अशीहि एक धर्म निरपेक्शता

दिवाकर कुलकर्णी's picture
दिवाकर कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Oct 2015 - 11:31 pm

अशीहि एक धर्मनिरपेक्षता !
नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना,
संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात,
त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी .
त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई,
बसलेली असते खेळणी विकायला,
मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज,
"घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं? " मी काही तरी विचारायचं म्हणून तिला विचारलं,
"जी ,नही साब,आपको देखना है?" म्हणजे ती बाई मुस्लिम होती तर,मी मनातल्या मनात म्हणालो,
"ये देखिये साब," असं म्हणून तिनं ते खेळणं काढलं,अफलझखानाचं पोट फाडतानाचं शिवाजीच ते खेळणं होतं,
"ये सबसे जादा खपता है"म्हणाली,त्यानंतर मी नातवाला घेऊन धरी कधी आलो माझ मलाच कळलं नाही,
खरी धर्मनिरपेक्षता आज मला उमजली होती!!

कथा

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

5 Oct 2015 - 6:07 pm | बोका-ए-आझम

असहमत. खरा क्रांतिकारक कधीही जाणूनबुजून निरपराध माणसांचा जीव घेत नाही. त्यामुळे एकाचा दहशतवादी तो दुस-याचा क्रांतिकारक हे म्हणणंच चुकीचं आहे.

यशोधरा's picture

5 Oct 2015 - 6:19 pm | यशोधरा

शिवाजी महाराज हे प्रजेवर अन्याय करणार्‍या सत्तेच्या विरोधात उभारले होते, सत्ताधारी केवळ मुस्लिम होते म्हणुन नाही हे सत्य जाणीवपुर्वक लपवले जात आहे. कित्येक आप्तस्वकियांनाही शिवाजींनी यमसदनास पाठवले तर कित्येक मुस्लिमांस आपली पडछायेचा दर्जा दिला. कुणाचीही निवड धर्म-जाती-पंथ याआधारे न करता केवळ गुणवत्ता व निष्ठा या दोन गुणांवर करणारे खरे धर्मनिरपेक्ष एकमेवः शिवाजी महाराज

.

हे योग्यच. उत्तम.

त्यांचीच अशी धर्माभिमानी-मुस्लिमद्वेष्टा प्रतिमा उभी करून आपल्या राजकिय पोळ्या शेकून घेतल्या गेल्या.

हित्ते चुकले बघा! (असे आपले मला वाटले हां) अशी प्रतिमा कधी उभी झाली? कशी होऊ शकेल? शिवाजीमहाराजांचा इतिहास माहित असलेल्या कोणालाही ह्यापेक्षा अधिक ठाऊक असते. महाराष्ट्रामध्ये अशी प्रतिमा सर्वसामान्याच्या मनात तयार करणे फारच कठीण काम आहे असे मला तरी वाटते. अर्थात, एका सामान्य नागरिकाच्या दृष्टीतून मी माझे मत मांडतेय. सर्वसामान्य मतदार इतकाही मूर्ख नाही हो! कदाचित तुमचा रोख एका राजकीय पक्षाकडे आणि घराण्याकडे असावा पण त्यांनीही महाराजांविषयी असे काही पसरवले होते, हे मान्य करणे कठीण आहे.

अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला?

- Really? खरोखर?

तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा? फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे.

पुन्हा एकदा, अफजल मुस्लीम आहे म्हणून तो दहशतवादी आहे हे कोण म्हणालेय? मला खरंच असे दिसले नाहीये, तुम्ही सांगता का?

'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे?

कधीतरी पोवाडे ऐका साहेब. लोक काव्य ऐका. महाराजांविषयीची/ बद्दलची अभ्यासू लोकांची भाषणे/ लेख ऐका, वाचा. माहिती मिळेल. अफजलबद्दलच्या गोष्टी, जयसिंगासोबतची वागणू़क, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, स्वतःच्या पोटच्या पोराला दिलेली सजा, मोरे, कित्येक घटना आहेत हो.

दुसरे म्हणजे सामान्य जनमानस तुम्हांला वाटते तेवढे मूर्ख नसते. असो.

शेवटी, बरं बाबा, तुमचंच खरं आणि योग्य. धन्यवाद. :)

तर्राट जोकर's picture

5 Oct 2015 - 6:52 pm | तर्राट जोकर

लोक काव्य ऐका. महाराजांविषयीची/ बद्दलची अभ्यासू लोकांची भाषणे/ लेख ऐका, वाचा. माहिती मिळेल. अफजलबद्दलच्या गोष्टी, जयसिंगासोबतची वागणू़क, रांझ्याच्या पाटलाला दिलेली शिक्षा, स्वतःच्या पोटच्या पोराला दिलेली सजा, मोरे, कित्येक घटना आहेत हो.

