मास्तरला प्रष्न पडला तात्याबा ना गाठावे तरी कसे. कधीही फोन केला की तात्या प्रतिक्षिप्त क्रियेत उत्तर द्यायचे. "मी आता बिझी आहे. शनिवार रविवार कधीतरी भेटु" करावे तरी काय? तात्यांचे बरेच उद्योग आहेत हे मास्तराना माहित होते. त्यात दिवस रात्र प्रार्थना, शेळी पालनाची भर पडली होती. जंगलात जाउन शेळीच्या जखमासाठी पाला गोळा करणे येरा गबाळांचे काम नाही. ह्या नादात तात्यानी तंबोरा वादनाचे क्लासेस तुर्तास बंद ठेवले होते. त्यामुळे देशी आणि आंग्ल युवतींची भलतीच कुचंबणा झाली होती.पण मास्तर पडला चिवट. त्याच्या फॉलो-अप ला कंटाळुन शेवटी तात्यानी भेटायची वेळ दिली.
रात्री ९ वाजता सुरु झालेली मिटींग सुमारे ४ तास चालली. त्याच सारांश खालील प्रमाणे,
तात्यांसमोर मास्तरांनी एक कल्पना मांडली. "बघा तात्या, मिपा सदस्य संख्या ३००० पोचली आहे. सर्व एक कुटंबासारखे नांदत आहेत. लोकप्रियतेबद्दल प्रष्नच नाही. सरासरी प्रतिसाद संख्येचा विक्रम होतो आहे. आपण सर्वानी एकत्र येउन एक कंपनी काढु. उसा मधील एका प्रसिद्ध लेखिकेने सद्य परिस्थीतीचे भाकित ५० वर्षापुर्वी केले होते. त्यात तीने म्हटले होते, "कितीही मंदी आली तरी एंटरटेनमेंट इंड्स्ट्री केव्हाही फायद्यात रहाणार". त्या मुळे आपण कंपनीचे नामकरण करु आणि त्यात चित्रपट काढु.
तात्यानी काहीच प्रतिसाद दिला नाही. मास्तराना तात्याची सवय बरोबर माहित होती. कल्पना आवडली नसती तर त्यांनी लगेच नाही म्हटले असते.
सुमारे १० मिनिटानी तात्या म्हणाले. " मास्तर, कल्पना चांगली आहे. राबवायला हरकत नाही. पण भांडवलाचे काय? आणि कंपनीचा मालक कोण?
सर्व जण मालक. भांडवलाच्या गुंतवणूकी प्रमाणे मालकी हक्क. आणि नफ्याचा वाटा. सुमारे १० कोटीचे भांडवल उभे करणे मिपाकराना सहज शक्य आहे.-मास्तर
कंपनीचे नाव काय ठेवायचे- तात्या
सी.ए. एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड्-मास्तर
चांगले नाव आहे-तात्या.
कसल्या प्रकारचे चित्रपट काढायचे- तात्या
तुर्तास एक मराठी, एक हिंदी, एक भोजपुरी . सर्व सोशल टाईप चे असतील. सद्ध्या कंपनीला एवढेच सोसल.-मास्तर
कुणाला फिमेल लीड मधे घ्यायचे? "कातरीना" मला लगेच डेट्स देईल. स्क्रिप्ट मधे विदेशी युवतीचा रोल असेल तर त्याची प॑ण व्यवस्था मी करेन्-तात्या लगेच प्रोड्यूसरच्या भुमिकेत शिर॑ले.
अहो तात्या म्हणुनच सर्व प्रथम तुम्हाला भेटलो आहे. मेन प्रोड्युसर तुम्ही. तुम्ही म्हणत असाल तर माझा अमेरिकेत एक मित्र आहे. सध्या "कॉमर्स कोचींग क्लासेस" सुरु केल्यापासुन गब्बर झाला आहे. मी सांगितले तर तो पण भांडवल गुंतवायला नाही म्हणणार नाही. बाकी इतर मिपाकर हातभार लावतीलच की.-मास्तर
बघु- तात्या (तात्या आजकाल बरेच निवळले आहेत - नाहीतर???)
इतर व्यवस्था कोण करणार. तुम्ही काय करणार. - तात्या
मी जातीने मास्तर असल्यामुळे 'ए.के. हंगल 'ची "दिवार "टाईप भुमिका मानधन न घेता करीन. आणि दोन लाख गुंतवीन- मास्तर
तात्या गालातल्या गालात हसले. ठीक आहे. सर्व कागदावर मांडुन परत एकदा भेटू.
