पल्याडचे गवत नेहेमीच अधिक हिरवे वाटणार्यांच्या गर्दीत, एकनिष्ठ सहजीवन अंगिकारणारे नेहेमीच अपवाद असणार.
आपले कोमल हात, विशाल पर्वताच्या गळयात लडिवाळपणे टाकून,
त्याच्याशी प्रियाराधन करणार्या नदीला,
सागराची धीर-गंभीर गाज मोह घालते
आणि ती पर्वताला सोडून, सागरात विलीन होण्यासाठी,
बेभान, बेधुंद होऊन धावत सुटते.
प्रियकराला सोडून आपल्या कुशीत आलेल्या पुष्ट सरितेला पाहून समुद्रही सुखावतो
पण तोही अधून्-मधून चकवा देणार्या चंद्रिकेच्या पाशात अडकतो.
पूर्ण यौवनाने मुसमुसलेल्या पौर्णिमेच्या रात्री तर तो धीर सोडून उचंबळू लागतो!
त्या एकाकी तळ्याच्या कोपर्यात ते हंसद्वय मात्र एकमेकांत गुंतलेले असते,
भोवतालच्या जगाची पर्वा न करता!
प्रतिक्रिया
18 Dec 2008 - 3:42 pm | विनायक प्रभू
एकदम कडाम कुडूम कविता.
18 Dec 2008 - 3:45 pm | पॅपिलॉन
नक्की काय ते समजले नाही. अधिक स्पष्ट केलेत तर समजू शकेल.
कविता वाचून प्रतिक्रिया देल्याबद्दल धन्यवाद.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.
18 Dec 2008 - 3:49 pm | विनायक प्रभू
कळले नाही म्हणता आणि शेवटच्या दोन ओळीत स्प्ष्टीकरण पण करता. असो.
चांगली कविता.
18 Dec 2008 - 7:41 pm | अमोल जाधव
खरच सुन्दर आहे. आपली कल्पना शक्ति कहरच चान्गली आहे
18 Dec 2008 - 8:48 pm | सखाराम_गटणे™
वाह वाह, छानच आहे,
आवडले
पुले शु
----
सखाराम गटणे
19 Dec 2008 - 5:01 am | धनंजय
ही तळी-नद्या-समुद्र लफडी करतात, पण हंसाना निवांत एकांतासाठी जागा देतात हे तरी बरे. कल्पना आवडली.
ध्यान माझे व्यापते जी, ती मला नाही बधे
ज्यामध्ये ही गुंतलेली, पूजितो तो त्या तिला
आणखी ही वेगळी माझ्यामुळे नि:श्वास दे
थू मला, त्याला, तिला, त्या कामदेवाला, हिला
************************
(भर्तृहरी)
यां चिन्तयामि सततं मयि सा विरक्ता
साऽप्यन्यमिच्छति जनं स जनोऽन्यसक्तः ।
अस्मत्कृते च परिशुष्यति काचिदन्या
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च ॥
************************
19 Dec 2008 - 7:15 pm | अवलिया
धनंजय शेठ
धिक् तां च तं च मदनं च इमां च मां च
आणि
थू मला, त्याला, तिला, त्या कामदेवाला, हिला
मस्तच बर का!
-- अवलिया
अवांतर - सध्या आम्ही कामात व्यग्र असल्याने सर्व प्रकारच्या वादविवादात तटस्थ आहोत हे सुज्ञांच्या लक्षात आले असेलच.
कारण, वाद विवाद हे वेळ घालवण्याचे चांगले साधन आहे. आणि, तुर्तास वेळ कमी आहे. असो.
19 Dec 2008 - 5:54 am | मीनल
पद्द रूपी गद्द वाटते आहे.
का़ कूणास ठाउक ? पण कविता म्हटली की कमी शब्दांच्या ओळीच डोळ्या समोर येतात म्हणून असेल कदाचित.
तूमची कविता खूप आवडली. छान आहे.
विषय खर तर जूनाच. त्यातली नदी ,समुद्र्,चंद्र , हे ही जूनेच .
पण तरीही ही कविता नवी वाटली..
म्हणूनच आवडली.
मीनल.
19 Dec 2008 - 8:33 am | प्राजु
कल्पना जरी जुन्या तरी मुक्तक छान वाटले..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Dec 2008 - 2:13 pm | पॅपिलॉन
सर्व रसिकांची आभार.
धनंजय, आपला स्पॅनिशप्रमाणे संस्कृतचाही अभ्यास दांडगा दिसतोय! भर्तृहरीच्या कवनाचे भाषांतर उत्तम आणि प्रसंगानुरूप.
मीनल, खरे आहे तुमचे म्हणणे. पद्यरुपी गद्यच म्हणा हवे तर. पण ही भावना व्यक्त करायला हा मुक्त फॉर्म अधिक योग्य वाटला.
पुन्हा एकदा धन्यवाद.
फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.