होऊ द्या खर्च....आपल्याच घरचं..

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
20 Sep 2015 - 2:33 pm

नमस्कार मंडळी
बाप्पा यायच्या आधीच एक महिन्यापासून माझ्या हपिसात मंडळासाठी टीशर्ट छापून घेणारे येऊ लागले. आता काय तंत्रज्ञानामुळे हव्या त्या रंगसंगतीचे, अगदी छान छान अशा कापडापासून बनवलेले टीशर्ट अगदी कमी वेळेत मिळू लागले आहेत.
मंडळांचे टीशर्ट तर छापून गेले पण आता वाट पाहायची नवरात्रीची.
असो, तर माझ्या डोक्यात विचार आला, आपण एवढ्या प्रकारचे रंगीत संगीत डिझाईन फक्त कार्यकर्त्यांसाठी बनवतो (ते मिरवणुकीत अजून काय रंग उधळतात त्यांनाच माहीत)
मग आपल्या मिपाकरांनीच काय गुन्हा केलाय. मग म्हणले चला. मिपाकरांसाठी पण टी शर्ट डिझाईन करावा.
पण नंतर विचार आला, साला इथे काय एक मेंबर एकसारखाय व्हय. हर एकाची रीत न्यारी, हर एकाची नीती न्यारी. मग ठरवलेच. कुछ चुनिंदा आयडी के लिए खास डिझाइन बनाये जाये. आयडीचा स्वभाव, त्यांचे लेखन, प्रतिसाद याचा विचार करतानाच थोडे गरगरल्यासारखे झाले. लैच व्हरायटी भरुन राह्यलीय राव इथे.
सो पेशे मिपाकर सम डिझाइन्स.
चांगल्याक कामाची सुरुवात गणेशाने करतात म्हणे. मग आमच्या सुपरशेफ गंपाला इसरुन कसं चालायचं? हे डिझाईन खास त्याच्यासाठीच.
t1
नेक्स्ट येताहेत आमच्या मिपाच्या लाडक्या सुगरण, ज्यानी पाण्याला जरी फोडणी दिली तरी ती ग्रेव्ही होते म्हणे, त्याच त्या सुप्रसिध्द मास्टरशेफ सानिकास्वप्निल अन मृणालिनी. ह्यांच्यासाठी हा खास टीशर्ट सेट. एकातच ५ येतील. हे शर्ट वापरुन त्या कायम किचनमध्ये राहतील अन आम्हाला नवनवीन नमुने पेश करतील ह्या अपेक्शेने ही ऑफर आहे.
t2
प्रचेतसरावांची सिनेयरिटी हाय पण दगडी डिझाईन शर्टावर छापायचे म्हणजे सोपे वाटले काय. बर्र त्यात सुध्दा ही दर्पण सुंदरी सातवाहनाच्या काळातील नसून वाकाटकाच्या आहे असे लेण्यामृत एकावे लागायचे. यांच्या शर्टवर आख्खी लेणीसुधा छापता आली असती म्हणा पण ती ऑर्डर बुवांकडून येणार आहे असे कळले.
t3
प्रचेतसराव म्हणले की बुवा हे उच्चारावेच लागत नाही, लॉरेन हार्डी सारखी यांची जोडी अभेद्य आहे. किंवा टीआगोबा, शर्टात्मा असे म्हणले तरी चालेल. बुवांसाठी हा खास शर्ट. हा रंग त्यांना विषेष प्रिय असल्याचे त्यांनीच दाखवून दिले आहे त्तस्मात दिलाय तो घालावा. बुवा दिवेकरा याहो, स्मायल्या मला भेट द्या हो.
t4
वडगावमार्गे पिंचीत आलो मग नाखून काका अन क्याप्टन्याला इसरुन कसे चालेल. हे डिझाईन खास दोघांचाठी. त्यांचे ते ओळखून घेतील. काळजी नसावी. नाखून काका तुमचा स्पेसबार लवकर दुरुस्त करुन घ्या हो.
t5
t6
