चटपटीत चांगलचुंगलं खाण्याचा शौक होताच. मिसळगावाच्या कवीश्वर बाजारात एक छोटीशी टपरी टाकली. आपल्याला धंद्याची काय येवढी पडलेली नाही. जनशेवा महत्वाची. म्हणून टपरीवर पोटाला सोसेल एवढेच खा असा संदेश देणारी कार्टून्स पण लावून ठेवली. धंदा कमी झाला तरी चालेल, पण निदान लोकांनी आपल्या मालाचे निदान कौतुक तरी करावे अशी माफक अपेक्षा होती. टपरीवर केळी, शेंगादाणे, असे हौसेने मांडून ठेवले. चटमटीत मिसळ होती. म्हटले चार लोक खाऊन नाही, तरी निदान वास घेऊन कौतुक करतील.
पण झाले भलतेच. टपरी उघडल्या उघडल्याच एक उनाड मुलांची टोळी समोर येऊन थडकली. म्हटले पाहुया, निदान काही घेतील. पण त्यांचा म्होरक्या एखाद्या दांडगट मुनिसिपल इंसपेक्टर सारखा समोर उभा राहून म्हणतो- “कच्चा माल लावलाय.” म्हटले, “नाही, कच्चा-पक्का सगळाच आहे. बघाना.” पण त्यां वांड पोरांना टपरीवरल्या मालाशी काहीच देणे घेणे नव्हते. त्याची आपापसातच भंकस सुरू होती.
मामू- कच्चा माल लावलाय.
बूड – होना मामू, बऱ्याच दिवसांनी दिसला. आता धमाल होऊन जाऊ दे.
मामू- अरे बुडक्या, आजकाल टपरीवर असे घट्ट पीठ दिसतंय कुठे! सगळेच पानचट घोळ! उचला रे हाताला यील ते. जिलब्या पाडू.
टकाट्या- “यस बॉस”
पोरांनी भराभरा हात मारले, अन काय मिळेल ते उचलून बाजूच्या रिकाम्या जागेवर चिवडत बसले.
टवाळ पोरांचा हुडदंग बघून टपरी रिकामीच पडली होती. ह्या गँगची मिसळगावात वट असणार! मग मी देखील पोरे काय गलाडा करताहेत बघत बसलो.
मामूने केळ्याच्या घडाचा घोटून लगदा केला, आणि चक्क एक माकडासारखा बाहुला तयार केला. तो एक डोळा मिचकावीत होता. डोळ्यावर भज्यांची भिंगे लावलेला मोडका चष्मा होता. मग काय, कंपूची फुल गजाली सुरू.
अरे बघ बघ हे बंदर फक्त बायकांकडेच पहात आहे.
बायकांकडे नाही रे, चोळ्यांकडे!
साल्या अचरटा, काय बघतोस रे? देऊ कां एक कानाखाली?
आयला! आज बाजारात कसला घमघमाट सुटलाय!
घमघमाट नाही मसरनड्या घामाघामाट आहे! वर बघ, केवढ तापलय!
तुमी साले सगले पिसाटले आहे.
ए, चलारे, ते काका काय म्हणतील!
टवाळ टोळीचा तो उद्योग मिसळगावातल्या निदान ५५० बघ्यांनी पाहिला. पण टोळी सोडून बाकी सगळ्यांचीच बोलती बंद होती. एखाद दुसरा बघ्या सहानुभूतीचा शब्द तोंडातल्या तोंडात उच्चारून माझ्याकडे ओझरती नजर टाकून तिथून निसटला.
मी उद्गारलो “ अरे हे काय चाललंय?
आणि हद्द बघा, माझी उध्वस्त झालेली टपरी २६७ लोकांनी नुसती पाहिली, अन न बोलताच सगळे तिथून खसकले. नंतर एक फाडूबाळ मोडक्या टपरीसमोर उभा राहून म्हणतो- “अरे ही काय भानगड आहे?”
