अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ आक्टोबरला अलाहाबाद उत्तरप्रदेश मध्ये हिंदू कायस्थ परिवारा मध्ये झाला. त्यांचे वडिल डाॅ. हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध हिंदी कवी व आई तेजी बच्चन कराची मधील शिख कुंटुबातील होती.
डाॅ. हरिवंशराय बच्चन यांना दोन मुले, मोठा अमिताभ व लहान अजिताभ. सुरवातीला अमिताभ यांचे नाव इन्कलाब होते पण नंतर त्यांचे नाव अमिताभ ठेवले. अमिताभ चा अर्थ "कधी न विझणारा प्रकाश". अमिताभ यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण नंतर त्यांच्या वडिलांनी बच्चन आडनाव लावले. अमिताभ यांनी दोन ठिकाणाहून एम.ए. ची डिग्री घेतली.
अमिताभ यांचा विवाह अभिनेत्री जया भादुरी सोबत झाला. अमिताभ यांना दोन मुले, मुलगी श्वेता नंदा व मुलगा अभिषेक, जो अभिनेता आहे आणि त्याचा विवाह एेश्वर्या राय बरोबर झाला.
1969 मधील सात हिन्दुस्तानी या फिल्मने अमिताभने आपल्या फिल्म करियरची सुरवात केली. अमिताभला बरेच पुरस्कार मिळाले. तीन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणी बारा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. अमिताभच्या नावावर सर्वाेत्तम अभिनेता फिल्मफेयर अवार्डचा रेकाॅर्ड आहे.
अभिनयाशिवाय अमिताभने पार्श्वगायक, फिल्म निर्माता, टीवी अँकर आणि भारतीय संसदेतील निर्वाचित सदस्य अश्या भुमिका केल्या. अमिताभने प्रसिद्द टी.वी. शो "कौन बनेगा करोड़पति" मधे होस्टची भूमिका केली.
मला आवडलेले अमिताभचे चित्रपट:
बाॅम्बे टू गोवा, जंजीर, दीवार, शोले, अमर अकबर एन्थनी, परवरीश, खुन पसीना, डाॅन, मुकद्दर का सिंकदर, त्रिशूल, मि. नटवरलाल, काला पत्थर, सुहाग, शान, दोस्ताना, राम बलराम, याराना, लावारिस, नसीब, कालीया, बरसात की रात, शक्ति, सत्ते पे सत्ता, नमक हलाल, खुद्दार, देशप्रेमी, पुकार, नास्तिक, अंधा कानून, कुली, शराबी.
लोकप्रिय डायलाॅग:
जंजीर: "जब तक बैठने को ना कहा जाये शराफत से खडे रहो... ये पोलिस स्टेशन है... तुम्हारे बाप का घर नही"
दीवार: "आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है, क्या है तुम्हारे पास? मेरे पास... माॅ है"
अमर अकबर एन्थनी: "ऐसा तो आदमी लाईफ मे दोहीच टाईम भागता है... आँलिपिक का रेस हो या पोलिस का केस हो.. तुम कहे मै भागता है भाई"
खुन पसीना: "जिस दिन गरीब बगावत पर उतरता है... तो धनवान तो क्या उसे भगवान भी उसे रोक नही सकता"
डाॅन: "डाॅन का इंतजार तो ग्यारह मुल्को की पोलिस कर रही है... डाॅन को पकडना मुश्कील ही नही... नामुमकीन है"
मि. नटवरलाल: "इस मे सिर्फ इतनी जिंदगी बाकी छोडना... की ये अपनी मौत अपनी आँख से देख सके"
प्रतिक्रिया
8 Nov 2015 - 9:35 pm | माम्लेदारचा पन्खा
मिपाकर त्याचा कीस पाडणार आता !!
8 Nov 2015 - 9:39 pm | जेपी
सदरील लेख मराठी विकीपीडीयासाठी घेण्याचा मानस आहे.
अर्थात तो प्राताधिकार मुक्त असेल अशी आशा करतो.एखादा फोटो विकीकॉमन्स साठी द्यावा.
आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत.