परत तुम्ही तीच तीच कॅसेट घासत आहात. महाराजांविषयी मलाच अभ्यास करायला सांगत आहात. तुम्हाला अजूनही प्रश्न कळला नाहीच असे दिसते आहे. हा प्रश्न "महाराजांनी काय केले?" हा नाही आहे हे पुन्हा एकदा सांगतो.

दुसरे म्हणजे सामान्य जनमानस तुम्हांला वाटते तेवढे मूर्ख नसते. असो

हे जे सामान्य जनमानस आहे ना ते तुमच्या अभ्यासू लोकांची भाषणे/लेख वाचत नाही. शहानिशा करायला स्वतः माहिती मिळवून वाचत नाही. हे सामान्य जनमानस फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, त्यापूर्वी निवडणुकांमधे होणार्‍या प्रचारसभा यांतून दील्या जाणार्‍या हेतुपुरस्सर (गरजेपुरत्या, अर्धवट) माहितींमधून सतत भडकवलं जातं. सोसायटीची मतं चार बाकड्यांच्या बदल्यात विकणारे, रेशनकार्ड-झोपडी-दारू-पैसा-कपडे याबदल्यात मते विकणारे, एवढ्या तेवढ्यावरून रस्त्यांवर तोडफोड, दंगल करणारे, तुमच्या आमच्या सारखे अभ्यासू लोकांची पळी धरणारे, चार भिंतीच्या सुरक्षित चौकोनात बसून निवांत चर्चा-परिसंवाद घालणारे नसतात. हेही फार जवळून पाहिलंय. त्यामुळे सामान्य जनमानस किती हुशार आहे याबद्दल खरंच चर्चा नको. कारण तो एका वेगळ्या आणि प्रदिर्घ धाग्याचा विषय आहे.

अधिक माहितीसाठी "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" हे अप्रतिम नाटक बघून घ्या. "महाराजांचे आम्ही काय केले?" हा प्रश्न व त्याचे उत्तरही मिळून जाईल कदाचित. 'जाणता राजा' ला होणारी गर्दी व उपरोल्लिखित नाटकाला झालेला/होणारा विरोध/गर्दी पुरेसा बोलका आहे.

हो, प्रतिसादाशेवटी मी म्हटलेच आहे की तुम्ही म्हणताय तेच योग्य आणि बरोबर. वाचले नै? :)

फुलथ्रॉटल जिनियस's picture

5 Oct 2015 - 6:33 pm | फुलथ्रॉटल जिनियस

पुन्हा एकदा, अफजल मुस्लीम आहे म्हणून तो दहशतवादी आहे हे
कोण म्हणालेय? मला खरंच असे दिसले नाहीये, तुम्ही सांगता
का?

आता कसा संघिष्ट पवित्रा घेतलात! हीच तर तुम्हा लोकांची खासियत आहे.
म्हणे टीपू सुलतान यांनी एक लाखाची फौज निर्माण केली होती , हिंदू स्त्रीयांवर अत्याचार करायला. अरे कीती खोटे फेकावे याला तारत्म्य तरी हवे....
टिपू सुलतान हे अत्यंत नैतिक राजे होते, आपल्या साम्राज्यातील कोणत्याही स्त्रीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये असा आदेशच त्यांनी दिला होता.बहामणी साम्राज्याला जे जमले नाही ते टिपूने केले होते.

हा प्रतिसाद पाहून तुमच्या जिनियसपणाविषयी माझी खात्री झालीच :)

श्रीगुरुजी's picture

5 Oct 2015 - 9:04 pm | श्रीगुरुजी

>>> टिपू सुलतान हे अत्यंत नैतिक राजे होते, आपल्या साम्राज्यातील कोणत्याही स्त्रीच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये असा आदेशच त्यांनी दिला होता.बहामणी साम्राज्याला जे जमले नाही ते टिपूने केले होते.

