अशीहि एक धर्म निरपेक्शता

दिवाकर कुलकर्णी's picture
दिवाकर कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Oct 2015 - 11:31 pm

अशीहि एक धर्मनिरपेक्षता !
नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना,
संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात,
त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी .
त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई,
बसलेली असते खेळणी विकायला,
मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज,
"घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं,
"जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो,
"ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं,
"ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही,
खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!

कथा

प्रतिक्रिया

दिवाकर कुलकर्णी's picture

3 Oct 2015 - 11:46 pm | दिवाकर कुलकर्णी

क्विलपँड बरेच खेपेला चालत नाही सबब शुद्ध(?) लेखन समजून घ्यावे

जव्हेरगंज's picture

3 Oct 2015 - 11:50 pm | जव्हेरगंज

माझ्या गावात मंदिरातही मुस्लिम बांधव येतात. दिवाळीही मोठ्या ऊत्साहाने साजरी करतात. रमजानला अख्खे गाव त्यांच्या वस्त्यांत शिरखुरमा वरपायला हक्काने जाते. हे लहानपणापासुन पाहत आलोय. त्यामुळे मला वरील उदाहरण विशेष वाटले नाही.
पण तुमचा पहीलाच लेख आहे. प्रयत्न आवडला.
'ळ' काढायला शिका. :)
येऊ द्या अजुन .:)

अरुण मनोहर's picture

4 Oct 2015 - 5:45 am | अरुण मनोहर

हिंदी फक्त मुसलमानच बोलतात काय?

"जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो,

दत्ता जोशी's picture

4 Oct 2015 - 11:36 am | दत्ता जोशी

"हिंदी फक्त मुसलमानच बोलतात काय?"
मुद्दा मान्य आहे पण काही मुस्लिम जन्माने महाराष्ट्रीय असले, महाराष्ट्रात वाढले आणि शिकले असले तरी उर्दुच (!) बोलतात. तुम्ही मराठी बोललात तरी ते त्यांचीच भाषा रेटत राहतात हा अनुभव आहे. हाच अनुभव ( विशेषतः मुंबई स्थित, जन्माने आणि कर्माने महाराष्ट्रीय असलेल्या बर्याच गुज्जू आणि दक्षिण भारतीय लोकांच्या बाबतीत आला आहे. ) ते जाणून बुजून हिंदी बोलत राहतात. कधी कधी या सगळ्याची चीड येते.(पुन्हा: सगळेच मुस्लिम आणि परप्रांतीय तसे नाहीत. त्यांची माफी मागून ) पण असा विचार केला कि आमच्यावर शिवसेना, मनसे शिक्का बसलाच. महाराष्ट्रात जन्मलेला, लुंगी नेसून आणि कपाळाला गंध लावलेला मोडकीतोडकी का होईना मराठी बोलताना क्वचित पाहायला मिळतो.
दिवाकर साहेब,
दुर्दैवाने, नेमके हेच चित्र लावण्यावरून सांगली, मिरज सारख्या संवेदनशील भागात अनेक हिंदू- मुस्लिम दंगली झाल्या आहेत.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Oct 2015 - 12:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान स्फूट रे दिवाकरा.'ये सबसे जादा खपता है'ह्यावरून ती बाई मराठीच असावी असे ह्यांचे मत.

हाच अनुभव ( विशेषतः मुंबई स्थित, जन्माने आणि कर्माने महाराष्ट्रीय असलेल्या बर्याच गुज्जू आणि दक्षिण भारतीय लोकांच्या बाबतीत आला आहे.

असाच अनुभव बेळगाव्,धारवाड भागात्,चेन्नईत राहणार्या मराठी माणसांबद्दल येतो असे ह्यांचे तेथे राहणारे मित्र म्हणायचे रे दत्ता. म्हणजे गणेशोत्सव जोरात साजरा करतील पण पोंगल्,ओनमच्या दिवशी मात्र कामावर जातील.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 12:02 pm | टवाळ कार्टा

खिक्क,,, मान गये माई की पारखी नजर को =))

दत्ता जोशी's picture

4 Oct 2015 - 12:55 pm | दत्ता जोशी

"खिक्क,,, मान गये माई की पारखी नजर को =))"
भा पो ध.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 1:07 pm | टवाळ कार्टा

भा पो ध मध्ये ध म्हणजे काय?

श्रीगुरुजी's picture

4 Oct 2015 - 1:13 pm | श्रीगुरुजी

>>> खिक्क,,, मान गये माई की पारखी नजर को =))

+१

माई गाजरपारखी आहेत. उगाच नाही त्यांनी नानासाहेबांना गटवलं!