-जेपी(थंड)गार
8 Nov 2015 - 10:32 pm | आदूबाळ
ते प्रतिसाद प्रताधिकारमुक्तवालं रहायलं... आणि अवांतर टाळण्याचं पण.
8 Nov 2015 - 9:45 pm | लाल टोपी
जबरदस्त माहितीचा खजिना असलेला लेख यातील जवळपास प्रत्येक वाक्य अखिल भारतियांसाठी नविन माहितेचे दालन उघडणारे आहे.
10 Nov 2015 - 9:08 am | जव्हेरगंज
8 Nov 2015 - 9:51 pm | भंकस बाबा
मला माहितच नव्हते इतके अमिताभबद्दल , तोच का तो ABCL कंपनी काढून गुंतवणुकदारचे पैसे बुडवणारा , कर चुकवण्यासाठी स्वताला अनिवासी भारतीय घोषित करणारा, जादूगर,तूफ़ान,मृत्युदाता,अकेला यासारखे भिकार चित्रपट देणारा?????
8 Nov 2015 - 9:57 pm | मांत्रिक
ओ लट्टुकाका, आवडला लेख!
8 Nov 2015 - 10:21 pm | हेमंत लाटकर
1984 पर्यंतचे अमिताभचे चित्रपट काय होते हे आजकालच्या पोरांना काय कळणार.
गाडीखाली माणसांना चिरडणार्या, काळवीट मारणार्या पेक्षा अमिताभ बरा.
8 Nov 2015 - 10:53 pm | भंकस बाबा
मि. नटवरलाल , काय पण पिक्चर होतं
अमिताभच्या लाटेत चालून गेलं नंतर त्याने हाच प्रयोग जादूगर आणि तूफान मधे केला . पब्लिकने पार झोपवला.
आणि हो लेख वाचला हो तुमचा. बॉम्बे टू गोवा मधे अमिताभचे काम किती होते? नाय वो ते तुमच्या लेखात दिसले. "मर्द को दर्द नहीं होता" हा टुक्कार डायलॉग कोणाचा हो काका?
8 Nov 2015 - 10:22 pm | हेमंत लाटकर
1984 पर्यंतचे अमिताभचे चित्रपट काय होते हे आजकालच्या पोरांना काय कळणार.
गाडीखाली माणसांना चिरडणार्या, काळवीट मारणार्या पेक्षा अमिताभ बरा.
8 Nov 2015 - 10:37 pm | सतिश गावडे
"शालेय निबंधमाला इयत्ता आठवी ते दहावीसाठी" या पुस्तकातील हा निबंध आहे का?
8 Nov 2015 - 11:04 pm | हेमंत लाटकर
सलमान खानचे दबंग टाईप पिक्चर कोणते धड आहेत. भंकस बाबा.
8 Nov 2015 - 11:09 pm | मुक्त विहारि
आवडले...
लेख थोडा उशीराच आला, कारण मी मागच्याच महिन्यात, अमिताभवरचे "अमिताभ शहेनशहा" हे बाबू मोशाय ह्यांनी लिहिलेले पुस्तक विकत घेतले.
8 Nov 2015 - 11:17 pm | भंकस बाबा
मी कधीच लिहिले नाही की सलमान खान चांगले चित्रपट काढतो. अभिनयाच्या बाबतीत तर तो अमिताभ पासून शेकडो मैल लांब आहे. तुम्ही अमिताभ व् रेखाचे काहीतरी जुने लफ़ड़े नव्याने मांडले असते तर मिसळपाव पेक्षा खमंग झाले असते. म्हणजे सिलसिलाच्या वेळी अमिताभ रात्रि दोन ते चार आपल्या रूममधुन गायब होता. रेखा बाईच्या रूमचि लाइट तेव्हा चालु होती. वगैरे
आता ऎसे बोलू नका की रेखाबाई अमिताभचि मानलेली बहिण होती
9 Nov 2015 - 6:08 am | मारवा
हेमंतराव जहॉ खडे होते है वहॉ से धागा शुरु होता है
जिस दिन हेमंतराव धागे पे उतरते है उन्हे कोइ संस्थळ रोक नही सकता
मेरे पास गाडी है बंगला है तुम्हारे पाअ क्या है ? मेरे पास धागा है धागा
हलक्यात घ्या सर रागावु नका
लेखाचा विषय खरच रोचक आहे अमिताभ वर लिहीण्यासारखं खुप आहे.