अर्र या मार्गे येतायेता सिंव्हगड रोडच्या दोन सिंव्व्हाना इसरुन चालणार नाही. एक सिंव्ह आध्यात्मिक गुरगुरतो आणि गायला लागला की आनंद शिंदेला घाबरवतो. म्हशींवर विशेष प्रेम आहे म्हणतात. दुसरा सिंव्ह नुसताच घाबरवतो. ह्याच्या सूडबुध्दीमुळेच मिपाचे संस्कार जरासे का होइना टिकलेत असे त्यांचे वैयक्तिक मत आहे. असोत बापडे. कोकण्यांच्या नादी कुणी लागावे. त्यांचे डीझाइन त्यांनी घेतील, चटणीपाकीटासारखा नीचपणा करणार नाहीत हया अपेक्षेने दोन शर्ट देत आहे.
t7
t8
ते आमचा टेक्निकल परशान्त (जरा कमी दामले) त्याला तर टीशर्ट मस्ट आणि मस्तच. कधीही भेटो स्वतःच्या दिलखुलासपणाने अन देखणेपणाने दुसर्‍याला कॉम्प्लेक्स देतो. प्रशांता, साह्यबा भारतात कधी असलास तर घाल हो हा शर्ट,
t9
मध्येच औरंगाबादच्या शक्तीकेंद्राला विसरुन चालणार नाही. टीशर्ट हा प्राडाँचा आवडता पोषा़ख आहे असे कळलेय. या टीशर्टात ते अजून टेक्नोसॅव्ही दिसतील असा विश्वास आहे.
t10
बोकेश अर्थात बोका ए आझमांचे आगमन मिपावर जरी उशीरा झालेय तरी त्यांनी अल्पावधीतच आपल्या दमदार म्यांउने मिपाकरांना जिंकलेय, त्यांच्या या राजेशाही वाटचालीसाठी खास डिझाईन.
t11
ब्याटमानापाचा स्नेह काय वर्णावा. त्यांनी म्हणावे अन आम्ही त्यांना टीशर्टावर टीशर्ट पुरवावे. काय करणार बिचारे लॉजिकचा एक सूट चढऊन बसलेत उतरवायलाच तयार नाहीत. असो.
t12
आदूबाळाने तर सध्या सगळ्याच मिपाकरांचे इन्क्लुडिंग संपादकमंडळांचे मन जिंकून घेतलेय. या लाडक्या अन अत्यंत गुणी बाळासाठी हा खास टीशर्ट. (मळवलास की आपण दुसरा घेऊ हं)
t13
हुशार लोकांची नावे येताहेत तर क्लिंटन ऑर गॅरी ट्रुमन साह्यबांना बोलावलेच पाहिजे. त्यांना त्यांचे मशीन सांभाळू द्या. हिशोबात घोळ होणार नाही. त्यांच्यासाठी अजून एक आम आदमी शर्ट आहे पण तो एके पीएम झाल्यावर देण्यात येईल.
t14
क्लिंटनराव अन राजकारण विषय आले की माई येणारच. त्यांच्या ह्यांनी टीशर्ट घालायला परमिशन नाकारलीय म्हणे. असु दे. ह्यांचे मत कधी चुकत असते काय.
t15
असेच न चुकणारे अन माईंशी भांडल्याशिवाय न करमणारे एक व्यक्तिमत्व आपल्या मिपाची शान वाढवतेय. विजयादशमीसाठी रा़हून ठेवतील हा शर्ट कदाचित. श्रीगुरुजी, विडंबनापेक्षा मोदींच्या राजकारणात जास्त मज्जाय हो.
t16
राजकारण असो की समाजकारण, विज्ञान असो की कला, भटकंती असो की अध्यात्म, प्रत्येक ठिकाणी एक्क्याची भुमिका पार पाडणारे आमचे डॉ. सुहास म्हात्रे यांना त्यांच्या जुन्या आयडीची ओळख कायम राहावी म्हणुन हा शर्ट.
t17
च्यामारी हा छॉटासा शर्ट कुणाचाय बरे? एखादी पिवशी आणा अन घेऊन जा.
t18
.
अरर्रर दमलात काय इतके श्याम्पल पाहून? मंडळी ईतक्यात कार्यक्रम संपणार नाही. अजून बरेच गणमान्य राजमान्य आयडी अन त्यांचे टीशर्ट येणार आहेत.
ह्या डीझाईन्ससाठी आम्ही बर्‍याच शक्यतांचा विचार केला आहे. ही व्हरायटी पाहून अजून काही मागण्या आल्यास त्यांचा पण विचार केला जाणार आहे.
सो...... स्टे टुन्न्न्न्न्न्ड.
कीप वाचिंग.