काहीही अश्लील हं..... श्री
;)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 1:16 pm | टवाळ कार्टा

आग्गाग्गा

श्रीगुरुजी's picture

4 Oct 2015 - 8:42 pm | श्रीगुरुजी

मी म्हटलंच होतं की माईसाहेब गाजरपारखी आहेत म्हणून. या धाग्यावरचे नानासाहेबांचे अर्थपूर्ण आणि समर्पक प्रतिसाद वाचले की याची प्रचिती येईल

नाव आडनाव's picture

4 Oct 2015 - 1:05 pm | नाव आडनाव

खपता है'ह्यावरून ती बाई मराठीच असावी असे ह्यांचे मत
तुमच्या आधीच्या प्रतिसादांवरून मला वाटायचं तुम्ही ह्यांचं मत मोठमोठे सामाजिक विषय, समस्या ह्यावरंच घेता. इथल्या प्रत्येक वाक्यावर / शब्दावर मत म्हणजे भारीच ना !
बाकी लई दिसांनी ? बर चाललंय ना?

अद्द्या's picture

4 Oct 2015 - 8:24 pm | अद्द्या

बाप जन्मात कधी बेळगाव / धारवाड , चेन्नई भागात आलाय का ?

कि आपलं उगा बडवला कळफलक . .

गणेशोत्सव मुळात मराठी सण .

पोंगल ला आपल्या कडे "संक्रांत " म्हणतात . .

बाकी ओणम च म्हणाल तर श्रावणात येतो .

पण असो . तुमचे "हे" जर अति शहाणे दिसतात . .त्यामुळे . .असोच

दत्ता जोशी's picture

4 Oct 2015 - 12:45 pm | दत्ता जोशी

जन्माने, आणि शिक्षणाने महाराष्ट्रीयन म्हटलं मी. माझे अनेक मित्र आणि नातेवाईक जे गेले अनेक वर्षे किंवा पिढ्या न पिढ्या वेगवेगळ्या राज्यात राहत आहेत ते तिथल्या संस्कृतीशी आणि भाषेशी एकरूप झाले आहेत. ( उदा. केरळ, कर्नाटक, गुजरात). कामासाठी बदली निमित्ताने वगैरे काही काळ पार प्रांतात राहणाऱ्या न विषयी नाही लिहील मी. तामिळ लोकांविषयी काय लिहावे?

ज्या मिरजेच्या चित्रावरुन गोंधळ झाला ते कुणी काढले हे माहीत असल्याने पास.

पैसा's picture

5 Oct 2015 - 1:01 pm | पैसा

क्या मय सही समझ रही हूँ!

फुलथ्रॉटल जिनियस's picture

4 Oct 2015 - 1:25 pm | फुलथ्रॉटल जिनियस

अफजलखानांचा कोथळा शिवाजींनी बाहेर काढला याला कोणताही समकालीन पुरावा नाही, हिंदुत्ववाद्यांनी मारलेली ती लोणकढी थाप आहे.शिवाजी व अफजल खान यांचे शामियाण्यात वाद झाले , शिवाजींनी अफजलखान यांना हिसका दाखवल्यानंतर ते पळुन गेले, पुढे मराठ्यांनी त्यांचा पाठलाग करुन वाईजवळ पाचवड इथे त्यांची हत्या केली, असे खरे प्रकरण आहे.

अरे वा. महाराजांच्या नुसत्या हिसक्याला घाबरला अन पळाला. मर्द मावळ्यांनी गाठून मारला. लैच चिल्लर होता म्हणा की.
ब्येस्ट ब्येस्ट.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 1:33 pm | टवाळ कार्टा

हट रे...थोरल्या राजांना भेटल्यावर खानाचे हृदयपरीवर्तन झाले अस्णार ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Oct 2015 - 7:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

खर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्य ते... "अफझलखानाचे हृदयपरीवर्तन झाल्यावर त्याने स्वतःच आपल्या हाताने आपाला कोथळा बाहेर काढला" आसे खानमामाकी (की खानसामाकी) बखर मध्ये पान ४८६ वर खुद्द खानाने स्वतःच्या रक्ताने लिहून मगच प्राण सोडला.

नाखु's picture

5 Oct 2015 - 10:10 am | नाखु

डॉ क सर आम्ही वाचला तो इतीहास असा होता:

राजे अफझलखानासमीप बसले,त्यांचा लॅपटॉप उघडून मिपा लॉग इन केले आणी मिपावरील साहीत्य खजीना खानापुढे रिता केला.