नानासाहेब,

आता पुरे नाही का झालं? आतापर्यंत अनेक बेताल प्रतिसाद दिलेत आणि प्रत्येक प्रतिसादाची सर्वांनी यथेच्छ टिंगलटवाळी केली. तरी अजून हौस फिटलेली दिसत नाही. ती ब्रिगेडी आय मीन बीग्रेडी पुस्तके वाचणे थांबवा. नाहीतर असेच बेताल प्रतिसाद देत बसाल आणि अजून टवाळी सहन करावी लागेल.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

5 Oct 2015 - 9:25 pm | फुलथ्रॉटल जिनियस

नानासाहेब,
आता पुरे नाही का झालं? आतापर्यंत अनेक बेताल प्रतिसाद
दिलेत आणि प्रत्येक प्रतिसादाची सर्वांनी यथेच्छ
टिंगलटवाळी केली. तरी अजून हौस फिटलेली दिसत नाही.
ती ब्रिगेडी आय मीन बीग्रेडी पुस्तके वाचणे थांबवा. नाहीतर
असेच बेताल प्रतिसाद देत बसाल आणि अजून टवाळी सहन
करावी लागेल..>>>>>>>>>>>>>>>
मी बेताल प्रतीसाद दिलेले नाहित, मी फक्त सत्यांश सांगितला.
(बायदवे, राजा शिवछत्रपती, जाणता राजा ही तद्दन व्यावसायिक कलाकृती आहेत, या असल्या गल्लाभरु गोष्टींना समकालीन पुरावे समजणार्यांनी मी कोणती पुअस्तके वाचावित हे ठरवू नये.)

श्रीगुरुजी's picture

5 Oct 2015 - 10:49 pm | श्रीगुरुजी

मी बेताल प्रतीसाद दिलेले नाहित, मी फक्त सत्यांश सांगितला.

नाना, आता पुरे. हसून हसून इतकं पोट दुखतंय की अफझुल्यासारखा माझा कोथळा बाहेर येईल.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका नवीन आणि अत्यंत विश्वसनीय ऐतिहासिक संशोधनानुसार, शिवाजी महाराजांनी अफझुल्याला पोटात वाघनखे खुपसून कोथळा बाहेर काढून मारले नाही. अफझुयाने शिवाजी महाराजांची गळाभेट घेतल्यावर त्यांच्या कानात महाराजांनी नानासाहेबांचे प्रतिसाद सांगितले. ते ऐकल्यावर अफझुल्या इतक्या जोराने हसायला लागला की शेवटी हसताहसता तो गडाबडा लोळू लागला आणि अति हसल्यामुळे पोट दुखुन त्याची आतडी बाहेर आली व तो मेला. त्यामुळे महाराजांनी अफझुल्याला पोटात वाघनखे खुपसून कोथळा बाहेर काढून मारले ही शुद्ध लोणकढी थाप आहे हे सिद्ध झाले आहे.

(बायदवे, राजा शिवछत्रपती, जाणता राजा ही तद्दन व्यावसायिक कलाकृती आहेत, या असल्या गल्लाभरु गोष्टींना समकालीन पुरावे समजणार्यांनी मी कोणती पुअस्तके वाचावित हे ठरवू नये.)

हो बरोबर. तुमचे संदर्भ ग्रंथ म्हणजे ब्रिगेडी आय मीन बीग्रेडी पुस्तके हे मी विसरलेलो नाही.

सुबोध खरे's picture

5 Oct 2015 - 8:14 pm | सुबोध खरे
दत्ता जोशी's picture

5 Oct 2015 - 8:46 pm | दत्ता जोशी

मला पहिल्यांदा डिरेक्टलि विचारलाय तर डिरेक्टलि उत्तर देतो.
१.
वेड पांघरून पेडगावला जाण्याचे, नपुंसक टोमणे मारण्याचे, 'लेकी बोले सुने लागे' छाप तद्दन माजघरी भाषणं ठोकणारे, यापेक्षा अजून वेगळी ओळख काय ती फासीस्ट लोकांची?
हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्ती लागू आहेत. माझ्या आधीचा स्वतःची पोस्ट वाचण्याची तसदी घ्यावी.

२. "'दहशतावाद असाच संपवावा लागतो' हे आडून आडून बोलण्यापेक्षा संपवून दाखवला असता तर कुणाच्या धमन्यांत रक्त उसळून उसळून जातंय तेही दिसलं असतं. पण फक्त नपुंसक पोपटपंची करणारांना शाब्दीक युद्धात रस, त्यास कोण काय करणार?"
आडून आडून नाही. जन्म आणि शिक्षणाने सांगलीकर आहे. वयाची सुरवातीची २५ वर्षे सांगलीत काढलीत. माझ्या बायोडाटाची काळजी नसावी. चांगल्यापैकी मजबूत आहे.
स्वतःचे खरे नाव तरी टाका उगीच नपुंसक बड बड वगैरे लिहून स्वतःला शूर वीर नका समजू.
मिरजेत दंगल झाली नाही म्हणणारे काल संध्याकाळी जन्माला आले असावेत. तेव्हा त्यांनी वेळेवर दुध पिण्याची काळजी करावी. सांगली मिरजेत गेली ६ वर्षे प्रत्येक गणेश उत्सवाआधी flagmarch होतो का होतो ते दुधाचे दात आले कि बघावेत.

