अजून एक कॉफी...

हैयो हैयैयो's picture
हैयो हैयैयो in जनातलं, मनातलं
25 Sep 2015 - 8:15 pm

गेल्या पावसाळ्यात एक सकाळ... रिमझिमत होते. हातांत छत्री घेवून निघालों.

एरवी गांवांत सकाळला दूधवाला अन् पेपरवाला सोडले तर इतर कुणाचीच विशेष लगबग नसेल. दुकानेही अजून बंद. अजून कुठे आठच तर वाजत होते. रस्त्यांत अजून कुठे घोळका-गलबला नाही. गांव नेहमीच असे आळसावले असे. पुढे दिवसभरांत इतर अनेक कामे होती, तेमुळे ह्या भेटीकरिता सकाळच उत्तम म्हणत वेळ निवडलो होतो.

छोटे साहेब एका बसस्टॉपवर बैसले होते. मला बघतांच हात करत लक्ष वेधले. ‘हाय्’ म्हणून हस्तांदोलन केले. बोलतांना खांद्यावर हात ठेवले चक्क. (असो..!)

पाऊस थोडा अधिकच रिमझिमत होता. ‘छत्री मध्ये यावा की’ म्हंटलों.

‘पर्वा नाही सार, हे काय पाऊस आहे कां..! नुसता रिमझिम की..’ म्हंटले.

म्हंटलो, जाऊ द्या..

‘‘मग, कुठे जावू या? कॉफी डे चलता कां?’’ ते स्वतःच माझ्याकडे विचारले.

“तेच्यापेक्षा उत्तम कॉफी ते तिकडे मिळेल, निम्म्या किंमतींत..” म्हंटलों. कशाला कॉफी डे ला खर्च करूया उगाच?

छोटे साहेब थोडे मागेपुढे केले. पण नंतर, ‘‘उघडले असेल नां? ठीक आहे मग, चला’’ म्हंटले.

मी छत्रींत, अन् ते रिमझिमीत... दोघे चालू लागलो.

पुढले काही मिनिटे बोलण्यात, माझ्या-तेंच्यामध्ये असलेले अंतर फार मोठे जाणवून जावू लागले. मी पूर्वमध्यमवयीन, ते अजून विशींतच.. मी झब्बा-पायजमा-चामडी चपला घालणार, अन् ते टीशर्ट-जीन्स अन् महागाचे शूज्.. मी सिग्नलला थांबणार, ते हळूच मध्ये घुसून ‘‘पळू या की’’ म्हणणार... मी म्हंटले तर दाक्षिणात्य, ते महाराष्ट्रांतलेच कोणते की एक गांववाले... मी ‘हाताची घडी’ प्रकारांत शांतिप्रिय, ते दोन्ही हात फैलावून तेंत विश्व सामावल्यागत अत्यानंदी... मी थोडा भरल्या अंगाचा, ते भाल्याच्या काठीसारखे बारीक. तेंच्या पाठीला तेंच्या अंगापेक्षाही मोठं एक गिटार टांगलेले...

हे झाले तर शारिरीक अंतर... बुद्धींतही एक पिढीभेद असल्याचे पुढल्या काही निमिषांतच समजले. बोलतांना, ‘‘ईमेलवर पाठवून देतो की’’ म्हंटलों. ते ऐकून तेंच्या कपाळावर आठी पाडून ते “ईमेल? आय् मीन् व्हॉई?” म्हंटले, “व्हाट्स्अॅप्पांतच पाठवा की.. ईमेल-गिमेल बघायचं सवय नाही हो मला..!”

मी आश्चर्य चकित! ईमेल बघायचं सवय नाही? आपण फारच म्हातारे झालों काय की..?

काही मिनिटांत दुकाना जवळ पोहोंचून मध्ये शिरलो. बसलो. “काय घेता, गार ज्यूस...?” म्हणून विचारले.

“कॉफी घेतो... गरम” म्हंटलों.

पुन्हा चेहऱ्यावर तेच संकट-भावना. वेटरजवळ एक गरम कॉफी सांगून पुन्हा “गार ज्यूस काय-काय आहेत?” म्हणून विचारून ऑर्डर केलेत.

