जागतीक मंदी
एके काळी होता इथे माणसांचा वांधा
पोटा पुरता नाही आता त्यांना काम धंदा
कधी नाही झालं , हे काय झालं यंदा
अशा " मंदीवर " कुणी उपाय तरी सांगा
आधी पाऊस पडेना , म्हणुन वाढ्ली महागाई
तिला पचवेल , आता आली मंदी बाई
व्यापायांना धंदा नाही ,झाली कामाची टंचाई
रोजच्या विचीत्र बात्म्यांनी डोकं चकावुन जाई
मोठमोठया देशांमध्ये कामं राहिली नाही
हिंडुन फिरुन लोकं पुन्हा मायदेशी येई
कमी पगाराची त्यांना सवय राहिली नाही
काही तरी केल्याशिवाय पोट भरणार नाही
काम नाही मिळाले तर घर कसं चालेल
खोली भाडं किराणा कसा बरं चुकेल
खरंच काम नाही हे मनाला फकत पटेल
पण काहीतरी खाल्याशिवाय पोट कसं भरेल
मालकांचं मन उदयोगासाठी तळतळतंय
कामगारांच अंग कामासाठी सळसळतंय
परिस्थिती नुसार हे सारं काही पटतंय
पण काय करणार
धरलं तर चावतंय , सोडलं तर पळतय.
श्री. राजाभाऊ गायकवाड
शिवाजीनगर ,सातपुर , नाशिक.
प्रतिक्रिया
15 Dec 2008 - 2:56 pm | बैलोबा
आधी पाऊस पडेना , म्हणुन वाढ्ली महागाई
तिला पचवेल , आता आली मंदी बाई
व्यापायांना धंदा नाही ,झाली कामाची टंचाई
रोजच्या विचीत्र बात्म्यांनी डोकं चकावुन जाई
खरं आहे !