आता खानाची पडली उर्दु भाषा आणि भाषांतरकार ही पाहिजे तोडीचा (इथे ताडीचा काडीचाही उपयोग नाही म्हणून दादुमियांचे नाव आपसूक गळाले) बॅट्या संदर्भ भेंडोळी घेऊन तयारीत होताच (साथील एकाला दोन असावेत म्हणून मालोजीराव आणि अद्द्या होतेच) नेम्का जेपी काही कारणाने शामियान्याचे बाहेर गेला होता म्हणून या ऐतीहासीक प्रसंगात उपस्थीत नव्हता. (इतीहासच काय भूगोलही त्याला माफ करणार नाही,ऐनवेळी दांडी मारायची वाईट्ट खोड त्याला तेव्हा पासून आहे याची नम्र नोंद)

राजेंनी एक एक धागा दाखवावा आणि त्याचा समजेल अश्या उर्दुत बॅट्याने अनुवादावा असा सुमारे २-३ तास संवाद चालला.

आता ता राजेंनी धूर्तपणे आणि चाणाक्षपणे मिपा ऐतीहासीक मैलाचे दगड (शब्द नीट वाचा आणि अनर्थ करू नका) ठरलेल्या कलाकृती निवडल्या आणि त्याचे रसाळ निरूपणं अनुवाद बॅट्याने केले. त्या कलाकृती येन प्रकारे.

मोकलाया दाही दिशा
ऐ तू चल नं
लाटकरांनी लाटलेले पण नीट न भाजलेले पापड
जीवनभाऊंचे सुरस जीवन सार
अकुंच्या बोधकथा
निसोंच्या शोधकथा

यानंतर सदर साहीत्या मेजवानीची सांगता स्नेहांकीता ताईच्या मिपाकर लक्षणे या सारांरुपाने झाली आणि परीणाम व्हायचा तोच झाला.

खानाचे हस्सुन हसुन गडबडा लोळाल्याने आणि बेंबीच्या देठापासून हसल्याने लहान आतड्याबरोबरच मोठ्या आतड्यावरही अतिअति ताण आल्याने पोटाचा अल्सर होऊन अल्पषा आजाराचे निमित्त होऊन निधन झाले.

इती"हास" प्रेमी यमक सम्राट जिल्बी प्रेमी अत्मुदा चारोळीवाले यांच्या एका शोधनिबंधातून साभार

अज्ञ बालक नाखु

टवाळ कार्टा's picture

5 Oct 2015 - 11:55 am | टवाळ कार्टा

ख्या ख्या ख्या
खि खि खि
खु खु खु

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Oct 2015 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

खानाने स्वहस्ते स्वरक्ते बखरीत लिहीलेल्या एकवाक्यी लिखाणावर त्याला शेवटचे पाजायला म्हणून आणलेले पाणी सांडल्यावर रक्त पानभर पसरले. त्या पानावर आता वरील मजकूर आहे... निदान नव(व्हं)इतिहासकारांचा तरी तसा दावा आहे. (असे त्या बखरीच्या संशोधनलेखनाच्या तळटीपेत नमूद आहे.)

पैसा's picture

5 Oct 2015 - 1:02 pm | पैसा

एकोळी लिखाण कसे ठेवले? संपादक काय करत होते? =))

तर्राट जोकर's picture

5 Oct 2015 - 1:10 pm | तर्राट जोकर

तेव्हापासूनच एकोळी लिखाण ठेवायचे नाही हा निर्णय झाला असेल.

बॅटमॅन's picture

5 Oct 2015 - 12:16 pm | बॅटमॅन

खी खी खी, ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =)) =)) =))

सहीच ओ.

सस्नेह's picture

5 Oct 2015 - 12:47 pm | सस्नेह

काहीही हां नाखुकाका !

रातराणी's picture

5 Oct 2015 - 12:52 pm | रातराणी

काका _/\_ :)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Oct 2015 - 1:26 pm | अत्रुप्त आत्मा

इती"हास" प्रेमी यमक सम्राट जिल्बी प्रेमी अत्मुदा चारोळीवाले यांच्या एका शोधनिबंधातून साभार

╰_╯ इसका बदला लिया जाएगा, बराब्बर लीया जाएगा!
दू दू दू ना\^o^/खून!!! :-/

जेपी's picture

5 Oct 2015 - 5:10 pm | जेपी

=))

कहाँ थे इत्ते साल से मियाँ????
हिन्दुस्थान की अवाम आप के न होने के कारण दुनिया से पीछे रह गयी| खैर, देर आये दुरुस्त आये|

