-सकाळवरील "गुगलच्या' जाहिरातींबद्दल निवेदन

ईसकाळ's picture
ईसकाळ in जनातलं, मनातलं
13 Dec 2008 - 9:50 pm

मागील एक दोन दिवसांत "ई-सकाळ' वाचत असताना जगातील काही भागातील काही वाचकांच्या पाहण्यात आक्षेपार्ह जाहिराती आल्या. मूळच्या "गुगल ऍडसेन्स'मार्फत प्रसिद्‌ध करण्यात येणाऱ्या या जाहिराती आमच्या वाचकांच्या सूचनेनंतर काढून टाकण्याचा निर्णय "ई सकाळ' व्यवस्थापनाने घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे.

मुळात आक्षेपार्ह जाहिराती प्रसिद्ध करणे ही गोष्ट सकाळ किंवा "ई-सकाळ'च्या जाहितरातविषयक धोरणात नाही असे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. म्हणूनच या सारख्या जाहिराती भविष्यात "ई-सकाळ'वर झळकणार नाहीत या बाबत अधिक काळजी घेण्याचा ई-सकाळचा प्रयत्न राहिल.

संबंधित जाहिरातींसाठी मध्यंतरी"ई-सकाळ'ने "गुगल ऍडसेन्स'बरोबर करार केला होता. त्यानुसार या जाहिराती वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्या. मुळात गुगलने कोणत्या प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध कराव्या याची यादी ई-सकाळतर्फे देण्यात आलेली होती. त्यात ई-सकाळच्या धोरणात न बसणाऱ्या, आक्षेपार्ह अशा जाहिराती वगळण्यात आल्या होत्या. मात्र कोणत्या भागात कोणत्या, कोणत्या वेळेला, कोणत्या जाहिराती दिसाव्यात याचे गुगलचे काही निकष आहेत. त्या नुसार अलीकडच्या दोन दिवसांत अशा आक्षेपार्ह जाहिराती काही ठिकाणी प्रसिद्‌ध झाल्या.

तथापि पुणे आणि आसपासच्या शहरात या जाहिराती अद्यापही पाहण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळेच आम्हालाही त्या "ई-सकाळ' कार्यालयात दिसू शकल्या नाहीत. असे असले तरीही "ई-सकाळ'वर मनापासून प्रेम करणाऱ्या काही वाचकांनी त्याबद्दल आम्हाला ई-मेलद्वारे सूचना केल्या. त्यामुळे आम्हाला याबद्दल समजू शकले. त्यानंतर लगेचच "ई-सकाळ' परिवारातर्फे या जाहिरातीच काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

आपण "ई-सकाळ'च्या प्रेमापोटी नियमितपणे "ई-सकाळ'ला भेट देतात आणि आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया आम्हाला वेळोवेळी कळवत असता त्याबद्दल ई-सकाळ परिवार आपला आभारी आहे. आपल्या आवडत्या ई-सकाळबद्दल यापुढेही काही सूचना, तक्रारी किंवा प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा. आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत.

आमचा ई-मेल - webeditor@esakal.com

समाजप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

आपल्या या स्पष्टीकरणाने नकळतच आम्हा मिपाकरांच्या मनात जे उलटसुलट विचार चालले होते त्यास आळा बसेल असे सांगावेसे वाटते.

मटा / टाईम्स असेच धोरण स्विकारेल तो दिवस खरा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Dec 2008 - 9:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या आवडत्या ई-सकाळबद्दल यापुढेही काही सूचना, तक्रारी किंवा प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा. आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत.

ई-सकाळ आवडतोच ! असल्याच काही सुचना तर एक वाचक म्हणून आम्ही आपणास नक्की पत्र टाकू . त्याचबरोबर इथेही उत्तम सामाजिक विचार / उत्तम भावना व्यक्त होत असतात. त्या जर आपल्या दैनिकाच्या माध्यमातून अधिक लोकांपर्यंत पोहचल्या, शासनापर्यंत पोहचल्या तर मिसळपाव आणि दै. सकाळचा एक वाचक म्हणूनही तितकाच आनंद होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन's picture

13 Dec 2008 - 10:01 pm | छोटा डॉन

( गुगल ऍडसेन्सच्या जाहीराती प्रकारांच्या ) अजाणतेमुळेपण का होईना झालेली चुक आपल्या "धोरणात व तत्वात" बसत नाही आणि ह्या गोष्टी आपल्या संस्कॄतीच्या नैतीकतेच्या व्याख्येत बसत नाहीत ह्याची योग्य वेळी दखल घेऊन त्यावर सत्वर कारवाई करणार्‍या "ई-सकाळ" चे अभिनंदन आणि आभार ...

आमच्या मनात ह्यामुळे सकाळ पेपरविषयीचा आदर जरा जास्तीच वाढला आहे.
ह्यापुढेही भविष्यात आपल्याकडुन आम्ही अशास "सतर्कतेची आणि परिपक्वतेची" आपेक्षा नक्कीच ठेऊ शकु अशी आम्हाला खात्री आहे.
तुर्तास आपले अभिनंदन करतो व आभार व्यक्त करुन इथेच थांबतो ...

