एका बोक्याची गोष्ट -१

निलम बुचडे's picture
निलम बुचडे in जनातलं, मनातलं
2 Nov 2015 - 7:26 pm

आमच्याकडे तीन वर्षापूर्वी मार्जार घराण्यातील एका राजपुत्राचे आगमन झाले.
शुभ्र पांढरा रंग आणि पाठीवर व शेपटीवर केशरी रंग.
फोटो टाकायचा आहे पण कसा टाकू ते समजत नाहीय.
असो...
तर या राजपुत्राचे म्हणजे आमच्या बोक्याचे स्वभाव वैशिष्ट्य जरा वेगळे आहे.
म्हणूनच मी सुरूवातीला त्याचा राजपुत्र असा उल्लेख केला.
त्याचा मूड सारखा बदलत असतो.
खाणे-पिणे, झोपणे, खेळणे, लाडात येणे या सगळ्याच बाबतीत त्याचं वागणं हे इतर मांजरांपेक्षा खूप वेगळं आहे..म्हणूनच ते तुम्हाला सांगावं असं वाटतयं..
चला तर मग सुरूवात करूया...

१. लहानपणी आमचा हा राजपुत्र दूध पित नसे...तर नुसती भाकरी खात असे... फक्त भाकरीआणि पाणी.
याचं कारण म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्याने दूध प्यायले होते तेव्हा त्याला उलटी झाली होते.
आपल्याला ज्या गोष्टी पचत नाहीत त्या न खाण्याचे उपजत ज्ञान त्या पिल्लाकडे होते. जवळजवळ ६ महिने त्याने दुधाला तोंड लावले नाही.

अजून बरेच लिहायचे आहे.. पण बोक्याला भूक लागली आहे.गेलच पाहिजे...

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंदराव's picture

2 Nov 2015 - 7:33 pm | आनंदराव

वाचन खुण साठवली आहे.
पुढे काय ची उत्सुकता लागली आहे.

एस's picture

2 Nov 2015 - 7:33 pm | एस

लेख वाचून डोळे पाणावले!

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Nov 2015 - 7:55 pm | माम्लेदारचा पन्खा

आमच्याकडे पण आहे असलं एक गोडुलं !! जाम धमाल असते...

निलम बुचडे's picture

2 Nov 2015 - 8:05 pm | निलम बुचडे

धन्यवाद. खरं तर मला वाटलेलं की सगळे मला हसतील.. काहीही लिहीते मिसळपाव वर म्हणून,
पण तुमच्या प्रतिक्रिया वाचून उत्साह वाढला..
आम्ही खूप मांजरे पाळली आतापर्यंत पण हा बोका वेगळाच आहे.. म्हणून लिहावसं वाटलं.

सतिश पाटील's picture

13 Nov 2015 - 3:14 pm | सतिश पाटील

.

हा आमचा गुड्डू ......
तो लहान असताना आम्हाला आधी वाटे कि हि मांजर आहे ...म्हणून आम्ही नाव ठेवले गुड्डी.
तो मोठा झाल्यावर समजले कि हा मांजर नसून बोका आहे...
मग तो गुड्डी चा गुड्डू झाला...

टवाळ कार्टा's picture

13 Nov 2015 - 3:15 pm | टवाळ कार्टा

पुणेरी भाव आहेत चेहर्यावर =))

सतिश पाटील's picture

13 Nov 2015 - 3:17 pm | सतिश पाटील

ख्या ख्या ख्या...नवि मुंबईचा आहे हो तो...

कसला मस्त बोका आहे. एक नंबर ..

सतिश पाटील's picture

13 Jul 2017 - 3:44 pm | सतिश पाटील

या आमच्या बोक्याला सोमवारी कुणीतरी विष देऊन मारले.

आमच्या सोसायटीत ४ कुत्र्याची पिल्ले अणि त्यांची आई होती, ती पिल्ले घाण करतात म्हणून बरेच जण तक्रार करत होते. ३ पिल्ले एकामागोमाग एक विषबाधेने मेली, एक पिलु डॉक्टर कड़े नेउन वाचवले.
त्यांच्यासाठी ठेवलेले विष आमच्या बोक्याने खाल्ले अणि देवाघरी गेला. घरात अजुन एक मांजर अणि बोका आहे. आता त्यांचा जीव धोक्यात आहे.

सतिश पाटील's picture

13 Nov 2015 - 3:16 pm | सतिश पाटील

पुढील भागाच्या प्रतीक्षेत...

मीता's picture

13 Nov 2015 - 3:41 pm | मीता

t

सतिश पाटील's picture

13 Nov 2015 - 3:57 pm | सतिश पाटील

अजून लहान आहे..पण मस्त आहे ...

पीके's picture

13 Nov 2015 - 4:45 pm | पीके

;)

बोका-ए-आझम's picture

13 Nov 2015 - 3:45 pm | बोका-ए-आझम

मग बघितल्यावर कळलं की.... ;)

सतिश पाटील's picture

13 Nov 2015 - 4:00 pm | सतिश पाटील

काय बगितल्यावर?

सागरकदम's picture

13 Nov 2015 - 4:01 pm | सागरकदम

अश्लील अश्लील

माझ्याकडे पण २ राजकन्या आहेत :)