सुबोध खरे's picture

4 Oct 2015 - 2:26 pm | सुबोध खरे

@फुलथ्रॉटल जिनियस
अहो तसे झालेलं नाही.
शिवाजी महाराजांनी धमकी दिल्याने अफझल खानाने घाबरून आत्महत्या केली असे खानसाम्याची बखर मध्ये वाचल्याचे आठवते. वाचा खानसाम्याची बखर (शव्वाल )हिजरी१३०६ -१३०७
जाता जाता -- उद्या हे इतिहास लिहिला तर मिसळपाव हे संस्थळ नव्हतेच ते तर खिमा पाव असे होते पण काही नतद्रष्ट उजव्या( किंवा भगव्या) लोकांनी त्याला शाकाहारी करायचे म्हणून मिसळ पाव केले म्हणतील.
ह. घ्या.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

4 Oct 2015 - 3:16 pm | फुलथ्रॉटल जिनियस

डॉक्टर माझ्या कमेंटमध्ये मी जे लिहिले आहे ते खरे आहे, वाई पाचवड कडच्या कुणालाही विचारा ते सांगतील....

प्यारे१'s picture

4 Oct 2015 - 4:28 pm | प्यारे१

जन्म गेला आमचा पाचगणी, वाई मध्ये. शेंड्या लावायची कामं बंद करा फुलथ्रॉटल.
आधी खानाचा तळ वाईमध्ये होता त्याला त्या भागाची माहिती होती म्हणून तो वाई भागात आला नि महाराजांना तिकडे बोलावू लागला. महाराजांनी न जाता खानाला प्रतापगडावर बोलावलं नि तिकडेच मारला.

कोथळा लिटरली काढला नसेलही कदाचित पण मारला तिकडेच असणार.
अन्यथा प्रतापगडाच्या पायथ्याला खानाची कबर कशी आली असती?

मी लहानपणी ऐकलेली कथा वेगळीच आहे
अफजल खान हा अत्यंत कनवाळू, दयाळू आणि दानशूर म्हणून प्रसीध्द होता. गरीबांच्या बद्द्ल त्याला विशेष आदर होता. तो शिवाजी महारांजाच्या वडीलांना जुनियर असल्यामुळे शिवाजी महाराजांवर त्याचा विलक्षण लोभ होता. शिवाजी महाराज करत असलेल्या समाजसेवेबद्द्ल महाराजांना एकदा प्रत्यक्ष भेटून गळाभेट घ्यावी अशी त्याची फारा दीवसापासूनची ईच्छा होती. भेट ठरली. बरेच दीवसांची आपली ईच्छा पूर्ण होणार म्हणून खान नर्व्हस होता. भेटीचा दीवस उजाडला. आपल्या लहान भावाला भेटावे तशा ओढीने खान राजांना भेटला. या भेटीत महाराजांनी मावळ भागातल्या शेतकर्‍यांची दुर्दशा खानास ऐकवली. ती ऐकून खानास गहीवरुन आले. ईतके गहीवरुन आले की त्याचे काळीज पिळवटून मग आतडी पिळवटून ती बाहेर आली. आणि त्यातच खानसाहेबांचा अंत झाला.

खटपट्या's picture

4 Oct 2015 - 5:05 pm | खटपट्या

ही सर्व घटना ऐकून जिजाउ प्रचंड संतापल्या आणि त्यांनी महाराजांना यास जबाबदार धरले. आणि मग प्रायश्चित्त्त म्हणून महाराजांना त्याची कबर बांधायला सांगीतली. मात्रुभक्त महाराजांनी ही आज्ञा मानून लगेच आलिशान कबर प्रतापगडावर बांधली,,,

खटपट्या's picture

4 Oct 2015 - 5:07 pm | खटपट्या

आसंय ते सगळं

बबन ताम्बे's picture

5 Oct 2015 - 5:33 pm | बबन ताम्बे

काय एक एक नवीन इतिहास कळतोय. मी इमॅजीन करतोय की शामियान्यात महाराज आणि अफजलखानात वादावादी काय झाली असेल. आणि महाराजांचा शेवटचा डायलॉग काय असेल की खान पाय लावून सैन्यासकट पळाला. "कसम भवानी की, मैं तुम्हारे टुकडे टुकडे कर दूंगा? "

:-)

अस मी पण काही ऐकल नाही कधी आता तुम्ही म्हणताय तर दसऱ्याला गावी गेलो कि ऐकेन

स्वगत: वाई आणि कमळगडाच्या परिसरात आयुष्याची २५ वर्षे वायाच गेली म्हणायची.

प्यारे१'s picture

5 Oct 2015 - 5:36 pm | प्यारे१

@ हाडक्या, हा बघ सातारा गँग मेम्बर! ;)

तर्राट जोकर's picture

4 Oct 2015 - 3:48 pm | तर्राट जोकर

ओ काय पन सांगू नका डागतर... शामियानात झुरळ घुसल्यालं बंगून हाफजलखानास हार्टटेक आलाय असं म्हंते. झुरलं घुसल्याचा आळ आपल्यावर येऊ नये म्हून 'खान्सामा खोटं बोलला' असं इंग्रजांच्या कोक्रोचीय डायारीज्मधे लिवलं हे.