तेंव्हा जावून, छोटे साहेब कां ‘कॉफी डेला जावू’ म्हंटले की म्हणून कळले. तेंना कोल्ड कॉफी अन् मला हॉट्ट कॉफी तिथेच मिळले असते, म्हणून.

पुढे छोटे साहेब भिंतीच्या कडेला गिटार टेकवून उभी करून, तेच्या बॅगेतून एक नोटबूक काढले. नोटबूकवर एक नवीन अॅक्शन हिरोचे चित्र होते... म्हंटलो, चालणारच... मध्येच पेन्सिलीचे लिहिलेले नोट्स्. समजावून सांगू लागले.

पांचच मिनिटात तेंचं ‘कशाच बद्दल चिंता नसणारं’ बिंब जावून, एखाद्या पोक्त मनुष्यासारखे बोलू लागले. तेंना काय करण्याची इच्छा आहे, ह्याबद्दल एक स्वच्छ कमर्श्यल् दृष्टीकोन तेंच्याजवळ आहे म्हणून लक्षांत आले.

ते एक संगीत कलाकार. चार मित्रांसोबत मिळून एक संगीतसंघ निर्मिले आहेत. तेंचे कामाचे कॉपीराईट प्रकरणांकरिता मजकडे आले होते. तेंना काय अवश्य आहे, मी काय करणे अपेक्षित आहे, म्हणून सारे कसे स्वच्छपणे समजावून सांगू लागले.

कॉफी ट्रे आले. मी लगेच कॉफी घेवून पिवू लागलों. तेंना ज्यूस प्या म्हंटलों. ‘‘असू दे की, थोड्या वेळाने पितो’’ म्हणून थांबले.

आमच्या चर्चा संपून तिथून निघण्याचा वेळ झाला. जातांना, गिटारकडे बघून ‘‘हेचे काय मोल?’’ थोडे स्पष्टच विचारलों. ते तेचे उत्तर न देता, ‘‘एक नवे मेलडी कंपोस केलों आहे, ऐकतांत कां?’’ म्हंटले.

मी दस्कून इकडेतिकडे पाह्यलों. आता ह्यांनी इथे हॉट्टलच्या मध्येच गिटार वाजवायला चालले काय?

तेंना तेविषयी काही चिंता नाही. झुर्र्रकिनि बॅग उघडून गिटार बाहेर काढून श्रुती झंकारून (किंवा तेसारखं काहीतरी करून) सरळ आरंभच केलेत की वाजवायला. पुढे वाजविणे चालूच ठेवलेत. ऐकायला चाल फार माधुर्यपूर्ण होते, सहजच गुणगुणण्या एवढे सरल होते. सुंदर वाजविले.

वाजवून झाले अन् ते माझ्याकडे बघितले. ‘‘अद्भुतच की..!’’ म्हंटलों. थोडे घुटमळत, ‘‘मी इळैयराजांचा रसिक आहो’’, म्हंटलों. ‘‘तेंच्या संगीतात गिटार अद्भुत वापरतांत.. कधी ऐकलां आहांत काय, तेंच्याबद्दल?’’

‘‘काय स्सार, अस्से कां? इळैयराजा म्हंटलं तर अॅक्चुवल् किंग सार... रियल किंग...!!” म्हंटले ते. ‘‘राजांचे गिटार पिसेस म्हणजे मला टेक्स्ट बूक सार...’’ म्हणतांना परतून इळैयराजांचे प्रसिद्ध गीत ‘तेण्ड्रल् वन्दु एन्नै तोडुम्’ वाजवू म्हणून सरसावून बसले...

आणि मला... अजून एक कॉफी मागवावे की काय की म्हणून वाटू लागले..!

-

(साभार / पुनर्लिखित)

संदर्भगीत :- ‘तेण्ड्रल् वन्दु एन्नै तोडुम्’

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

एक नंबर लिहिलंय. फार आवडलं.

सिरुसेरि's picture

25 Sep 2015 - 8:51 pm | सिरुसेरि

छान आठवण . हि गोष्ट घडते कुठे ? तामिळनाडुत का महाराष्ट्र ? इलायराजा म्हणले की त्यांची "राजा कय्या वचा" , " महागणपती", "रक्कमा कय्या थट्टु" अशी गाजलेली गाणी आणी "१६ वयाधीने" , "स्वाथी म्रुत्यम" , "अग्नी नक्षत्रम" , "स्वाथी नक्षत्रम" असे गाजलेले चित्रपट आठवतात .

