे तर सारा टेस्ट आणि वन डे खेळली.
रोझ सिग्नल - लीझ सिग्नल - जुळ्या बहिणी. दोघी टेस्ट क्रिकेट खेळल्या आहेत.
मरे वेब - रिचर्ड वेब - सख्खे भाऊ. मरे टेस्ट खेळला तर रिचर्ड वन डे.
केवळ वनडे स्टेटस असलेल्या देशांतही घराणेशाही आहे!
आयर्लंड
एड जॉईस (भाऊ) - डोमिनिक जॉईस (भाऊ) - सेसिलिया जॉईस (बहिण) - इसाबेल जॉईस (बहिण) - सख्खी भावंडं. इसाबेल टेस्ट आणि वन डे खेळली आहे तर बाकी सर्वजण वन डे. एड जॉईस इंग्लंडसाठी अनेक वन डे खेळला आहे.
केव्हिन ओब्रायन - नियाल ओब्रायन - सख्खे भाऊ.
जॉन मूनी - पॉल मूनी - सख्खे भाऊ.
अँड्र्यू पॉयन्टर - स्टुअर्ट पॉयन्टर
केनिया
स्टीव्ह टिकोलो - डेव्हीड टिकोलो - सख्खे भाऊ.
मॉरीस ओडुंबे - एडवर्ड ओडुंबे - सख्खे भाऊ.
केनेडी ओटीयानो - डेव्हिडी ओबुया - कॉलिन्स ओबुया - सख्खे भाऊ.
नेहमाया ओढियांबो - लॅमेक ओन्यांगो - जेम्स नगोचे - शेम नगोचे - सर्व सख्खे भाऊ (वेगळी आडनावं असली तरी!)
टोनी सुजी - मार्टीन सुजी - सख्खे भाऊ.
हॉलंड
टॉम कूपर - बेन कूपर - सख्खे भाऊ.
ग्रीट मार्टीन-मोल - हेन्ड्रीक यान-मोल - सख्खे भाऊ
मार्क यॉन्कमन - मॉरीट्स यॉन्कमन - जुळे भाऊ.
स्कॉटलंड
गॉर्डन डरमाँड (भाऊ) - अॅनेट डरमाँड (बहिण)
माजिद हक - ओमर हुसेन - आते-मामे भाऊ.
नामिबिया
जान बॅरी बर्गर - लुईस बर्गर - सारेल बर्गर - सख्खे भाऊ.
जॉन कोट्स - डिऑन कोट्स - सख्खे भाऊ.
हाँगकाँग
इरफान अहमद - नदीम अहमद - सख्खे भाऊ.
कॅनडा
आसिफ मुल्ला - मोहसिन मुल्ला - सख्खे भाऊ.
इंग्लंडचा कॅप्टन आणि फास्ट बॉलर अॅलेक बेडसरचा जुळा भाऊ एरीक बेड्सर १४ हजारावर फर्स्टक्लास रन्स आणि ८०० च्या वर विकेट्स घेऊनही कधीही टेस्ट क्रिकेट खेळू शकला नाही! स्टीव्ह आणि मार्क वॉचा भाऊ डीन वॉ केवळ एक फर्स्ट क्लास मॅच खेळला!
प्रतिक्रिया
21 Nov 2015 - 4:03 am | श्रीरंग_जोशी
क्रिकेटमधल्या घराणेशाहीच्या माहितीचे उत्तम संकलन.
21 Nov 2015 - 7:59 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
21 Nov 2015 - 6:30 am | अरुण मनोहर
विकी मध्ये टाका!