३. अफझलखान हा दहशतवादाचे प्रतिक कुणी व का केला? तो तर 'सत्ताधारी' बादशाहाचा एक सरदार होता जो बंड करणार्‍या एका दुसर्‍या सरदाराच्या मुलावर धावून आला. यात तो दहशतवादी कसा?
अरे व्वा. शिवरायांच्या स्वराज्याची व्याख्याच तुम्ही बदलून टाका आणि स्वराज्यावारच प्रश्नचिन्ह उभे करा. आणि म्हणे मी शिवाजी भक्त.

४. फक्त त्याचा धर्म मुस्लिम म्हणून त्याला 'दहशतवादी' हे लेबल चिकटवणे हे नुस्ते धर्मांधपणाचेच नाही तर इतिहासाचे विदृपीकरण आहे. 'दहशतवाद असाच संपवावा लागतो' हेच स्लोगन शिवराय स्वकियांनाही मारत आहेत असे चित्र रंगवून का नाही दाखवत? तिथेच का हात आखडतात सेकूलरांना शिव्या घालणार्‍यांचे?
नाही ना हो दाखवता येत. कारण ते बाहेरून इथे हिरवा धर्म पसरवण्यासाठी आणि देश लुटण्यासाठी आले नव्हते. त्यांनी इथे येवून आमची देवळे फोडली नाही. स्त्रियांवर अत्याचार केले नाहीत. आपला धर्म जबरदस्तीने पसरविला नाही. आमची विद्यापीठे उध्वस्त केली नाहीत हिंदू आणि बौध धर्मग्रंथ जाळले नाहीत. मुस्लिमांनी जिथे जिथे आक्रमण ती सर्व राष्ट्रे आज मुस्लिम राष्ट्रे आहेत. ( आजच्या युगातहि हेच सुरु आहे.) पण तुमच्या पुस्तकात हे सर्व पांढर्या पानावर सफेद शाईने लिहिले असल्याने (किंबहुना त्या सगळ्या वस्तुस्थितीवर व्हाइट वॉश दिला असल्याने) काय बोलावे? इथल्या लोकसभेवर हल्ले होतात, मुंबईत बॉम्ब स्फोट होतात, निरपराध निः शास्त्र लोकांवर मशीन गन चालवली जाते आणि ते करणारे काश्मीर मुक्तीसाठी लढणारे स्वतंत्र सैनिक आहेत म्हणणाऱ्या लोकांशी काय वाद घालायचा?
अहो त्या मराठी सरदारांना व्हिजन नव्हती. स्वराज्य म्हणजे काय, त्यांचा उद्देश काय , ते कशाशी खातात हे माहिती नव्हते.त्यांचा विरोध स्वतःची वतनदारी टिकवून ठेवण्यासाठी होता. त्यांना स्वतःची स्पेस हवी होती. इतकेच. पण तुमच्या दृष्टीने ते अविचारी स्थानिक वतनदार- सरदार आतंकवादीच असणार!

बॅटमॅन's picture

5 Oct 2015 - 8:52 pm | बॅटमॅन

मिरजेत दंगल झाली नाही म्हणणारे काल संध्याकाळी जन्माला आले असावेत. तेव्हा त्यांनी वेळेवर दुध पिण्याची काळजी करावी. सांगली मिरजेत गेली ६ वर्षे प्रत्येक गणेश उत्सवाआधी flagmarch होतो का होतो ते दुधाचे दात आले कि बघावेत.

२००९ च्या अगोदर कधी मोठी दंगल झालीय ओ मिरजेत?

तर्राट जोकर's picture

5 Oct 2015 - 10:30 pm | तर्राट जोकर

आडून आडून नाही. जन्म आणि शिक्षणाने सांगलीकर आहे. वयाची सुरवातीची २५ वर्षे सांगलीत काढलीत. माझ्या बायोडाटाची काळजी नसावी. चांगल्यापैकी मजबूत आहे.
स्वतःचे खरे नाव तरी टाका उगीच नपुंसक बड बड वगैरे लिहून स्वतःला शूर वीर नका समजू.