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

20 Sep 2015 - 2:42 pm | किसन शिंदे

भन्नाट आहे हा धागा..
सगळे टीशर्ट जबराच जमलेयंत. =)) =))

पुभाप्र..

अभ्या अभ्या धन्स धन्स धन्स :)
मस्त धागा , काय डोस्क चालतय तुझ , एक से एक टी - शर्ट २१०० प्रतिसादासाठी भर्घोस शुभेच्चा :)

यसवायजी's picture

20 Sep 2015 - 2:44 pm | यसवायजी

अभ्या, पैली ऑर्डर घे. ब्याटयाचा एक शर्ट मला पण. १ लम्बर जमलाय.

अभ्या..'s picture

20 Sep 2015 - 3:01 pm | अभ्या..

दिला.
दिला भो.
सीमाभागासाठी कायपण.

भैड्या's picture

20 Sep 2015 - 2:45 pm | भैड्या

कशे डजन दिले? कोठुन उचलले? शिल्लक स्टॉक किती? अॉर्डर द्यावी काय?

एक नंबर भावा. वाट बघायची का? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Sep 2015 - 2:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त जमलंय. ये मला थोडं रंगीत ब्याकग्राऊंड पाहिजे होतं हं... ! :(

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

20 Sep 2015 - 2:54 pm | बोका-ए-आझम

बेष्ट गिफ्ट येव्हर!

मांत्रिक's picture

20 Sep 2015 - 3:56 pm | मांत्रिक

सगळ्या मस्त तुमचा टीशर्ट वाटला. ते मांजरू पण किती राजबिंडं दिसतंय! झक्कास राजेशाही थाटात बसलंय!

बोका-ए-आझम's picture

21 Sep 2015 - 12:13 am | बोका-ए-आझम

मा. अभ्या यांच्या खास देखरेखीखाली बसलेला बोका आहे तो. अंगरखा तर कातिल आहे!

बाबा योगिराज's picture

20 Sep 2015 - 3:09 pm | बाबा योगिराज

मस्त डिझ्यायीन.आवड्या.

चाणक्य's picture

20 Sep 2015 - 3:18 pm | चाणक्य

आयड्या....भारीच

प्रचेतस's picture

20 Sep 2015 - 3:28 pm | प्रचेतस

अगागागागा _/\_
महान हैस.

आमच्या टीशर्टावरील सुंदरी मात्र होयसळांची हो.

वाटलच. हिचं कुळ निघणारच. असो. सुंदर हाय ना? घेऊन टाक. :)

प्रचेतस's picture

21 Sep 2015 - 12:32 pm | प्रचेतस

आवडली हायेच म्हाराजा. :)

आनंदराव's picture

20 Sep 2015 - 3:30 pm | आनंदराव

लै भारी
अभ्या, लेका मिसळपाव खायला घालतो तुला
माझा पण टी सदरा बनव ना
मित्र ना तु आप्ला

अभ्या..'s picture

21 Sep 2015 - 12:25 pm | अभ्या..

आनंदराव, तुमचं नाव वाचून डोळ्यासमोर राजशेखर नाहीतर चंद्रकांत सूर्यकांतच उभे राहतेत हो. जरा लिव्हत जावा, पर्तिसाद देत जावा म्हणजे सोभाव कळेल आम्हाला. मग एक काय चार चार छाटण डिझाईनचे शर्ट देऊ. हाकानाका.