21 Nov 2015 - 7:57 am | बोका-ए-आझम
_/\_
21 Nov 2015 - 9:18 am | दिवाकर कुलकर्णी
आम्हाला आपलं भारता पुरतं माहित,
सुनील गावस्कर व गुंडा प्पा विश्वनाथ हे नंतर एकमेकाचे मेव्हणे मेव्हणे झाले,
त्यामुळं हे घराणेशाहीत बसत नाही
निवडीत थोडाचा अैडवांटेज नाते संबधामुळं मिळंत असेल पण मेटल प्रुव्ह व्हावं लागतं नाहीतर तुम्ही टिकत नाही,
रोहन गावस्कर कुठं टिकला
उलट एकनाथ सोलकर ,रांजणे( फास्ट बोलर) ही सर्व सामान्य मुलं जास्त टिकली,
मिल्खासिंग ,क्रुपालसिंग ही मात्र वशिल्याची तट्टं होती
पूर्वी तर राजे महाराजे फक्त बैटिग व लंचला असायचे ,फ़ील्डिंग ला तिसराच कोणीतरी,
सध्या मात्र परिस्थिति खूपच बदलली आहे,टफ कॉंपिटिशन मुळं अनेक दर्जेदार खेळाडूना
कायमच बेंचवर बसावं लागतं किंवा पाणी देता देताच त्यांची करीअर संपते
संकलन फारच सुंदर
21 Nov 2015 - 11:41 am | टवाळ कार्टा
रोहन गावस्कर आयसीएल मध्ये खेळायला गेलेला...आणि त्यावेळेस बीसीसीआयने आयसीएलमध्ये गेलेल्या सगळ्या खेळाडूंवर आजीवन बंदी घातलेली असे काहितरी झालेले बहुतेक
21 Nov 2015 - 9:42 am | खेडूत
मोहिन्दर आणि सुरिंदर अमरनाथ यांचा उल्लेख का टाळ्लाय ?
मोहिंदर जब्रा खेळाडू होता.
शिवाय त्याचे आणि पाकच्या मुदस्सरचे करियर पहाता कमालीचे साम्य दिसते!
21 Nov 2015 - 10:21 am | स्पार्टाकस
हे मिस केलंत का? अगदी पहिला उल्लेख आहे.
टेस्ट मॅच खेळलेल्या बापाची एक नव्हे तर दोन मुलं टेस्टमध्ये खेळल्याची तीन उदाहरणं आजपर्यंत क्रिकेटच्या इतिहासात झाली आहेत.
लाला अमरनाथ आणि दोन मुलं - सुरिंदर आणि मोहिंदर अमरनाथ!
21 Nov 2015 - 12:35 pm | खेडूत
ते आहेच, पण पुढे यादीत नाहीत म्हणून म्हट्लं.. असो. :)
22 Nov 2015 - 9:19 pm | पैसा
राजिंदर हा बहुधा रणजी खेळलाय.
21 Nov 2015 - 10:48 am | विजुभाऊ
सुनिल वॉल्सन हा खेळाडू वर्ल्डकप जिंकलेला परंतु त्या वर्ल्डकपमधली एकही मॅच न खेळलेला एकमेव खेळाडू आहे.
त्याची कारकीर्द तितकीच. नगण्य परंतु इतिहासात सुवर्णाक्षरानी नोंदलेली
21 Nov 2015 - 10:51 am | कपिलमुनी
लेख कमी आणि संकलन जास्त वाटला पण आवडला !
21 Nov 2015 - 1:08 pm | नाखु
क्रमशः आला असता तरी चालला असता म्हणजे प्रत्येकावर काही तरी रोमांचक माहीती (त्याने केलेल्या विशेष कामगीरीची) आली असते जमल्यास फोटो सकट.
चटावरचे श्राद्ध सारखा उरकला असे वाटले. (क्रुपया भावना दुखवून घेऊ नका)
21 Nov 2015 - 5:19 pm | DEADPOOL
आपलं नशीब सैफ क्रिकेटच्या भानगडीत
पडला नाही! पण बॉलिवूडमध्ये जाऊन उच्छाद मांडलाच!
असो!>>>>>>>>>>
आईवर गेलाय तो ;)
22 Nov 2015 - 7:39 pm | मुक्त विहारि
धन्यवाद....
22 Nov 2015 - 7:49 pm | मुक्त विहारि
धन्यवाद....
22 Nov 2015 - 9:20 pm | पैसा
मस्त लेख!
22 Nov 2015 - 9:24 pm | स्वाती दिनेश
छान माहिती,
स्वाती