माझे प्रश्न तुम्हाला असले तरी 'दत्ता जोशी' या व्यक्तिस वा सदस्य आयडीस व्यक्तिशः नसून आपल्या प्रतिसादांतून जे विचार पाझरले त्यास उद्देशून आहेत. ते 'डॉन बॉस्को' असते तरी तसेच असते. लगेच अंगावर घेऊन हमरी तुमरीवर यायला हा काही आठवडी बाजारातला चौक नाही. तस्मात आपला बलदंड बायोडाटा आपणापाशीच ठेवणे. योग्य ठिकाणी उपयोगी पडेल.

शिवरायांच्या स्वराज्याची व्याख्याच तुम्ही बदलून टाका आणि स्वराज्यावारच प्रश्नचिन्ह उभे करा. आणि म्हणे मी शिवाजी भक्त.

तुम्ही तुमची व्याख्या लावून जातीय तेढ वाढवा. चालु द्या.

कारण ते बाहेरून इथे हिरवा धर्म पसरवण्यासाठी आणि देश लुटण्यासाठी आले नव्हते. त्यांनी इथे येवून आमची देवळे फोडली नाही. स्त्रियांवर अत्याचार केले नाहीत. आपला धर्म जबरदस्तीने पसरविला नाही. आमची विद्यापीठे उध्वस्त केली नाहीत हिंदू आणि बौध धर्मग्रंथ जाळले नाहीत.

अशा हिरव्या लोकांना महाराजांनी आपल्या पदरी ठेवले, विश्वासाची पदं दिलीत. असे का बरे केले असावे महाराजांनी इतक्या जहरी हिरव्या पिलावळीसोबत? तसेच इंग्रजांनीही यातले बरंच काही उपद्व्याप केलेत. तितकेच अत्याचार त्यांनीही केलेत. खरे तर भारताचा खरा इतिहासच लपवून, नष्ट करून टाकण्याचे पातक इंग्रजांना जाते. त्यांच्याबद्दल एवढ्या तीव्र भावना कधी व्यक्त होत नाहीत जेवढ्या मुस्लिम शासकांबद्दल होतात.

इथल्या लोकसभेवर हल्ले होतात, मुंबईत बॉम्ब स्फोट होतात, निरपराध निः शास्त्र लोकांवर मशीन गन चालवली जाते आणि ते करणारे काश्मीर मुक्तीसाठी लढणारे स्वतंत्र सैनिक आहेत म्हणणाऱ्या लोकांशी काय वाद घालायचा?

मी तरी नाही म्हटले की लोकसभेवर हल्ला करनारे, मुंबईत बॉम्बस्फोट करणारे, निशस्त्र लोकांवर गोळ्या चालवणारे यांना दया दाखवा. आपल्या बादशहाच्या 'सत्ते'मधे होणारी बंडाळी तत्कालिन सर्व उपलब्ध पर्यायांचा वापर करून मोडण्याचा प्रयत्न करणारा अफझल खान, दुसर्‍यांच्या भूमीवर अशांतता पसरवून देशाच्या प्रगतीस खिळ घालण्याचा प्रयत्न करणार्‍या ह्या परदेशी दहशतवाद्यांचं प्रतिक आहे ते कसं हे काही समजलं नाही. केवळ तो मुस्लिम होता, त्याने अत्याचार केले इतकंच सूत जुळवून 'तोही तसाच' आणि 'हेही तसेच' असे करत "सगळेच मुस्लिम अथपासून इथपर्यंत असेच" असा शॉर्टकट मारून तुम्हाला इतिहास व आंतरराष्ट्रीय राजकारणाची कितपत जाण आहे हे कळून आले.

त्या मराठी सरदारांना व्हिजन नव्हती. स्वराज्य म्हणजे काय, त्यांचा उद्देश काय , ते कशाशी खातात हे माहिती नव्हते.त्यांचा विरोध स्वतःची वतनदारी टिकवून ठेवण्यासाठी होता. त्यांना स्वतःची स्पेस हवी होती. इतकेच. पण तुमच्या दृष्टीने ते अविचारी स्थानिक वतनदार- सरदार आतंकवादीच असणार!

