आमदार संपतरावांनी उदघाटन केले आणि सोनटाकळी ते बोरगाव रस्त्याचे काम चालु झाले. कांट्रेक्टर कासलीवालला साहेबांनी स्पेशल सूचना देऊन महीनाभरात कोसभराचा पक्का डाम्बरी रस्ता करवुन घेतला. दोन गाव एकमेकांना जोडली गेली. तालुक्याला जायला सोपं झालं. खाजगी वहानांची वर्दळ वाढली. जिथे दिवस जायचा ते काम घंटयात होउ लागलं. लोक आपल्यावर जाम खुश असणार असा विचार करुण साधारणता महिनाभराने संपतरावांनी सोनटाकळीचा दौरा करायचं ठरवलं. साहेबांना त्या कोसाभराच्या नव्या कीरिंग रोडवर साधारणता सात ते आठ स्पीडब्रेकर लागले म्हणजे गाडी आदळतच टाकळीला आली. चौकशी केल्यावर समजले की सात ते आठ ठिकाणी तो नवा किरिंग रोड कापला गेलाय. साहेब संतापले. सरपंचाला विचारल्यावर तो म्हणाला, सड़क झाल्यावर दोन दिवसांनी रमनला कालव्यातून पाइपलाइन करायचे सुचले नंतर जगनला सुचले, चार दिवसांनी शेतात राहणाऱ्या चंपा अत्याच्या गनुने समोरच्या तारेवर अकड़ा टाकून 'अंडरसड़क' वायरिंग केले. मग असच काही वस्तीवर राहणाऱ्यांनी वाहनं जोरात पळतात, मुलं ख़ेळत असतात, म्हणून कुदळीने खनुन स्पीडब्रेकर तयार केले. या चार दोन लोकामुळे साहेबांच्या आनंदावर विरजन पडले ते आणखी भडकले. त्यांनी ग्रामसेवकाला अधिक चौकशीसाठी पाठवले. चौकशीतले जबाब:
"मी एकटाच दिसलो का तुमाला? बाकीच्यायनि खनले ते बघा ना?" रमन.
"पाइपलाइन का अभाळातुन करूं मंग?" जगन.
"कुंत्या कलेक्टराची गाडी इनार हाय कनु ह्या रोडाव्हर?" चंपाअत्या.
"भौ सरकारी पैका मजी आपलाच पैका. काय बीघडलं उलसक् खंदलं मनून. शेवटी लेकरं आदिक की रोड आदिक?" वस्तीवाले.
"भौ मह्याजवाळ कुठं कार हाय, माही बैलगाड़ी त् कश्यातुन बी पळती. कहयाला बांधला रोड? पोट्टे आंधळ्यावाणी गाड्या हानत्याय." दूसरा वस्तीवाला.
शेवटी निवडणुका जवळ आल्यात, ही बी मानसच हाइत असा विचार करुण संपतराव आल्यावाटेने आदळत आदळत वापस गेले.
प्रतिक्रिया
25 Oct 2015 - 1:54 pm | जव्हेरगंज
फक्त शेवट दणकट हवा. कथा जबराट होतील.
शैली चांगली आहे. :)
25 Oct 2015 - 2:26 pm | बाबा योगिराज
जम्या.
शेवट थोड़ा दमदार हवा.
पुलेशु.
25 Oct 2015 - 9:51 pm | आनंद कांबीकर
...
25 Oct 2015 - 3:19 pm | असंका
हां हे असं आवडतं आपल्याला.
बेश्ट!!!
धन्यवाद!!
25 Oct 2015 - 6:55 pm | द-बाहुबली
मी म्हटलं सडक चित्रपटाचे परिक्षण वगैरे आहे की काय.. पण छ्या.
25 Oct 2015 - 11:49 pm | प्यारे१
रीमेक आला का काय?
गोष्ट आवडली ओ काम्बिकर
28 Oct 2015 - 11:03 am | आनंद कांबीकर
त्याचे काय परिक्षण करायचं. तुमाला सिनेमाचा भलताच नाद दिसतोय बुवा
25 Oct 2015 - 7:00 pm | जेपी
चांगलय..
25 Oct 2015 - 10:23 pm | बोका-ए-आझम
झकास!
25 Oct 2015 - 11:11 pm | आनंद कांबीकर
जरूर प्रयत्न करू
26 Oct 2015 - 12:09 am | एक एकटा एकटाच
सही
26 Oct 2015 - 11:02 am | शित्रेउमेश
लई भारी राव
26 Oct 2015 - 11:33 am | सामान्यनागरिक
हा अनुभव बर्याचदा येतो. यात कुठलीही कल्पना नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजुला शेतं असली तर लोक सर्रास रस्ता खणुन पाईपलाईन टाकतात. त्यात त्यांना काहीही अयोग्य आहे असे वाटतनाही पहिल्या खड्ड्यात दाण्ण्कन गाडी आदळली की आपणच शहाणे व्हायचे आणि चुपचाप वीस तीस च्या वेगाने गाडी चालवायची.
26 Oct 2015 - 7:22 pm | आनंद कांबीकर
रास्ते नविन असले तरी पण
26 Oct 2015 - 11:38 am | मराठी_माणूस
मुंबईतही नळासाठी रस्ते खोदुन ते तसेच थातुर मातुर बुजवले जातात.
26 Oct 2015 - 1:38 pm | आनंद कांबीकर
जिकडे तिकडे सारखेच
28 Oct 2015 - 11:24 am | अजया
आमच्या भागात हे सर्रास होत असते. स्पीड ब्रेकर तर लोक घरापुढे उंबरा घालुन घ्यावा असे घालतात !
28 Oct 2015 - 2:34 pm | आनंद कांबीकर
..
28 Oct 2015 - 2:37 pm | आनंद कांबीकर
..
28 Oct 2015 - 4:15 pm | चिगो
माह्या गावातबी सात-आठशे मिटरच्या रस्त्याले अशेच डझनावारी 'स्पीड-ब्रेकर' हायेत.. त्यातच मंग रस्त्यावरच वाळू-गिट्टीचे ढीगारे ओतणं, रस्त्यातच ट्रॅक्टर-ट्रॉल्या-नांगर ठीवणं, भर रस्त्यात गाडी थांबवून गप्पा मारणं, असं कायबाय बी करत असतात लोक.. हाये, चालू हाये ते ठीकच हाये लोकशाहीत..
कथा जमलीय, कांबीकरसाहेब..
28 Oct 2015 - 5:38 pm | आनंद कांबीकर
...
28 Oct 2015 - 4:20 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त!