गावातील भय(गुढकथा)

दिनु गवळी's picture
दिनु गवळी in जनातलं, मनातलं
14 Sep 2015 - 8:33 pm

गावात सगळीकडे निरव शांतता होती. रात्रीचे ११ वाजले होते. मागच्या दोन दिवसांपुर्वी गावात खुपच भयानक घटना घडली होती, गावातला नाना पिठे नावाचा पाटील गळफास घेऊन मेला होता.गावातले लोकं त्याला
नफुंसक म्हणत म्हणुन वैतागुन त्याने आत्महत्या केली .पण आता गावात मात्र चित्रविचीत्र गोष्टी घडु लागल्या पहिल्याच रात्री गावातील वडाखाली सुन्याने पाटलाला बघितले तेव्हापासुन त्याची तब्येत बिघडली .तर दुसर्या रात्री गावात वेगवेगळे आवाज ऐकु येऊ लागले .. कुत्री तर खुपच भुंकायची मांजराचा सगळीकडे सुळसुळाट होतो.आज ही तिसरी रात्र होती, ११ वाजुन गेले होते ... हवेत एक प्रकारचा गारवा होता.तसेच अंगावर काटे येतील असे वातावरण होते.सारे गाव भितीच्या छायेत झोपले होते.
पण एकच व्यक्ती या गावातील गल्लीबोळात भटकत होती. पिळदार शरीर, मजबुत बाहु अंगावर काळी शाल पांघरलेला तरुण युवक म्हणजेच रवी . हा साधारण २३ वर्षाचा होता.
रवी कालच पुण्यावरुन घरी आला होता . तो शहरात एका कॉलसेंटर मध्ये काम करत होता. पाच दिवसांच्या सुट्टया घेऊन तो सहज आपल्या आईला भेटायला आला होता. रवी लहान असतांना त्याचे बाबा आजारात वारले .तेव्हापासुन त्याच्या आईनेच त्याला लहानाचे मोठे केले. आई घरी एकटीच असायची .काल गावी आल्यावर रवीला गावातील गोष्ट कळाली म्हणुन त्याने याचा शोध घेण्याचे ठरविले.त्याने गावातील मित्रांची सोबत मागितली पण कुणीच या साठी तयार झाले नाही. म्हणुन रवी आज एकटाच या कामगिरी वर निघाला होता.तेही आईला न सांगता गुपचुप. त्याची नजर सभोवार फिरत होती.फिरत फिरत तो वडाच्या झाडाखाली येऊन थांबला अजुन तरी त्याला काही भितीदायक दिसले नव्हते. पण त्याच वडाच्या झाडावरुन एक असुरी नजर रवीवर लक्ष ठेवुन होती. पण रवीला याची काहीच कल्पना नव्हती. इतक्यात एक थंडगार हवेचा झोत रवीच्या अंगाला स्पर्श करुन गेला . क्षणभर रवीला पण आपल्या आजुबाजुला काहीतरी आहे असा भास झाला. इतक्यात त्याचे लक्ष वडाच्या झाडावर गेले....
क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

14 Sep 2015 - 8:37 pm | मांत्रिक

वाचतोय! पुभाप्र!!!

जव्हेरगंज's picture

14 Sep 2015 - 8:38 pm | जव्हेरगंज

लवकर टाका पुढचा भाग,
ऊत्सुकता ताणलिये.

चित्रगुप्त's picture

14 Sep 2015 - 8:56 pm | चित्रगुप्त

बापरे... नफुंसक पाटलाचे भूत म्हणजे भयानकच प्रकार असणार पुढे.

.
...
.
कल्पनेनेच हुडहुडी भरलीय...

एक एकटा एकटाच's picture

14 Sep 2015 - 9:01 pm | एक एकटा एकटाच

मस्त फोटोज

प्यारे१'s picture

14 Sep 2015 - 9:35 pm | प्यारे१

देखणे आलेत ओ फोटो.
कॅमेरा सेटींग्ज स्वॅप्स ना विचारावीत काय? ;)

दिनु गवळी यांना पुनरागमनाबद्दल पुस्प्गुच

दिनु गवळी's picture

14 Sep 2015 - 8:57 pm | दिनु गवळी

ऊदयाच टाकतो

मांत्रिक's picture

14 Sep 2015 - 9:15 pm | मांत्रिक

ओ टाका हो लवकर! मस्त लिवताय!

होबासराव's picture

14 Sep 2015 - 8:59 pm | होबासराव

फुंस फुंस :))

दिनु गवळी's picture

15 Sep 2015 - 10:34 am | दिनु गवळी

वाचा की रावं

दिनु गवळी's picture

17 Sep 2015 - 6:00 am | दिनु गवळी

दुसरा भाग टाकलाय हो !!!!!!!!!!!!!!!