श्रीगुरुजी's picture

4 Oct 2015 - 8:52 pm | श्रीगुरुजी

>>> वाचा खानसाम्याची बखर (शव्वाल )हिजरी१३०६ -१३०७

चुकलात तुम्ही डॉक्टरसाहेब. तुम्ही नानाखाँची बखर (शव्वाल) हिजरी १३०५ -१३०६ यातील रूमाल क्रमांक ७८६ वाचा. हे वाचल्यानंतर नानासाहेबांचा दावा खरा असल्याचे ध्यानात येईल.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 10:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्याचं रुमालाला वेगवेगळ्या वस्तु पुसल्या गेल्याने नीटसा संदर्भ लागत नाही.

बादवे अफजलखानाने शिवाजी महाराजांना भेटल्यावर पापांचं परिमार्जन म्हणुन "सेप्पुकु" केलेलं म्हणे. थोर तो अफजुल्ला आणि थोर त्या त्याच्या अनौरस विचारसुंतक पिल्लावळी.

दत्ता जोशी's picture

4 Oct 2015 - 3:59 pm | दत्ता जोशी

शिवाजी राजांना ते करत असलेल्या थोर कार्यासाठी शाबासकी द्यायला खान दिल्लीहून आला होता. खान मराठी रयतेला भेट द्यावी म्हणून प्रचंड खजिना घेवून आला होता आणि येता येता मराठी मुलुखात आणि हिंदू देवळांवर उधळत उधळत येत होता. मी तर ऐकलय कि महाराजांनी खानाचा शाल-श्रीफळ देवून सत्कार केला होता. काय तरीच हे हिंदुत्ववादी! या लोण कढी लोकांनीच त्याची खोटी समाधी प्रतापगडावर बांधली. आणि त्याला पीर ठरवून पूजा अर्चा सुरु केली.

तर्राट जोकर's picture

5 Oct 2015 - 1:35 pm | तर्राट जोकर

खान दिल्लीहून आला होता

डी-ग्रेडी पुस्तक वाचणं सोडा ओ राजे .

सय्यद बंडाच्या अंगरख्यात? लब्बाड!

dadadarekar's picture

4 Oct 2015 - 10:47 pm | dadadarekar

आणि जे या प्रसंगाचे साग्रसंगीत पोवाडे गातात ते कुठे बसले होते ? कृष्णाजी प्रभाकरने स्वप्नात दृष्टांत दिला काय ?

सुबोध खरे's picture

5 Oct 2015 - 9:58 am | सुबोध खरे

दादा खान
असे कृष्णाजी प्रभाकर त्याच काळात नव्हे तर आजच्या काळातही आहेतच कि (चार दमडयानसाठी स्वकीयांच्या पाठीत खंजीर खुपसणारे.)
ओळखा पाहू. एक हिंट -- सारखे डू आय डी घेत/ बदलत असतात.

dadadarekar's picture

5 Oct 2015 - 11:35 am | dadadarekar

कृष्णाजी प्रभाकर की भास्कर ?

बहुतेक कृष्णाजी भास्कर

पैसा's picture

5 Oct 2015 - 1:06 pm | पैसा

http://www.misalpav.com/comment/750526#comment-750526 इथे तुम्हीच लिहिलंत ना दादुस? विसरलात काय?

अमित मुंबईचा's picture

5 Oct 2015 - 1:01 pm | अमित मुंबईचा

हे अस काही घडल होत हे माहीत नव्हत, काही पुरावे आहेत का?

हिंदी फक्त मुसलमानच बोलतात काय?

रोजचा स्वतःचा अनुभव आणि निरीक्षण आहे . तुम्ही मुस्लिमांशी (अत्यंत दुर्मिळ अपवाद वगळता ) कितीही मराठी बोलायचा प्रयत्न केलात तरी ते कधीही मराठीत बोलत नाहीत .उर्दू मिश्रित हिंदीतच बोलतात मग अख्खा जन्म महाराष्ट्रात घालवलेला तरीही . त्यांना मराठी समजत असतं आणि बोलताही येत असतं पण ते प्रतिसाद मात्र मराठीत देत नाहीत .त्यांचीच भाषा पुढे रेटतात . आपणही मग त्यांच्याशी त्याच भाषेतून बोलू लागतो .भाषा आणि पोशाख ह्या कुठल्याही धर्माच्या , संस्कृतीच्या महत्वाच्या गोष्टी असल्यामुळे आपणही त्यांच्याशी हटकून मराठीतच बोलायला हवं .

अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजी महाराजांचं खेळणं विकलं जातं हे त्या बाईने सांगितलं . आता ह्यात धर्मनिरपेक्षता कसली आलीय ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Oct 2015 - 1:59 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अडवाणी,अमित शहा,राजनाथ्,अशोक सिंघल मुंबईत्,महाराष्ट्रात आले की मराठी कार्यकत्यांशी कुठच्या भाषेत बोलतात गे तुडतुडे?

तर्राट जोकर's picture

4 Oct 2015 - 3:49 pm | तर्राट जोकर

माई, त्येंच्याशी वाद घालू नका. मुसलमानांना त्येंच्या सोतोपेक्शा जास्त चाम्गलं व्ळीखतेत ते.

दिवाकर कुलकर्णी's picture

4 Oct 2015 - 3:25 pm | दिवाकर कुलकर्णी

सर्व प्रतिसादकांचे आभार
मे जे लिहीलंय ती एक सत्य घटना आहे,
तसा मी कधीच लेखक नव्हतो व नाही,पण जे मनाला भिडलं कि,
एका मुस्लिम बाईचं ब्रेड आणि बटर अफझल खानाच्च्या
वधाचं खेलणं असावं ,ते उतरवलंय इतकंच,
हा विरोधाभास मला धर्म निरपेक्शता वा सहिष्णुता वाटली , इतकंच
माझा खरं तर शशक लिहायचा विचार होता त्यामुलं अधिक तपशील मी टालले,
त्यामुलं ती मुस्लीम असल्याचा संदर्भ नीट येऊ शकला नाही, हे मान्य,
प्रश्न राहिला ळ बद्दल ल लिहीलं जाण्याचा, अयोग्य की बोर्ड मुलं हे घडतंय,
आपल्याला हे सहन करावं याबद्दल क्शमस्व !
मिपाच्या पंगतीत ,येणं अंत्यत आनंदाचं आहे याची प्रचिती मी घेतली आहे.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

4 Oct 2015 - 3:49 pm | फुलथ्रॉटल जिनियस

चाळु द्या चाळु द्या, ल ने तसाही काही फळक पडत नाही......

दिवाकर कुलकर्णी's picture

4 Oct 2015 - 5:07 pm | दिवाकर कुलकर्णी

घन निळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा
सुटली वेणी केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्याचा उद्या गोकुळी
होईल अर्थ निराळा ।।१।।झुलवूनको हिंदोळा
सांज वेळ ही आपण दोघे अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कालिंदीच्या तटी खेळती
गोपसुतांचा मेळा ।२। झुलवू..........
गदिंमांच्या या गीतात १४ वेळा ळ आलाय
माणिक वर्मांच हे गाणं तू नळी वर ऐका,भरून पावल्याचा आंनंद मिळेल
़़शुभा खोटे वर हे गाणं चित्रीत झालंय, त्या वेळची शुभा खोटे किती मार्दव़
माझ्या कथेतील ल ,ळ ,च्या चुकार पणाची भरपाई करू इच्छितो

चांदणे संदीप's picture

4 Oct 2015 - 5:24 pm | चांदणे संदीप

छळ छळ छळा सग ळ्या क ळ ळाव्यांना!

अरुण मनोहर's picture

4 Oct 2015 - 5:59 pm | अरुण मनोहर

कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ
कळ्ळ्ळ कळ्ळ्ळ
रे दिवाकरा, ळ विषयीची कळकळ तळमळ कळ्ळ्ळ कळ्ळालि

आमचा लाडका अफजुल्या ६२ बायका , सरदारकी उपभोगुन ६० वर्षे तृप्तपणे जगुन मग मेला . शाइस्त्याचेही तसेच आहे. २२ की किती वर्षे बंगालचे की कुठले राजेपण भोगून मग मेला. बोटं तुटलॅ म्हणून कुठलं सुख कमी नाही पडले.

(संपादित)

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 7:10 pm | यशोधरा

बघा, असं आमचा लाडका, आमचा लाडका असं एका धाग्यावर म्हणता, आणि दुसर्‍या धाग्यावर कसा काय आमचा लाडका असं विचारता! ह्ये वागनं बरं नव्हं!

dadadarekar's picture

4 Oct 2015 - 7:13 pm | dadadarekar

लाडका अफजुल्या , लाडका औरंग्या असं म्हटलं की दौदही आमचा लाडकाच झाला का ?