करेक्ट. कारण तेव्हा त्या लोकांना स्वतःच्या वैयक्तिक फायद्यापुढे आपल्याच लोकांवर होणारे अत्याचार दिसत नव्हते. तुम्ही वर जे वर्णिले ते काहीही त्यांच्या डोळ्यादेखत घडत नव्हते. त्यांना तसे काही वाटतच नव्हते. म्हणून आमच्यासाठी अशा नराधम शासकांचे कुकर्म डोळेझाक करणारे पराक्रमी सरदार-योद्धे हेही तेवढेच अन्यायी जेवढे तुम्हाला तथाकथित सिक्युलर हे आतंकवाद्यांइतकेच देशद्रोही वाटतात. तुम्ही त्यांना आपले म्हणून सोडून देताय ते एवढ्याच साठी की ते फक्त हिरवे नाहीत भले त्यांनी कितीही अपराध केलेले असू दे. तोच न्याय आपण अशा दहशतवादी कृत्यांमधे सामील असणार्‍या 'भटकवलेल्या' स्थानिक मुस्लिमांना लावत नाही कारण ते हिरवे आहेत.

असो. आंतरजालावर वैयक्तिक काही घेत जावू नका.

अशा आतंक वाद्यांना फाशी देवू नका म्हणून याचना अर्ज करणारे. अश्या आतंकवाद्यांना फाशी दिले तर देश पेटेल म्हणणारे आणि फाशी दिल्यावर त्यांच्या मयतीला गोल टोपी घालून जमा होणारे, मतांसाठी इतिहासाला व्हाइट वॉश देवून स्वतःची अस्मिता विकणारे ..भारत पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान जिंकले कि फटाके वाजवणारे, इराक मध्ये सद्दामला फाशी झाली म्हणून इथे रस्त्यावर मोर्चे काढणारे, बेंगळूरूत पोलिस स्टेशन जाळणारे, आणि त्यांचे लांगुल चालन करणारे कसले सेक्युलर ते तर सिक्युलरच...

फुलथ्रॉटल जिनियस's picture

5 Oct 2015 - 9:43 pm | फुलथ्रॉटल जिनियस

अशा आतंक वाद्यांना फाशी देवू नका म्हणून याचना अर्ज
करणारे. अश्या आतंकवाद्यांना फाशी दिले तर देश पेटेल
म्हणणारे आणि फाशी दिल्यावर त्यांच्या मयतीला गोल
टोपी घालून जमा होणारे, मतांसाठी इतिहासाला व्हाइट
वॉश देवून स्वतःची अस्मिता विकणारे ..भारत पाकिस्तान
सामन्यात पाकिस्तान जिंकले कि फटाके वाजवणारे, इराक
मध्ये सद्दामला फाशी झाली म्हणून इथे रस्त्यावर मोर्चे
काढणारे, बेंगळूरूत पोलिस स्टेशन जाळणारे, आणि त्यांचे लांगुल
चालन करणारे कसले सेक्युलर ते तर सिक्युलरच...

मुस्लिम असे काही करत नाहीत,हा तद्दन खोटा प्रचार आहे.या देशातला प्रत्येक मुस्लिम हा देशभक्तच असतो.पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणारे कुठेबघितले हो जोशि? आणि याकुबच्या मयतीला आलेले लोक अत्यंत कमी होते, कुठला तरी फोटो मॉर्फ करुन चिकटवण्याची भक्तांची सवय आपल्याला ठाऊक नाही काय.?

टवाळ कार्टा's picture

5 Oct 2015 - 9:50 pm | टवाळ कार्टा

आज मिपा मूतपिठचा रेकॉर्ड मोडतयं

पाकिस्तान जिंकल्यावर फटाके वाजवणारे कुठेबघितले हो "
वाईत २००४ मध्ये

dadadarekar's picture

5 Oct 2015 - 11:55 pm | dadadarekar

पाकिस्तान भारतात येऊन अखंड हिंदुस्तान व्हावा हे हुतात्मा नथुरामपंत गोडसेगुरुजी यांचे स्वप्न होते ना ?

मोदीनीदेखील भारतमातेकडून पाकमावशीला साडी भेट दिली आहे ना ?

मोदींच्या वाराणशीत गंगेत गणपती विसर्जन प्रकरणावरून संतप्त हिंदुनी पोलिस चौकी जाळली !

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=49231442&section=top-sto...

बघा बघा . किती धूर झालाय !

dadadarekar's picture

6 Oct 2015 - 5:44 am | dadadarekar

हिंदुनी सगळा इतिहास हा फॅब्रिकेटेड लिहिला आहे.

अफजलखान , समान नागरी कायदा, मुस्लिमांची धर्मांधता यावर तावातावाने लिहायला आले.

पण गेल्या काही महिन्यात झालेल्या घटना ... समाजसुधारकांच्या खुनाच्या केसेस एका हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्याला झालेली अटक , बीफ खाल्ले असा आरोप करुन भाजपाशी संबंधित गटाने एका मुस्लिमाची केलेली हत्या , गणेश विसर्जावरून मोदींच्या वाराणशीत सुरु असलेली जाळपोळ व दंगल ... यावर मात्र कुणी धागे / प्रतिसाद लिहिलेले नाहीत.

