घरच्यांपुरतं वसुधैव कुटुंबकम(?)

शब्दानुज's picture
शब्दानुज in जनातलं, मनातलं
15 Nov 2015 - 6:12 am

घरच्यांपुरतं वसुधैव कुटुंबकम(?)

" साहेब, आम्ही अोळखतो तुम्हाला. पण मिडियाने व्हायरल केलयं ना..एफ आय आर करावा लागेल. पण काळजी नका करु. अपघात दाखवून हातावेगळं करु. तुम्ही तशी साक्ष द्या आणि मोकळ व्हा.
बरयाच वर्षापासुन तुम्ही हे अनाथालय चालवताय. ठिकठिकाणाहुन मिळण्यारया देणगींचा विचार करा. "
आवाजाची पट्टी वाढवत तो इन्स्पेक्टर बोलतच राहिला " माझ्यावरही दबाब आहे. रोजच आहे हे माझ्यासाठी. "
पवन समोरच्या अनाथालयाच्या पाटीकडे पाहत होता. ज्या रोहितसोबत हे सुरु केलं होतं त्याच्याच आधार अचानक हरपला होता. समोरची पाटी पवनला दिसेनाशी झाली.
थरथरत्या हाताने पवनने खिशातुन एक कागद काढला आणि इनस्पेक्टरने दिला. त्र्ासिक चेहरा करुन त्याने ती चिठ्ठी वाचायला चालू केली. आणि चेह्रयाचा रंग उतरला. हे 'रोजच' नाही हे कळाल त्याला बहुतेक .
ती रोहितची सुसाईड नोट होती.
' पवन, मित्र्ा, मला माफ कर. मला नाही सहन होत हे सगळ. तुला माहितेय की मीसुद्धा अनाथच होतो. ती भावना काय असते ते केवळ पाहिलं नव्हतं तर अनुभवलं होतं. या आश्रमासाठी मी दोन महिन्यांपासुन मागे लागलो तेव्हा तू तयार झाला.
पण समाज एवढा निगरगट्ट असेल असं वाटल नव्हतं रे. सगळीकडुन फक्त अपेक्ष्ाभंगच पदरी पडला. फक्त पेपरामद्धे फोटे येण्यापुरते ह्यांची मदत असायची.
आपली फक्त पन्नास मुले. ती बोलत नाहित पण न बोलताच खुप सांगुन जातात. त्यांच खपाटीला गेललं पोट नाही पहावत आता
आता मला मागेही फिरता येणार नाही. आधी त्या देवाने अनाथ केल आणि आता समाजाने. तो देवसुद्धा त्याच्या घरात सोन्याचांदिचे मुकूट खालून बसलाय. त्यालाच जाब विचारतो आता. "

इन्स्पेक्टर शांतपणे निघाला. त्याने त्याची केस सोडवली होती!!

पवनने मागे वळून पाहिल. दोन मुलं बिचकत त्याचाकडे पहात होती. त्यांना त्याने मिठीत घेतले आणि ढसाढसा रडु लागला. आता परिक्ष्ा पवनची होती की वसुधैव कूटुंबकम म्हणणरया समाजाची ?
दुस्रया दिवशी मिडीयाने पवनला घेरले आणि केवळ प्रश्नांची सरबत्ती केली. समाजाला दोन मिनिटात चार नावे ठेऊन मिडिया निघुन गेली. नुकत्याच झालेल्या निवडनुकांचे निकाल त्यांच्यासाठी जास्त महत्वाचे होते.
.
.
संध्याकाळी त्या इन्स्पेक्टरच्या नावाने आलेल्या २०००च्या चेककडे पवन पहातच राहिला.

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

कोणाला तरी मदत करावीशी वाटली म्हणायची...
पुलेशु.