जे.जे.'s picture

25 Sep 2015 - 9:06 pm | जे.जे.

सोलापूर?

अभ्या..'s picture

25 Sep 2015 - 10:03 pm | अभ्या..

इल्लै.
सोलापूर इल्लै.
फर्स्ट रीझन, नो सीसीडी हीयर.
अगेन वेरी मायनर काऊंट आफ तमिलीअन्स.
अ‍ॅन लास्ट.. नोवन वांडर हियर विथ गिटार.
थ्यान्क्स अ लाट.

अहो गरुड बंगल्यासमोर का कुठेतरी सीसीडी होणार आहे असं ऐकलं होतं. बारगळलं का ते?

तिथला गरुड़ पण बदलला. समोर डोमिनोस आहे. साइडला ऐ एफ सी. मॅकडी भागवतला होतेय. बहुतेक शेंगा चटनी देतील बर्गर बरोबर.;-)

सिरुसेरि's picture

1 Oct 2015 - 7:23 pm | सिरुसेरि

किल्ला भागामध्ये आणी हुतात्मा मंदिराजवळ बरयाच ब्रँडसच्या शोरुमस आणी बरेच फुड जॉइंटस पाहिले आहेत . गुंटुर डोसा सेंटरमध्ये द्वाशी हा प्रकार मिळतो. तो शेंगा चटनी बरोबर चांगला लागतो .

रेवती's picture

25 Sep 2015 - 9:00 pm | रेवती

छान लिहिलय.

मांत्रिक's picture

25 Sep 2015 - 9:07 pm | मांत्रिक

झक्कास!!!

एस's picture

25 Sep 2015 - 9:46 pm | एस

झक्कास!

कानडाऊ योगेशु's picture

25 Sep 2015 - 9:48 pm | कानडाऊ योगेशु

बेळगाव धारवाड धाटणीच्या मराठीत लिहिलेला लेख आवडला.
बर्याच दिवसांनी आलात.
वेलकम बॅक!

एस's picture

25 Sep 2015 - 11:37 pm | एस

तंजावूरी मराठी आहे.

पिशी अबोली's picture

25 Sep 2015 - 9:51 pm | पिशी अबोली

अप्रतिमच लिहिलंय..

एक एकटा एकटाच's picture

25 Sep 2015 - 10:35 pm | एक एकटा एकटाच

छान वाटलं वाचुन

सिरुसेरि's picture

25 Sep 2015 - 10:47 pm | सिरुसेरि

तांबारम ? वेलाचेरी ? अड्यार ? अलवारपेट ? सैदापेट ? पटिरॅप ?

दाक्षिणात्य मराठी आवडलीच एकदम.

उंगळ् वीट्टि तमिऴनाट्टिल एंगे ? तंजावुर?

ही तर प्युअर तंजावरी मराठी आहे.

अभ्या..'s picture

26 Sep 2015 - 1:07 am | अभ्या..

तंजावरी मराठी गोडच.
का कोण जाणे मला वाचताना चिंतामणी य. मराठेंच्या जुन्या ऐतिहासिक कथांची सय येतेय. अशीच लाघवी भाषा.
मस्त.

नाखु's picture

26 Sep 2015 - 9:55 am | नाखु

खूप दिवसांनी दर्शन !!!

पुलेप्र

प्रचेतस's picture

26 Sep 2015 - 10:56 am | प्रचेतस

झक्कासच

पद्मावति's picture

26 Sep 2015 - 1:16 pm | पद्मावति

खूपच मस्तं लिहिलंय.
भाषाही गोड वाटतेय.

द-बाहुबली's picture

26 Sep 2015 - 1:23 pm | द-बाहुबली

वेरी वेल सार...!

दमामि's picture

26 Sep 2015 - 5:45 pm | दमामि

वा! मजा आली.

खेडूत's picture

26 Sep 2015 - 9:10 pm | खेडूत

आवडला.
भाषा विशेष आवडली. अजून येउद्या...