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 7:21 pm | यशोधरा

तुम्हीच सांगा :)

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 9:27 pm | टवाळ कार्टा

चायला वर्जीनल पर्तीसाद सं पादीत झाला....कुणाकडे ब्याकप है का =))

टक्या, इस हात दे और उस हात ले. समझे? :D

अवांतरः इतकं बोलून दादासैब काय दौद त्यांचा लाडका नाही म्हणले नैत, मग काय बरं समजावं?

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 9:40 pm | टवाळ कार्टा

कि मंग्दा है...मैनू एवरेस्ट बेस कँप जाण्णा जी...ओये त्वाड्डी मदद मंग्दा :)

यशोधरा's picture

4 Oct 2015 - 10:19 pm | यशोधरा

देर आये. कोई नहीं, आये तो सही!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 10:25 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

समाधी घेतलीत तरी चालेल.

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 10:27 pm | टवाळ कार्टा

व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी??? अश्शी उघड उघड???

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 10:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

उघड उघड "चुकी"च्या गोष्टी बोलण्याला विरोध हे व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी कधीपासुन झाली टक्कुमक्कुशोनु?

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 10:38 pm | टवाळ कार्टा

चुकीच्या गोष्टी वगैरे काही नस्तेरे...अफ्वा हैत त्या =))

dadadarekar's picture

4 Oct 2015 - 10:57 pm | dadadarekar

चूक बरोबर कोण ठरवणार ?

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 11:00 pm | टवाळ कार्टा

चिमणी =)) आग्गाग्गा

टवाळ कार्टा's picture

4 Oct 2015 - 11:02 pm | टवाळ कार्टा

dafaq

भारतात तुमचे नाव हवे ते आणि हव्या तितक्या वेळा बदलण्याचे स्वातंत्र्य तुम्हांला आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Oct 2015 - 10:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझा पर्याय जास्तं सोपा आणि पुण्यदायी आहे.

dadadarekar's picture

4 Oct 2015 - 10:15 pm | dadadarekar

जे वाक्य दिसते आहे त्याच्याउलट दुसरे वाक्य होते. ते संपादित झाले.

सुबोध खरे's picture

5 Oct 2015 - 9:45 am | सुबोध खरे

ओ हितेस भाऊ
तुम्ही तुमची सर्व स्थावर जंगम इष्टेट आम्हाला देऊन हाजला जाणार होतात ना ? पुण्य मिळवायला. आम्ही ष्टाम्प पेपर घेऊन वाट बघून र्हायलो ना? मग कायले हिकडे काथ्याकुट करून र्हायले? तिकडे काबा ला ष्टाम्पिड साठी तुमची वाट बघून राह्यलेना!

पैसा's picture

5 Oct 2015 - 1:28 pm | पैसा

असं काय कर्ता ओ! मला आठवतंय तुम्ही लिहिलेलं! लिंक शोधायचा लै कट्टाळा आलाय आता!

dadadarekar's picture

5 Oct 2015 - 1:43 pm | dadadarekar

.

तर्राट जोकर's picture

4 Oct 2015 - 11:23 pm | तर्राट जोकर

लेखासंबंधी:
वपुस्टाइल मांडणी चांगली आहे. लेखनशैलीही चांगली आहे.

काय चुकले?
धर्मनिरपेक्ष हा शब्द वापरून. ती बाई मुस्लिम होती-नव्हती हा भाग वेगळा. इथे लेखकाच्या मनातच धर्म किती रुतून बसला आहे याचे प्रत्यंतर आले. ऐकीव माहितींवरून व सतत एकतर्फी प्रचारावरून सुशिक्षितांचीही मते कशी मातकट होतात याचे हे उदाहरण. अफझलखानाचा वध करणारे शिवाजी हे हिंदू-विरुद्ध-मुस्लिम चे प्रतिक म्हणून प्रचार करून शिवाजींची प्रतिमा/इतिहास बदलण्याचे पातक काही विशिष्ट लोकांनी केले.

खरे काय?
शिवाजी महाराज हे प्रजेवर अन्याय करणार्‍या सत्तेच्या विरोधात उभारले होते, सत्ताधारी केवळ मुस्लिम होते म्हणुन नाही हे सत्य जाणीवपुर्वक लपवले जात आहे. कित्येक आप्तस्वकियांनाही शिवाजींनी यमसदनास पाठवले तर कित्येक मुस्लिमांस आपली पडछायेचा दर्जा दिला. कुणाचीही निवड धर्म-जाती-पंथ याआधारे न करता केवळ गुणवत्ता व निष्ठा या दोन गुणांवर करणारे खरे धर्मनिरपेक्ष एकमेवः शिवाजी महाराज. त्यांचीच अशी धर्माभिमानी-मुस्लिमद्वेष्टा प्रतिमा उभी करून आपल्या राजकिय पोळ्या शेकून घेतल्या गेल्या.

