क्या हुवा तेरा वादा आणि शीना बोरा मर्डर केस

नितीनचंद्र's picture
नितीनचंद्र in जनातलं, मनातलं
18 Sep 2015 - 5:29 pm

मुंबई पोलिस कमीशनर राकेश मारीया जो पर्यंत चार्ज मधे होते तो पर्यंत शीना बोरा मर्डर केस मधील उलट सुलट बातम्या, संभाव्य आरोपी इंद्राणी मुखर्जी तीचे तीन पती, ड्रायव्हर आणि अन्य यांचे धक्कादायक खुलासे यानी वर्तमानपत्रांची पाने आणि उपग्रह वाहिन्यांचे अनेक तास खर्ची पडले.

माकडीण आपल्या मुलाला नाकातोडांत पाणी जाऊ लागल्यावरच नाईलाजाने पाण्याखाली दाबते पण सामाजीक प्रतिष्ठेच्या खुळचट कल्पना घेऊन एक आई आपल्या मुलीला मारत असेल अशी कल्पना हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या तद्दन गल्लाभरु चित्रपटांच्या लेखकांच्या मनाला सुध्दा स्पर्शुन गेली नसावी.

चित्रपटातील कल्पनातुन खुन घडतात किंवा मुळच्या केसवर आधारीत सिनेमा/ सिरीयल्स बनतात हे एक वास्तव आहे.

रागाच्या पोटी एखाद्याला मारहाण करणे आणि पध्दतशीर खुन करणे हा प्रांतच मुळी महिलांचा नाही. त्यातुनही नियोजीत खुन आणि प्रेताची विल्हेवाट लावणे हा विभाग तर त्यांचा नाहीच. अश्यावेळी सनसनाटी निर्माण करणारी एक खुनाची कहाणी आणि त्या मागे एक महिला असणे ही बातमी जरा जास्त वेळ रेंगाळणार ह्यात नवल नाही.

ह्या बातमीचा मागोवा घेताना अतिशय साम्य असलेली एक हिंदी सिरीयल " क्या हुवा तेरा वादा "आठवुन गेली ज्यात मोना सिंग उर्फ जस्सीची प्रमुख भुमीका होती.

प्रदिप सिंग ( पवन शंकर ) आणि मोना सिंग ( मोना सिंग ) आणि त्यांची तीन मुले बुलबुल, रानो आणि राजबीर यांच्या सुखी आयुष्यात एक तिसरी औरत अनुष्का ( मौली गांगुली ) येते जी प्रदिप सिंगची कॉलेजमधली मधली मैत्रीण आणि त्याची बॉस असते. प्रदीप मोनाला घटस्फोट देतो आणि मोना मुलांना मोठे कशी करते आणि अनुष्का तिच्या आयुष्यात काटे कसे पेरत रहाते ही खरी मध्यवर्ती कहाणी वाटावी अशी ही हिंदी सिरीयल ३० जानेवारी २०१२ ला सुरु होऊन २३ मे २०१३ पर्यंत सोनी चॅनलवर सुरु होती.

ह्या सिरीयलचे आणि शीना बोरा मर्डल केस मधली साम्य स्थळे अशी दिसतात.

१. मधेच एक व्यक्ती अनुष्काच्या आयुष्यात येते ज्याची ओळख अनुष्का आपला कझीन म्हणुन करुन देते ज्याच सिरीयल मधले नाव शौर्य मित्रा ( चेतन हंसराज ) असते. अनुष्का आपल्या कंपनीमधे चोरी करते आणि ती जेव्हा उघडकीस येते तेव्हा शौर्यवर आळ घालते. पुढे ती स्वतः शौर्यचा खुन करते आणि त्याचा आळ प्रदिपवर येतो. दरम्यान अनुष्का प्रदिपपासुन प्रेग्नंट होते आणि त्यांना अनिका नावाची मुलगी होते जी पुढे लहानाची अमेरीकेत मोठी होऊन येते.

प्रदिप न केलेल्या खुनाच्या आरोपात गोवला जातो आणि त्याला मोना सिंग सोडवते. एका कठीण प्रसंगी प्रदीप मरतो आणि त्याच्या खुनाच्या आरोपाखाली अनुष्का जेल मधे जाते.

२. अनुष्का सजा भोगुन आल्यावर एका ऑस्ट्रेलियन नागरिकत्व असलेल्या श्रीमंत पण वयाने खुप मोठ्या असलेल्या व्यक्तीशी बलवीर भल्ला ( दिपक केजरीवाल )पैशासाठी लग्न करते आणि ते ऑस्ट्रेलियात राहु लागतात.

बलवीर भल्ला एकदा आजारी पडुन कोमात जातो आणि त्याच्या सर्व संपत्तीची उत्तराधिकारी बनुन अनुष्का नव नव्या चाली रचुन मोना आणि तिच्या मुलांना तिच्यापासुन तोडण्याचा प्रयत्न करत रहाते.

३. अनिका मोठी झाल्यावर जेव्हा तिला तिच्या आईच्या काळ्या कर्माविषयी समजते तेव्हा ती आईला सोडुन मोना सिंग कडे रहायला येते.

अजुन बरीच नात्यांचा गोतावळा आणि भावसंबंधांचे ताणणे करत ही सिरीयल संपते.