इतिहासात कोणत्या धर्माने / कोण्त्या व्यक्तीनी काही का केलेले असेना आज मला जो धर्म आवडतो मी तोच स्वीकारणार व त्यात आनंदाने रहाणार. हे स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवे.

....

दत्ता जोशी's picture

6 Oct 2015 - 10:23 am | दत्ता जोशी

इतिहासात कोणत्या धर्माने / कोण्त्या व्यक्तीनी काही का केलेले असेना....
हो मान्य आहे कि पण एकाच बाजूने हे होती नसते हो. अजूनही दुसर्याबाजुच्या बहुसंख्य पब्लिकची मानसिकता तीच असेल तर हे शक्य होत नाही न! बोलणे सोपे आहे.
आज मला जो धर्म आवडतो मी तोच स्वीकारणार व त्यात आनंदाने रहाणार. हे स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवे.
तेच तर आम्ही पण म्हणतो. एकांगी आमचा धर्म आणि तत्वज्ञान कोणावरही लादावा असा कोणताही अतिरेकी विचार आम्ही करत नाही फक्त. भारतात तरी आम्हाला सुखाने आणि शांततेने जगू द्या इतकीच मागणी आहे. अश्या कोणत्याही अतिरेकी विचारला विरोध करण्याचा विवेक संस्कार आणि बाळकडू आम्हाला मिळाली आहे त्यासाठी सिक्युलारांची गरज नाही. अजूनही सर्व जगावर आमचाच धर्म स्थापन करू त्यासाठी सर्व मार्गांचा वापर करू या विचारला खतपाणी देणारे इथे आहेत तो पर्यंत हे कसे व्हावे?
सरसकट सगळे मुस्लिम वाइट आहेत असा कोणीच कधीच म्हटला नाही. शिवाजी महाराजांनी पात्रतेचा आदर करून मुस्लिमांना आणि सर्व जातीच्या लोकांना योग्य पदे दिली होती. पण म्हणून धर्मांध मुस्लिमांना जवळ केले होते असे कसे म्हणता येईल? बरं हेच पेशव्यांनी हि केले होते पण सिक्युलाराच्या दृष्टीने ते कधी सेक्युलर का होत नाहीत? ते धर्मांधआणि जातीयवादीच कसे काय? तिथे या विचारवंत आणि इतिहासकारांची वाचा का खुंटते. याचे उत्तर मिळत नाही.
आफ्जुल्याच्या वधाचे चित्राला हिंदू मुस्लिम रंग द्यायला नको हा मुद्दा स्वागतार्ह. पण हा मुद्दा दंगल करणार्यांना पटवायची तुमची तयारी नाही उलट लगेच आम्हाला चित्र बदला, चित्र लावू नका हे सल्ले येतात. हा इतिहास खोटा सांगणारे विचारवंत पुढे येतात. इथे समतोल सांभाळावा असे का वाटत नाही ? यांना सेक्युलर म्हणावे कि सिक्युलर?
साईबाबा, ताजुद्दीन बाबा, जंगली महाराज, शेख महम्मद, हे आम्हाला पूज्यच आहेत. साईबाबांना मुसलमान म्हणून संत पद देण्यास विरोध करणाऱ्यांविरुद्ध आवाज आम्ही पण उठवला. देशप्रेमी मुस्लिमांना आमचा कधीच विरोध नव्हता आणि नाही. राष्ट्रद्रोही जन्माने " हिंदू" असला तरी त्याला कोणताही आदर, सहानुभूती किंवा थारा आमच्यापाशी नाही. मलाही अनेक मुसलमान मित्र आहेत. आणि माझी मते त्यांनाही माहिती आहेत.