आनंदराव's picture

21 Sep 2015 - 1:42 pm | आनंदराव

अभ्या शेठ
अहो तुम्ही तर आम्हाला पार ब्लाक एन्ड व्हाईट करुन टाकले कि हो.
आमचा जन्म कलर टी व्ही च्या काळातला आहे.
मी फार आळशी आहे. त्यामुळे टंकायचा कंटाळा येतो.
पण तुमच्या सुचने चा विचार केला जाईल.
बाकी ते टी सदरा लक्षात असु द्य

ही ही ही

मांत्रिक's picture

20 Sep 2015 - 3:40 pm | मांत्रिक

ओ आमाला पन पायजे!

अभ्या..'s picture

22 Sep 2015 - 11:24 am | अभ्या..

येणार येणार. अवश्य येणार

सस्नेह's picture

20 Sep 2015 - 3:48 pm | सस्नेह

कामं कमी पडली वाट्टं ?
बाकी टीशरटांतून डोके दिसते आहे हो !

पैसा's picture

20 Sep 2015 - 4:02 pm | पैसा

मस्त आहेत एकेक!

आदूबाळ's picture

20 Sep 2015 - 4:15 pm | आदूबाळ

लोल लोल लोल!

श्रीगुरूजी, माई आणि अर्थात माझा टीशर्ट सर्वात जास्त आवडले!

चौकटराजा's picture

20 Sep 2015 - 4:27 pm | चौकटराजा

ह्याला म्हण्तात धन्द्यात्ली कल्पकता ! आता सोलापुरी आर्डरी देणं आलं !

काय एकेक डिझाईन्स! सुपर्ब!

स्रुजा's picture

20 Sep 2015 - 5:06 pm | स्रुजा

लोल .. कहर डीझाईन्स आहेत. माईंसाठीचं डीझाईन सगऴ्यात भारी :D

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2015 - 5:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

लै म्हंजे लैच भारी कल्पक डोस्कं हाय ह्ये ! काय येकेक जंक्शन डिज्जैन म्हंतो मी ! एक लंबर. आडर कश्काय द्याची वो ? =))

मित्रहो's picture

20 Sep 2015 - 5:42 pm | मित्रहो

एकदम जबरी कल्पना
लय भारी टी शर्ट

एक एकटा एकटाच's picture

20 Sep 2015 - 5:51 pm | एक एकटा एकटाच

सगळ्यांच अगदी परफ़ेक्ट मेचिंग केलय.

पद्मावति's picture

20 Sep 2015 - 6:05 pm | पद्मावति

ही ही ही ....मस्तं कल्पना! सगळेच टी शर्ट्स तर एक से बढ़कर एक!
माय फेवरेटस---माई, बोका आणि आदुबाळ...

चांदणे संदीप's picture

20 Sep 2015 - 6:30 pm | चांदणे संदीप

मालक, आमचीबी "कस्टम्बाईज्ड" टी शर्ट साठी ऑर्डर घेणार का??

कस्टम्बाईज्ड कामेच करतो आपण. :)

टी शर्टसवरील सगळी चित्रे बरोबर आहेत.

रेवतीम्याडमनी जोड्या लावा ह्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर जसा शेरा देतात तसा दिला आहे. मार्क कोण देणार?

सॉरी हां, अभ्या, १०० टक्के मार्क्स मिळवलेस गड्या!

मदनबाण's picture

20 Sep 2015 - 9:16 pm | मदनबाण

अभ्या... कल्पना आणि त्याचे प्रकटीकरण केवळ सुरेख आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोरया... :- दगडी चाळ

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2015 - 12:28 am | अत्रुप्त आत्मा

कल्पना आणि त्याचे प्रकटीकरण केवळ सुरेख आहे.