या सिरीयलची दुसरी नायिका अनुष्का हीचे दोन विवाह आणि एक बॉय फ्रेंड ( प्रदीप ) या पासुन झालेली मुलगी अनिका. तीचे आणि तिच्या आईचे बिघडलेले संबंध. अनुष्काचा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी संपत्ती साठी झालेला विवाह . तिचे नियोजन बध्द खुनाच्या केस मधे अडकणे ही सारी साम्ये शीना बोराच्या केसशी मिळती जुळती आहेत. मोना सिंगची मोठी मुलगी बुलबुल टीव्ही न्युज चॅनलमधे नोकरी करणे हे सुध्दा साम्य स्थळ आहे.

या सिरीयल निर्मीतीचा काळ सुध्दा शीना बोराचा संभाव्य खुनाच्या तारखेच्या दरम्यान असणे. इंद्राणी मुखर्जी आणि त्यांचे तिसरे पती जे वयाने मोठे आहेत आणि एका उपग्रह वाहिनीचे मालक होते, क्या हुवा तेरा वादा च्या निर्मीतीत प्रमुख सहभाग असलेल्या बालाजी टेलीफिल्म शी काही काळ संबंधीत होते हे साम्य आश्चर्यात टाकणार आहे.

अनेक कलाकारांना अवार्ड मिळालेली ही सिरीयल मात्र माझ्या मनात आणखी काही साम्य स्थळे आहेत का याचा शोध घेत रहाते.

समाजविचार

प्रतिक्रिया

भिंगरी's picture

18 Sep 2015 - 6:15 pm | भिंगरी

बापरे!!!!!!!!!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 Sep 2015 - 7:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान रे नितीन.दोन-चार दिवसांपूर्वी ह्यावर मंडळात चर्चा चालली होती.
चॅनेलला दोन मोठ्या उद्योगपतींकडून अवैध पैसा मिळाला होता.राकेश मारिया त्यांना चौकशीला बोलावणार होते.राजकीय पक्षांत उद्योगपतींची उठबैस असल्याने मारियांची बदली झाली असे म्हंटले जाते.

बोका-ए-आझम's picture

18 Sep 2015 - 8:11 pm | बोका-ए-आझम

रागाच्या पोटी एखाद्याला मारहाण करणे आणि पध्दतशीर खुन करणे हा प्रांतच मुळी महिलांचा नाही. त्यातुनही नियोजीत खुन आणि प्रेताची विल्हेवाट लावणे हा विभाग तर त्यांचा नाहीच.>>>

१.अंजनाबाई गावित आणि तिच्या दोन मुली - सीमा आणि रेणुका ज्यांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला आहे - त्यांनी लहान मुलांचं अपहरण करुन त्यांचा भीक मागण्यासाठी वापर केला आणि नंतर त्यांची निर्घृणपणे हत्या केली.
२. मारिया सुसाईराज या कन्नड अभिनेत्रीने आपला प्रियकर जेरोमच्या मदतीने नीरज ग्रोव्हरचा खून केला आणि प्रेताची विल्हेवाट लावायचा प्रयत्नही केला.

ही दोन गेल्या पंधरा वर्षांमधली ठळक उदाहरणं. शिवाय अनेक हुंडाबळी आणि आत्महत्येला प्रवृत्त करणं या संदर्भात असलेल्या प्रकरणांमध्ये स्त्रिया आरोपी आहेत. स्त्रिया पुरूषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत आणि हे जितकं औद्योगिक क्षेत्र, अर्थकारण , राजकारण, समाजकारण, लेखन, पत्रकारिता, कला, क्रीडा यांच्या बाबतीत खरं आहे तितकंच ते गुन्हेगारीच्या बाबतीतही खरं आहे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Sep 2015 - 9:43 pm | कैलासवासी सोन्याबापु

जियो! अगदी हीच उदाहरणे टाइप करायला आलो होतो

+१११

स्फोटक दारूगोळा ठासून भरलेला आहे.
इन्द्राणी मुखर्जीने टोटल किती लग्न केली याचा खरा आकड़ा सांगा आणि बक्षिस मिळवा अशी नवी स्पर्धा कोणी तरी काढतंय म्हणे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Sep 2015 - 9:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

भैयाजी,

ई तो सोनपुर मेला के नौटंकी से भी भद्दा प्रकार हाउ!!

प्यारे१'s picture

18 Sep 2015 - 10:18 pm | प्यारे१

जाना देव! असतात काही 'प्रामाणिक' लोक. ;)

मारवा's picture

18 Sep 2015 - 10:19 pm | मारवा

घर दार गोठा पाणवठा गाव खेडी क्यान्टीन रेस्टॉरन्ट टपरी देवालय शौचालय कार्यालय धुम्रपानालय मदिरालय चेपु मसं व्हॉट्स अप थेटर थिएटर स्कुल कॉलेज कुठे कुठे इंद्राणी वर चर्चा चालु नाही आहे ?
इंद्राणी वरील चर्चा म्हणजे असली ब्रह्म आहे ते सर्व चराचराला व्यापुन आहे पण तरीही वेगळ आहे.
ते सर्वत्र आहे नित्त्य आहे बुध्दु आहे.
त्या शिवाय जगण व्यर्थ आहे गालिब म्हणाला होता कान लगाने दे इधर या ऐसी जगह बता जहॉ इंद्राणी की केस नाहो ?
जगात एकच शेवटची जागा होती मिपा जिथे इंद्राणी नव्हती पोहोचली
पण नाही हा ही एक भ्रम च होता म्हणा अखेर
इथे ही इंद्राणी होतीच तिच अस्तीत्व जाणवल नाही कारण माया
माया महाठगिणी गो महाठगिणी
अखेर चंद्रोदय झाला च
आणि पौर्र्णिमेच्या चंद्र प्रकाशात ब्रह्म कमळ उमलल
सेल्फी लो भई सेल्फी