आपण अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, नासिक, जळगाव जिल्ह्याचे आहात ? अहमदनगरयेथे 'विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६ आयोजन'चे आमंत्रण प्रस्तावासाठी अनुमोदन हवे आहे

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
12 Oct 2015 - 1:31 pm

मराठी विकिपीडियाचा लेखक आणि वाचक वर्ग संबंध महाराष्ट्रात तसेच महानगरांपलिकडे उर्वरीत भारतात पसरलेला आहे परंतु संघटनात्मक आयोजने सहसा केवळ महानगरांपुरती मर्यादीत रहातात. विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी भारतातील शहरांकडून प्रस्ताव मागितले गेले आहेत आणि महानगरांची काँपीटीशन असेल परंतु विकिमिडीया चळवळीचा मुख्य हेतु सर्वत्र पोहोचण्याचा आहे या दृष्टीने अहमदनगर येथील अनुभवी विकिपीडियन्सना विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६साठी प्रयत्न करण्याचे आवाहनास त्यांनी प्रतिसाद दिला आहे. अहमदनगर महाराष्ट्रातील पुण्यासहीत औरंगाबाद, नासिक, जळगाव या शहरांपासून साडेतीन चार तासांच्या अंतरावर तसे मध्यवर्ती पडते. तसा कॉन्फरन्सचा उद्देश भारतभरातल्या विकिपीडियन्सना तीन दिवस एकत्र आणण्याचा असतो समांतर मराठी किंवा लोकल भाषांचे ट्रॅक आयोजीत करता येतात. विकिपीडिया विषयक चर्चा ट्रेनिंग तांत्रिक सुधारणा भेटीगाठी इत्यादी गोष्टी त्यात होतात.

मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:चावडी/इतर_चर्चा#विकिकॉन्फरन्स इंडिया २०१६ आयोजन (अहमदनगर) येथे प्रस्तावास सहभाग अनुमोदने हवी आहेत, अर्थात अनुमोदन करु इच्छित व्यक्तींना अनुमोदन मराठी विकिपीडियावरील पानावरच करावे लागेल.

धन्यवाद

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2015 - 1:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

येऊ शकतो तारीख कळवा.
खूप दिवसापासुन तुम्हालाही तसं भेटायचंच आहे.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

12 Oct 2015 - 2:06 pm | माहितगार

नक्कीच भेटूया ! मी मागे पुणे विद्यापिठात आपणास बोलवले होते पण तेव्हा जमले नव्हते या वेळी जरुर जमवा अर्थात मराठी विकिपीडिया चावडीवर आपले अनुमोदन नोंदवावे ही नम्र विनंती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Oct 2015 - 3:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनुमोदन नोंदवत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(मराठी विकिपीडिया सदस्य)

माहितगार,

मराठीच्या जाणीवांचा केंद्रबिंदू पैठणच्या दिशेने सरकत असल्याचे पाहून संतोषमिश्रित मौज वाटली. उपक्रम यशस्वी होवो ही सदिच्छा.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

12 Oct 2015 - 5:04 pm | माहितगार

=)) धन्यवाद !