+++++१११११ http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/devils-horn-smiley-emoticon.gif

पां डुब्बा चा टी शर्ट कुठ्ठाय??? https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif ल्लूल्लूल्लूल्लू https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif दू दू दू दू दू अभ्या https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

प्रचेतस's picture

22 Sep 2015 - 12:43 am | प्रचेतस

कुणाला कशाचं तर तुम्हाला पांडुब्बाचं......

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2015 - 7:06 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/guns/shooting-two-guns.gif

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2015 - 7:08 am | अत्रुप्त आत्मा

दुत्त हलकट हत्ती! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

पांडुब्बाने इतक्या दिवसात काय दिले ते सांगता का गुरुजी? ;)

करत्याला उपाशी अन नाकर्त्याला ओठाशी ही पध्दत चांगलीय बर्का तुमची हितली.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2015 - 11:31 am | अत्रुप्त आत्मा

पांडुब्बाने इतक्या दिवसात काय दिले ते सांगता का @गुरुजी? ;)| >>| आमची मा घार! ;)
हा मुद्दा ध्यानातच नै आला. :-/

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2015 - 11:39 am | अत्रुप्त आत्मा

आणि हो.. मला माजा Tशर्ट आवडला..पण त्यावर साध्या स्मायली ऐवजी ही https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif
ल्लूल्लुल्लु करत मागे बगणारी स्मायली पण हवी! आणी तिच्यामागे 'दुत्त दुत्त!' असं लिहीलेलं हवं ! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

प्रभू-प्रसाद's picture

20 Sep 2015 - 9:58 pm | प्रभू-प्रसाद

डोस्क सोलापूरी...

खेडूत's picture

20 Sep 2015 - 10:09 pm | खेडूत

:)

कवितानागेश's picture

20 Sep 2015 - 11:09 pm | कवितानागेश

=))

कैलासवासी सोन्याबापु's picture

20 Sep 2015 - 11:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

हाहाहाहा!!! तूफ़ान!!! श्रीगुरुजी अन माई आवडली कॉन्सेप्ट

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Sep 2015 - 11:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अभ्या भौ जब्राट आयड्या मला स्पॅरो वाला, बॅट्यावाला, सगा, सूड आणि जिल्बुच्चा वाले टीशर्ट भयानक आवडले =)) देउ काय ऑर्डर :)!!

अभ्या..'s picture

21 Sep 2015 - 12:27 pm | अभ्या..

कॉन्ट्री काढा आधी. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 Sep 2015 - 7:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

करुयात की काय हरकत नाही. कट्ट्याला काँट्री :)

बहुगुणी's picture

21 Sep 2015 - 3:25 am | बहुगुणी

जबरदस्त निरीक्षणशक्ती आहे!

मनीषा's picture

21 Sep 2015 - 7:02 am | मनीषा

सगळे 'श्याम्पल्स' भारी ..

प्रमोद देर्देकर's picture

21 Sep 2015 - 9:07 am | प्रमोद देर्देकर

खुप छान. टीशर्ट आवडले.

नाखु's picture

21 Sep 2015 - 9:32 am | नाखु

साक्षात दं ड व त. सर्व टीशर्ट ज्याम आवडले. फक्त एकच मागणी आहे. आपल्या चौकटराजांनी काय बनेल होऊन घालून फिरायचं का ? त्यांच्या साठी एक डिझाईन करणे.

ता;कः "बुवा दिवेकरा याहो, स्मायल्या मला भेट द्या हो" याचे स्टीकर करून हवे आहेत. पुढच्या कट्ट्याला वाटायचे आहेत.आधीक तपशील चिमणकडे आहे.

ना द खु ळा

श्रीरंग_जोशी's picture

21 Sep 2015 - 10:08 am | श्रीरंग_जोशी

अभ्या तुझ्या निरिक्षण कौशल्याला व कल्पकतेला दाद देतो.

पुभाप्र.