चांदणे संदीप's picture

26 Sep 2015 - 11:20 pm | चांदणे संदीप

वा..वा..वाह! झक्कासच!

भाषेचा लहजा असा मुठीत बोट धरून फिरविलात की हो तुम्ही!

"भेटीकरिता सकाळच उत्तम म्हणत वेळ निवडलो होतो." या ओळीनंतर बघा मला ते पुलंचे रावसाहेबी टाईप्प बोलणे जाणवले आणि पुढे छोटे साहेब रावसाहेबांचे नक्कीच कोण नातेवाईक असणार असे वाटू लागले!

जरा भेट घालून देता की छोट्या साहेबांशी! त्यांच गिटार ऐकलो असतो जरा आणि हाणल्या असत्या की दोन-चार कॉफ्या आम्हीबी!

भारीच लिहिलय तुम्ही. ___/\___

पुढच्या लेखनाकडे डोळे लावून बसलेला
Sandy

जव्हेरगंज's picture

26 Sep 2015 - 11:35 pm | जव्हेरगंज

खमंग लेखन! खासचं!

ज्योति अळवणी's picture

27 Sep 2015 - 1:16 am | ज्योति अळवणी

सुंदर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2015 - 4:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखन आवडलं.

(तुम्हीही बऱ्याच वर्षांनी दिसलात.)

शित्रेउमेश's picture

30 Sep 2015 - 1:47 pm | शित्रेउमेश

वाह... एकदम माझा बेळगाव वाला मित्र आठवला... तो असच बोलतो की वो....

खूपच छान. माझा तातेराव नावाचा जुना कर्नाटकी मित्र आठवला.

पैसा's picture

30 Sep 2015 - 2:32 pm | पैसा

मस्तच लिहिलंय! तें गोड मराठी फ्फार आवडलं बगा!

इशा१२३'s picture

30 Sep 2015 - 2:36 pm | इशा१२३

मस्तच!!

जागु's picture

30 Sep 2015 - 2:42 pm | जागु

छान.

मितान's picture

30 Sep 2015 - 2:48 pm | मितान

फार आवडलं !!!

मीता's picture

30 Sep 2015 - 3:40 pm | मीता

मस्त...

माधुरी विनायक's picture

30 Sep 2015 - 4:26 pm | माधुरी विनायक

लंपन माझा लाडका... पुन्हा एकदा लंपन मालिकेशी साधर्म्य असणारं काही तितकंच कसदार वाचल्याचा आनंद मिळाला. गोड भाषा.. लिहिते राहा, ही विनंती.

खमंग लेख. मस्तच.. वडक्कम ब्याक स्सार..

चलत मुसाफिर's picture

30 Sep 2015 - 11:45 pm | चलत मुसाफिर

ऐन थंडीत गरमागरम फेसाळ कॉफीचा घोट घेतल्यावर छातीत सुखद काहीतरी भरत जातं तसं वाटलं वाचून! :-)

मदनबाण's picture

1 Oct 2015 - 5:18 am | मदनबाण

मस्त... :)
कॉफी सोबत माझही एक गाणं... ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बॉय फ्रेंड... गर्ल फ्रेंड... Na Na Na Na... :- J Star

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Oct 2015 - 10:21 am | बिपिन कार्यकर्ते

लेखन अतिशयच आवडले आहे. पण त्याहून जास्त आनंद झाला तो याचा की अनेकानेक वर्षांनी अचानक श्री. हैयो यांचे पुनरागमन झाले. जालावरील एक प्रमुख व्यक्ती गायब होती ती परत दिसली.

वणक्कम सार!!

मृत्युन्जय's picture

1 Oct 2015 - 10:51 am | मृत्युन्जय

भाषा मस्त. आवडली.

सिरुसेरि's picture

1 Oct 2015 - 1:59 pm | सिरुसेरि

मुम्बे वा ..मस्तच गाणे आठवले . ए. आर. रहमानने संगीत दिलेले "सुलान ओरु कादल" या तामिळ फिल्ममधील हे गाणे खुपच गाजले होते .
ए. आर. रहमाननेही सुरुवातीला इलायराजांकडेच काम केले होते .