मी (मनात) म्हटले “You ask me, I ask who?”
प्रतिक्रिया
25 Oct 2015 - 5:02 am | यशोधरा
२६७ लोकांनी - २७२.
25 Oct 2015 - 6:06 am | कंजूस
आता ठरवा या बाजारात राहुटी लावायची की नाही.
25 Oct 2015 - 7:07 am | नाना स्कॉच
झेपेल तेवढीच घ्यावी म्हणतो मी!
25 Oct 2015 - 7:59 am | अत्रुप्त आत्मा
+111
प्यायची लायकी शून्य
आणि म्हणे मी बंदूक काढून हुबा!
25 Oct 2015 - 8:57 am | जव्हेरगंज
नानाची तंग
मिशिंग पात्येलं
:)
25 Oct 2015 - 9:21 am | नाना स्कॉच
डिसक्वालिफाई झालात! :D
25 Oct 2015 - 9:09 am | मुक्त विहारि
आता टपरीवर काहीतरी खमंग माल ठेवून बघा.
25 Oct 2015 - 10:35 am | अत्रुप्त आत्मा
अगदी बरोब्बर.
पण तो - यायला पाहिजे ना ! :P
25 Oct 2015 - 11:01 am | अत्रुप्त आत्मा
अगदी बरोब्बर.
पण तो - यायला पाहिजे ना ! :P
25 Oct 2015 - 11:16 am | पैसा
काका, बर्याच जणांनी तुमचा स्टॉल बघायच्या आधीच माल पळवला गेला होता. मी पाहिला तेव्हा तिथे नेमके काय आहे हेच समजले नाही खरंच!
एरवी तुम्ही छान लिहिता. आणि त्याला पावती मिळतेच की नाही! असे नाराज होऊ नका.
25 Oct 2015 - 1:57 pm | असंका
+१
कसल्या मालाची नास्धूस झाली हेच कळत नव्हतं अत्तापर्यंत.
25 Oct 2015 - 11:19 am | जेपी
=))
25 Oct 2015 - 11:28 am | दमामि
:):)
नवीन मालाच्या प्रतिक्षेत!
25 Oct 2015 - 12:14 pm | द-बाहुबली
खिक्क...!
बाकी लेख डॉक्यवरुन गेला. असो खसे का असेना आपान लिहेते झालात/आहात हा आनंद आहे...
25 Oct 2015 - 12:16 pm | मदनबाण
मनोहर पंत, रागे भरण्याचे काय कारण ? मी तर म्हणीन कच्चा माल आणि विडंबन दोन्ही सुंदर ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टुटी-फ्रुटी हुं में... ;) :- Karachi Se Lahore Tak
25 Oct 2015 - 12:23 pm | अरुण मनोहर
आमच्या एका मित्राने "मनास ह्या काहीतरी, शोधण्याचा ध्यास होता" ही सुंदर गझल लिहीली. तिला संगीतात सजवून एक सुरेल गाणे दुसऱ्या मित्राने तयार केले, व ते आमच्या (सिंगापूर) येथील गायिकेने "काव्यस्वरांजली" ह्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात गायिले. ह्यात आमच्या शब्दगंध ह्या स्वरचित कविता गटाच्या कविताना इथल्याच संगीतकारांनी संगीत बद्ध केले होते.
त्यातल्याच एका गझलेचे "चापण्याचा ध्यास" हे विडंबन.
~ चिन्ह हे गाणे गाताना स्वर लांबविण्यासाठी दिले होते..
दंगली मध्ये हे विडंबन धारातीर्थी पडले म्हणून शोक पाळत आहे.
25 Oct 2015 - 12:29 pm | पैसा
मित्रांची हरकत नसेल तर ती गझल इथे द्या ना! आम्हीही आस्वाद घेऊ.
25 Oct 2015 - 12:35 pm | मदनबाण
हेच म्हणतो.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- टुटी-फ्रुटी हुं में... ;) :- Karachi Se Lahore Tak
25 Oct 2015 - 12:40 pm | अरुण मनोहर
मित्राला दंगलीत खेचायचे नाहीय. इथे जंगलराज आहे!