चौकटराजा's picture

21 Sep 2015 - 10:16 am | चौकटराजा

एक हिरवा पोपट उडत आहे त्याच्या गळ्यात दोरी बांधलेली .ती दोरी एका हातात त्या हातात बाङ्गड्या .पोपटाच्या तोन्डी वाक्य "अगं , फडके रोड वर फकस्त चक्कर मारून येतोय बरं !!!!"

बोका-ए-आझम's picture

21 Sep 2015 - 10:35 am | बोका-ए-आझम

तुम्ही डोंबिवलीचे की काय?

चौकटराजा's picture

21 Sep 2015 - 2:20 pm | चौकटराजा

पिंची चा हाय पन भक्ति शक्ति पेक्षा फडके रोड वर हिर्वळ आपलं मंड ई लै भारीच !

अभ्या..'s picture

21 Sep 2015 - 12:28 pm | अभ्या..

ऑर्डर घेतली आहे पोपटराव. ;)

देशपांडे विनायक's picture

21 Sep 2015 - 10:31 am | देशपांडे विनायक

+++++

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2015 - 10:53 am | चौथा कोनाडा

व्वा, भन्नाट कल्पना अन फर्मास लेखन !
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.

आमच्या तर्फे पिंचिवाडीमध्ये आल्यावर अभ्याला विशिष्ट स्पेस मध्ये नेउन बार दाखवण्याचाkकार्यक्र्म करुन सत्कार करण्यात येइल.

वेल्लाभट's picture

21 Sep 2015 - 11:01 am | वेल्लाभट

क्लास! एक से एक

नीलमोहर's picture

21 Sep 2015 - 11:03 am | नीलमोहर

जास्त आवडलेले - माई, शाही बोका,

डिझाईन फिल्डातले दिसताय..
(सेम पिंच)

हाय का? असे कामून इचारतायसा?

खरडफळ्यावर चारयेळा आम्ही केलेल्या बॅनरचे कौतुक करताय अन आता इचारताय व्हय डिझाईन फिल्डातले का म्हणून?

नीलमोहर's picture

21 Sep 2015 - 2:36 pm | नीलमोहर

पण आम्ही तर एकदाच कौतुक केले,
तुम्ही चार वेळ येऊन का बघून गेलात ;)

बाकी छान काम करताय.
बायदवे, आमचीही रोजीरोटी फोटोशॉप मायबाप तर्फे येते :)

शंतनु _०३१'s picture

21 Sep 2015 - 12:07 pm | शंतनु _०३१

कहर
डोकॅलिटीला +११११११११११११

मुक्त विहारि's picture

21 Sep 2015 - 12:17 pm | मुक्त विहारि

+१ विषयाला...

+१ सदस्य निवडीला

+१ योग्य ते डिझाईन निवडीला.

अनिता ठाकूर's picture

21 Sep 2015 - 1:30 pm | अनिता ठाकूर

तो राजेशाही बोका........त्याची ती बसायची पोझ.. ते चेहेर्‍यावरचे भाव....हाताचा अँगल...! सुपर्ब...सुपर्ब!!!

मीता's picture

21 Sep 2015 - 1:59 pm | मीता

बोका tshirt खूप आवडला .

नि३सोलपुरकर's picture

21 Sep 2015 - 2:47 pm | नि३सोलपुरकर

आमचा अभ्या ना... एक लंबर माणूस बघा .

आधी सोलापूर हे चादरीसाठी प्रसिद्ध होते ,इथून पुढे अभ्याने डिझाईन केलेल्या टीशर्ट प्रसिद्ध होईल ,असे भाकीत नोंदवितो.

सानिकास्वप्निल's picture

21 Sep 2015 - 3:04 pm | सानिकास्वप्निल

हाहाहा लई भारी !!
ग्रेट आहेस अभ्या :)

gogglya's picture

21 Sep 2015 - 3:09 pm | gogglya

एक नंबर... मि पा चे टी-शर्ट बनवण्याचे सर्वाधिकार घेऊन टाका! आणी एक टी-शर्ट कट्टा होऊ द्यात...