चला मंडळी मला मदत करा ह्या प्रोजेक्टला. कोणाकोणाला कंपनीत आपले भांडवल गुंतवायचे आहे त्यांनी लगेच कळवावे. बहुतेक सर्व भुमिका मिपा गणगोत करणार असे ठरले आहे. तेवढाच बजेट वर लोड कमी. कोणाला कोणती भुमिका द्यावी हे इतरांच्या सुचनेने ठरवले जाईल. कमीत कमी ३ सुचना कराव्यात. कोण सद्स्य साधारण कुठल्या भुमिकेला शोभेल ह्यावर सुचना असाव्यात. ती देताना रेफरन्स म्हणुन पिक्चरचे नाव पण सुचवावे. दिग्ददर्शक,एडीटर, संगीतकार्,नृत्यदिग्ददर्शक, खलनायक, खलनायिका, सहनायक सहनायिका, छाया चित्रकार, मॉब सिन कलाकार ,फडका मारणारा पोर्या व इतर सर्व जागा भरायच्या आहेत. नाव सुचवताना मास्तर सोडला तर कोणावरही बिलो द बेल्ट वार नको. ज्यांना विनोदाचे वावडे आहे त्यांच्या वाट्याला जाउ नका. वादाने शीण आला असेल तर होउन जाउ द्या.
जाता जाता: मिपावर एक एक लय भारी आयटम आहेत. त्यामुळे चिंता नाही. सुरुवात मी करतो.
प्रतिक्रिया
21 Dec 2008 - 7:10 pm | सखाराम_गटणे™
छान कल्पना,
दादा कोडंके टाईप पिक्चर चांगले चालेल.
त्यात दिवस रात्र प्रार्थना, शेळी पालनाची भर पडली होती. जंगलात जाउन शेळीच्या जखमासाठी पाला गोळा करणे येरा गबाळांचे काम नाही.
तात्या, सुरापान बंद काय?
आता मुंबई-ठाण्यात मंदी जोरदार येणार असे दिसते आहे.
ह, घे. णे .
टिपः चांगली होरोईन इथुन मिळु शकते.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2791783.cms
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
21 Dec 2008 - 7:13 pm | विनायक प्रभू
स्टंट्स- टारु राक्षस गण मित्र मंडळ (विरु देवगण). तसेच झिंगालाला झिंगालाला हुर्र हुर्र अशाप्रकारच्या गाण्यातील आफ्रिकन अदिवासी युवतीना संभाळायचे काम.
छाया चित्रकार : आपले सर्वांचे प्यारे, स्टीवन स्पिलबर्ग - भडकमकर मास्तर. ते एकाच वेळी १३ नायक दाखवतील आणि गजनी चा विक्रम मोडतील.
गीत रचना- रामदास. ह्याच्या मादक गीत रचना चे भाषांतर हिंदी मधे रंगा शेठ करतील. ते कशाचे ही भाषांतर करु शकतात.-
21 Dec 2008 - 10:25 pm | टारझन
ह्ये काम बैकग्राऊंडला करण्यास आम्हाला आज्जिबात हरकत णाही !! फक्त एकदा प्रात्यक्षिक दाखवताणा संभाळा, काय आहे ना, "मजाक मजाक मे कोई अब्दूल रजाक ना बन जाये" असो ( हे शेपूट डाण्याकडणं)
अर्रे आपणे अफ्रिकण डाण्स देखा ही कहा ... शकीराच्या मायला लाजवतील असली जबरा 'कंबर' हालवतात .. तेही प्रौपर रिदम मधे !! ढिंग चैक
पण पडद्यावर आपल्याला सताठ पेश्शल शीन असलेले व्हिलणचे बी रोल पायजे बॉ!!
- टारू राक्षसगण
©1984-2009
(प्रशिक्षकाच्या परवाणगीशिवाय स्टंट्स करू णये,हाडं मोडल्यास मंडळ जबाबदार णाही.)
अवांतर : 'पाव्हणीच्या तंगड्या' णावाचा चित्रपट दिग्दर्शकाच्या 'बौद्धिक' दिवाळखोरीमुळे 'डब्ब्या' गेला म्हणे, आता त्याच्या घरचा 'फैन' पण फिरत णाही..