25 Oct 2015 - 2:21 pm | मुक्त विहारि
व्यनि न करता इथेच लिहित आहे......
============================================
" इथे जंगलराज आहे!"
ह्या वाक्याला, तीव्र आक्षेप.....
इथे अजिबात जंगलराज नाही.
कदाचित इथे तुम्हाला आदरणीय किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्ले प्रतिसाद मिळत नसतील.
पण.....
खरे मिपाकर उत्तम प्रतिसाद देतात.
डू-आय-डी फक्त मिपाच्या मिपाच्या काही धाग्यांवर येतात. विशेषतः "श्रीगुरुजींच्या".
त्यामुळे सूड,टका,माप, अतृप्त,प्रचितस आणि इतर अनेक खरे मिपाकर जर तुमच्या लेखातील किंवा कवितेतील उणीवा काढत असतील तर त्या नक्कीच उणीवा असतील.
जातीवंत मिपाकर कधीच व्यक्तीगत टीका करत नाहीत.
26 Oct 2015 - 3:17 pm | द-बाहुबली
हे सपशेल दिशाभुल करणारे वाक्य आहे असे नमुद करतो. विदाच मागणार असाल तर एकतर आपण डोळे मिटुन मिपा वाचता असेच मानावे लागेल. आणी हो वरी विधान करताना मी व्यनी व खरडवह्यातील लिखाण अजिबात गृहीत धरलेले नाही याची अवश्य नोंद घ्यावी.
बाकी उर्वरीत प्रतिसादाशी बहुतांशी सहमत.
(संपादित)
26 Oct 2015 - 5:27 pm | नीलमोहर
+१
25 Oct 2015 - 1:03 pm | विवेकपटाईत
मिसळपाववरचे उनाड मुले शरीफच आहे, फक्त टपरी लुटली, आणिक काही केले नाही. दुसरी कुठलीतरी SSSमी गेंग असती तर पळवून लावले असते.
25 Oct 2015 - 1:06 pm | अरुण मनोहर
आमचे नातू देखील अतिशय खोड्याळ आहेत. ती पण एक मजा असते!
25 Oct 2015 - 1:42 pm | माम्लेदारचा पन्खा
सामोपचाराच्या प्रथमोपचाराची गरज आहे.....
25 Oct 2015 - 1:59 pm | कंजूस
फाडूबाळ यांचा ओडिट रिपोर्टातला रिमार्क होता तो "अरे { अरु~ ण असं म्हणायचं असावं }, ही काय भानगड आहे?"
26 Oct 2015 - 1:53 pm | नाखु
"मनोहर" तरी असं तरी कस म्हणू मी?
26 Oct 2015 - 2:29 pm | सूड
हे इथवर ठीक आहे, त्याचा अर्थ खालील प्रमाणे नव्हता.
दमामि ह्या आयडीची पार्श्वभूमी तुम्हाला माहीत नसावी, तो दमामि साठी खोचक प्रश्न होता, तुमच्या कवितेसंदर्भात नाही. त्यावर विडंबन येणार आहे हे माझ्या गावीदेखील नव्हतं.
आणि दमामिसाठीही इथेच!! तुझ्या ज्या कोणी बोलवित्या धनीणी/धनी असतील त्यांनी डोळ्यात तेल घालून हे वाचा. तुमच्यामुळे विनाकारण माझी बदनामी होणार असेल तर मी हे खपवून घेणार नाही.
26 Oct 2015 - 5:03 pm | अभ्या..
पटले रे सूडक्या.
रोखठोक असावे तर असे.
27 Oct 2015 - 1:55 pm | प्रसाद गोडबोले
करेक्ट !
खटक्यावर बोट जाग्यावर पलटी !
27 Oct 2015 - 2:10 pm | बॅटमॅन
एकदम पर्फेक्ट सूडपंत.