नावापासुन जन्मापासुन अगदि स्टोरी स्टार्ट होते
हरीवंशराय बच्चन यांचे मित्र महान कवी सुमित्रानंदन पंत यांनी "अमिताभ" हे नाव सुचवलेलं होत.
त्या संदर्भात काहीतरी रोचक कीस्सा आहे नीट आठवत नाही
बघा नाव सुचवायला इतका मोठा कवी स्टोरी बीगीन्स फ्रॉम हीअर
9 Nov 2015 - 6:08 am | मारवा
हेमंतराव जहॉ खडे होते है वहॉ से धागा शुरु होता है
जिस दिन हेमंतराव धागे पे उतरते है उन्हे कोइ संस्थळ रोक नही सकता
मेरे पास गाडी है बंगला है तुम्हारे पाअ क्या है ? मेरे पास धागा है धागा
हलक्यात घ्या सर रागावु नका
लेखाचा विषय खरच रोचक आहे अमिताभ वर लिहीण्यासारखं खुप आहे.
नावापासुन जन्मापासुन अगदि स्टोरी स्टार्ट होते
हरीवंशराय बच्चन यांचे मित्र महान कवी सुमित्रानंदन पंत यांनी "अमिताभ" हे नाव सुचवलेलं होत.
त्या संदर्भात काहीतरी रोचक कीस्सा आहे नीट आठवत नाही
बघा नाव सुचवायला इतका मोठा कवी स्टोरी बीगीन्स फ्रॉम हीअर
9 Nov 2015 - 7:26 am | हेमंत लाटकर
@ मारवा
कच्चा पापड पक्का पापड म्हणा बरे!
9 Nov 2015 - 7:40 am | सोंड्या
शिर्षक वाचून वाटलं अमिताभ खपला की काय.
लेखाच्या पहिल्या ओळीत त्याच्या जन्मतारखेच्या उल्लेखामुळे खात्री वाटायला लागली होती. आणी संपूर्ण लेख वाचून जीव वाटीत पडला
9 Nov 2015 - 7:55 am | जेपी
अमिताभ चा अभिनय शराबी चित्रपटात सर्वोत्क्रुष्ट आहे.
एखाद्या अट्टल शराबी माणसांपेक्षा ,
दारुड्याचा अभिनय त्यांने चांगला केला आहे.
"भई,मुछें हो तो नथ्थुलाल जैसी हो,वरना ना हो" क्लास.
9 Nov 2015 - 7:57 am | हेमंत लाटकर
@ सोंड्या
तुमचा जीव लहान दिसतोय भांड्याच्या ऐवजी वाटीत पडला.
9 Nov 2015 - 10:19 am | चित्रगुप्त
मी 1984 साली 33 वर्षाचा होतो, तरी मी अमिताभचा तरूणपणीचा एकही पिच्चर पूर्ण बघितलेला नाही. शोले सुद्धा नाही . व्हीव्ही वर अनेकदा अधून मधून उडत उडत अधले मधले प्रसंग बघितले असले तरी बसून नीट पूर्ण बघण्याची इच्छा कधीच झाली नाही . मात्र त्याचे पांढरी दाढी झाल्यावरचे पुष्कळ सिनेमे आवडीने मुद्दाम थेटरात जाऊन बघितले. कौन बनेगा करोड़पति मधील सुसंस्कृत सादरीकरण आवडीने बघितले.
9 Nov 2015 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार
स्वतः विषयी येवढी माहिती खुद्द अमिताभला देखील नसेल.
संग्राह्य धागा.
आताच माझ्या आजीला हा लेख वाचून दाखवला. तिच्या मोतिबिंदू पडलेल्या डोळ्यात टचकन दोन अश्रू तरारले.
मनःपुर्वक धन्यवाद ह्या लेखनासाठी.