हा विषय चर्चेला आणुन व त्यावर सविस्तर चर्चा घडवुन ह्या अजाणाता झालेल्या चुकीला वाचा फोडुन "मिडीया व सर्वसामान्य जनतेचा दबाव" किती महत्वाचा असतो ह्याचा पुन्हा एकदा प्रत्यय देऊन "जनमताच्या रेट्याचे" महत्व स्पष्ट करुन दाखवल्याबद्दल "समस्त मिसळपाव्.कॉम च्या जनतेचे" सुद्धा अभिनंदन व आभार ...
मित्रांनो आता आपलीसुद्धा जबाबदारी वाढली आहे. :)

छोटा डॉन
" अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? "
[ अपने अड्डे पे जरूर आना ,

विनायक पाचलग's picture

13 Dec 2008 - 10:22 pm | विनायक पाचलग

आपल्या प्रतिक्रियेने सर्व शंका मिटल्या आणि हो सकाळ्ने देखील सतत मिपाकडे लक्ष द्यावे आजकाल मिपावर अनेक विषय चर्चेला येतात्.याशीवय अनेक अनिवासी भारतीयाना व्यक्त होण्याचे हे साधन आहे आजकाल लोक पेपर्कडे लेख पाठवणॅ इ.भानगडीत पडत नाहीत्.पण या सहकार्यामुळे दोघांचाही फायदा होइल.
आणि हो इथले लेख हे उच्च दर्जाचेच असतात आपण एकदा जुन्या लेखांवरुन नजर टाकावी.
मध्यंतरी सामनालाही येथील लेखाची व चर्चेची दखल घ्यावी लागली होती.
आपला,
कायमस्वरुपी सकाळ वाचक
(मिपाचा हितचिंतक)कोल्हापुरी दादा

वेताळ's picture

13 Dec 2008 - 10:48 pm | वेताळ

मागे लेका तु लोकमत वाचत होतास व आज एकदम सकाळ चा कायमस्वरुपी वाचक?हे काय दाद्या?
निखिल भाउना वैट वाटल ना.
वेताळ

विनायक पाचलग's picture

13 Dec 2008 - 11:07 pm | विनायक पाचलग

वेताळा मी लोकमत वाचत नाही.मी काय मुर्ख नाही.
मी दररोज वाचतो-सकाळ्,लोक्सता.
शुक्रवारी वाचतो-लोकप्रभा
शनिवारी वाचतो-सा.सकाळ
दर महिन्याला-तनिष्का फक्त चाळतो
आणि कधीतरी प्रीमीअर ,आणि नात्यरन्ग
आणि हो आय्.बी.एन. लोक्मत रोज बघतो.फक्त आजचा सवाल आणि शनिवारी ग्रेट भेट
बस

टारझन's picture

14 Dec 2008 - 5:14 am | टारझन

एटूझेड पेप्र वाचल्याबद्दल हाबिणंदण दादासाहेब.
लहाणपणी (जवळपास ८-१० वर्षांपुर्वी )आम्ही पण समदे पेप्र चाळायचो .. पण त्यात "काही पिक्चर्स " ची नावं (आणि चित्र) पहाण्याकरताच .. तेंव्हा तेवढं पाहून पण लै लै भारी वाटायचं

अवांतर : ई-सकाळचे अभिणंदण

-पुणेरी दादा

विकास's picture

13 Dec 2008 - 11:54 pm | विकास

इ-सकाळने येथील तसेच त्यांना येणार्‍या इतर इ-मेलची दखल घेऊन स्वतःवे वेगळेपण सिद्ध केले आहे. आपल्या या वाचकाभिमुखते बद्दल धन्यवाद!

चतुरंग's picture

13 Dec 2008 - 11:57 pm | चतुरंग

लोकाभिमुख वृत्तपत्राची परुळेकरांची परंपरा जपणारे म्हणून नाव राखलेत!

चतुरंग

विसोबा खेचर's picture

13 Dec 2008 - 11:58 pm | विसोबा खेचर

आपल्या संपूर्ण निवेदनात मिसळपावबद्दलही दोन कृतज्ञतेचे शब्द जर आले असते तर तो आपल्या मनाचा मोठेपणा ठरला असता..!

असो,

ईसकाळ परिवाराला माझ्या व आमच्या संपूर्ण मिसळपाव परिवारतर्फे मन:पूर्वक शुभेच्छा..!

आपला,
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

असो. सुधारणा होत असतात. शुभेच्छा!

चतुरंग

सखाराम_गटणे™'s picture

14 Dec 2008 - 9:49 am | सखाराम_गटणे™

सहमत

----
सखाराम गटणे

पाषाणभेद's picture

14 Dec 2008 - 1:17 am | पाषाणभेद

आपले (जाहीराती न स्विकारणारे ) तात्या, ई-सकाळवरील खुलासा आणि मा.मनोहर पर्रिकर -गोव्याचे माजी मुख्यमंत्री (पहा: पुढील धागा ( http://www.misalpav.com/node/5056 )), हे म्हणजे कलियूगातपण तत्व पाळणारे तत्व्वेत्तेच नव्हे काय ?

अवांतर: आता मि. पा. ने पण "मि. पा. ईफेक्ट" असे लिहीले पाहीजे. ;)

-( सणकी )पाषाणभेद

शंकरराव's picture

14 Dec 2008 - 3:08 am | शंकरराव

तात्या चे म्हणने अगदि योग्य आपल्या संपूर्ण निवेदनात मिसळपावबद्दलही दोन कृतज्ञतेचे शब्द जर आले असते तर तो आपल्या मनाचा मोठेपणा ठरला असता..!
सहमत