21 Dec 2008 - 7:19 pm | परिकथेतील राजकुमार
सुंदर कल्पना (अय्यर न्हवे)
>त्यात दिवस रात्र प्रार्थना, शेळी पालनाची भर पडली होती.
== ह्यात कुठेही देशसेवीकांचा उल्लेख का नाही ? वेळेला त्यांना हिरवणीच्या मागे 'यक्स्ट्रा' म्हणुन उभे करता येइल की.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
21 Dec 2008 - 7:23 pm | विनायक प्रभू
तु कुठला रोल करणार?
21 Dec 2008 - 7:36 pm | गणा मास्तर
नायक ज्या खानावळीत जेवत असेल तिथे गटणे डब्याची चौकशी करायला आलेल्या मुलाचा रोल करेल.
खानावळ मालक आमचे प्रभाकरपंत पेठकर.
भडकमकर मास्तरांना आम्ही सहाय्यक छायाचित्रकार म्हणुन मदत करू.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
21 Dec 2008 - 10:20 pm | रामदास
हे कोण बॉ. ?
22 Dec 2008 - 1:42 pm | विनायक प्रभू
ते स्टो पीन वाले.
22 Dec 2008 - 12:29 am | विसोबा खेचर
सी.ए.एंटरटेनमेंट ओपन अनलिमिटेड तथा मिसळपाव डॉट कॉम पब्लिक लिमिटेड कंपणीला आमच्याही मनापासून शुभेच्छा! :)
स्वगत : आयला हा प्रभूमास्तर दोन लाख टाकून मिपा टेकओव्हर करणार असं दिसतंय! साले दोन लाख भेटणार असतील तर आम्ही आमचा ५१टक्के स्टेक सोडावा की काय? :?
22 Dec 2008 - 12:35 am | विसोबा खेचर
पुन्हा स्वगत :
भेंडी, मिपा दोन लाखाला विकून पुनश्च हरिओम म्हणत काही नवीन व्यक्तिचित्रांचा स्टॉक घेऊन पुन्हा मनोगतावर जावे की काय? :?
साला, शक्तिवेलू काय, न नडता चुपचाप लेख दिले तर नक्की छापेल! :)
आपला,
आंतरजालीय राजकारणी,
(राष्ट्रवादी मिपा प्रमूख) शरदतात्या पवार.
22 Dec 2008 - 1:44 pm | विनायक प्रभू
मिपा टेक ओवर करण्याची ताकद असलेला गुडदा माझ्याकडे नाही. आणि कोणाकडे असेल असे वाटत नाही.
22 Dec 2008 - 1:40 am | घाटावरचे भट
मी स्पॉट बॉय.... :( आम्हाला तेवढंच येतं, काय करणार?
22 Dec 2008 - 8:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय हो भटोबा, गाणं नाही का म्हणणार?
23 Dec 2008 - 3:38 am | घाटावरचे भट
मास्तरांनी चानस दिला तर नर्डेघाशी पण करू...
22 Dec 2008 - 9:08 pm | शंकरराव
भटोबा अन हे काय नवीन ... स्पॉट बॉय
त्या ऍवजी सांगकाम्या म्हटल तर ....कस ?
22 Dec 2008 - 3:16 am | अघळ पघळ
>>त्यात दिवस रात्र प्रार्थना, शेळी पालनाची भर पडली होती. जंगलात जाउन शेळीच्या जखमासाठी पाला गोळा करणे येरा गबाळांचे काम नाही.
तसेच ते आजकाल अर्धी चड्डी घालुन बौद्धीक ऐकायला जातात आणि घरी आल्यावर त्याच चड्डीवर ढगाला लागली कळं गाणं लावुन नृत्य करतात ते विसरलातच की.
(पंचा आणि चड्डी दोघांचाही समर्थक) अघळ पघळ
बाकी लेख तितका खमंग झाला नाही. गटण्याने ऑलरेडी हा प्रयोग करुन झालेला असल्याने तुम्ही गरीबांचे गटणे बनल्यासारखे वाटले.
(वहिनीच्या बांगड्या फैन) अघळ पघळ
22 Dec 2008 - 2:56 pm | विनायक प्रभू
वादाने झालेला जाळ माझ्यापुरता तरी कमी झाला.
गरीबाचे गटणे- खी,खी,खी
22 Dec 2008 - 2:58 pm | अवलिया
वादाने झालेला जाळ माझ्यापुरता तरी कमी झाला.