10 Nov 2015 - 10:32 am | अत्रुप्त आत्मा
जब्बरदस्स्स्स्स्त बाजार उठलेला आहे..
9 Nov 2015 - 3:19 pm | आनंदराव
अमिताभ
एक स्वतंत्र लेखमाला होऊ शकेल
9 Nov 2015 - 7:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम माहिती रे हेमंता.कुली चित्रपटात तो जखमी झाला होता तेव्हा त्याला बरे वाटावे म्हणून अनेकांनी साकडे घातले होते.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी त्याला भेटायला आल्या होत्या मुंबईत.
१९८५ ते २००० पर्यंतचे त्याचे सिनेमे मात्र काही खास नव्हते.त्याचा अभिनयही सर्वसाधारण होता तेव्हा.
10 Nov 2015 - 12:04 am | सागरकदम
हा अमिताभ कोण ?
संपादक मंडळात होता का ?
10 Nov 2015 - 8:06 am | हेमंत लाटकर
हा सागर कदम कोण आहे.
10 Nov 2015 - 10:09 am | संदीप डांगे
फाटेल एर्रोर....
10 Nov 2015 - 1:31 pm | जव्हेरगंज
खुपच ऊशिरा समजले हे!
च्यायला भारीच!!!!!!!
चिवचिव चा दोस्त!!!!!
10 Nov 2015 - 1:49 pm | संदीप डांगे
चिमण त्याचा दोस्त है... एकदम जीवश्च कंठ्श्च दोस्त.
(शब्दार्थः कंठ आवळून जीव घेणारा दोस्त)
10 Nov 2015 - 3:26 pm | सागरकदम
आधी भांडतात नंतर मी आवडू लागतो
10 Nov 2015 - 10:33 am | अत्रुप्त आत्मा
सुमार दर्जाचं लेखन
10 Nov 2015 - 11:08 am | जव्हेरगंज
10 Nov 2015 - 7:58 pm | हेमंत लाटकर
शांती. नारायण नागबळी, कालसर्प, ग्रह शांती वगैरे म्हणजे पुरोहितांचा पैसे कमवण्याचा फडां. बाकी या गोष्टींचा काही उपयोग नाही.
10 Nov 2015 - 8:14 pm | नाव आडनाव
लाटकर सर, ह्या गोष्टिंचा इथं काय संबंध लावला?
10 Nov 2015 - 11:55 pm | हेमंत लाटकर
अकलमंद को इशारा काफी है.
अवातंर: ज्याला उद्देशून लिहले आहे त्याला समजेल.
11 Nov 2015 - 12:31 am | अत्रुप्त आत्मा
@लाटकर सर, ह्या गोष्टिंचा इथं काय संबंध लावला? >> जाऊँ दे हो.. एकंदर अक्कल पहाता ..ठीक आहे ! अस म्हणून आपण गप्प बसायचे.. जन्मजात मती-मंदत्वा पुढे युक्ति वादांचे काय काम?
10 Nov 2015 - 9:38 pm | होबासराव
लाटकर सर आपण एकदम योग्य बोललात, कोकिळव्रता विषयि आपले सुविद्द मत आम्हा पामरांना ऐकायला आवडेल.
म्हणजे कोकिळव्रता विषयि आपला लेख फारच डिटेल होता...आम्हि तर ऐकलय कि आता पर्यन्त ५ कोकिळव्रत झाले आहेत म्हणे तुमचे...असो.
10 Nov 2015 - 11:50 pm | हेमंत लाटकर
कोकीळा व्रताचा धागा काढला म्हणजे माझा त्यावर विश्वास आहे असा होत नाही. यावेळेस पुरोहितांनी कोकीळा व्रताचा खूप प्रचार केला होता. (फायद्यासाठी) म्हणून बर्याच स्त्रियांनी हे व्रत केले.
10 Nov 2015 - 10:26 pm | पीके
आपल्याला हिंदी चित्रपट स्रूटितला कोन्ता महानयक आवडतो आणि का.असाधागा कढायचा होतात. सारे महानयक मिपाचे मेम्बर होउण एक मेकांचे कवतीक करत बसले असते. ४०० कुठे गेले नसते.