कथेचं काय?
इथे ती बाई व्यवसायहेतू हे पुतळे विकते, तीचे शिक्षण-विचारसरणी-मूल्ये लेखकांइतकी उच्च नक्कीच नसतील. ती अर्थव्यवस्थेच्या गरजेअनुरूप वागत आहे. त्यात तिला स्वतः न जाणवणारी धार्मिक बाब लेखकांना जाणवते व लेखकराव त्यांनीच शोधलेल्या तिच्या (गरजेपोटी आलेल्या) धर्मनिरपेक्षपणाचं कौतुक करण्याचा प्रयत्न करतात. अफझलखानास मुस्लिम धर्म चिकटवतात व शिवाजींस हिंदू धर्म चिकटवतात. स्वतःचीच धर्मांध प्रतिमा या कथेतून उभं राहतांना त्यांना जाणवत नाही पण ते अशिक्षित गरीब बाईंच्या धार्मिक मूल्यांची मोजदाद करण्याचा प्रयत्न करतात.

प्रतिसादकांचं काय?
नेहमीचे यशस्वी लोक आपआपली नेहमीची आयुधे घेऊन नेहमीचे तीर सोडतायत. कंटाळा कसा येत नाही तेच तेच सतत टंकून? कथेवर चर्चा सोडून भलतेच विषय घेऊन एकमेकांवर फुटकळ शरसंधान करण्यात काय मिळतं? खरंच ही कथा शिवाजी-अफझलखान भेटीवर आहे?

असो. प्रत्येकाच्या मनोरंजनाचे आपआपले फंडे असतात. कुठल्या दुखर्‍या नसा कोण कुठं कुरवाळीत बसेल ज्याचे त्याला ठवुक.

धन्यवाद!

पगला गजोधर's picture

5 Oct 2015 - 9:26 am | पगला गजोधर

असाच काहीसा आपल्यासारखा सूर मी माझ्या "शिवजयंती हायजँक ????"
या धाग्यात लावलेला. त्यामुळे आपल्या या सुज्ञ प्रतिक्रियेला माझे अनुमोदन.

" कंटाळा कसा येत नाही तेच तेच सतत टंकून?" तेही बरचसं धडधडीत खोटं.. अगदी असंच मला नेहमी वाटत या सेक्युलर लोकांच्या बाबतीत.
यांच्या म्हणण्याप्रमाणे अफजलखान विजापूरहून निघून वाई ला येईपर्यंत काय शांतीचा संदेश पेरत आला होता असंच असं असतांना करंटे लोक आफ्जुल्याची दाढी बघतात म्हणजे काय? !!!
बरं मग मग जर अफजलखानाचा वधाचे चित्र लावून खाली "दहशतवाद असाच संपवावा लागतो" असं चित्र दिसला तरी या सेक्युलर आणि शांती प्रिय लोकांना का मिरची लागते हे मात्र न कळलेले कोडे आहे !! मग ते शांतीप्रिय लोक चित्रे फाडतात, दगडफेक करतात अगदी मग हिंदू दैवतांच्या मूर्तींची विटम्बना होते, जाळपोळ आणि दंगल होते. त्यांना हेच ज्ञानामृत पाजण्याचे शानपन ( पक्षी: धारिष्ट्य) हे सेक्युलर विचारवंत लोक का दाखवत नाहीत असं विचारणे म्हणजे विचारणारे अजून धर्मांध. असो. लोकशाही है. चल्नेकाच . .

तर्राट जोकर's picture

5 Oct 2015 - 11:21 am | तर्राट जोकर

दत्ताजी,
काही प्रश्न आहेत.
अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे?

वेड पांघरून पेडगावला जाण्याचे, नपुंसक टोमणे मारण्याचे, 'लेकी बोले सुने लागे' छाप तद्दन माजघरी भाषणं ठोकणारे, यापेक्षा अजून वेगळी ओळख काय ती फासीस्ट लोकांची?

'दहशतावाद असाच संपवावा लागतो' हे आडून आडून बोलण्यापेक्षा संपवून दाखवला असता तर कुणाच्या धमन्यांत रक्त उसळून उसळून जातंय तेही दिसलं असतं. पण फक्त नपुंसक पोपटपंची करणारांना शाब्दीक युद्धात रस, त्यास कोण काय करणार?

dadadarekar's picture

5 Oct 2015 - 11:39 am | dadadarekar

अफजलखान केवळ सरदार होता.

पण गनिम शहेनशहा जर वाइइट होते तर त्यांच्या दारात रांग लावायला जाणे , माझ्या मुलाला जहागिरी द्या अशी पत्रे लिहिणे , असे प्रकार बाकीच्चे राजे का करत होते ?