स्थळ :- अंजनी, तासगाव तालुका, आबा व त्यांच्या आईंमधील संवाद...
कायं र ! अध्यात ना मध्यात हिकड कूट वाट चुकला मंत्री साहेब तुम्ही ? ते बी बीन दिव्याच्या गाडीतन् .. पोलिसबी न्ह्याय म्होरं. ..
---मंत्रीसाहेब नाय आमी आता , राजीनामा दिला मंत्री पदाचा..
अर् काय सांगतुयास.. अस् कस् राजीनामा दिला ??
---कस म्हंजे .. दिल्ली वरनं साहेबांचा फोन आला " राजीनामा द्या " .. देउन टाकला.
अरं त्यांचा लाडका नव्हं तू ?
---आपल्या साहेबांच म्हाईत नाय व्हंय तूला.. कधी कूनाला डोक्यावर बशीवतील अन कधी खाली टाकतील ह्याचा काय नेम न्ह्याय. सम्द्दा म्हाराष्ट्र त्यांनला ' खंजीर
खूपसन्यात वस्ताद ' म्हणून वळखतो..
ते बी खरचं म्हना.. आता नवीन कोन म्हने तूझ्या जागंवर ??
---आजुन न्ह्याय कळलं ते.. कूनाला बी करनात , मला कायं त्याच !
अर् तू ही थ .. तिकड जागला कोन नाय मंत्रालयात .. कस चालायचं आता..
--- ( नकारार्थी मानं हलवत स्वगतः ' आमी असताना तरी कूठ धड चालल होत ! ' )
बरं आता आलायस तसा राहा चार दिस .. रानात लई काम पडलीत ..
---तेवडा येळ न्ह्याय मला.. साळंत जाउन त्या बोरगावे गुर्रजीला धरायचंय आदुगर.. हिंदी बोलता न आल्यामूळं सम्दा घोळ झालाय हा. पुन्हा येकदा घोटून घेतलं पायजे
पय्ल्यापासनं..
अर मग म्हराठीत बोलायच.
----छे छे.. साहेबांचा अन् म्याडमचा स्पष्ट आदेश आहे.. देशाची प्रादेशीक एकात्मता व महाराष्ट्राची अस्मिता जपण्याकरता हिंदी मधेच बोललं पाहीजे..
#################################
#################################
स्थळ :- पुर्णा- गोदावरी , वरळी सी-फेस.. मुंबई. देशमुखांच घर.. श्री व सौ मधील संवाद.
मी म्हणते येव्हड्या गडबडीत राजीनामा द्यायची काही गरज होती का ? ८ महिनेतर राहीले होते बाकी .
----अहो असे करुन नाही चालत. हायकमांडचे आदेश पाळावे लागतात.
त्यांना काय होतयं दिल्लीत बसून आदेश सोडायला; दुसरी वेळ ही अस तोंडघशी पाडायची. ' माजी ' म्हणल्यावरं माझी किती पंचाईत होते.
----बर बर बघू , तूम्ही फार मनावरं घेउ नका.
भाओजी कॅबीनेट मधे बसणार असं तुम्हीचं म्हणाला. .. आता जाउबाईंचे टोमणे मला ऐकावे लागतात ...' मनावरं घेउ नका ' म्हणे.... आणी काय हो , त्या वर्माला बरोबर घेउन जायच काय नडलं होत. तोही मेला तीथे गेल्यावर कोपरयात गप्प बसेल की नाही .. स्क्रीप्ट लिहीत .. पण नाही !!
----असं काय बोलता तूम्ही.. आपल्या रीतेशच्या करीयरला खुप मदत केली आहे त्याने. वरुन प्रत्येक निवडणुकीत त्याच्या 'शुभेच्छा' असतात न चूकता.
---- ( स्वगतः- १ पेटी या वेळेला चालणार नाही, कमीतकमी ५ तरी पाहिजे.. आजचं फोन करतो त्याला. )
तुमच्या पुढे बोलून काही एक उपयोग नाही. जाते मी आपली...
[ सौं चा स्वर आत मधे लागलेलाच आहे. श्री टिव्ही चा आवाज वाढवतात. . तेवढयात रीतेश बाहेर जायला लागतो )
अरे रीतेश , कूठे चाललास ? ..
-- शुटींग आहे बाबा , गोरेगाव मध्ये.
थांब मी पण येतो. घरी फार कंटाळा आला आहे...
############################
############################
नांदेड ला ( वीना ) उद्योग मत्र्यांच्या घरी पहाटे वाजता मोबाईलची रींग वाजते.. नो एन्सर--> व्होईस मेलवर जातो.. बंगाली टोन मधल्या हिंदी मधे एक वयस्कर आवाज.
" ओय बाबू.. हम तूमको शी . य्म. बनाया है . कोणी नवीन काहितरी काडी करायच्या आधी पटकन मुंबईला जा आन् शपथ घेउन टाक ... आपला डिल नंतर फायनल करु. तुझ्यासाठी सगळं वजनं टाकलं हां मी. नाहीतर त्या कोकणंतला ऑफर ऐकदम सॉलीड होता. "
थोड्या वेळानं सकाळी , मंत्र्याच्या घरुन डॉक्टरनां फोन जातो..
" अहो ह्यांनी सकाळी उठल्यावर त्या मोबाईलची बटणं दाबून अस काय ऐकलं काय ठाउक , तेव्हापासनं जे ' आ ' वासून बसलेत ते तोंड मिटायलाच तयार नाहीतं , ४ तास झालं आता .. असाल तसे या तूम्ही आधी " ...
प्रतिक्रिया
21 Dec 2008 - 11:38 am | आनंदयात्री
=))
मस्त लिहलं आहेस रे पोरा !
21 Dec 2008 - 11:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
असंच म्हणते, आणखी वाढवलं असतं तरी चाललं असतं.
21 Dec 2008 - 11:49 am | परिकथेतील राजकुमार
+१
सहमत असेच म्हणतो !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
21 Dec 2008 - 6:43 pm | सखाराम_गटणे™
सहमत
----
सखाराम गटणे
© २००८,
लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
21 Dec 2008 - 12:16 pm | विसोबा खेचर
मस्त लिवलंस रे बामनाच्या पोरा..! :)
साले सगळे राजकारणी सारखेच नालायक! देशाशी वगैरे त्यांना काही पडलेली नाही. आपली खुर्ची कशी टिकेल एवढीच त्यांना चिंता! म्हणजे पैसे खाऊन स्वत:च्या ४२ पिढ्यांची सोय करायला मोकळे!
तात्या.
21 Dec 2008 - 12:54 pm | विनायक प्रभू
लय भारी बापो.
21 Dec 2008 - 6:25 pm | यशोधरा
खुसखुशीत लेख!
अवांतरः हल्ली डान्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया लिहायची भीतीच वाटते! उगाच अजून एक लेख लिहून टाकायचा!! नाहीतरी क्रमशः चे हत्यार बाळगलेच आहे त्याने जवळ!! :SS
21 Dec 2008 - 8:21 pm | शितल
मस्त लिहिले आहे.
:)
22 Dec 2008 - 2:57 am | शंकरराव
एकदम खरपूस लिखान ... पात्रांचे आपाप्सातील संभाषन व लेखाची मांडणी आवडली
22 Dec 2008 - 8:27 am | अंतरंग....
लै भारी लिहिलय,
पण अजुन थोडं वाढवायला हवं होतं