हाहाहाहा.. मस्तच डिसाईन्स आहेत सगळ्या. धन्यवाद :)

भन्नाट आहेत. पण तुझा टी-शर्ट कुठे आहे यात?

अभ्या..'s picture

22 Sep 2015 - 12:03 am | अभ्या..

काय करणार पिंगू.
हलवायाला डायबेटीस :(

कपिलमुनी's picture

21 Sep 2015 - 3:21 pm | कपिलमुनी

बुवांच्या टी शर्टवर वैजु वैनी आणि जुळे !!
हाहाहा!
बुवा श्रावणात तुला फ्रुट सॅलड देणार

टीशर्ट लैच आवडल्या गेला आहे. पुढल्या खेपी प्रिंटवून आणणे. अ‍ॅब्जवाल्या टिशर्ट्चा आयडी अंमळ चुक्याच!! ;)

अन्या दातार's picture

22 Sep 2015 - 2:33 pm | अन्या दातार

अ‍ॅब्जवाल्या टिशर्ट्चा आयडी अंमळ चुक्याच!! ;)

१००% सहमत. =))

सर्वच डीझाइन्स आवडलीत. भारी आयड्या रे अभ्या..

मेरा टी शर्ट किधर हय???

मेरा टी शर्ट किधर हय???

कोण आपण? धन्यवाद!!

मस्त मस्त डिझाईन एकएक! माई,बोक्या,एक्का काका भारीच्च.
सगळ्याइ भारी पिशवि बरका.आवडलीच...

विलासराव's picture

21 Sep 2015 - 4:22 pm | विलासराव

झक्कास आहेत एकेक मास्टरपीस.
आपल्या रॉयल कॅफेचा बोर्ड, मेनू आणि टी शर्ट किंवा ड्रेस डिजाइन करून दया.
अर्थातच पेड़.

लग्गेच हो विलासराव. तुम्ही हुकूम करायचा अन आम्ही डिझाईन करायचं.
हे पाहा आम्हाला दिसलेलं तुमचं रॉयल कॅफे.
काय म्हणता? आवडलं की नै?
a

किसन शिंदे's picture

21 Sep 2015 - 6:18 pm | किसन शिंदे

मस्त लूक दिसतोय कॅफेचा.

सूड's picture

21 Sep 2015 - 6:48 pm | सूड

मस्तच राव!!

अवांतरः पोर्ट्रेट पण करतोस का तू?

अभ्या..'s picture

22 Sep 2015 - 12:02 am | अभ्या..

पोर्ट्रेट पण करतोस का तू?

ल्याण्डस्केप कर्तो पोर्ट्रेट असलेल्याला. (प्रिंटरसेटींग मध्ये)
करतो बे. ६ वर्शे पध्दतशीर चित्रकला महाविद्यालय केलेय.

तसं नाय रे, व्यक्तिचित्र वैगरे अशा अर्थाने म्हणतोय. आणि प्रिंटेड नाही म्हणत मी.

विलासराव's picture

21 Sep 2015 - 7:24 pm | विलासराव

भन्नाट!!!!!!
दंडवत स्वीकारा भौ.

स्वारी, मिपा चेकवलोच न्हवतो आत्ताच बगिट्लो............

अभ्या लेका काय टीषर्ट काढलायस का दन्का!!!!!! नादच खुळा बग बे. असाच येखादा कष्टममेड बट्टमण्ण षर्ट बणवूण घेण्याचा विच्यार हाये.

बॅटमॅन's picture

21 Sep 2015 - 4:27 pm | बॅटमॅन

आदूबाळ, माई, श्रीगुर्जी, कप्तान, प्रचेतस आणि बुवा यांचे षर्ट इषेष आवडले.

चिगो's picture

21 Sep 2015 - 5:44 pm | चिगो

काय धावते राजे कल्पनाशक्ती तुमची? जबराटच.. सलाम !! माई, गुरुजी आणि तो बॉडी-डिल्बर वाला टी-शर्ट लै म्हंजे लैच भारी आहे..