आमच्या इतिहासात मुस्लिमांच्या अत्याचाराचे खोटे आअनि अतिरंजित वर्णन केले कारण असे सांगणाऱ्या समकालीन वृत्तपत्रांची कात्रणे, चलचित्र फिती पुरावे म्हणून नाहीत असे म्हणणार्यांना जगात थैमान घालणं रक्तपात दिसत नाही? ज्या गोष्टी इतिहासात लिहिल्या अगदी त्याच गोष्टी ( मुस्लिमेतर स्त्रिया पळवून नेवून अत्याचार करणे, हाल हाल करून ठार मारणे, त्यांच्या धार्मिक इमारती, मंदिरे उध्वस्त करणे, लुटमार करणे, ) आजच्या युगात घडत आहेत आणि या गोष्टींचे यांच्यातल्या कोणालाही सोयर सुटक नाही उलट त्यांना समर्थन देवून या "धर्म" कार्यासाठी भारतातून पळून जावून सामील होणार्यांचे समुपदेशन करण्यापेक्षा हिंदू कसे वाईट हे आणि एव्हडेच सांगण्यावर जो पर्यंत सिक्युलर लोकांचं कार्य मर्यादित राहील तो पर्यंत ते कधीच सेक्युलर होऊ शकणार नाहीत.पान मावा खावून नको तिथे पचापच थुंकणाऱ्या आणि या गोष्टीची शरम हि नसणाऱ्या लोकांत आणि जिथे तिथे, जाता येता असल्या निरर्थक सिक्युलर पिंका टाकणाऱ्या लोकांत माझ्यादृष्टीने काडीमात्र फरक नाही.

dadadarekar's picture

6 Oct 2015 - 11:38 am | dadadarekar

बॉम्बस्फोटातील आरोपीला फाशी दिलीत.

.....

मंदिराचे निमित्त होऊन देशभर ज्या दंगली झाल्या त्याला कोण कोण जबाबदार होते , त्याची नावेही जाहीर करून त्याना शिक्षा कधी देताय ?

( आणि हो , त्यानाही जर फाशी दिलीत आणि त्यांच्या विधीला तुमचे पन्नास हजार लोक उपस्थीत राहिले तर मी तरी ऑब्जेक्शन घेणार नाही. )

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Oct 2015 - 11:58 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मंदिर-ईतिहास-धर्म..सगळ्याची सरमिसळ करणारे ते लोहपुरूष दिल्लीत बसले आहेत.त्यांचे शिष्य फेसबूक व गूगलवाल्यांना रेल्वे स्थानकांवर 'वाय-फाय'बसवावे म्हणून मागे लागले आहेत.
'कापून काढा',' देशाबाहेर हाकलून लावा'चे मथळे देणारे सामना वर्तमानपत्र अजूनही सुरळीत चालू आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Oct 2015 - 10:36 am | डॉ सुहास म्हात्रे

चला झाले २०० ! अभिनंदन दिकुसाहेब !!

खास कल्पक ऐतिहासिक योगदानांनी केलेल्या वाचकांच्या मनोरंजनासाठी विनोदी कलाकारांचे विषेश आभार ! (अरे, नेहमीचेच यशस्वी सत्कारधुरीण हल्ली कुठे गायब झालेत ? :) )

एखाद्या लघुलेखातील एखाद्या लघुवाक्याने व्दिशतकी दीर्घचर्चा* कशी होऊ शकते याचे उत्तम उदाहरण ;) :)

* : चर्चा आमच्यावर घसरू नये यासाठी मुद्दाम 'चर्चा' या अतीसौम्य शब्दाची योजना केली आहे हे सुज्ञांस वेसांनल ;)

दत्ता जोशी's picture

6 Oct 2015 - 11:33 am | दत्ता जोशी

सांभाळा कपडे.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

6 Oct 2015 - 10:45 am | फुलथ्रॉटल जिनियस

सध्या गरिब मुस्लिमांच्या विरोधात प्रचार चालू आहे हे इथल्या चर्चेवरुन दिसतच आहे,पण सामान्यांनी घाबरुन जायचे कारण नाही, सोशल डायनॅमिक्स आपले काम करतच असते, सध्या याच मुस्लिमद्वेषाच्या विरोधात मुस्लिम हे जनाब असौद्दीन ओवैसी साहब यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत आहेत, मुस्लिमांचा वापर आता व्होटबॅंक म्हणून करता येणार नाही हे अनेकांच्या पचनी पडत नाही आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

6 Oct 2015 - 11:35 am | माईसाहेब कुरसूंदीकर

एवढंच काय पण तुळोजी आंग्र्यांचं आरमार पेशवा बाळाजी बाजीराव यांनि इंग्रजांच्या मदतीने बुडवलं तोही देशद्रोहच होता

त्यावेळचे राजे-महाराजे-सुलतान फक्त स्वतःसाठी लढत.'मी व माझे राज्य'ईतपतच.ह्या साम्राज्य विस्तारात मग कधी लढाईने व कारस्थाने करून दुसर्याला नमवायचे.
शिवाजी महाराज ह्यांचा एखादा अपवाद.

संपादक मंडळ's picture

6 Oct 2015 - 12:11 pm | संपादक मंडळ

चर्चा संपूर्णपणे भरकटलेला धागा वाचनमात्र करत आहोत.