हे वादीने झालेला जाळ माझ्यापुरता तरी कमी झाला असे वाचले
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Dec 2008 - 9:01 pm | अघळ पघळ
>>वादाने झालेला जाळ माझ्यापुरता तरी कमी झाला.
त्यापेक्षा इनो घ्या मास्तर सगळ्या प्रकारच्या जाळावर, जळजळीवर हमखास उपाय! ;)
22 Dec 2008 - 5:35 am | शंकरराव
मास्तरला प्रष्न पडला तात्याबा ना गाठावे तरी कसे. कधीही फोन केला की तात्या प्रतिक्षिप्त क्रियेत उत्तर द्यायचे. "मी आता बिझी आहे. शनिवार रविवार कधीतरी भेटु" करावे तरी काय? :-C
काय करणार... तात्या आता बिझी आहे सतत शिंडीबाईंशी फोनाफोनी (त्यातही राँग नंबरचा हिशोभ वेगळाच) :)]
सध्या मिल्स ऍन्ड बुन्स चे जोरदार वाचन चालू आहे, कामाचे काही संभाषन नजरेखालून गेलेले बरे हो... ऍन वेळी फोनवर मराठीतील भावना विंग्रजीमंधी रुपांतर करतांना एळ जातो ... अन शब्द सापडेस्तोवर भावनांना कल्लोळ होतो... ;)
22 Dec 2008 - 4:55 am | प्राजु
कल्पना मस्त आहे तुमची.
चालूद्या.. काही काम लागले तर आम्हालाही सांगा..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Dec 2008 - 10:03 am | अवलिया
म्या कंपनीचा आयपीवो काढुन देतो... ग्रीन शु आप्शन माह्याकडे
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Dec 2008 - 12:54 pm | सुचेता
१ला भाग कुठे ??
सुचेता
22 Dec 2008 - 2:16 pm | अवलिया
१ला भाग कुठे ??
कुणाचा?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Dec 2008 - 3:56 pm | धम्मकलाडू
कातरीनाचे "खजूर" कुणालाही आवडतील. पण ते पचवायलाही गुडदा हवा ना. तो येरा गबाळ्याचे काम नोहे. असो. (पण हा घोर अन्याय आहे हं अनुष्कावैनींवर. घर की मुर्गी दाल बराबर. दुसरे काय!)
(कातरीनाचे "खजूर" पचवू शकणारा) धम्मकलाडू
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
22 Dec 2008 - 9:29 pm | llपुण्याचे पेशवेll
आम्ही अगदी ३-४ लाख पण टाकू पण आमालाही छोटासा रोल पाहीजे चित्रपटात. उदा. हिरोच्या घराच्या हॉल मधे भितीवर टांगलेल्या फोटोमधे आमचा फोटो पाहीजे(म्हणजे फुल्टू पगडी घालून एकदम जाम्यानिम्यासकट). तसेच आमचा फोटू चित्रपटात सगळीकडे दिसला पाहीजे. उदा. पोलिस स्टेशन मधील भिंतीवर, कोर्टातल्या भिंतीवर, हाटीलातल्या भिंतीवर; बास, तुर्तास इतकेच पुरे. बघा पटले तर notexists@junkmail.com या पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधा.
(प्रसिद्धीप्रिय)
पुण्याचे पेशवे
23 Dec 2008 - 1:41 am | वाटाड्या...
"फडका मारणारा पोर्या"...मला देनार काय व्ह?? पन मंग त्याबरुबर यक गानं बी दिलं पायजेन...कपडा मारता मारता आपन ते म्हन्नार आनि हिरवीनीला जरा खुश करनार ;)
ह.घ्या. हे. वे. सा.न. ल.
फडक्या...
23 Dec 2008 - 3:29 am | भास्कर केन्डे
आमचे पण २ टाकले बरं का मास्तर. पण आपल्याला सुद्धा भूमिका पाहिजे बरं... कलंत्री साहेबांनी त्यांची भूमिका ठरवल्यावर मग आम्ही आमचे पत्ते टाकू. ;)
चित्रपटात सुद्धा कबड्डी असावी असा आमचा हट्ट आहे...
आपला,
(कबड्डी पटू) भास्कर
आम्ही येथे वसतो.
23 Dec 2008 - 11:54 am | विनायक प्रभू
अहो ते सुट्टी वर गेले आहेत ना.